Dilip Prabhavalkar Interview | इच्छामरण मागणाऱ्या जोडप्याची अनोखी गोष्ट! | N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 фев 2024
  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांचा एक अनोखं कथानक असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'आता वेळ झाली' या सिनेमात काय आहे खास? पाहूयात या खास मुलाखतीतून अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी "दया दाखवून मरण 'देता' का येत नाही?" असा थेट सवाल केला आहे. का? त्यांच्या या प्रश्नाची पार्श्वभूमी काय? जाणून घ्या...
    #dilipprabhavalkar #dilipprabhavalkaronecchamaran #atavelzali #anandmahadevan #rohinihattangadi #dilipprabhavalkarupcomingmovie #upcomingmarathimovie #news18lokmat #news18lokmat #entertainment #dilipprabhavalkarmovies #marathicinema #milindbhagvat #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 169

  • @pareshaaibaba3104
    @pareshaaibaba3104 5 месяцев назад +36

    अगदी आवश्यक व काळानुरुप विचार !फक्त सरकारकडून याबाबत लवकर निर्णय घेतला तर खुप दुःख भोगणारे जीव सुटतील जिवंतपणीच्या यमयातनांमधुन!

    • @gorakshanathkarvande2513
      @gorakshanathkarvande2513 5 месяцев назад +1

      सहमत आहे सर 🙏🙏

    • @rohiniogale7692
      @rohiniogale7692 5 месяцев назад +1

      Aaagadi गरजेचे आहे. वय झाले, मुलानी वृद्धाश्रमाच्या वाट दाखवण्याche दुःख सहन करत Maran यातना सहन करावयाचे tyapekasha इच्छा mariachi विचार करून लवकर sarakaarne कृपया kaayda karava.

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 5 месяцев назад +26

    खर आहे. ईच्छा मरणाला परवानगी द्यावी. निदान चर्चा सुरू होऊन काही तरी मार्ग निघेल.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 5 месяцев назад +27

    मी 83 वर्षाचा आहे. मनाप्रमाणे जीवन जगत आहे. आता ह्यापुढे जगून माझ्यामुळे ना कोणाचा फायदा वा तोटा होणार आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या कटकटी, आर्थिक व शारीरिक त्रास वाढणार आहेत. म्हणून इच्छा मरण पत्करले तर त्यात गैर काय आहे?

    • @Zsg436
      @Zsg436 5 месяцев назад +5

      My grandmother is above 90.
      As you described, she has given away all her wealth and possessions. Yet, she has a longing to live.
      She is not active by herself but, she does fear death.
      So, my elder brother and I are looking after her like our own baby and she is enjoying her life in a true sense which I can see on her face everyday, though it's very tasking on me many times I try to give my best and take life as it comes. But, it's true all other relatives have given up on her and nobody cares if she is alive and they don't even ask about her. Maybe ours is a different case.

    • @arunbhoge764
      @arunbhoge764 5 месяцев назад

      ❤Good health is a gift of God ! . If it permits, you can live a good life till your leges permits!! In the old life nature and music give extra energy to life . After all it depends to Person to person !!

    • @hemanpakhale5139
      @hemanpakhale5139 5 месяцев назад

      Tras talnya sathi nahi...full content ne jaane he mahtwa che....

    • @hemanpakhale5139
      @hemanpakhale5139 5 месяцев назад

      Purvi kaali... almost all people leave the world example ram lakshman ..all pandavs .. dhyaneshwar

    • @neeladilipkarmarkar9611
      @neeladilipkarmarkar9611 5 месяцев назад

      Very true

  • @mangalbidwai6308
    @mangalbidwai6308 5 месяцев назад +16

    खूप छान विषय आहे आणि काळाची गरज आहे आर्थिक, सामाजिक ,शारिरीक, मानसिक सगळ्याच द्रस्टीणे चांगलेच आहे .एका नंतर दुसर्‍या जोडीदाराला रोज मागण्यापेक्षा खूप छान.मूले असून ही लांब राहतात. आणि प्रेम पण राहिले नाही मरण पण खूप महाग झाले आहे.रडत जगण्यापेक्षा ईच्छा मरण खूप छान आहे.आणि हे विचार लोक आनंदाने स्वीकार तील आणि मुक्त होतील व मान्यता लवकर मिळेल .

    • @rohiniogale7692
      @rohiniogale7692 5 месяцев назад

      Karachi garaj आहे. माझ्या सारखे खूप लोक Maran यातना मधून मोकळे होतील. सरकारी kaayda लवकर manjur व्हावa. Typing chuka क्षमस्व

  • @mugdhakarandikar1220
    @mugdhakarandikar1220 5 месяцев назад +21

    माझ्या आई मावशी नेहमी म्हणायच्या लवकर सोडव आमचं सर्व जगून झालाय,अशांना हा कायदा लवकर व्हावा

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 5 месяцев назад +1

      कायदा करायला किती वेळ जाईल पण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने व्हायला नको

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +16

    मी हा विचार नेहमीच करते, त्याची चर्चासुद्धा करत असते. अशा सूज्ञ माणसांना सुखाने आणि सन्मानाने प्रतिष्ठित मरण देण्यासाठी कायदा व्हायलाच हवा.

    • @pradnyamore4119
      @pradnyamore4119 4 месяца назад

      True हा कायदा झालाच पाहिजे

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 5 месяцев назад +6

    समाजात स्वार्थी माणसे भरपूर आहेत. ज्या म्हाताऱ्या आई किंवा वडिलांना पेन्शन असेल तर त्यांना काही स्वार्थी मुले मरायला देत नाहीत. ज्यांना पेन्शन नाही अश्या वृद्धाची अवस्था खूपच बिकट असते. इच्छा मरणाचा कायदा झाला पाहिजे.

  • @shubhadasumant7480
    @shubhadasumant7480 5 месяцев назад +18

    खूपच छान विचार मांडला आहे. त्याचा अगदी मनोमन स्विकार केला आहे पण पुढे जाऊन तशी परवानगी मिळणे जास्त आवश्यक आहे.

  • @user-kf7ty9cs7n
    @user-kf7ty9cs7n 5 месяцев назад +22

    दोघेही अतिशय मोठे कलाकार आहेत. ही सत्य घटना आहे. एक जोडपे हे महाराष्ट्रात ही आहे. त्यांची इच्छा मरण मिळावे म्हणून केस चालू आहे.
    पण अध्यात्मिक व सनातन धर्मानुसार मृत्यू हा आपल्या पू्वकर्मानुसार ठरलेला असतो अनैसर्गिक मृत्यू मागणे कींवा घेणे हे अतिशय चुकीचे आहे कारण परत कर्म भोगण्यासाठी यावेच लागते व तो नवीन जन्म प्रचंड त्रासदायक असतो.
    नैसर्गिक मरण हेच योग्य आहे.

    • @anujabal4797
      @anujabal4797 5 месяцев назад

      ह्या जोडप्याची मुलाखत पण बऱ्याच दिवसांपूर्वी बऱ्याच चॅनलवर दाखवण्यात आली होती

    • @Zsg436
      @Zsg436 5 месяцев назад

      But, don't you think through medicines and hefty operations we are unnaturally extending our lives. What is your say on this in terms of spirituality?

    • @user-kf7ty9cs7n
      @user-kf7ty9cs7n 5 месяцев назад

      @@Zsg436 नहीं सबकुछ कर्म ही है। जब तक आप अपने पापोंका और पुण्य का फल पुरी तरह से नही पाते तब तक कीसीभी अवस्था में जिवीत रहना ही पडता है । इसीलिये
      जो आत्महत्या करके अपनी जीवनी समाप्त करते है उनको प्रेत योनी में हजारो साल भटकना पडता है और जब कर्म फल पाने के लिये जब नया जन्म मिलता है तो वो भयंकर क्लेशदायक होता है । क्योंकी जीन कर्मो को छोडकर आप दुनिया से जाते हो वो कर्म कभी पिछा नहीं छोडते। कर्म सर्वश्रेष्ठ है । कर्म गती ना कोई समझा है ना कोई समझेगा।
      इसलिये जीवन मृत्यू के चक्र में हमे कभी इंटरफीयर नहीं करना चाहीये।
      जो जीवात्मा गरूडपुराण पढेग वो कभी भी भोग अधुरा नहीं छोडेगा।
      और जीवन से भागेगा नहीं।
      मनुष्य जन्म ८४ लाख योनी के बाद मिलता है। क्यों मिलता है ताकी आप भगवत स्मरण में और भगवत शरण में वो बिताये । कींतू मनुष्य
      मायामोह जाल में फसकर जन्म के बाद सब भूल जाता है। साधूसंत लोग बिमारी भी भोग समझकर
      बडे आनंद से सह लेते है। लेकीन इच्छामरण कभी नही चाहते।
      क्योंकी वो जानते है ये प्रकृती के विरूध्द है। इसका फल क्लेशदायक मिलेगा । फीर जनम लेना पडेगा।

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 5 месяцев назад

      Ho, ichchaamaran hi ek prakare atma hatya aahe ase mhanataat.mhanaje gunhaa aahe.

  • @anandsarmalkar68
    @anandsarmalkar68 5 месяцев назад +5

    अतिशय योग्य विचार, माझे वय ५४ आहे, पण गेल्या १६ वर्षांपासून मी बेडवर परावलंबी आयुष्य जगत आहे, माझ्या मुळे माझ्या परीवाराची खूप ओढ ताण होते, हे जाणवते. भले कुणी बोलत नसेल, पण आपली उपयोग्यता संपली हे जाणवते.
    आमच्या सारख्या साठी हे झालेच पाहिजे.

    • @prakashjoshi7793
      @prakashjoshi7793 5 месяцев назад

      My mother is97 she is bed ridden now she want to die

  • @AnaghaNawathe
    @AnaghaNawathe 5 месяцев назад +4

    खूप छान विषय आहे. खरंच काळाची गरज आहे असं मला वाटतं. आमच्या पिढीची प्राॅडक्टिव्हिटी संपेपर्यंत हा कायदा यावा आणि लोकांनीही यांचा सकारात्मक विचार आणि उपयोग करावा अशी मनापासून इच्छा😊 मी आणि माझा नवरा असे दोघेच जाणार या सिनेमाला. सध्या इतकंच आमच्या हातात आहे😀👍

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +8

    आपण जोपर्यंत आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये असतो तेव्हाच आयुष्य संपवण्याची अनुमती कायद्याने द्यावी. मरणासन्न अवस्थेत गेल्यावर इतरांनी हा निर्णय घ्यावा त्यापेक्षा सुखासमाधानाने स्व इच्छेने मरणाचा निर्णय घेणे हे केव्हाही श्रेयस्कर आहे.

    • @chandrashekhardharmadhikar5725
      @chandrashekhardharmadhikar5725 5 месяцев назад

      जोपर्यंत आपली निर्णय क्षमता आहे तोपर्यंतच आपण स्वतः निर्णय घेऊन तो लिहून ठेवायला हवा आहे तो निर्णय घेतल्यानंतर दोन महत्त्वाचे नातेवाईक नसलेले असे साक्षीदार त्यासाठी नेमावेत मात्र हे साक्षीदार त्यांच्या जवळचे आणि महत्त्वाचे असले असले पाहिजेत जर नातेवाईकांनी निर्णय घ्यायचा म्हटला तर कदाचित त्यांना आयुष्यभर असे वाटेल की आपण हा निर्णय घेतला आहे तो चूक आहे की बरोबर आहे

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 5 месяцев назад +2

    इच्छामरणाची इच्छा फक्त अत्यंत आत्म‌निर्भ‌र‌ लोकांनाच होते.अशीच माणसं योग्य वेळी सगळ्यांपासून डिटॅच होतात.म्हणूनच हा कायदा स्कॅनडेनेव्हिया मध्ये झाला.भारतीय मानसिकता अतिशय दुसऱ्यावर अवलंबून व गुंतून पडण्याची आहे.‌हा विषय डिस्कस करून काहीतरी कायदा करण्याची वेळ आलेली आहे.🙏🙏🙏

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 5 месяцев назад +19

    नैसर्गिक मरण जर खूप क्लेशकारक असेल तर ती प्रोसेस इच्छा मरणाने सुखावह होईल. अतिशय काळाच्या पुढचा आणी तरीही उपयोगी विचार असू शकेल.

    • @surekhabhave1920
      @surekhabhave1920 5 месяцев назад +1

      अत्यंत चांगला विचार

    • @bharatikelkar159
      @bharatikelkar159 5 месяцев назад

      काळाच्या पुढचा नाही तर हा काळानुरूप असलेला विचार आहे. जेव्हा गलितगात्र होऊन माणूस पडतो तेव्हा त्याच्या जगण्याचा आनंद त्याला स्वतःलाही घेता येत नाही. तशा अवस्थेला पोचण्याआधीच हा निर्णय ज्याचा त्याला घेण्याची कायदेशीर मुभा असायला हवी.

  • @ravindraapte3796
    @ravindraapte3796 5 месяцев назад +15

    काही ठराविक वया (८०+) नंतर आपली नियमित औषधोपचार घ्यावे.काही गंभीर आजार झाल्यास कुठलाही जास्तीचे उपचार न घेता मरणास सामोरे जावे. सपोर्ट सिस्टीमचा वापर टाळावा.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 5 месяцев назад +2

      हे अगदी 100%बरोबर आहे

  • @nalinishinde7803
    @nalinishinde7803 5 месяцев назад +8

    Mi खूप सहमत आहे ह्या विषयी

  • @meeradeshpande7884
    @meeradeshpande7884 5 месяцев назад +11

    खूप छान विचार केला आहे कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही मी८० वर्षा ची आहे छान जंगले तब्बेत पण उत्तम आहे पण देवा जवळ रोज हेच मागणे मागते आता पुरे

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 5 месяцев назад +3

      मीरा ताई तुमची मुलं जर चांगली असतील तर असा विचार नका आणू मनात,भगवंतान तुम्हाला त्याच नामस्मरण करण्यासाठी ठेवलं असं समजून खूप छान आयुष्य तुम्हांस लाभो.

    • @Zsg436
      @Zsg436 5 месяцев назад

      Hope we have a very good environment for all oldies to come together and share beautiful time together in a day which might help each other to live through old age beautifully.

    • @sadhanarathod2256
      @sadhanarathod2256 5 месяцев назад +1

      ज्यांचे जीवन क्लेश दायक असेल, आरोग्य चांगले राहत नाही,पैसा नाही ,करणारे कोणी नाही शरीर वेदना सहन करू शकत नाही त्यांना खरंच इच्छामरण मिळाले पाहिजे

  • @avinashdeshpande2193
    @avinashdeshpande2193 5 месяцев назад +3

    माझे वैयक्तिक मत असे आहे ,इच्छा मरण तसे पण आपण ठरवू शकतो,त्या साठी कायदा करा, परवानगी द्या अशी का इच्छा धरावी, फक्त मरणाचे अगोदर,तसे लिहून जाहीर करावे जेणे करून आपल्याच जवळच्या लोकांनां त्रास होऊ नये व कसे मरावे व ते कसे सुसह्य व्हावे हा विचार करावा व त्या प्रमाणे मरावे ,थोडक्यात अर्धवट निर्णय घेऊन अर्धवट मरू नका !,तशी पण लोकसंख्या खुप आहे ,सहसा कोणी दखल घेत नाहीं, मेला,संपला ! त्या वर कोणी फारसे बोलत नाहीत ,जो तो आपल्या कामात असतो😊 जो पर्यंत आपण कोणावर अवलंबून नाही, शरीर साथ देतेय उतारं वयात पण आपण स्वस्थ आहोत असे असेल तर मरणाचा विचार करणे योग्य नाहीं, एकाकी जीवन कधी असह्य होऊ शकते पण त्यावर सुद्धा मात करता येते हे निश्चित, सोबती गेला म्हणून दुखी कष्टी का व्हावे,कोणी मागे पुढे होणारच ! जीवन सूंदर आहे,आव्हात्मक आहेच ते मस्त जगा, मस्त रहा ,दुसर्याना आनंद द्या स्वतः घ्या ! ज्या दिवशी वाटेल आता बस मग मृत्यू पत्र लिहा कोणाला कळवा आणी मृत्युला आनंदाने मिठी मारा कोणीही तुम्हाला आडवणार नाहीं, सहसा तुमची काळजी ठराविक वयानंतर कोणी ही करत नाहीं आणी तुम्ही पण कोणाची काळजी करू नये शेवटी "ओम पूर्ण मिदम,पूर्णात पूर्ण मुद्श्चते.पूर्णस्य् पूर्ण मादाय पुर्ण मेवावं शिषते !"

  • @arunakulkarni7966
    @arunakulkarni7966 5 месяцев назад +5

    काळानुरूप या विषयावर चर्चा व निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे , रोहिणी ताईंनी दिलेले वानप्रस्थाश्रमाचे उदाहरण समर्पक आहे, गेली ५ ते १०वर्षे अंथरूणाला खिळून असलेली व पूर्ण भान असलेली मंडळी जेव्हा आर्ततेने देवाचा धावा करतात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं, व हतबलता जाणवते, माझ्या पहाण्यात अशा वय वर्षे ९०-१००च्या आसपासच्या ८ते १०वृद्धांचे हेच म्हणणे आहे, *अजून वेळ आली नाही का?* तसेच एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ही वयस्कर मंडळी आपल्या घरांत, आपल्या माणसांत रहात आहेत, व‌द्धाश्रमात नाहीत, त्यामुळे विषयावर चर्चा व निर्णय आवश्यकच.

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 5 месяцев назад +10

    दिलीपजी तुम्ही उत्साही आहात ❤❤❤

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 5 месяцев назад +12

    काळाच्या अतिशय पुढचा विचार,पण असा विचार जर कायदा म्हणून पास झाला तर त्याचा गैरवापर जास्त होईल...

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 5 месяцев назад

      अनेक कायद्याचे गैरवापर होतात तरी कायदे आहेतच ना , यात आणखी एकाची भर पडेल --काय फरक पडतो?

    • @anaghabidkar4293
      @anaghabidkar4293 5 месяцев назад

      इस्टेटीसाठी गैरवापर होऊ शकतो.

  • @arvindmailagir-zx7wx
    @arvindmailagir-zx7wx 5 месяцев назад +2

    मी सुद्धा हाच विचार करतो, माझा वय 74 वर्ष आहे जीवनातील उतारचढ ,जवळचे परके यांना फारच जवळूनच पाहिले आहे. विचार व्हायला हवा कायदा करण्याचा

  • @user-yb4zk3hn3e
    @user-yb4zk3hn3e 5 месяцев назад +2

    माझे बाबा 90 वर्षाचे आहेत. अजून active आहेत. ते इच्छा मरण्याचा कायदा होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आता सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही रोज ऐकतोय.ते सुद्धा राष्ट्रपती ना पत्र लिहितात. मला माझे बाबाच समोर आले हे सर्व ऐकून. पण अम्हाला ते अजून झेपतंच नाही..

  • @chandramanijadhav7131
    @chandramanijadhav7131 5 месяцев назад +2

    खरंच खूप छान विचार आहे, परंतु वयाचे बंधन नसावे.

  • @Zsg436
    @Zsg436 5 месяцев назад +3

    Embracing old age and all that comes with it is indeed a challenging skill but, it can be cultivated very young in life by living a life with a right conscientious and complete awareness.
    Not easy but surely possible!

  • @ravindranarvekar1683
    @ravindranarvekar1683 5 месяцев назад +9

    THE GREAT ACTOR'S ❤ 🙏🙏❤

  • @kiranpangaonkar3231
    @kiranpangaonkar3231 5 месяцев назад +1

    I 1000% percent agree with this subject and point. I still go ahead with above. I myself is 65 ,live very good life. Now wish to quit with smiling face and no physical problem till today. My statistics is as below
    If I live still 15 years ,without doing any work will eat 15x365x2 meals,breakfast,
    Tea,medicine,hospitalisation with huge amount. And no use to me or anybody else. Better to quit happily and my advance wish is my all organs are still in good conditions which I can donate to young people,so they will get good life to them. But this point govt must accept. All the best

  • @prachib7715
    @prachib7715 5 месяцев назад

    Khup changla vishay aahe. Mazya manat sudha ha vichar yeto. Chagle avyav shariratale dusrya sathi upyukt padtil ase vatate.

  • @anitaharde400
    @anitaharde400 5 месяцев назад

    Khup chhan ek asa vishay jo pratyek susanskrut vyaktichi aantrik eichcha v aavshakyta darshavto sanmanjanya jivanmaran

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 5 месяцев назад +2

    खूपच गंभीर आणि अतिशय भावनाप्रधान, तरीही सध्याच्या काळाची गरज आहे.आज माझे जगणे जगून झाले आहे. आता मुले लांब राहतात,किंवा मुलेच नाहीत.आज मी धडधाकट आहे,चांगले जीवन जगत आहे. पण उद्याचं काय? जर मी जराजर्जर झाले किंवा अनंत यातनामय,अंथरुणाला खिळणे, परावलंबित्व आले तर .मी कोणावर भार टाकणार?कोण सांभाळणार?आणि जरी घरी सांभाळणारे असतील तरी असे आजारपण आले तर किती वर्ष हे सर्व सहन करणार?सर्व कुटुंबच आजारी असल्यासारखे वाटते.आणि समाज सर्व बाबतीत नावचं ठेवतात.त्यामुळेच समाजमन बदलणे अतिशय आवश्‍यक आहे.तरचं कायदा येऊ शकतो.हा चित्रपट समाजात क्रांतिकारक विचार पुरवण्यात मदत करेल.धन्यवाद. आणि आर्थिक मदतीचे काय?एकदम बरोबर मत मांडले आहेत.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 5 месяцев назад

      Ekhada Terminal Aazar Zaala Tr Treatment Naheech Dene Ase Mi Mazya Mulana Sangun Thevle Aahe

  • @minaltandel9306
    @minaltandel9306 5 месяцев назад +1

    खरच खूप छान विषय आहे.

  • @mansideshpande5177
    @mansideshpande5177 5 месяцев назад +2

    पुण्यात मंडलिक आजोबा म्हणून होते. .त्यांनी 20. .25 वर्षांपूर्वी हा विचार मांडला होता. .आणी त्या अनुषंगानं कायद्याने इच्छा मरणाला परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न खूप केले

  • @anujabal4797
    @anujabal4797 5 месяцев назад +1

    एक छान विषय मांडला आहे धन्यवाद

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 5 месяцев назад +1

    Khoop barobar vichar mandle ahet❤

  • @sarlaburande6868
    @sarlaburande6868 5 месяцев назад

    खुप छान विचार आहे . इच्छा मरण असायला पाहिजे. तो माणूस saglya tapatun सुटतो .sharik मानसिक नातेवाईक la त्रास. वृद्ध आश्रम हे पण कमी
    Hotel ना. लवकरच विचार केला गेला पाहिजे. कायदा झाला पाहिजे. 😊

  • @vinayakarambelkar3352
    @vinayakarambelkar3352 5 месяцев назад

    Yes I fully agree with the thought.

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 5 месяцев назад +4

    जिवंतपणी क्लेशकारक यातनामय जीवन जगणे...भोग भोगावे लागणे he कायद्याला सं मत आहे ka...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 5 месяцев назад

      Prarbdh Aap Aaplya Karmnusar prapt zalel aste Vidhicha Kayada Koni Ullanghan Naahi Karu Shakat

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад +1

    कितीकजन मरणासी आसुसले ते एवढे सोपे नाही
    जगण्यामधला अर्थ शोधावा असेका वाटतनाही
    मी आलोका पाठवले मला मलाच कळले नाही
    जगता जगता सांगत जाईन जन्म जगण्यासाठी
    स्वर्गामधूनी पाठवल्या कुणी भेटीस रेशिमगाठी
    या गाठींचा मोह अनावर तो ही कळला नाही
    निघून जाती जेव्हा हे ते करमत मुळी रे नाही
    करमत मुळीरे नाही
    करमणूकी साठी स्वर्गी जावे हीच इच्छा आई .....हीच इच्छा आई.....हीच इच्छा आई
    आईस भेटण्या मन आसुसते दुसरी इच्छा नाही
    वडिल ही तेथे तिथे भेटावे भाऊ बहिणींना ही
    सगळे भेटले जर मला तिथे मग दुसरा स्वर्गच नाही
    दुसरा स्वर्गच नाही
    काका काकू आत्त्या मामा रे भेटतील का ही
    ताई भाऊजी भाऊ वहिनी प्रिय मनी रेंगाळता ही
    इच्छा मरणे साधेल कारे सुचेनाच काही सुचेनाच काही
    हुर हुर मनाची मग इथे तगमग इथचं शिल्लक राही इथेच शिल्लक राही

  • @swatiskathakathan
    @swatiskathakathan 5 месяцев назад

    खूप वेगळा व चांगला विषय.

  • @anjanadattani6494
    @anjanadattani6494 5 месяцев назад +3

    मैंने हर पल मृत्यु मांगनेवालोकों देखा है जिनकी लिए जिंदगी अतिशय दु:खदायक थी। ये निर्णय आवश्यक है|

  • @neeladilipkarmarkar9611
    @neeladilipkarmarkar9611 5 месяцев назад

    Excellent idea. We should support this film

  • @priyatupake1482
    @priyatupake1482 5 месяцев назад +1

    Its really needed, we appreciate this thought

    • @ajitdivadkar3344
      @ajitdivadkar3344 5 месяцев назад

      Very important thought.But Very difficult to assess that one has exhausted all the utility towards society and one should leave this world to make room for utilisation of resources to next one.
      This is not acceptable.
      Great dramatic point is that of couple.Who should depart first.

  • @rupalinichmache4502
    @rupalinichmache4502 5 месяцев назад

    👍

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 5 месяцев назад

    It is need of the day

  • @pratibhakulkarni7975
    @pratibhakulkarni7975 5 месяцев назад

    हो आहेत.

  • @rehanashaikh5959
    @rehanashaikh5959 5 месяцев назад

    🙏👍

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 5 месяцев назад

    Good

  • @mugdhakulkarni3921
    @mugdhakulkarni3921 5 месяцев назад

    खूप छान विषय आहे, गप्पाही छान झाल्या, सिनेमा छानच असणार,हा विषयाची चर्चा तरी व्हायलाच हवी

  • @balkrishnashelke5280
    @balkrishnashelke5280 5 месяцев назад

    अगदी बरोबर विचार आहेत.सरकारने ईच्छा मरणाची ईच्छा असणारां बद्ल काही कायदेशीर मार्गदर्शक व्यवस्था करावयास हवी.

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 5 месяцев назад +2

    गिरगांव मधील एका जोडप्याने हा विषय 15-20 वर्षांपूर्वी जाहीर पणे मांडला आहे.

  • @pramodgupte3768
    @pramodgupte3768 5 месяцев назад

    Very interesting interview

  • @chandrakantpatil345
    @chandrakantpatil345 5 месяцев назад

    आपण पूर्ण शुद्धीवर असल्यावर जर मरणाचे सेल्फ declaration with two witnesses in the front of any sitting Judge must be respected.
    काळाची गरज आहे आणि त्याचा practicle मधे विचार व्हावा व तसा कायदा व्हावा पण त्याला फाटा फोडायला so many conditions नकोच only Self Declaration of the subject person as stated above.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 5 месяцев назад

    दिलीप प्रभावळकरजी आणि रोहिणी हट्टंगडी मॅडम या सारखे दिग्गच कलाकार चित्रपटात आहेत म्हणजे हा चित्रपट चांगलाच होणार. माझे आवडते कलाकार म्हणून हा चित्रपट बघावाच लागेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 👍👍👍🌺🌺🌺💐💐💐🙏🙏🙏

  • @kiranmatani5109
    @kiranmatani5109 5 месяцев назад

    Nice topic , true but people are scared to face the law

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 5 месяцев назад

    विषय छान आहे.

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 5 месяцев назад

    खूप छान विषय.आणि माझे आवडते कलाकार.हा कायदा व्हावा ही माझी खूप इच्छा आहे,मी ६४वाची सेवानिवृत्त शिक्षिका मुलबाळ नाही.म्हणजे मलातरी वाटते की आपला कुणाला त्रास होऊ नये.पैसा असला म्हणून काय झाले.पोटची मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात मग माझ्यासाठी तरी मला हे खूप चांगले आहे.आणि रोहिणी ताई आणि माझे आवडते, हरहुन्नरी कलाकार आहेत तर नक्कीच पहाणार , थिएटरमध्ये जाऊन.

  • @doc250882
    @doc250882 5 месяцев назад

    Kay Sundar Bolatay .Tumhala Eikane Parwani aahe.

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 5 месяцев назад

    Butifuule actress mam ❤❤❤❤

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +1

    अल्पसंख्येने असले तरी या विचारांचे लोक सूज्ञ आहेत. नाहीतरी शहाणे लोक समाजात खूप कमीच. असतात.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 4 месяца назад

    माझा इच्छामरणस पाठिंबा आहे .आपले जीवन इतरांवर बोजा पडू नये .

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 5 месяцев назад

    वाढत्या वयामुळे वृद्धांची होणारी हेळसांड, वाढलेल्या वयामुळे शारीरिक अस्थिरता, व्याधी, विभक्त कुटुंब पद्धती,मुलांचे आई-वडीलांकडे होणारे दुर्लक्ष,त्रासामुळे जगण्याची इच्छा मरणे या सर्वांचा विचार करता इच्छामरणाचा कायदा असायलाच हवा...

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 5 месяцев назад

    Ichchaamaran kayadaa yaayalaa havaa. Khup garaj aahe. Naahitr vrudhdh kantalun atmahatyaa karu laagalet.

  • @suhasinikarkare7546
    @suhasinikarkare7546 5 месяцев назад

    Mala hey barobar vatat .Zalay ki chyan jagun kiti moh karayacha..chalate firate aahot to paryant thic aahe .Ha kayada laukar amalat yeo.

  • @pradnyamahindrakar5033
    @pradnyamahindrakar5033 5 месяцев назад

    उद्या 23 तारखेला सिनेमा रिलीज होतोय, आम्ही आजच तिकीट बुक केली. खरंच स्वेछामरण कायदा असावा.

  • @shekharkotwal1599
    @shekharkotwal1599 5 месяцев назад

    इच्छा मरण कायदा होणे गरजेचे आहे

  • @yagfe
    @yagfe 5 месяцев назад +2

    इच्छा मरण व आत्महत्या मध्ये फरक काय आहे? यानंतर काय? आत्म्याला मुक्ती आहे पण मोक्ष मिळतो काय?

    • @swatinarvekar6355
      @swatinarvekar6355 5 месяцев назад

      दोन्हीचा अर्थ एकच.आणि शिल्लक भोग भोगण्यास पुन्हा जन्म नक्कीच (म तो कुठल्याही योनीत असे ना का )

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 5 месяцев назад

      व्यावहारिक जीवनात होणाऱ्या शारीरिक/मानसिक वेदना इतक्या भयंकर असू शकतात की मोक्ष/पुनर्जन्म अश्या गोष्टींवर विचार करण्याइतका संतत्वाला पोचलेला माणूस सापडणे कठीण , त्याला तर यापासून तात्काळ मुक्ती हवी असते त्याला आत्महत्या/सुलभ इच्छामरण हवे असते.

  • @supriyaghanekar4436
    @supriyaghanekar4436 5 месяцев назад

    मलाही पटले , समाधानी जगून झालय . धडधाकट असले तरी नेहमी वाटत ही वेळ मरणाला छान आहे .मी ही सरकारच्या कायद्याची वाट पाहत आहे .

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 месяцев назад

    Vedanayukt jeevansathi asa nirnay asava.

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 5 месяцев назад

    चांगली मुलाखत.....पण येवढं स्वःहा विषय निर्णय म्हणजे अवघडचं....😮

  • @hemanpakhale5139
    @hemanpakhale5139 5 месяцев назад

    Purvi chaari dham yatra....proper chalat jaane...he hi ek iccha maran hote ....chaari dham awghad hoti tya yatret kashta ne jaane apekshit hote... Pan aata ti yatra joke aahe... ekdum easy keli aahe

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад

    मरण या शब्दातचं रण म्हणजे रणांगण आहे
    इथे जगताना दुसर्याला दोष न देता मीच माझ्याशी लढताना मला सगळ्यां बद्दल प्रेम माया आस्था असताना मी माझ्या माणसांसाठी काहीच
    करू शकलो नाही एखाद्या व्यक्तीला त्याची आवडती वस्तू पदार्थ किंवा त्याला सुखावून टाकणारी एखादी घटना व्यक्त केल्या नंतर जो आनंद समोरच्याच्या चेहेर्यावर झळकतो तो आनंद पाहिला मिळाल्या नंतर जो आत्मिक आनंद मिळतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आसूसलेलं मन जेव्हा काही कारणामुळे आयुष्यात आलेली निष्क्रियता त्या मुळे बंद झालेल्या आशेच्या वाटा पण इथ पर्रंत मी
    कसा पोहोचलो मी आयुष्यात कसा कसा हसलो
    स्वतःच स्वतःला याचा मनाला जाणवणारा शल्ययुक्क्त जीवन प्रवास जेव्हा डोळ्या समोरुन
    तरळून जातो तेव्हा आयुष्यात मी गमावलेले माझे जीवलग त्यांचे निरागस चेहेरे मन विषण्ण
    करतात आणि खरोखरी असं वाटतं जन्म घेणं हे तर आपल्या हातात नाही पण मृत्यु तरी हातात
    असावा व तो इच्छे प्रमाणे मिळावा अगदी मना
    सारखा इच्छेनुसार पण तो मिळेल का कोणी देईल का कारण मांगनेसे अगर मौत मिलजाती
    कौन जिता इस जमाने में कौन जिता इस जमाने में सगळं विषण्ण रिकामं रिकामं उदास उदास
    मी तर सतत हसणारा माणूस आणि हसवणारा
    नको नको मला इच्छा मरणं रडत रडत मी या जगात आलो हसत हसतचं जाईन समोरच्या
    व्यक्तीच्या चेहेर्या वरचा हसतानाचा आनंद देव
    दर्शना पेक्षा मला खुप खुप आनंद देतो अगदी
    मनसोक्त अगदी मन सोक्त मरणाला विनंती माझी तुला वेळ मिळेल तेव्हा ये मी तुझ्या स्वागता साठी केव्हा ही तयार आहे आत्ता या वेळी या क्षणी आज आत्ता पटापट हाँ......हाँ......हाँ
    ये मरणा साद घालीतो आनंदे प्रेमे
    खेळ येथला कसा मजेशिर येणे नी जाणे
    खेळ येथला कसा मजेशिर येणे नी जाणे

    • @vijaya01
      @vijaya01 5 месяцев назад

      Maladmady yika ruda mansae baykola marun sutachpan marayca prytn kela mule pardesht

    • @vijaya01
      @vijaya01 5 месяцев назад

      Mhatarenchi karun damlelynac lok kahihi bolat aata ykac mul bas yik aai vadilana bagt aani dusr maja karatat

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 5 месяцев назад

    इच्छामरण हा विषय योग्य आहे वृध्दापकालाच्या अनेक समस्या आहेत पण समृर्द्ध जीवन जगून इच्छामरण मागणार्यानाअवश् इच्छामरण द्यावे पण सन्सार कटकटीना वैतागलेल्या इच्छामरण द्यावे माझेवय86

  • @bhaskarkolhatkar5505
    @bhaskarkolhatkar5505 5 месяцев назад

    ते गृहस्थ श्री मंडलीक

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 5 месяцев назад

    माणूस मरणाला नाही घाबरत , त्याच्या वेदनांना (किंवा त्या अशांकेने)भयभीत असतो.सहज वेदनारहित मरण उपलब्ध झाले तर अनेक लोक आनंदाने स्वीकारतील.आत्महत्या भेकडपणा समजला जातो (अध्यात्मिक दृष्टीने किंवा समस्येला सामोरे जाण्याचे धैर्य नाही या अर्थाने बरोबर ही असेल पण) आत्महत्या करायला असीम धैर्य लागते ,कल्पना करून बघा की जाळून घेणे,फास घेणे, गाडी समोर उडी घेणे ,अंगावर काटा येतो नुसत्या कल्पनेने.ज्याला जगायची इच्छा नाही ( वेगवेगळ्या कारणांनी) त्याला इच्छामरण सहज उपलब्ध करून दिले पाहिजे ,कायद्याने.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 месяцев назад

    अनुमती

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 5 месяцев назад

    काळाची गरज आहे.....

  • @sunandagarde7757
    @sunandagarde7757 5 месяцев назад

    अगदी विचार करायला हवा .die with dignity ha pratyakacha hakk aahe.

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 5 месяцев назад

    इच्छामरण अधिकार असावा, आताची परिस्थिती तशीच आहे किंवा सरकारने मोठया प्रमाणात वृद्धाश्रम तयार करावेत आज खाजगी वृद्धाश्रम फी महिन्याला Rs.25000 ते Rs.30000 आहे, मेडिकल खर्च वेगळे.

  • @snehaagharkar9824
    @snehaagharkar9824 5 месяцев назад

    गिरगावातील आर्यन शाळेतील शिक्षिका मा.इरावती लवाटे आणि S.T.महामंडळातील तात्या लवाटे या उभयतांनी इच्छा मरण कायदेशीर व्हावे यासाठी खूप प्रयास केले...अखेर बाई varalya....तात्या म्हातारपण जगताहेत......

  • @janhavig8895
    @janhavig8895 5 месяцев назад

    चित्रपटाचे नाव काय

  • @user-nn9hs6pt9f
    @user-nn9hs6pt9f 5 месяцев назад

    मीपण 52वर्षाची आहे मुलांचे लग्न झाले सर्व कर्तव्ये झाली धडधाकट असताना इच्छा मरण घ्यावे आणि अवयव दान करावे खरंच प्रामाणिक इच्छा आहे

  • @arajput6731
    @arajput6731 5 месяцев назад +1

    चित्रपटाचे नाव= आता वेळ झाली

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +2

    आत्महत्या आणि स्वेच्छामरण यात खूप फरक आहे.

  • @deoyaniostwal9363
    @deoyaniostwal9363 5 месяцев назад

    Santhara jain

  • @nandupalkar3619
    @nandupalkar3619 5 месяцев назад

    Dilip sir aani rohini tai doghe hi great
    Actor aahet

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +1

    अजिबात आक्रमक विचार नाही. अनेक धर्मांमध्येसुद्धा हा विचार केलेला आहे.

  • @ushasoman75
    @ushasoman75 5 месяцев назад

    फक्त याचा गैरफायदा घेतला जाऊ नये.

  • @rekhadewal4304
    @rekhadewal4304 5 месяцев назад

    Gair vapar “Vima” kinva etar gostitahi hoto.apghat muddam ghadvale jatat niyamana davlun

  • @hemanpakhale5139
    @hemanpakhale5139 5 месяцев назад

    Ata wel aali asa me aahe...but ajun kahi varsha aahe😊

  • @sujatamistry1606
    @sujatamistry1606 5 месяцев назад

    Aattach ek country che x prime ministerani tyanchya patni sobat eccha maran sweksrle .aani Aaj Tak madhe hi baatmi 22 Feb chya black and white show var aale hote .

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe1701 5 месяцев назад

    इच्छा मरणावर सरकार मध्ये सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. मनुष्याला सन्मानाने मरता आले पाहिजे.

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 5 месяцев назад

    खरंच अनेक कंटाळून जगतात पण याचा गैरफायदा घेतला जाईल

  • @ushasoman75
    @ushasoman75 5 месяцев назад

    विषय उत्सुकता वाढवणारा दिसतोय.
    कुणाला खरं वाटणार नाही, पण "आता माझी आई 25वर्षांपूर्वी" कुटुंबात म्हणायची की मी जागा खाली केली तरच नवीन पीढीला जन्माला यायला जागा होईल. आणि खरोखरच ती गेली आणि एक वर्षाच्या आत तिला पणतू झाला. म्हणजे ज्या कुटुंबात मनमोकळे वातावरण असते, तिथे वरील विषयाची चर्चा व्हायची. चित्रपटाच्या विषयाला यश येईल. गंभीर असला तरी.

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 3 месяца назад

    सावरकरांचं प्रयोपवेशन याच प्रकारे होत

  • @hemanpakhale5139
    @hemanpakhale5139 5 месяцев назад

    Australian scientist ne kele hote kahi varshan purvi...

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 5 месяцев назад +2

    हो मी या विचाराची नक्की आहे. हा हक्क मिळाला पाहिजे.

  • @sharadkavadi1499
    @sharadkavadi1499 5 месяцев назад

    सावरकरांनी स्वतःचे मरण ओढवून घेतले ते कोणत्या प्रकारात मोडते??? यावर कोणी खुलासा करेल का???

    • @bhaskarkolhatkar5505
      @bhaskarkolhatkar5505 5 месяцев назад

      स्वतः सावरकरांनी सहा दिवस अगोदर "आत्महत्या की आत्मसमर्पण "या लेखात केलाय

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 месяцев назад

    Support systim var कोणालाच ठेवू नये

  • @nandinikulkarni2458
    @nandinikulkarni2458 5 месяцев назад

    Girgaon madhe ek family ne icchamaran have ase sangitale hote.

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 5 месяцев назад

    माझे स्पष्ट मत आहे.. इच्छामरण असावे..