GODHAL | वंचित बहुजनांचा गोंधळ | MILIND SHINDE | SHITAL SATHE | SACHIN MALI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Navayan Mahajalsa Official Video 2019
    Song : Vanchit Bahujanancha Gondhal
    वंचित बहुजनांचा गोंधळ
    Production Navayan Mahajalsa
    Music Lable : Navayan Mahajalsa
    Production Head - Sachin Mali
    Lyrics : Sachin Mali & Shital Sathe
    Music / Singer : Milind Shinde & Shital Sathe
    Arrangements : Aniket Mohite
    Live Rhythm - Rohan Pawar | Aniket Mohite
    String & Melody - Akash Salokhe
    Chorus Part - Shirish Pawar | Shivani Kadam | Omay Sathe | Amol Balllal | Mithun Chavan |
    Record | Mix | Master | mr.Abhijeet Saraf (Pune)
    All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
    Lyrics :
    पंढरीच्या विठूराया जागराला यावं
    संतश्रेष्ठ नामदेवा जागराला यावं
    जगतगुरू तुकोबाराया जागराला यावं
    जिजाऊ माँसाहेब तुम्ही जागराला यावं
    छत्रपती शिवराया जागराला यावं
    जागर मांडला तुम्ही जागराला यावं
    क्रांतीसूर्य जोतीबाराया जागराला यावं
    ज्ञानमाता सावित्रीमाई जागराला यावं
    प्रज्ञासूर्य बाबासाहेब जागराला यावं
    लोकशाहीर अण्णाभाऊ जागराला यावं
    लोकशाहीर वामनदादा जागराला यावं
    जागर मांडला तुम्ही जगराला यावं
    दार उघडू दे आता दार उघडू दे
    दार उघडू दे आता दार उघडू दे
    वंचितांना सत्तेचं दार उघडू दे
    धनगरांना सत्तेचं दार उघडू दे
    ओबीसींना सत्तेचं दार उघडू दे
    भटक्यांना सत्तेचं दार उघडू दे
    साळ्याला-माळ्याला दार उघडू दे
    आग्ऱ्याला-कोळ्याला दार उघडू दे
    चांभाराला-कुंभाराला दार उघडू दे
    लोहाराला-सुताराला दार उघडू दे
    न्हाव्याला-शिंप्याला दार उघडू दे
    कुणब्याला-कोष्ट्याला दार उघडू दे
    आयांना-बायांना दार उघडू दे
    किन्नर तायांना दार उघडू दे
    दार उघडू दे आता दार उघडू दे
    वंचितांना सत्तेचं दार उघडू दे
    पेंढाऱ्याला-भंडाऱ्याला दार उघडू दे
    वंजाऱ्याला-पिंजाऱ्याला दार उघडू दे
    लोहाराला-होलाराला दार उघडू दे
    घिसाड्याला-कैकाड्याला दार उघडू दे
    तेल्याला-तांबोळ्याला दार उघडू दे
    गारूड्याला-कऱ्हाड्याला दार उघडू दे
    मांगाला-भंग्याला दार उघडू दे
    हेळव्याला-पिंगळ्याला दार उघडू दे
    दार उघडू दे आता दार उघडू दे
    वंचितांना सत्तेचं दार उघडू दे
    बहुजनांचा गोंधळ वाजे तालावर संबळ
    आणा काठी अन घोंगडं
    कष्टकऱ्यांची सांगड
    आली लोक लय मैदाळ
    बारा बलुत्यांची ओंजळ
    अठरा अलुत्यांची कांबळ वाजं तालावर संबळ
    विणली वंचितांची माळ
    एकजुटीचा हा काळ
    उठली रणामंदी राळ
    दौडू नगा आता येळ
    आमचं कष्टकऱ्यांचं नातं
    उच-नीच नाही मानत
    भेदभाव हा भोंगळ
    जाणा ऐकीचं हे बळ
    बहुजनांचा गोंधळ वाजं तालावर संबळ
    बाळासाहेबानं जोडला बहुजन
    अन घेतला सत्तेचा पण
    बाळासाहेबानं फुंकलया रणशिंग
    भाजप काँग्रेसचं फुटलया बिंग
    पाठ भिंतीला लावून लढायचा पिंड
    आजवर एकाकी लढवली ही खिंड
    आले साथीला पहिल्यांदा धनगर
    वाटली भटक्यांनी ऐकीची साखर
    ऐकी मांगाची देतीया ललकार
    बाळासाहेबांच्या शब्दाची ही धार
    अहो कसा हाय आमचा नेता
    त्याचा पोलादाचा पिळ
    त्याला दहा हत्तीचं बळ
    सत्ता खोट्यांची डळमळ
    जाना ऐकीच हे बळ
    बहुजनांचा गोंधळ वाजं तालावर संबळ
    गाडायला चला आता गाडायला चला
    मनुवाद्यांना गाडायला चला
    पाडायला चला आता पाडायला चला
    प्रस्थापितांना पाडायला चला
    मताला चला आता मताला चला
    मताला चला आता मताला चला
    पिढ्यानपिढ्या घराणेशाहीची सत्ता
    गिरवत बसली यांचाच कित्ता
    राजा येवू द्या मताच्या पेटीतून आता
    घडवू नव्या महाराष्ट्राची गाथा
    दार उघडू दे आता दार उघडू दे
    वंचितांना सत्तेचं दार उघडू दे
    फिटर वेटर मताला चला
    वेल्डर पेंटर मताला चला
    ड्रायव्हर कंडक्टर मताला चला
    मजुर कामगार मताला चला
    शेतकरी कातकरी मताला चला
    गावकरी कामकरी मताला चला
    मताला चला आता मताला चला
    आता ताब्यात घ्यायचं विधी मंडळ
    आवंदा लढाई होणार तुंबळ
    वाजवू सत्तेचा संबळ, बहुजनांचा गोंधळ
    वाजवू सत्तेचा संबळ, बहुजनांचा गोंधळ
    Public Appeal :
    नवयान महाजलसा हा अधिकृत RUclips Channel आहे. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि आमची "पंचसूत्री" आहे. आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    शितल साठे & सचिन माळी
    Public Appeal
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Name : NAVAYAN PUBLICATION
    Bank : Central Bank of India
    Current Account No. 3710156063
    IFSC Code : CBIN0281516
    Satara Branch : (01516)
    Maharashtra : 415002
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600

Комментарии • 1,1 тыс.