#Kuravpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • श्री क्षेत्र कुरवपुर (कुरगड्डी)
    आंध्रप्रदेशातील कुरवपूर हे स्थान दत्तमहाराजांच्या पदस्पर्शाने स्पर्शाने पावन झालेले, हे स्थान कृष्णेच्या प्रवाहाने विभागले गेले त्यामुळेच त्याला #कुरगुडी बेट म्हणतात. याचे वर्णन #गुरुचरित्रात आले आहे. याचे वर्णन #स्वामींची तपोभूमी म्हणून केले जाते.
    #कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते #कर्नाटकात #रायचूर जिल्ह्यात येते. #कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ #कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते #श्रीपाद #श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठया #औदुंबर वृक्षाखाली #अनुष्ठान करीत. बेटावरील दोन-चार घरी #माधुकरी मागून ते निर्वाह करीत.
    सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून, ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून #सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. #पादुका, #मंदिर, आजूबाजूची #वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. #कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते; पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री #वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे #आंध्र आणि #कर्नाटक यांच्या सीमेवरील #रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी #कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळयात न सोसणा-या कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते.

Комментарии • 32

  • @mediatedsoul
    @mediatedsoul 20 дней назад

    श्रीपाद राजम शरणम प्रपदे ❤

  • @bharatjadhav5261
    @bharatjadhav5261 10 дней назад +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @abhaysinghpatil3828
    @abhaysinghpatil3828 6 месяцев назад +2

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्दे

  • @vaishalibachhav7857
    @vaishalibachhav7857 3 месяца назад +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏

  • @jyotipatankar7331
    @jyotipatankar7331 3 месяца назад +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपाद वल्लभ दिगबरा

  • @artideokar892
    @artideokar892 8 месяцев назад +2

    Gurudev Datt.khup Chan mahiti

  • @Bharatiya6624
    @Bharatiya6624 3 месяца назад +1

    Digambara digambara shripad wallbha digambara

  • @shubhadabhave8445
    @shubhadabhave8445 5 месяцев назад +2

    वल्लभ पुर मधेच विठ्ठल बाबाचा आश्रम आहे तिथेच श्रीपाद स्वामी सूर्य नमस्कार घालायचे तोच आश्रम आहेना तिथूनच मुख्य मंदिरात बोटिने जाता येते जवळच आहे असे समजले

  • @madhurikulkarni9539
    @madhurikulkarni9539 5 месяцев назад +2

    रायचूर ला उतरल्यावर कुरवपूरला कसे जायचे? कृपया सांगाल का प्लीज.

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      रायचूर रेल्वे स्टेशन वरून, रायचूर बस स्थानक जा, तिथुनच सकाळी ७.३० ला आतकुर ला बस लागते, आतकुर वरून बोटीने नदि पार करून कुरवपूर/कुरगुड्डी ला जातात.

  • @shubhadabhave8445
    @shubhadabhave8445 5 месяцев назад +1

    विठ्ठल बाबा आश्रम व श्रीपाद छाया आश्रम येथून आम्हाला दुसऱ्या दिवशी रायचूर ला जाण्यासाठी गाडीची सोय असते का आम्ही 45लोक आहोत गाडीवाल्याचे नंबर असेल तर पाठवा

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      माझ्याकडे गाडीचा नंबर नाही पण तुम्हाला तेथून रायचूर जाण्यासाठी सोय मात्र नक्की होऊ शकते

    • @shubhadabhave8445
      @shubhadabhave8445 5 месяцев назад

      🙏🙏

  • @swati7132
    @swati7132 6 месяцев назад +2

    कूरवपूरला राहाण्यास आमची सोय होईल का आम्ही 44 लोक आहोत

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад +1

      हो

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      संपर्क - ०८५३२ २८०५७०. ०९७४०३१३८२८, ०९४४८५६८१८३

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      तुम्ही राहण्यासाठी, चांगली सुविधा पंचदेव पहाड येथे आहे, तिथे तुम्ही सर्व जण व्यवस्थित राहु शकतात. वरिल संपर्क आहेत ते मुख्य मंदिर कुरवपूर.

    • @swati7132
      @swati7132 5 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @shubhadabhave8445
    @shubhadabhave8445 5 месяцев назад +1

    विठ्ठल बाबा आश्रमाचा तुम्ही दिलेला फोन लागतच नाही

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад +1

      श्रीपाद छाया आश्रम, पंचदेव पहाड +91 99123 14718

    • @shubhadabhave8445
      @shubhadabhave8445 5 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      @@shubhadabhave8445 Manjunath Bhatt Pujari
      +91 97403 13828
      +91 97414 44348

  • @shubhadabhave8445
    @shubhadabhave8445 5 месяцев назад +1

    विठ्ठल बाबा आश्रम व वलभ आश्रम एकच का

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      ताई तुम्ही कुरवपूर बिनधास्त जा, तिथे राहण्याची सोय ३ ठिकाणी आहे, त्यामुळे राहण्यासाठीची चिंता नसावी

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      पंचदेव पहाड, श्रीपाद श्रीवल्लभ आश्रम व मुख्य मंदिर येथे, यापैकी कोणत्याही एका ठिकाणी ५० लोक आरामात राहु शकतात

    • @shubhadabhave8445
      @shubhadabhave8445 5 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      @@shubhadabhave8445 Manjunath Bhatt Pujari
      +91 97403 13828
      +91 97414 44348

  • @manjushaghan109
    @manjushaghan109 6 месяцев назад +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @madhurikulkarni9539
    @madhurikulkarni9539 5 месяцев назад +2

    रायचूर ला उतरल्यावर कुरवपूरला कसे जायचे? कृपया सांगाल का प्लीज.

    • @GoreBapu
      @GoreBapu  5 месяцев назад

      रायचूर रेल्वे स्टेशन वरून, रायचूर बस स्थानक जा, तिथुनच सकाळी ७.३० ला आतकुर ला बस लागते, आतकुर वरून बोटीने नदि पार करून कुरवपूर/कुरगुड्डी ला जातात.