पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामांची प्रेरणादायी गोष्ट | Harishchandra Birajdar | विषयच भारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 48

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 2 года назад +13

    अगदी सुंदर माहिती जुळणी केली आहे.
    दिल्लीच्या शेरास महाराष्ट्राचा वाघ भारी पडला.
    1977 च्या लढतीवेळी मी अठवीत होतो.रेसकोर्स मैदानवर कुस्ती होती.मैदान सकाळपासूनच भरल होत आणी हजारो कुस्ती शौकिन बाहेरच ताटकळत उभे होते म्हणतात. बेळगावच्या कुस्ती शौकिनानीं आधिच तिकिटं काढून ठेवली होती त्यामुळे ते लवकरच मैदानात जाऊन बसले होते म्हणतात.माझ्या गल्लीत सर्व शेतकरी आणी कुस्त्या करणारे त्याचबरोबर कुस्तीशौकिन असल्याने जवळपास सर्वानीच तिकिटं आनली होती.मला वाटत तेंव्हा कुस्तीच समालोचन रेडिओवर सुरु होत.कुस्त्या संपल्यावर गल्लीतील मंडळी कुस्तीची समक्ष माहिती सांगताना आनंदाला उधान उरलं नाही. दुसऱ्या दिवशी बेळगावच्या सर्व व्रूत्तपत्रातून फोटोसह पहिल्या पानावर बातम्या आल्या *दिल्लीच्या शेरास महाराष्ट्राचा वाघ भारी पडला* तेंव्हा अनेकांनी पेपरच्या कात्रणाचे फोटो फ्रेम करुन ठेवलेत.मी लहान होतो.तेंव्हा बेळगावमधे अनेक ठिकाणी मामांचा भव्य सत्कार करण्यात आला,अनेक तालमीचे उद्घाटन मामांच्या हस्ते झाले.त्यावेळी मी शाळा चुकवून त्यांचा सत्कार कार्यक्रमात हजेरी लावत होतो.आणी त्यावेळी मी त्यांच्या जवळ जाऊन हातात हात घेतलेली आठवण अजूनही ताजीतवानी वाटते.मामांवर माझी श्रध्दा असल्याने त्यांना देवाज्ञा झाल्याने मी अत्यंत दुःखी झालो.

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 года назад +18

    सुंदर माहिती दिली. हरिश्चंद्र बिराजदार महाराष्ट्राची शान. त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🏻🙏🙏🏻

  • @बोलकिभावा
    @बोलकिभावा 2 года назад +22

    बिराजदार मामांना कोटी कोटी प्रणाम ...

  • @IshalWriter
    @IshalWriter 2 года назад +16

    Quality 👌👌👌... बिराजदार मामांना शतशः नमन

  • @ashutoshpatil6410
    @ashutoshpatil6410 Год назад +3

    मामा लिंगायत धर्माचे होते त्यामुळे ते शकाहरी असणार याचाच अर्थ बिना अंडी मटणाचे पण पैलवान होता येत🙏

  • @aappashinde8317
    @aappashinde8317 2 года назад +20

    नाद नाही करायचा बिराजदार मामा यांच्या कुस्ती कारकिर्दीचा

  • @CreativeMindAkshayb
    @CreativeMindAkshayb 2 года назад +29

    पैलवानकी करायला आंडी मठाण नाही, आंगात रग लागतिया... - बिराजदार मामा ✌🏻😇

  • @shrikantbirajdar3313
    @shrikantbirajdar3313 2 года назад +5

    हरीश्चंद्र बिराजदार महाराष्ट्राची शान , त्याना भावपूर्ण आदारांजली 💐💐💐💐

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 11 месяцев назад +2

    डोळे भरतात अशे क्षण ऐकले की छान माहिती 🙏

  • @roshanvilla8617
    @roshanvilla8617 2 года назад +11

    वड भावा.... मामांना मानाचा मुजरा... अंगावर काटा आला

  • @dipakchavan6143
    @dipakchavan6143 2 года назад +6

    #महाराष्ट्राच्या_हृदयसिंहासनावर_आरुढ_आसलेले #जुन्या_काळातला_नामांकीत_पैलवान_महान_मल्ल, #दिग्गज_वस्ताद
    #पहीले_डबल_महाराष्ट्र_केसरी_गणपतराव_खेडकर #आण्णा 👑💪
    १९६४ व १९६५ सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणारे पैलवान. गणपतराव खेडकर..
    हे श्री शाहू विजयी गंगावेश तालमीचे दिग्गज पैलवान
    आण्णानी सुरवातीला गवळी वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले.. बगता बगता जोड वाढत गेली...
    उंची 6"5 वजन 140 असे भारदस्त व शरिरसंपन्नतेचे मालक असलेल्या खेडकर आण्णा यांनी तत्कालीन कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता.
    हजारो कुस्तीशौकीनांचे पैलवानाचे खेडकर अाण्णा है दैवत बनले होते...
    कोणत्याही मैदानात खेडकर अाण्णा आले कि लोकांचा टाळ्यांचा कडकडाट व जल्लोष असायचा..त्यांची कुस्ती व आशीर्वाद घ्यायला लोकं तासनतास त्यांच्या मागे रेंगाळत असायचे...
    डब्बल महाराष्ट्र केसरी किताबा बरोबरच खेडकर आण्णाच्या नावावर कुस्तीतलं बरंच योगदान आहे..
    त्यानी गंगावेश तालीम मधे एकसे एक मातब्बर व लढवय्ये पैलवान तयार केले.
    रुस्तम-ए-हिंद ,सर्वोत्तम महाराष्ट्र केसरी पैलवान कै. हरिश्चंद्र बिराजदार मामा .
    हिंदकेसरी ,महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी पैलवान गुरुवर्य. दिनानाथ सिंह आण्णा.
    महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम.
    महाराष्ट्र केसरी पैलवान संभाजी पाटील आसगावकर.
    महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव दादा मोळे.
    मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर .
    महान मल्ल पैलवान टोप्पाना गोजगे .
    जुने पैलवान बाला रफिक शेख .
    इत्यादी #शेकडो एका पेक्षा एक दर्जेदार पैलवान आण्णानी निर्माण केले..
    दिल्लीच्या महाबली पैलवान सतपाल नावाच वादळ आलं होत. या वादळाला कोण थोपविणार ? असा प्रश्न्न प्रत्येक तालमीत विचारला जात होता . उत्तरेकडून आलेला हा पैलवान अजिंक्य ठरून जाणार काय ? अस वाटत असतानाच हे वादळ रोखलं, रस्तुम ए हिंद हरिश्चंद्र मामा बिराजदार यांनी.
    त्यांनी सामने थंडर या डावावर महाबळी सतपालला चित केलं . या कुस्तीसाठी मामांना धडे दिले खेडकर अाण्णांनी .
    महाबली सतपालला चित केल्यावर या गुरु शिष्याच्या जोडीला अवघ्या महाराष्ट्रान सलाम केला होता .
    खेडकर अाण्णाच गावं वाळवा तालुक्यातील नवेखेड.
    एका छोटयाश्या खेडयात जन्मलेले आण्णा कुस्तीच्या वेडासाठी कोल्हापूरला गेले. अखंड साधना करून ते स्वत डबल महाराष्ट्र केसरी झालेच , पण त्यांनी नामांकीत मल्ल घडविले. आयुष्यभर कुस्तीसाठीच जगले अाण्णा . कुस्ती वाढवली .
    आजची मुल एकाद्या अभिनेत्यावर किंवा क्रिकेटपटूवर जसं प्रेम करतात तसचं प्रेम ज्या पैलवानांना मिळालं त्यापैकीच खेडकर अाण्णा होते .
    अाण्णाच्या निधनानंतर #त्यांच्या_गावात_त्यांचे_स्मारक #उभा_करण्याची_घोषणा_झाली होती. पण अजूनही त्या घोषणेचे कृतीत रुपांतर झालेले नाही .
    याची #खंत_वाटते
    अण्णांना कुस्ती सुटल्यानंतर खूप हलाखीत राहावे लागले. पण हा स्वाभिमानी पैलवान आयुष्यभर ताठ मानेनच जगला. गरिबीच्या वेदना सहन केल्या पण त्या कोणापुढ व्यक्त केल्या नाहीत . असा हा महान मल्ल .
    या कर्तबगार पैलवानाला श्री शाहू विजयी गंगावेश तालीमीचा मानाचा मुजरा... 💖🌹🙏
    धन्यवाद.. 🙏
    जय हिंद.. 🇮🇳
    पै. संग्राम कांबळे. 👮
    कुस्ती मल्लविद्या 💐💪

  • @makarands830
    @makarands830 22 дня назад

    असा पैलवान.. माणूस पुनः होणे नाही.. शत शत नमन.. प्रणाम अणि दंडवत ..

  • @SanjayTodkar-u6p
    @SanjayTodkar-u6p 8 месяцев назад +1

    कोण म्हणतय वाणी उदमांची पोर कुस्ती खेळत नाहीत पैलवान जातीत नाय मातीत जन्माला येतो जय महाराष्ट्र

  • @appasaheblate4275
    @appasaheblate4275 2 года назад +7

    बिराजदार मामा 💐💐🙏🙏

  • @dattatraydeshmane1396
    @dattatraydeshmane1396 2 года назад +1

    महाराष्ट्राची शान महान पैलवान हरिश्चंद्र (मामा) बिराजदार

  • @SwaRaag
    @SwaRaag Год назад

    खूप रोमहर्षक ..
    हा इतिहास चित्रपटरुपाने युवावर्गापुढे यायला हवाच💐💐

  • @omkarbarge8839
    @omkarbarge8839 2 года назад +2

    लय भारी प्रेझेंटेशन सचिन भैय्या ... 🥰🥰

  • @paivijaypujari4679
    @paivijaypujari4679 2 года назад +15

    बिराजदार मामा सारखे पैलवान होने नाही

  • @yashawantkapade7993
    @yashawantkapade7993 Год назад

    अभिमान वाटतो हरिश्चंद्र बिराजदार पैलवान यांचा.

  • @dailyupdated7
    @dailyupdated7 2 года назад +4

    Presentation khup Chan 🔥

  • @balasahebadagale1274
    @balasahebadagale1274 2 года назад

    खुपच छान साध्या सोप्या भाषेत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @sachin_yelure007
    @sachin_yelure007 Год назад

    मस्त माहिती दिली

  • @Shubham-sm2wl
    @Shubham-sm2wl 2 года назад +2

    Presentation lay bhari rav🤩💥😎

  • @balasahebshitole5183
    @balasahebshitole5183 10 месяцев назад

    Very nice information

  • @Commando-uh8jm
    @Commando-uh8jm 2 года назад +1

    nice Presentation. ...next lallantop 🔥🔥🔥

  • @allizzwell7327
    @allizzwell7327 2 года назад +2

    Presentation बद्दल positive

  • @vgproduction3656
    @vgproduction3656 2 года назад +3

    नाद भरी ✌️✌️✌️🚩🚩

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal5852 Год назад

    मामा 🙏🙏🙏

  • @RohitHogade-vj5bw
    @RohitHogade-vj5bw Месяц назад

    मी रामलिंग मुडगड चा आहे पै हरिश्चंद्र बिराजदार अण्णा आमच्या गावचे आहेत .

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 2 года назад +1

    मस्तच सचिन सर...

  • @prakashbudake3245
    @prakashbudake3245 2 года назад

    Khup chaan mitrano.
    Keep up the spirit 👍

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 2 года назад +1

    Ek no mama hote

  • @pravinkhopade2986
    @pravinkhopade2986 2 года назад +1

    1 no

  • @user-ny1pg1zw6q
    @user-ny1pg1zw6q 2 года назад +1

    Mast bhau😍

  • @BhushanGengane
    @BhushanGengane Год назад

    Inspiring story ❤

  • @sandeepsavant6758
    @sandeepsavant6758 2 года назад

    Lai Bhari

  • @extensive9000
    @extensive9000 2 года назад +1

    पैलवान असावा तर असा

  • @surajsakunde1555
    @surajsakunde1555 2 года назад +1

    Very nice story

  • @parasramtagad8263
    @parasramtagad8263 2 года назад

    👌👌

  • @bhatuwankhede8792
    @bhatuwankhede8792 2 года назад +3

    छान vdo आहे..
    "सामने खंड हर "हा कसा डाव असतो ?कोणी सांगू शकाल का?

    • @prathmeshphalke3713
      @prathmeshphalke3713 2 года назад +2

      " सामने थंडर " बोलतात या डावाला...
      दुहेरी पट यासाठी प्रतिडाव आहे..

    • @bhatuwankhede8792
      @bhatuwankhede8792 2 года назад +1

      @@prathmeshphalke3713 thanks...!

    • @dipakchavan6143
      @dipakchavan6143 2 года назад

      कुस्ती मल्लविद्या ह्या फेसबुक पेज वर जाऊन व्हिडिओ पण पाहू शकता

  • @suryratn322
    @suryratn322 2 года назад +1

    pan ata sikander shekh ahe .. Maharashtra ca wagh

  • @directattachmentwithland6961
    @directattachmentwithland6961 6 месяцев назад

    भाई हिंदी में भी अनुवाद करें।