पाट्यावर वाटलेली आईच्या हातची खोबरा लसणाची चटणी | Coconut Garlic Chutney (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- पाट्यावर वाटलेली आईच्या हातची खोबरा लसणाची चटणी | Coconut Garlic Chutney (Konkan) आतापर्यंत आपण वेगवेगळ्या चटण्या चाखल्या असतील परंतु मित्रांनो, माझ्या गावी कोकणामध्ये खोबऱ्या लसणाची चटणी खूप लोकप्रिय आहे. पाट्यावर पारंपरिक पद्धतीने आई खोबऱ्या लसणाची चटणी तयार करते. ही चटणी तयार करण्यासाठी घरगुती मसाले, काळे तीळ, लसूण, भाजलेला खोबरा, कोथिंबीर वापरली जाते. गावच्या पाट्यावर आई नेहमी ही खोबरा लसूण चटणी तयार करते. कोकणात सर्वांच्या घरी पाटा वरवंटा असतो त्यावर बऱ्याच चटण्या, मसाले तयार केले जातात परंतु आजकाल नव्या जमान्यात लोकं मिक्सरवर वाटण तयार केले जाते. त्यामध्ये अंगमेहनत नसते पण पाट्यावरील चटणीची बातच काही निराळी असते. ही खोबरा लसणाची चटणी अतिशय चविष्ट, झणझणीत तांदळाची भाकरी, नाचण्याच्या भाकरीसोबत चटणी जाम भारी लागते.
#CoconutGarlicChutney #ChutneyRecipe #EasyChutenyRecipe #sforsatish
कोकणामध्ये गावी केले जाणारे पदार्थ यांची पण एक वेगळीच खासियत आहे. कोकणात वेगवगेळ्या विभागात ही चटणी खूप लोकप्रिय आहे. खोबऱ्या लसणाची चटणी पाट्यावर कशी तयार करतात, आईच्या हातची खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी, गावरान पद्धतीने चटणी कशी तयार करतात हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पहा ! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका!
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar