रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2022
  • 'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही.
    आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गांधी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'यळकोट', 'ध्यानीमनी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'चाहूल', 'आषाढ बार', 'हॅम्लेट' या आणि अशा अनेकोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत.
    संहितेचा एकंदर आशयच नव्हे तर त्यातला शब्दनशब्द आपलासा करुन अत्यंत चोख तयारीने चंदू सर नाटक उभं करण्याच्या प्रक्रियेला सामोरे जातात. मात्र हे काटेकोर नियोजन, नाट्यशास्त्राचा केलेला रीतसर अभ्यास, अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचा अनुभव ह्यांपैकी कशाचंही ओझं मात्र ते होऊ देत नाहीत. अतिशय तन्मयतेने, उत्स्फूर्तपणे आणि बारकाईने सादरीकरणाच्या विविध शक्यता ते नटांबरोबर आणि तंत्रज्ञांबरोबर पडताळून पाहतात; आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना एक रसरशीत, नावीन्यपूर्ण रंगानुभव देण्याचा प्रयत्न करतात.
    संहितेचं पुनर्लेखन ही दिग्दर्शकाने नाटककाराला स्वतःच्याच विचारांशी करून दिलेली पुनर्भेट कशी असते, प्रत्यक्ष उभं राहण्यापूर्वी नटाने संवादांवर काय काम करावं, नाटकातील हालचाली आणि आकृतीबंध हे मुद्दामहून ठरवण्याऐवजी आपोआप उमलू कसे द्यावेत, नेपथ्य आणि संगीताचा वापर द्विमितीतील रंगमंचीय अवकाश त्रिमितीत परिवर्तित करण्यासाठी कसा करावा, प्रयोग हलू नये म्हणून काय काळजी घ्यावी, काही सुचत नसेल अशा वेळी दिग्दर्शकाने काय करावे अशा अनेक रोचक विषयांवर चंदू सर आज बोलणार आहेत.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 58

  • @amolkshirsagar1191
    @amolkshirsagar1191 Год назад +4

    तीन भागातील ही मुलाखत "त्रीनाट्य धारेईतकीच " सुंदर रंगली आहे ,
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात त्रीनाट्य धारेचे जसे महत्त्वाचे स्थान आहे तसेच
    चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शक म्हणून एक स्वतंत्र स्थान आहे हे या निमित्ताने परत एकदा अधोरेखित होते ...।

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 Год назад +9

    परत अखंड मुलाखत ऐकली ज्यानी जीवंत समोर नाटक ३ अंकी पाहिली. इतकी सुन्दर मुलाखत ! "चन्द्रकांत उवाच" असचं म्हणावं. प्रयोग अतीशय रंगला ! ❤️

  • @itsskyway7047
    @itsskyway7047 Год назад +3

    चंदू सरांची ही मुलाखत नवीन कलाकारांसाठी विद्यापीठ प्रमाणे काम करेल.....खूप बुद्धिमान व्यक्ती आपल्या मराठी रंगमंच्याला मिळालेला आहे.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Год назад +2

    रंगपंढरी टीमचे विशेष आभार!
    नाटकाबद्दल किती छान माहिती विनासायास कळतेय! कुलकर्णी सर खरंच ग्रेट!!
    नाटक कसे बघायचे हे ही कळतेय.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Год назад +3

    विचार किती सुस्पष्ट असावेत !!! आणि ते परत योग्य शब्दात मांडता येणं ही तर कमालीची ताकद आहे. 🙏🏻

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Год назад +4

    रंगपंढरी, तुम्हाला असं वाटतं नाही का चंद्रकांत कुलकर्णांची मुलाखत अजून ५-७ भाग तरी व्हायला हवी!!!! He himself is the one man institute !!! सरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 Год назад +1

    आळेकर सरान नंतर खूप अभ्यास पूर्ण अशी मुलाखत आज बघायला / ऐकायला मिळाली . दिग्दर्शक म्हणून. ह्या दोघांच्या मुलाखती ऐकल्यावर नाटक कसे बघायचे हे आत्ता कळायला लागले

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 Год назад +2

    सर, तुमच्या मुलाखतीतूच आम्हास शांतता मिळाली, भरपूर ऊर्जा पण. धन्यावाद .

  • @madhumatideshpande9911
    @madhumatideshpande9911 Год назад +3

    मुलाखती चे तिन्ही भाग पाहिले , साहित्यिक मेजवानी च मिळाली आणी आता पुढे कुठलंही नाटक बघताना नविन दृष्टीकोनातून ते बघायला खुप मजा येईल .वा!वा!

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 Год назад +2

    उत्तमता आणि प्रतिभा यांचा सुरेख संगम!! प्रेक्षक म्हणून प्रगल्भ करणारी मुलाखत👌👌

  • @vineetavartak3450
    @vineetavartak3450 Месяц назад

    खुपच सुंदर मुलाखत!!
    मधुराणी तुम्ही मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला खुप छान मोकळेपणाने बोलू देता मधे अडवत नाही त्यामुळे सलग बोलणं ऐकून छान वाटत.मी रंग पंढरी वरच्या मुलाखती नेहमी ऐकते

  • @supriyabrahme4132
    @supriyabrahme4132 Год назад +1

    अतुल कुलकर्णी ची मुलाखत बघायला आवडेल तुमच्या या कार्यक्रमात🙏🏻

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Год назад +2

    तीन तास खिळवून ठेवणारी ही मुलाखत अविस्मरणीय अनुभव देवून गेली हे नक्की.धन्यवाद परत एकदा दोघांनाही.विचार समृध्दी म्हणजे काय तर हे सगळं.धन्यवाद आणि आभार ही.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Год назад +2

    धन्यवाद , रंगपंढरी !
    एका अभ्यासू दिग्दर्शकाच्या मुलाखतीने केवळ नाट्यकर्मींनाच नव्हे तर प्रेक्षकांना देखिल खूप काही मिळाले.

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 Год назад +3

    अप्रतिम. गेल्या चार दशकांमधला नाटकाचा प्रवास अनुभवायला मिळाला. रंगपंढरी धन्यवाद. सर्व दिग्दर्शकांमधील उत्तम मुलाखत.

  • @supriyabrahme4132
    @supriyabrahme4132 Год назад +2

    अप्रतिम परिपूर्ण अशी मुलाखत! अत्यंत उंचीवरील आणि समृद्ध अश्या व्यक्तीमत्वाविषयी ऐकायला अतिशय आनंद झाला आणि खूप शिकायला मिळाले. 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @smadam4243
    @smadam4243 Год назад +2

    या मुलाखती मधून नाटकाचे माहित नसलेले आयाम कळले. आता नाटक अधिक जाणीव पूर्वक पाहता येईल.धन्यवाद

  • @dhanashreedivekar8052
    @dhanashreedivekar8052 Год назад +2

    परिपुर्ण मुलाखत, आता ही सगळी नाटकं पुन्हा एक-दोन वेळा बघायला मज्जा येईल.

  • @manasiborkar8305
    @manasiborkar8305 Год назад

    एका देवदूत कडून मिळालेली एक अप्रतिम वैचारिक मेजवानी
    आभारी आहे

  • @user-ck5tj3qs1m
    @user-ck5tj3qs1m 15 дней назад

    Excellent interview!

  • @sureshshelar2534
    @sureshshelar2534 Год назад

    धन्यवाद. एका उत्तम दिग्दर्शकाला ऐकायला मिळालं. आता वामन केंद्रे सरांना ऐकायला आवडेल.

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 11 месяцев назад

    सर्व natak प्रेमींना सुंदर माहीती मिळाली धन्यवाद

  • @cadiwan
    @cadiwan Месяц назад

    पुन्हा एकदा तीन्ही भाग पाहिले :)
    आनंद !!

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 11 месяцев назад

    अतिशय प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व ऐकायला मिळाले धन्यवाद

  • @madhuripatil6680
    @madhuripatil6680 Год назад

    परिपूर्ण नाटक शाळा डोळयासमोर उभी केली
    सर ही पदवी किती योग्य आहे

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 Год назад +2

    Thank you very much. Just like his trilogy all the three parts are worth watching. His command and knowledge is unbeatable. Directors interviews are amazing

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 Год назад

    खूप खूप धन्यवाद रंगपंधरीचे अणि त्यांच्या सगळ्या टीम चे

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 Год назад

    अतिशय उत्तम मुलाखत
    खुप हुशार विवेकी उच्च दर्जाची अभिरुची उत्तम जाण अभ्यासपुर्ण काम करणारे चंद्रकांत कुलकर्णी खुप खुप अभिनंदन
    मधुराणी खुप खुप धन्यवाद
    तुझ्या अभ्यासपुर्ण मुलाखतकार असण्याचा अभिमान वाटतो

    • @RangPandhari
      @RangPandhari  Год назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, रसिका जी. तुमच्यासारख्या साक्षेपी प्रेक्षकांमुळे आम्हाला अजून चांगलं काम करायचा हुरूप येतो.
      योगेश तडवळकर
      - निर्माता, दिग्दर्शक रंगपंढरी

  • @jayamohrir8603
    @jayamohrir8603 Год назад

    सुपच सुंदर मुलाखत ऐकतच रहावे वाटते

  • @rahulbawankule
    @rahulbawankule Год назад

    Finally, he came, he saw, and he conquered as usual. A long wait is worth it. Now other directors do nataks as a profession, but Chandrakant Kulkarni lives in it. That is why his nataks are different from others and very well received by the audiences and successfully run in theatres.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 Год назад

    मधुराणीजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही एका प्रतिभाशाली नाट्य-चित्र दिग्दर्शकाची मुलाखत ऐकवलीत, आम्हाला पहाता आली. चंद्रकांतजींना ऐकताना, पहाताना खूप छान वाटले. किती छान बोलले. आणि तुमचेही अभिनंदन की तुम्ही समोरच्याला जराही अडथळा न आणता बोलतं ठेवता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची मते आपल्याला ऐकता येतात. ही तुमची हातोटी मला खूप आवडली. चंद्रकांतजींची बरीच नाटके मी पाहिली आहेत--ध्यानीमनी, व्यक्ति आणि वल्ली, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला, वाऱ्यावरची वरात, हमीदाबाईची कोठी. माझे आवडते दिग्दर्शक आहेत. एकच खंत आहे की अति महत्वाची तीन नाटके वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या नाटकांचे एकत्रीकरण करून त्यांनी जे प्रयोग केले होते, ते पहाता आले नाहीत. माझी किंवा आम्हा प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की त्यांनी हा उपक्रम पुन्हा करावा. आणि तो आम्हाला पहाता यावा आणि आमच्या डोळ्यांचे पारणे फिटावे. आमची ही इच्छा पूर्ण होईल अशी मी आशा करते. व तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देते. 💐💐🙏🙏🌹🌹

    • @RangPandhari
      @RangPandhari  Год назад

      संध्या जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! रंगपंढरी अशाच पहात रहा.
      त्रिनाट्यधारा सध्या उपलब्ध नसली तरी 'वाडा चिरेबंदी' या नाटकाचे प्रयोग अजूनही होत असतात. जरूर पहा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @mitapansare3093
    @mitapansare3093 Год назад

    👌👌💐💐

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Год назад

    Waah

  • @abhyangam7840
    @abhyangam7840 9 месяцев назад

    प्रचंड व्यक्तिमत्त्व ..तुम्ही लिहा नाटकावर...नाटक लिहिणारा दिग्दर्शक

  • @seemachougule8296
    @seemachougule8296 Год назад +2

    चंद्रकांत कुलकर्णी सरांवर PHD करण्यासाठी ही मुलाखत mile stones आहे

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 Год назад +1

    A legendary director

  • @hemaayachit435
    @hemaayachit435 Год назад

    Khup sundar. Great 🙏

  • @prakashshetty5189
    @prakashshetty5189 Год назад

    🙏💐💐💐🙏

  • @danceforever5940
    @danceforever5940 Год назад

    Apratim

  • @rahulaphale
    @rahulaphale Год назад +1

    Very insightful and interesting interview

  • @jsagar95
    @jsagar95 11 месяцев назад

    धन्यवाद !🙏🏻

  • @oriandcalliartshop2491
    @oriandcalliartshop2491 Год назад

    Kammmmaal 🎉

  • @neetashinde4265
    @neetashinde4265 Год назад

    अप्रतिम मुलाखत. किती अभ्यासू आणि नम्र. नाटक जगतात ते. Great 🙏

  • @aparnapangare6547
    @aparnapangare6547 Год назад

    Hats 🎩 off to this man and his passion!!! Take a bow 🙇‍♀️ sir!!!

  • @sangeetakeluskar5988
    @sangeetakeluskar5988 Год назад

    Atishay surekh mulakhat. Chandrakant kulkarni yancha natya pravas anubhavta ala. Thanks team rangpandhri

  • @rahulbawankule
    @rahulbawankule Год назад +3

    Please call Vijaya (bai) Mehta. A stalwart of theatre who shaped at least one generation in Marathi nataks.

  • @Shraddha935
    @Shraddha935 Год назад +1

    अतिशय सुंदर... खरं वेडेपण याला म्हणतात... 3 hours of master class this was....
    Thank you Rangpandhari 👏

  • @chinmayeejoshi4592
    @chinmayeejoshi4592 7 месяцев назад

    Haha, enjoyed the little anecdote about namrata nursing home 😅

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 Год назад +1

    आमची दिवाळी

  • @ravikiranpatne3492
    @ravikiranpatne3492 Год назад

    भाषा अत्यंत चपखल, ईतकी समृद्ध की पुणेकरांना पण न्युनगंड येऊ शकेल.