Maai Bappa Vithala | Lyrical Song | Ajay Gogawale, Atul Gogawale | Nitin-Prasad, Mukund Bhalerao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला..
    Audio Credits :
    Singer: Ajay Gogawale
    Voice Over: Atul Gogawale
    Music: Nitin Ugalmugale, Prasad Shinde
    Lyrics: Mukund Bhalerao
    Music Arrangements And Flute: Ankush A. Boradkar
    Rhythm Arranger: Sachin Bhangre
    Rhythm Player: Sachin Bhangre, Vishal Khot, Karan Patil, Ratnadeep Jamsandekar, Tushar Rankhambe, Karan Kadam, Rasik Thakur
    Chorus: Prasad Shinde, Gopal Thakre, Nitin Ugalmugale, Ankush A.Bordkar, Mukund Bhalerao
    Vocals Recorded By: Pramod Chandorkar at Soundideaz Studio
    Rhythm Recorded By: Avdhoot Wadkar at Ajivasan Sounds
    Mix and Mastered By: Vijay Dayal at Yashraj Studios
    Video Credits :
    Cast: Shashank Shende, Sujata Mogal
    Produced by: PS Music Production
    Co-Produced by: Baba Thombre, Pallab Pratap Bhore
    Song Concept: Nitten Gurjal
    Director: Prashant Pandekar
    Asst. Director: Vishal Sangle, Sangeeta Tiwari
    Cinematography: Sopaan Purandare, Aaditya Kamodkar
    Make-up: Pushkar Deogaonkar
    Costume: Shriya Bhide
    Focus Puller: Omkar Santras
    Drone Pilot: Aaditya Kamodkar, Hrishikesh Katkar
    Making: Jatin Kikale
    Stock Courtesy: Dnyaneshwar Katkade, Dipesh Vaity, Abhay Kevat
    Lights: Siddhivinayak Cine Lights
    Edit: Ashay Deshpande
    DI: Bhushan Sahasrabudhe
    Locations: Prati-Pandharpur (Dudhivare), Dehugoan, Pandharpur
    Photograph courtesy: Mahesh Lonkar
    Posters By: Posterwood Design
    Special Guidance:
    Ajay Gogawale, Atul Gogawale, Pinakin Tendulkar, Nanu Jaisinghani.
    Special Thanks:
    Deva Patil, Vivek Pandit, Prithviraj Murhe, Alkatai Ganesh Dhaniwale, Santosh Kumbhar, Sukhdev Thakar, Datta Shinde, Rajaram Aaswale, Pavan lonkar
    Music on - Video Palace
    Listen to this song on :
    Saavn -
    www.jiosaavn.c...
    Gaana -
    gaana.com/song...
    Wynk -
    open.wynk.in/j...
    Amazon Music -
    www.amazon.de/s...
    Spotify -
    open.spotify.co...
    itunes -
    / maai-bappa-vithala-single
    Set 'Maai Bappa Vithala' song as your Mobile Callertune (India Only)
    Airtel Subscribers Dial 5432117761209
    Vodafone Subscribers SMS CT 12583273 to 56789
    Idea Subscribers Dial 5678912583273
    BSNL (South / East) Subscribers SMS BT 12583273 To 56700
    Lyrics :
    तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    घरातच कारावास सोसला रं रातंदीस,
    तुझा मानुनिया कौल नाही ओलांडली येस...
    गोड लागंना शिवार गोड लागंना रं शेत,
    चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत,
    तुझ्या नावावीण नसे काही ठाव विठ्ठला,
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    युगे अठ्ठावीस होती तुझी वारी ही अखंड,
    काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड,
    कर सावट हे दूर जनामना दे उभारी,
    यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी,
    कसा भरलासा रागे आता पाव विठ्ठला,
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    बघ जरा माऊली गं तुझ्या बाळांची आबाळ,
    तुझ्या विटे खाली देवा माझी पुरलीया नाळ...
    साहवेना गा विठाई दहा दिशांचा तुरुंग,
    वाळवंटी वाटभर पुन्हा घुमू दे मृदुंग...
    थांबवी रे जीवघेणा लपंडाव विठ्ठला
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
    कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहीन
    सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन..
    आता सोडून पंढरी ठायी ठायी मी असतो,
    बघ तुझा जनार्दन आता जनांत वसतो..
    तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ ?
    सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त
    दवाखान्यांतून करी कोण धावाधाव खास...
    कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास...?
    लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून
    की हे काळाचे सावट जावे निघून लांबून...
    पिला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा,
    कलीकाळाचे संकट कसे निवारतो पहा...
    पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन...
    साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन...
    सारे निवारून मग पंढरीस मी जाईन...
    बाळा, चंद्रभागेतीरी तुझी वाट मी पाहीन....
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला…
    पांडुरंगा विठ्ठला... मायबापा विठ्ठला...
    Enjoy & Stay Connected with us
    Like us on Facebook : / videopalacemovies
    Subscribe us on RUclips : www.youtube.com...

Комментарии • 1,3 тыс.

  • @maheshbanadar7788
    @maheshbanadar7788 2 месяца назад +11

    काय तो भाव, काय तो शब्दांचा खेळ, काय तो उत्साह प्रत्येक शब्धातून आर्त भाव विठ्ठलाचे दर्शन झाल्याची अनुभूती देते.🙏

  • @rohantelavane654
    @rohantelavane654 Год назад +4

    अविस्मणीय ! आप्रतीम शब्दच नाही. मन तृप्त झालं.. काय ती रचना.. वारकरी डोळ्याचा समोर आले.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल // राम कृष्ण हरी //

  • @rajaramghagas1607
    @rajaramghagas1607 Год назад +1280

    मी एक मुसलमान आहे , पण मी हा गीत दिवसातून 4 5 वेळा रोज ऐकतो, खरच मन भारावून जातय, धन्यवाद 🙏अजय अतुल सर

  • @Skkaran........Onlysingle
    @Skkaran........Onlysingle 4 месяца назад +7

    श्री रंगा विठ्ठला. 🙏. गाणं तर अप्रतिम आहे महाराष्ट्राची शान आहेत अजय अतुल सर यांची गाणी. काही तरी नवीन. शिकवून जातात. हे विठ्ठला तूझ्याच चरणी माझे प्राण आहे .......🙏🙇

  • @rupeshkumavat4183
    @rupeshkumavat4183 3 месяца назад +27

    मनातील दु:ख, वेदना आणि अत्यानंद अश्रूंच्या स्वरुपात डोळ्यांतून बाहेर येनार गाणे आहे खरच.
    अतुलनीय, अप्रतीम.❤

  • @dipaliyadav9536
    @dipaliyadav9536 2 месяца назад +3

    विठ्ठलाची लीला अपरंपार आहे🙏🙏💐💐 विट्ठल, विट्ठल,जय हरी विठ्ठल ❤️❤️

  • @ashwinipuri9788
    @ashwinipuri9788 Год назад +6

    डोळ्यातलै अश्रु आवरले नाहीत ऐकुन खुप छान सर👌👌👌🙏🙏🙏खुपचं गोड आवाज. खुप छान वाटलं ऐकुन

  • @ayush-ru5yl
    @ayush-ru5yl 2 месяца назад +8

    खूप सुंदर गाणं आहे सारखं ऐकू वाटते ❤❤❤❤

  • @rahulbhoye3281
    @rahulbhoye3281 3 года назад +46

    मनाला लागे डोळ्यात पाणी येई पर्यंत गाणं ऐकल 👌🥺😊♥️

  • @Tureviraj1995
    @Tureviraj1995 3 месяца назад +13

    काय तो आवाज काय ते गाण्याचे कडवे.....मानले राव अजय अतुल तुम्हाला.... खरच डोळ्यात पाणी आले ❤️‍🩹❤️

  • @sunitazende2423
    @sunitazende2423 2 года назад +8

    मन शांत होत... हे गाण ऐकलं कि... 🌺🙏🏻
    ।।माय माऊली।।🌺🙏🏻🙏🏻

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 2 года назад +52

    माय मराठी 🙏🚩❤️....... महाराष्ट्राचे गड किल्ले ,वारीची परंपरा कधीच संपू नये

  • @rahuludande3723
    @rahuludande3723 6 месяцев назад +3

    अजय दादा आणि अतुल दादा यांची गाणी कायम काळजात घर करून बसली आहेत ❤

  • @GopalghareMadhukar
    @GopalghareMadhukar Месяц назад

    अजय अतुल सर दगडालाही पाझर फुटेल असा मनाला स्पर्श करणारा तुमचा आवाज आहे.

  • @divyankasawant576
    @divyankasawant576 3 года назад +66

    अंगावर काटा आला. अप्रतिम, शब्दांचा खेळ त्याला मिळालेली संगीताची गोड साथ. साक्षात पंढरीला गेल्याचा भासच.❤️

    • @harishphadtare6606
      @harishphadtare6606 3 года назад

      0raràatrr00000000 q0⁴aaaGS!!]0

    • @akashbelavane4142
      @akashbelavane4142 2 года назад

      ययमयं मय्यपन ययमयं मय्यपन म ययमयं मममज मत तममजत ययमयं त

    • @shitalbadakh4977
      @shitalbadakh4977 Год назад

      S right

  • @shalakapendharkar2304
    @shalakapendharkar2304 2 месяца назад

    सर्वांच्या प्रतिक्रिया,याहून वेगळे काही शब्द माझ्याकडे नाहीत. केवळ अप्रतिम. अजय अतुल तुम्हाला मनापासून खूप खूप आशीर्वाद

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 2 года назад +12

    किती छान गाणं गायलं आहे अप्रतिम अजय-अतुल यांनी 🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌

  • @ganeshdairy9133
    @ganeshdairy9133 2 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @akshaythakare1812
    @akshaythakare1812 3 года назад +30

    शब्दच नाही आपल्याकडे ❤️अप्रतिम 👍

  • @ksharvsnl
    @ksharvsnl 2 года назад +4

    अप्रतिम ... एवढेच म्हणू शकतो .. बाकी भावना व्यक्त करायला शब्द नाहीत आणि काही बोलावे अथवा लिहावे - तर किती आणि कसे लिहावे हा प्रश्न पडतो.. आम्ही सर्व श्रोते आपले सदैव ऋणी राहू.. व हे ऋण कमी न होता सदैव वाढतच जावे ही श्री विठ्ठला चरणी प्रार्थना ..

  • @uttamsupnekar6351
    @uttamsupnekar6351 2 года назад +29

    जय हरी अजय अतुल सर यांना पांडुरंगाची सेवा करण्यासाठी च धरतीवरती पाठवले असावे किती वेळा गीत
    ऐकले तरीही मणाची भुक भागत नाही सर काय तुमच्या आवाजात ताकद
    आहे शेवट तर
    अप्रतिम धन्यवाद सर

  • @Sandysot151
    @Sandysot151 3 года назад +10

    पांडुरंग हरी💐💐💐💐हृदयाला स्पृश केलात सर💐💐💐💐

  • @swarashirke6789
    @swarashirke6789 Год назад +5

    खूपच छान गाण्याची रचना केली आहे आणि गायले पण खूपच छान...काळजाला लागून गेले हे गाणं ....hats off..

  • @SaiCreation24
    @SaiCreation24 3 месяца назад +3

    अंगावर काटा आला हे गाण ऐकून ❤🙏

  • @akshaymane5871
    @akshaymane5871 2 года назад +6

    अजय अतुल यांची शब्द रचना कुणाला ही जमणार नाही या आयुष्यात तरी अप्रतिम ♥️♥️♥️

  • @maheshrodi9948
    @maheshrodi9948 2 месяца назад +2

    कित्येक वेळा ऐकलं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं मनोज भरून येतं शब्दात फक्त करता येणार नाही इतकच मनात कालवाकालव होते खंरच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय

  • @SandeepPatil-ui6xm
    @SandeepPatil-ui6xm 2 года назад +17

    किती वेळा पण गाणं ऐकलं तर मन भरत नाही सतत ऐकावं वाटते... खुप छान गाणं आहे.. खुप छान गाणं आहे.. खुप छान गाणं आहे..

  • @sagardive713
    @sagardive713 3 года назад +53

    1नंबर गाणं आहे अगदी हृदयात शब्द निघतात

  • @vishnukhursule3795
    @vishnukhursule3795 3 года назад +45

    ♥️🚩पांडुरंग तुझ्या चरणी प्रार्थना करतो की खुप दिवसा पासून तुझ्या लेकराचे जे हाल चालत ते जरा पहा जरा धावघे पांडुरंग हीच तुझ्या चरणी प्रार्थना पांडुरंग ♥️🚩

  • @mrvaishnavpatil757
    @mrvaishnavpatil757 2 года назад +4

    या गाण्यात आपली मनाची व्यथा आहे आणि हे गाणं आईकल की मनाला नवीन ऊर्जा निर्माण होते. जगात देव आहे हे समजते.
    माऊली सर्वांची इच्छा पूर्ण होवो.
    || जय हरी विठ्ठल ||

  • @ganpatshinde4727
    @ganpatshinde4727 2 года назад +5

    गाणं ऐकतांना प्रत्यक्षात विठ्ठलाच्या सानिध्यात असल्याचा भास होतो,,,
    अंगावर शहारे येतात,
    खरंच खूप अप्रतिम शब्द आणि सूर,,,,,

  • @akshaybadekar959
    @akshaybadekar959 22 дня назад +1

    विठु माऊली तु माऊली जगाची 🥺🙏🌺

  • @jalindarpatil3025
    @jalindarpatil3025 2 года назад +4

    मी दररोज एक वेळा तरी हे गाणं एकतोच... खूपच छान, अप्रतिम रचना, आणि संगीत पण, अजय अतुल जोडी great...👍
    God bless you,

  • @ganeshadling5568
    @ganeshadling5568 Месяц назад

    हे गाणं ऐकल्यापासून माझं माझ्या वडीलांवरती असणारं प्रेम कित्येक पटीने वाढलं आहे... मी स्वतःला खूप नशिबवान समजतो...

  • @premalokafans4962
    @premalokafans4962 Год назад +11

    Ram krishna hari mauli 🙏🙏🙏mi vittalacha ek mottta bhakta

  • @poojasurvase1903
    @poojasurvase1903 3 года назад +640

    किती वेळा पण गाणं ऐकलं तर मन भरत नाही सतत ऐकावं वाटते... खुप छान गाणं आहे..

    • @saurabhgunjal3154
      @saurabhgunjal3154 2 года назад +34

      हो ना, परत परत ऐकावं वाटते मनच भरत नाही

    • @sanketmali9893
      @sanketmali9893 2 года назад +12

      Agdi khr ahe

    • @sureshhinge6075
      @sureshhinge6075 2 года назад +12

      Correct

    • @sameerzore4238
      @sameerzore4238 2 года назад +2

      @@saurabhgunjal3154 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sameerzore4238
      @sameerzore4238 2 года назад +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 2 года назад +7

    आपण ज्या काळातून आज हे दिवस पाहतो आहे आणि प्रशासन विठ्ठल रुपी आपली काळजी घेत होत भविष्यात पुढच्या पिढीला हे गाणं बघितलं कीवा एकल तरी महामारीच्या लाटा म्हणजे काय ते हे गाणं सगळं दाखवून देईल.

  • @chhayagadekar1661
    @chhayagadekar1661 7 месяцев назад +2

    प्रत्येक वेळी हे गीत ऐकल की काय व्यक्त व्हाव शब्द सुचत नाही.आणी गाण्याच्या प्रत्येक शब्दाला मला माझे बाबा आठवतात😢😢

  • @jalindarkale3917
    @jalindarkale3917 3 года назад +30

    अप्रतीम गाण डोळ्यातून अश्रू अनावर झाले माझे ॥ राम कृष्ण हरी ॥

  • @suniljogi4402
    @suniljogi4402 7 месяцев назад +2

    विठ्ठलाचे खूप छान भजन आहे मन भरून आलं खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sujatamore5142
    @sujatamore5142 3 года назад +22

    खूप सुंदर .... यातून खरोखर मनातील भावना व्यक्त होतात..

  • @MefromU09
    @MefromU09 3 года назад +100

    अजय-अतुल, The Gem of महाराष्ट्र... ❤️

  • @Drayvingsh
    @Drayvingsh 2 месяца назад +4

    तुम्ही खरो खर विठू माऊलीचे दर्शन करून दिले 🙏🙏

  • @akshaywagh94
    @akshaywagh94 2 года назад +8

    तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला!!
    जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला!!😭🙏
    अजय अतुल ❤️🙏

  • @sanvipatil4006
    @sanvipatil4006 2 года назад +61

    ಭಾಷೆ ಬರದೆ ಇದ್ರೂ ಈ ಹಾಡು ❤ಮನಸ್ಸಿಗೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ ಆತು❤❤ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ

  • @rshamadagale9794
    @rshamadagale9794 3 года назад +10

    Ek no awaz ahe lvkrch jaude hi mahamari🙏

  • @vaibhavagale6596
    @vaibhavagale6596 2 года назад +61

    ❤️❤️ खूप छान गाणे आहे 🙏🏻🥰
    गेल्या 2 वर्षात खूप काही गमावले सर्वांनी ...मी जगेल कि नाही म्हणणारा माणुस आज परत मानुसकी सोडून पैश्यांच्या मागे लागलाय आणि भेदभाव करतोय 😕
    भेदभाव करू नका माणुसकी जपा 🙏🏻

    • @avkumare
      @avkumare Год назад +1

      खरेच...... शेवटी माणूसच..!
      कधीच नाही बदलणार... फक्त पैसा पैसा, जात पात धर्मात गुंतून राहणार!

  • @sumedhbagade9731
    @sumedhbagade9731 3 года назад +6

    Kay bhari song aahe👌 100 da aael yar mi khup ch mst aahe ajay atul dada kay voice aahe 🙏

  • @akankshadandwate
    @akankshadandwate 2 года назад +89

    कित्तेक वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळी डोळ्यांत पाणी येतंच, मन भरून येतं 😭 शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकी मनात कालवाकालव होते. खरंच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय 😭😭🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vajirpashanadaf6954
    @vajirpashanadaf6954 Год назад +6

    हे गान आइकुन मानुस शांतपने भाराहुन् जातो very nice Atul sir..❤️🌏🤲🙏✌️✌️✌️

  • @sirajshaikh2303
    @sirajshaikh2303 Год назад +10

    महाराष्ट्राची संस्कृती

  • @deepakhangirgekar6695
    @deepakhangirgekar6695 3 года назад +8

    Khup chan song aiklyavar dolyatil asru thabenase jhale atta pryant mi 100 vela aikla song khup chan heart touching

    • @subhashkadam5190
      @subhashkadam5190 2 года назад +1

      खूपच मस्त आहे गाणं

  • @rakeshpawar3274
    @rakeshpawar3274 2 года назад +54

    अजय आणि अतुल सर तुम्हाला सलाम आहे खरच खूप सुंदर गाणं आहे❤️😍🙏🚩....राम कृष्ण हरी माऊली❤️🚩🙏

  • @renukhadye5804
    @renukhadye5804 2 месяца назад

    खरोखर.... निशब्द झाली आहे...😢😢😢❤❤

  • @minetejas4300
    @minetejas4300 3 года назад +36

    देवा किती परीक्षा घेणार अजुन थांबव रे त्रास 😪

    • @ShitalDevkar-tw6eh
      @ShitalDevkar-tw6eh 2 месяца назад

      pratekchya aayushat kahi n kahi adchnit astatach .fkt deva vr vishwas theva.

  • @yogeshkaulage11
    @yogeshkaulage11 2 месяца назад +1

    मुस्लिम असलात तर काय झालं देवा पुढे सगळे एकच आहेत ❤😊

  • @suryakantghadi
    @suryakantghadi Год назад +3

    अतुल च्या आवाजातल्या ओळी अशक्य आहेत.. थेट काळजाचा ठाव आणि डोळ्यात पाणी.. अजरामर गीत..

  • @vidhivideshjadhav2821
    @vidhivideshjadhav2821 2 года назад +7

    हे गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येत हृदय स्पर्शी आहे हे गाणं मी दिवसात जस वेळ भेटतो तास गाणं एकते

  • @ganeshzingade5559
    @ganeshzingade5559 Год назад +16

    महाराष्ट्राची शान अजय अतुल सर.....❤❤

  • @suniljogi4402
    @suniljogi4402 7 месяцев назад +1

    अतिसुंदर विठ्ठलाचं गाणं आहे खूप छान❤❤❤❤❤

  • @balasahebgaikwad980
    @balasahebgaikwad980 3 года назад +22

    Kharach Kaljala lagnare shabad ahet hy ganyat Great Ajay Atul Sir 👌❤️😊🤗

  • @archnadeshmukhjabalpurcity2729
    @archnadeshmukhjabalpurcity2729 3 месяца назад +1

    किती सुंदर हे गीत😢😢
    मन दाटून आलय दादा....😢किसी सुंदर गयालय तुम्ही खूप सुरेख दादा

  • @LALITPAWAR136
    @LALITPAWAR136 2 года назад +7

    हे गीत ऐकल्यावर मन भरून आलं खूप सुंदर गीत आहे

  • @swapnilkhochare5340
    @swapnilkhochare5340 2 года назад +2

    आई मुलाला कधी सोडत नाही तस आपला मायबाप आपल्या कसा सोडलं आयुष्यात काही नसताना मला त्यांनीच सावरले मायबापा विठ्ठला 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤❤️❤❤️❤👌🙏👌

  • @prasadpatil539
    @prasadpatil539 2 года назад +92

    अप्रतिम गाणं आहे, खरोखर डोळ्यात पाणी आलं......... धन्यवाद अजय - अतुल सर 😍😍

  • @kshitija215
    @kshitija215 Год назад +2

    माझ्या आजोबांना covid झाल्यामुळे ही परिस्थिती खूप जवळून अनुभवली... खरंच हे एक भयानक सत्य आहे.. ऐकताना मिटलेले डोळेही आपोआप पाणावले..😢 hat's off Sir 🙏🙏

  • @incometaxreturns9568
    @incometaxreturns9568 2 года назад +57

    अप्रतिम रचना ❤️
    " चंद्रभागे तीरी तुझी वाट मी पाहीन " ऐकल्यावर ओढ लागली पंढरीची 🙏

  • @vip-xl1nk
    @vip-xl1nk 2 года назад

    apratim dadano शब्द नाही तुमचा रचनेला जय हरि

  • @Shetkrisamrudhimishan
    @Shetkrisamrudhimishan 2 года назад +85

    आवाजात किती करुणाभाव आहे, किती आत्मियतेने गायन केले आहे, खूपच अप्रतिम,
    मी रोज पहाटे एकदा मनापासून हे गाणं ऐकतो आहे, दिवस भर मन अगदी प्रसन्न रहातं,व ओठांवर शब्द रहातात,
    पांडुरंगा विठ्ठला, मायबापा विठ्ठला.
    गायकाला मनापासून धन्यवाद,🙏

    • @sandeepbinnar7914
      @sandeepbinnar7914 Год назад

      Mi pn darRoj pahate aikato bhau....khuuupp bar vatat jevha. Panduranga vitthala may bapa vitthala he shabd kani yeta tevha....realy heart touching song

    • @prashantkale589
      @prashantkale589 Год назад

      Correct

    • @parasaramnavale6463
      @parasaramnavale6463 Год назад

      धन्यवाद मनापासून. अजय .अतुल. पांडुरंगा विठठला मायबापा विठठला. मन भरून येतं.

  • @vinitaatandale9168
    @vinitaatandale9168 2 года назад +2

    खूपच सुंदर खरंच आज प्रत्येकाची हिच भावना आहे 🙏🙏🙏🙏

  • @prabhakarchimagave8300
    @prabhakarchimagave8300 Год назад +17

    भक्ताने घातलेली आर्त हाक...... आणि त्याप्रमाणे देवाने ही दिलेली. भावपूर्ण साद..... अप्रतिम......

  • @shivajipatil8917
    @shivajipatil8917 2 месяца назад +1

    ❤❤❤ जय हरी विठ्ठल

  • @vikasmarathe7096
    @vikasmarathe7096 2 года назад +25

    या संपूर्ण टीम ला ज्यांनी हे सुंदर गाणं तयार केलं साष्टांग दंडवत, गाणं ऐकत असताना जणु काही आपण स्वर्गात असल्याचा भास होतो, आणि बस लगेचच पांडुरंगाची भेट होईल हा आभास होतो.....

    • @amitjohnsmith7904
      @amitjohnsmith7904 Год назад

      खुप अप्रतिम गाणे आहे........

  • @firozshaikh2103
    @firozshaikh2103 Год назад +83

    Mai bhi Ek Musalman Hoon Mai Roj morning mein ye bhajan sunta hun dil ko bahut sukun Milta Hai Hum Sab Ek Hai Ram Krishna Hari Jay Hari Vithala Om Sai Ram🙏🌹 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra

    • @SomnathKadali-q6e
      @SomnathKadali-q6e 9 дней назад

      सगळे एकत्र आले ना हिंदू मुस्लिम खरचं छान वाटेल..❤❤🚩🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩❤️

  • @mahadevpawar1987
    @mahadevpawar1987 3 года назад +252

    सलाम अजय अतुल डोळ्यात पाणी आले खरंच देवा लवकर ही दूर कर ही महामारी

  • @harishdeshmukh7120
    @harishdeshmukh7120 8 месяцев назад +1

    हीच जादू आहे अजय सर यांच्या आवाजात किती पण नास्तिक असणारा माणूस ह्या आवाजाने विठ्ठला च्या भक्तीत तल्लीन होतो. हा आवाज नास्तिक मानवाला पण आस्तिक होण्यास भाग पडतो.. 🙏🏻🙏🏻

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 3 года назад +25

    साऱ्या वेदनांना वाट दाखवणारे गाणं👏

  • @suhaskale1334
    @suhaskale1334 2 года назад +10

    अप्रतिम गाणं आहे. शब्द च नाही अजय अतुल सर तुमच्या साठी एकदम सुंदर चाल.. खुप खुप सुंदर गायन 👏🏻👏🏻

    • @dipalitayade3661
      @dipalitayade3661 2 года назад

      अप्रतिम,, 🙏🙏भावाविभोर झालं,, भक्ताचा कळवळा भरभरून आहे,,

  • @ErSK-d9s
    @ErSK-d9s Год назад +22

    ಏನು ಹಾಡಿದ್ದೀಯ ಗುರುವೇ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಿದೆ 🙏🙏🙏

  • @BabanGanganbeedkar
    @BabanGanganbeedkar 2 года назад +2

    खरंच अप्रतिम गाणे आहे; गाण्यातील शेवटच्या ओळी ऐकून अंगावर काटा उभा राहतो;. मन भरून आले. मन हरवुन गेल..पांडुरंगा विठ्ठला. मायबापा विठ्ठला…

  • @hemantatkari6409
    @hemantatkari6409 2 года назад +15

    🚩🙏पांडुरंग आणि वारकऱ्यामधील एक अतूट नात दाखवणार गान आहे हे 🚩🙏

  • @shambalanikalje3260
    @shambalanikalje3260 2 года назад +5

    खुप छान गान आहे कीतीवेळा आईल तरी पण आईका वाटत सारख

  • @dnyaneshwarpatil9812
    @dnyaneshwarpatil9812 3 года назад +48

    अप्रतिम शब्द,संगीत,आवाज.

  • @shree.joshi-123
    @shree.joshi-123 2 года назад +6

    पांडुरंग हरी वासुदेव हरी 🚩🚩 हर हर महादेव 🕉️🚩🚩

  • @subhashghalke9621
    @subhashghalke9621 3 года назад +11

    अप्रतिम रचना,,आणि आवाज तर काय ,,,आहाहा

  • @vikasbandawane1077
    @vikasbandawane1077 2 года назад +55

    Today I am in pandharpur and I travel in bike pune to pandharpur and all road I only listening 🎧🎧 this song
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला

  • @dilipmarnar2141
    @dilipmarnar2141 3 года назад +28

    मावली।तूमचा।गानयाचा।आवाजातून।मि।माजा।विठल।पहातो

  • @AryanMhatre-r2p
    @AryanMhatre-r2p Год назад +1

    Mala khup avdla ha sang 🥹🙏🏻
    अंगावर काटे। येतात 🙏🏻

  • @ranjitmahadik7146
    @ranjitmahadik7146 3 года назад +50

    आज पर्यंत 100 वेला गाणं ऐकलं खूप भारी आहे

  • @shivrajgiram-i5t
    @shivrajgiram-i5t 2 месяца назад +1

    कित्येक वेळा ऐकलं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं मनोज भरून येतं शब्दात फक्त करता येणार नाही इतकच मनात कालवाकालव होते खंरच आता तरी हा जीवघेणा लपंडाव माऊलींनी थांबवावा असं वाटतंय 😭😭😭🙏🙏🚩

  • @Nooptiontrader
    @Nooptiontrader 2 года назад +3

    अप्रतिम 🙏❤️ शब्द सुचत नाहीत बोलायला वाह 👌❣️

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 9 часов назад +1

    खूपच छान गीत ❤❤

  • @chhayasangle1242
    @chhayasangle1242 8 месяцев назад +4

    खुप छान वाटते आहे

  • @amitsuryawanshi7191
    @amitsuryawanshi7191 Месяц назад

    फक्त आवाज.. नहीं तर.. पूर्ण भावनेने आलेले सुर

  • @rajupawar4743
    @rajupawar4743 3 года назад +119

    माझा विठ्ठला आठवन फार येते मी वारकरी नाही फ्कत एकदाची भेट जिव्हा वेड झाला आंदा 2 वषॉ ची भेट न होता जीव कासावीस झाला रे विठु राया मन रडतय अश्रु वाहतय पण काय करनार ?

  • @chetanmhetre8532
    @chetanmhetre8532 10 месяцев назад

    🚩तोडच नाही मराठी गाण्याला 🚩

  • @harishwaghat1987
    @harishwaghat1987 3 года назад +74

    मन हरवुन गेल... Nice song 👌..
    Heart touching ♥️..

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 4 месяца назад

    विठल सर्वांसाठी समान आहे. जात, धर्म सर्व विठला समोर समान आहेत.

  • @vaibhavsagar6065
    @vaibhavsagar6065 2 года назад +6

    आम्ही रोज सकाळी ऐकतो

  • @mhkhakivardi2377
    @mhkhakivardi2377 2 года назад

    खरच छान यशस्वी गान आहे lockdown ची व्यथा mandthanachi