मालवण ४,किल्ले पद्मगड🚩| किल्ले सिंधुदुर्ग चा राखणदार | padmagad fort | sindhudurg | malvan | kokan |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • जिल्हा : सिंधुदुर्गश्रेणी : मध्यम
    छ. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट ही किल्ल्र्‍यांची साखळी तयार केली. या किल्ल्र्‍यांपैकी पद्मगड हा समुद्रात असलेला किल्ला सिंधुदूर्ग आणि मालवण किनारा ह्र्‍यांच्या मध्ये उभा आहे. २००६ च्या त्सुनामीपूर्वी ओहोटीच्या वेळी मोरयाच्या धोंड्यापासून सिंधुदूर्ग किल्ल्यापर्यंत पाण्यातून चालत जाता येत असे. या मार्गाने होऊ शकणार्‍या संभाव्य हल्ल्याचा विचार करुन महाराजांनी सिंधुदूर्ग व मालवण किनार्‍यामधील खडकावर पद्मगड किल्ला बांधला असावा.
    पद्मगड भोवतालचा खडक विशिष्ट तर्‍हेने फोडून तेथे नविन जहाजे बांधण्याची व जुनी जहाजे दुरुस्त करणारी गोदी उभारण्यात आली.
    पहाण्याची ठिकाणे :गडाचे सिंधुदूर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करुन असलेले छोटेखाणी प्रवेशद्वार अजून शाबूत आहे. गडाचे बुरुज व तटबंदी याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. किल्ल्यात एक कोरडी विहिर व वेताळाचे मंदीर आहे. मालवणच्या कोळी लोकांचा हा देव असून त्र्‍यांनी देवळासमोरील बुरुजावर अनेक झेंडे रोवलेले आहेत. पद्‌मगडाभोवतालीचा दगड विशिष्ट प्रकारे फोडून जहाजांसाठी गोदी शिवाजीमहाराजांनी तयार केली होती. त्याचे अवशेष किल्ल्याच्या तटावरुन दिसतात.
    पोहोचण्याच्या वाटा :पद्मगडावर जाण्यासाठी मालवण किनार्‍यावरील दांडगेश्वर मंदिरापासून होडी बरीच खटपट केल्यावर व बिदागी दिल्यास मिळू शकते. नाहीतर सिंधुदूर्ग किल्ल्यात बोटीने जाताना दुर्बीणीने पद्‌मगडाचे निरीक्षण करता येते. सिंधुदूर्गाकिल्ल्यातील शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा असलेल्या बुरुजावरुन पद्मगडाचे निरीक्षण करता येते.
    #malvan
    #padmagadfort
    #sindhudurgfort
    #mahadkarmehulsawant
    #kokan

Комментарии • 2