||अभंग||हरी नाम जो जो विसरला तया हसती लोक रे||बुवा श्री श्रीधर मुणगेकर||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • ||अभंग||हरी नाम जो जो विसरला तया हसती लोक रे||hari Nam Jo Jo visarla taya hasati lok re||
    बुवा श्री श्रीधर मुणगेकर||
    हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे ।
    कवडी मोल धन हे सारे, कमविले तु लाख रे ॥धृ॥
    कुणाची ही शेतीवाडी, बंगलामाडी कुणाची ।
    कुणाची ही मोटारगाडी, बॆलगाडी कोणाची ।
    राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राख रे ॥१॥
    माय-बापाला छळणारा पुत्र तो नसावा ।
    मेल्यामागे तुप-रोटी देणारा नसावा ।
    भुकेल्याची भुक जाण. लोभ सारा टाक रे ॥२॥
    थंडीमध्ये कुडकुडणारा देह पाहिला तु ।
    झाकावया नाही गेला दुर राहिला तु ।
    मायेचा उबारा दे तु, लाज त्याची राख रे ॥३॥
    आज आहे उद्या नाही, क्षणिक ही काया रे ।
    दत्त नामाविणा जाई, जन्म सारा वाया रे ।
    श्रीधरा परी भक्तीची, गोडी जरा चाख रे ॥४॥
    #मराठीभक्तिगीते #अभंग #कोकणातीलभजनमंडळे #abhangmarathi

Комментарии • 2

  • @Aakash_i-s3b
    @Aakash_i-s3b 8 месяцев назад +4

    Thank you lyrics sathi, keep up.. Don't stop

  • @kishorthukrul737
    @kishorthukrul737 2 месяца назад

    Rag konta aahe mauli