महाराष्ट्रातील एक अनोखे आदिवासी गाव | Kumshet Village | Kumshet Village Akole | Konkankada Kumshet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 Год назад +120

    आजच्या ह्या आधुनिक काळात...ह्या माझ्या सह्याद्रीला देवासारखे पुजनारे आणि आईसारखे सभाळणारे हे आदिवासी बांधव , त्यांची कला, संस्कृती ,मेहनत, कष्ट बघून मन तृप्त झाले❤️🏞️🌾✨

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 Год назад +58

    खूपच सुंदर💫...आदिवासी गरीब असले तरी त्यांच्याकडे निसर्गाची 🏞️आणि मनाची ❤️श्रीमंती खूप आहे😇⛰️🌾✨

  • @rameshkumre3887
    @rameshkumre3887 Год назад +115

    आम्ही आदिवासी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सर्व आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे.अन,हिच आमची संस्कृती तिला जपुन ठेवने हेच आमचे आदय कर्तव्य.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      Thank you

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 Год назад +1

      Tasech Raha.. kadhich jamini viku naka 🙏🙏

    • @K-K-007
      @K-K-007 Год назад +1

      Great❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ashokdhumal5217
      @ashokdhumal5217 Год назад +5

      अतिशय छान सुंदर चित्रीकरण . मी कृषी विभागाच्या माध्यमातून कुमशेत गावात काम करीत असताना सरपंच सयाजी आसवले व गावकऱ्यांचा माझा फार जवळून संबंध आला. जितका निसर्ग, देवराई सुंदर तितकीच माणसं प्रेमळ, स्वच्छ मनाची,आपुलकीने वागणारी , संस्कृती परंपरा जपणारी मी म्हणेन ही इथली नुसती चांगली माणसं नाहीत तर देवमाणसं आहेत.

    • @balasahebmagar767
      @balasahebmagar767 Год назад +1

      खूप छान वाटले.

  • @nikhilkhamkar6315
    @nikhilkhamkar6315 Год назад +32

    मी महादेव कोळी जमातीचा आहे ज्या वैशिष्टपूर्ण पद्धतीने तुम्ही बोलता आणि तुमची व्हिडिओ editing अप्रतिम... तुम्ही आमची संस्कृती आणि जगणं इतर लोकांना अतिशय उत्तम पद्धतीने दाखवलं त्या बद्दल खूप आभार..keep it up

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад +1

      Thank you

    • @namdevhulawale5928
      @namdevhulawale5928 10 месяцев назад +2

      फार उत्तम निसर्ग सुंदर मी अकोले तालुक्यातील च आहे पणं हे गाव माहित नाही कारण मुंबईत असल्याने ok far छान

  • @mandargujar500
    @mandargujar500 Год назад +20

    मी एक आदिवासी मुलगा आहे ..माझ्यासाठी निसर्गरम्य वातावरण काही नवीन गोष्ट नाही .पण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये गोष्टी दाखवल्या खरंच अप्रतिम ..मी व्हिडीओ न स्क्रिप्ट करता बघितला..

  • @avinashbhoye2274
    @avinashbhoye2274 Год назад +30

    मला गर्व आहे आदिवासी असल्याचा

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Год назад +34

    विकासाच्या नावाखाली जंगल तोड करून सपाटी करणाचा तडाखा लावणाऱ्या लोकांनी खरंच आदिवासी समाजाचा आदर्श घेऊन निसर्ग जपला पाहिजे .
    आज आदिवासी समाजा मुळेच जल जंगल जमीन टिकून आहे . निसर्ग पूजक असणाऱ्या आदिवासी समाजाला सलाम केला पाहिजे .
    खूप छान विश्लेषण केले सर तुम्ही .
    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे .

  • @sanjaybhoye6281
    @sanjaybhoye6281 Год назад +10

    मला गर्व आहे आदिवासी असल्याचा जय जोहार ,,,,जय आदिवासी ,,,,

  • @balnathsonawane7060
    @balnathsonawane7060 2 года назад +32

    सर खूप छान!!! खूप मेहनत घेतली आहे आपण.. आदिवासी लोकांना नक्कीच याचा फायदा होईल... खूप आभारी आहोत..

  • @ramapathave5468
    @ramapathave5468 Год назад +15

    खूप आभारी आहोत की आपण आमच्या अकोले तालुक्यातील निसर्ग महाराष्ट्रातील जनतेला दाखवल्याबद्दल आणि आमच्या रूढी परंपरा

  • @sandipabhale4083
    @sandipabhale4083 Год назад +6

    मी अकोल्याचा रहिवासी असून आजपर्यंत अनेकांचे व्हिडिओ पहिले परंतु आपला व्हिडिओ खूपच सुंदर वाटला..छानच छायाचित्रण केले असून सुंदर शब्द रचनेत माहिती मांडली आहे. पुन्हा पुन्हा येऊन हवा हवा सा वाटणारा अकोले तालुका... म्हणजे महाराष्ट्राचे काश्मीर...❤❤❤🎉

  • @ashokgabhale8011
    @ashokgabhale8011 Год назад +8

    खुप छान माझा आदिवासी माणूस हा प्रामाणिक आणि मेहनती आहे. माणुसकीचं दर्शन देणारा

  • @anandvanjare6808
    @anandvanjare6808 7 месяцев назад +2

    खूपच सुंदर आहे आदिवासी मनाने खूप श्रीमंत आहे निसर्गाशी त्यांचं नातं अतुट आहे आणि आपलेही अभिनंदन

  • @sagarshibe8965
    @sagarshibe8965 Год назад +3

    सर तुम्ही ज्या पद्धतीने आदिवासी समाज जीवन दाखविले आहे ते अप्रतिम आहे

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 года назад +19

    सर्वप्रथम कुमशेत गावचे गावकरी ह्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी ही जैवविविधता व निसर्ग अतिशय सुंदरपणे जपून ठेवलाय. कोकणकडा पाहून मन अतिशय भारावून गेले. आणी सोमनाथ जी, ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. High class Video 👍👍👌👌

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 Год назад +9

    आमची संस्कृती आमचा अभिमान,
    मी आदिवासी माझा स्वाभिमान... 🙏🏼

  • @SUSHanTM01
    @SUSHanTM01 Год назад +5

    मी एक आदिवासी मुलगा आहे आणि मी खूप दूर आलो होतो निसर्ग पासून पण दादा आज तुझा vlog पाहिला आणि पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात परत आलो..!
    Thank you 😊🙏❤️

  • @ChandarDagale-o3z
    @ChandarDagale-o3z 4 дня назад +1

    खूप खूप छान बनलेला हा विडीओ आहे आणि आदिवासाचे हे कुमशेत गावाचे घनदाट जंगल पण त्या आदिवासी लोकाचे जिवन

  • @sanketbendal7881
    @sanketbendal7881 Год назад +8

    kharch आयुष्य असं असावं..जिथं पैसा नाही तर माणुसकी आणि समाधानाच सुख असावं...❤😍

  • @rohanthorat871
    @rohanthorat871 Год назад +14

    त्यांनी केलेल्या सत्काराच्या प्रसंगी गावकऱ्यांच्या
    मुखावरचा निरागस भाव बघून डोळ्यात टचकन पाणी आलं 🙏👏👏 जय महाराष्ट्र

  • @kisanhile-wx9ec
    @kisanhile-wx9ec 5 дней назад +2

    जय सेवा जोहार, जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी..!!! दादा..❤.

  • @rahulpatil2035
    @rahulpatil2035 Год назад +4

    खूप छान ठिकाण आहे . मी स्वतःच थोडा दिवसा आधी या गावाला भेट दिली खूप सुंदर ठिकाण आहे .आणि तितली लोक पण खूप प्रेमळ आहे आमची भेट सरपाचांशी झाली त्यांनी आमची जेवणाची सोय केली व अप्रतिम रित्या तिथला ठिकाणचं वर्णन करून सागितलं

  • @maheshpagare1353
    @maheshpagare1353 Год назад +4

    जितका निसर्ग अफलातून, अप्रतिम आहे तितक्याच ताकदीचा अगदी जीव ओतून हा व्हिडीओ बनवला; मस्तच!👍

  • @graminvlogkatta4657
    @graminvlogkatta4657 Год назад +7

    बिताका गाव,खुप भारी आहे, शेजारी बितान गड पण आहे.
    सांगायचे झाले तर 10/15 वर्षापूर्वी हे गाव नकाशात सुद्धा नवतं.खुप गरीब लोक आहेत तिथे.
    गाव बिताका, ता,अकोले,जि-अहमदनगर.
    ( 1 )जाण्याचा मार्ग-ईगतपुरी-घोटी-सर्वतीर्थ टाकेद-ते बिताका.
    ( 2 ) राजुर-वाकी बंगाल-देवगाव-खिरविरे-ते बिताका.

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 2 года назад +7

    आदिवासी लोककल्याणकारी शिवकार्य आपल्याकडून जोपासले जात असल्याने मन भारावून गेले। अत्यन्त मानभावक भाग पाहून समाधान झाहले।।

  • @m.b.sagbhor6010
    @m.b.sagbhor6010 Год назад +3

    खुप सुंदर चित्रीकरण... सुंदर योग्य माहिती... आमच्या तालुक्यातील एक अनेक गावे या निसर्गाने नटलेले आहेत... त्यात हे एक कूमशेत....
    जय आदिवाशी....,,, 👏👏👏🌹

  • @Adv.SomnathMundhe
    @Adv.SomnathMundhe Год назад +1

    माझ्या तालुक्यात जाऊन, माझ्या निसर्गावर, संस्कृती वर, माझ्या आदिवासी बांधवांवर व्हिडिओ बनवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तो भाग आणखीन explore करून वेगवेगळे व्हिडिओ बनवा अशी विनंती करेल.

  • @saradchaudhari8202
    @saradchaudhari8202 4 месяца назад +1

    खूप छान सर आमचे आदिवासी जीवन अनुभवल्याबद्दल....सलाम तुमच्या कार्याला आणि कर्तुत्वाला..🙏🙏🙏🙏🙏

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 2 года назад +3

    सहजच कोकणचे व्हिडिओ बघत असताना तुमचा व्हिडिओ मिळाला... आणि आता अस झालं.की रोज तुमचे विडिओ बघितल्याशिवाय होत नाही...! खुप सुंदर होता व्हिडिओ sir .!

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 Год назад +15

    आदिवासी समाज भोळा भाबडा इमानदार आणि खूप कष्टाळू असतो

  • @DipakChaughule
    @DipakChaughule Год назад +1

    खूप छान, मस्तच एकदम झकास व्हिडीओ

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 11 месяцев назад +2

    Beautiful video

  • @sonaliadhari8783
    @sonaliadhari8783 Год назад +2

    गर्व आहे मला मी आदिवासी असल्याचा...

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Год назад +1

    नेहमी प्रमाणे उत्कृष्ट छायाचित्रण, उपलब्ध अशी‌ माहिती, ओघवती भाषाशैली,
    खूप खूप धन्यवाद,🙏

  • @surajrade1641
    @surajrade1641 Год назад +1

    खूप छान। निसर्ग सौंदर्य आहे।जय जोहार

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад +5

    सोमनाथ मस्तच प्रत्येक एपिसोड वेगवेगळा त्यामुळे आनंद मिळतो स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या आवाहनाबद्दल आभारी आहे देवरायांचे महत्त्व त्या गावाने जपले आहे त्या गावाचे खरोखरच आपण ऋणी आहोत त्याचे महत्त्व अतोनात आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @vitthalchavan5160
    @vitthalchavan5160 Год назад +8

    मन भारावून गेले माझे..... इतका सुंदर video मी कधीच पहिला नाही... खुप मस्त वाटत मला हे गाव पाहून.
    आणि तुमच्या ज्या शैलीने हा video बनवला खूपच अप्रतिम.... आणि व्हिडिओ मध्ये जो तुमचा आवाज आहे तो तर इतका चांगला आहे की ऐकतच रहावं वाटत...
    आणि मला या गावाला भेट द्यायची इच्छा झाली आहे....
    🙌🙌🙌🙌🙌🙌❣️❣️❣️❣️❣️❣️👏👏👏👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 Год назад

    तुमचं मनापासून आभार... आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले तुम्ही... निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते...

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 7 месяцев назад

    श्री.सोमनाथ नलावडे आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या गाव व तेथील निसर्ग सौंदर्य दाखवले इतिहास हि उत्तम रितीने सांगीतला आपल्याला धन्यवाद.

  • @aamchiagashi352
    @aamchiagashi352 Год назад +2

    मी कोकण कडा येथे जाऊन आलो तिथे गेल्यावर स्वर्गात आल्यासारखं वाटत होत खूप छान वाटते.❤ 🏞️

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Год назад +2

    पृथ्वीवरच स्वर्ग आहे फक्त गरज आहे त्याला शोधण्याची व त्याची अनुभूती घेण्याची

  • @Sushantdk
    @Sushantdk 2 года назад +2

    खुप सुंदर व्हिडिओ आहे कुमशेतचा, निसर्ग सौंदर्याने नटलेलले हे गाव खुप सुंदर आणि तेथील लोकांनी सुंदर जपले आहे हे सौंदर्य.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 года назад +2

      अनेक धन्यवाद ! तुम्हाला हे सर्व आवडतं हे पाहुन फार छान वाटतं. 😊

  • @laxmanide4863
    @laxmanide4863 Год назад +1

    सर तुमचे आभार कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करू
    प्रत्येक भागातील प्रत्येक अडाणी लोकांना सामान्य माणसांना सुद्धा समजेल अशा शुद्ध मराठी भाषेत सोप्या शब्दांत वक्तव्य केलंय...
    अतिशय सुंदर 👌

  • @vilasshelar6843
    @vilasshelar6843 7 месяцев назад +1

    खूप छान एक नंबर छान माहिती मिळाली

  • @eknathagiwalevlogs
    @eknathagiwalevlogs Год назад +2

    खुप छान सर तुम्ही आमच्या आदिवासी अकोले तालुक्यात येऊन आमचे आदिवासी जीवन व निसर्ग दाखवला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद... असेच व्हिडिओ बनवत राहा सर best of luck 👍👍👍

  • @sagarshibe8965
    @sagarshibe8965 Год назад +1

    असेच नवनवीन पर्यटन स्थळे पाहायला मिळतात तुमच्यामुळे सर

  • @pandurangsabale9376
    @pandurangsabale9376 Год назад +1

    निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्यासाठी भाग्य लागते, खूप छान परिसर आहे मी गेलो आहे एकदा या ठिकाणी

  • @sunilborade-xg6fc
    @sunilborade-xg6fc Год назад +1

    मस्त निसर्गरम्य वातावरण

  • @tribal_aadivasi_mh_1597
    @tribal_aadivasi_mh_1597 Год назад +3

    खरंच खूप सुंदर माहिती दाखवली आज आदिवासी भागातील निसर्ग देव संस्कृती खुप चांगल्या प्रकारे दाखवली आदिवासी भाग तील पाडे , वस्ती येथील लोक याच्या बद्दल जेवढे बोलावे ठेवढे कमीच आहे कारण हा निसर्ग एकदा पाहून मनात भरणारा नसून सारखा पाहात राहावे असा आहे आणि आदिवासी भाग म्हटल की निसर्ग आणि आदिवासी च नात हे जणू काही एक वेगळच आहे
    खूप छान व्हिडिओ दाखवला भाऊ आज आदिवासी संस्कृती आणि निसर्ग जपण्याची खूप गरज आहे असेच नव नवीन व्हिडिओ घेऊन येत जा.
    कारण आदिवासी टिकला तर जंगल टिकेल आणि जंगल टिकेल तर आदिवासी टिकेल.
    जय जोहार जय आदिवासी 😍🏹🇵🇱🌍🌾🌱

  • @SS-zd9mf
    @SS-zd9mf Год назад +2

    पुण्यात राहायला आहे पण असे वाटले कुमसेत ला जाऊन आलो आभारी आहे सर व्हिडिओ मस्त होता.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      आपले मनापासून आभार

  • @Vishalnagreofficial
    @Vishalnagreofficial Год назад +1

    खूप छान सर मन प्रसन्न झालं आपला महाराष्ट्राचं खूप सुंदर आहे आपली स्वस्कृती आपली भाषा आपले खेड्यातले लोक माझी ड्रीम असेल या गावाला जाण्याची thyanku sir ❤️

  • @BaluDarane-b4h
    @BaluDarane-b4h 4 месяца назад +1

    खुप खुप सुंंदर आहे आदिवाशी गांव जय आदिवाशी

  • @ajaypandharipande1067
    @ajaypandharipande1067 2 года назад +1

    खूप निसर्गरम्य आणि दुर्गम भागाचे दर्शन झाले, धन्यवाद, सोमनाथ जी

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 года назад +2

    काय बोलु मीत्रा शब्दच नाहीत ऐवढ
    अप्रतिम 👍👍👍👌✌️

  • @baban20111
    @baban20111 10 месяцев назад +2

    Very nice village life and beautiful Nature

  • @ArunSalve-pf5uo
    @ArunSalve-pf5uo Год назад +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे

  • @madanthite7701
    @madanthite7701 Год назад +1

    आजच्या काळात धावत्या जगात पण गावात राहून आपल्या परंपरेनुसार येथील लोक निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहतात आणि वास्तव जिवन जगतात निसर्गा ला पुजत आहेत आणि या सह्याद्रीच्या सेवा करत आहेत खूप छान विडिओ बनवलाय दादा ❤❤

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Год назад +1

    फार सुंदर VDO, आहे,खूप आवडला.सोमनाथ तुमचे अनोखे पर्यटन VDO खूप देखणे असतात. मला पण असेच उठावे आणि बाहेर पडावे असे वाटते परंतु व्यवसाय मुळे कुठे जाता येत नाही खूप वाईट वाटते तेव्हा तुमचे VDO पाहून आनंद मिळतो

  • @ramanthpachore505
    @ramanthpachore505 Год назад +1

    🙏🙏🙏सयाजी खूपच मस्त कुमशेत गावातील वेगवेगळ्या पॉईंटचे दर्शन आम्हाला घडले🌷🌷🌷

  • @manishakawate4567
    @manishakawate4567 Год назад +3

    jay adivashi Jay ragoji bhanghare

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 4 месяца назад

    हि खरी निसर्ग पुजा आहे. आज तेथील आदिवासी समाज निसर्ग देवराई येथिल वनसंपदा याची जपवणूक करतात त्यांचा खरच खूप अभिमान वाटतो. शेतकरी महिलांची पारंपारिक गाणी मनाला मोहून गेली हि पारंपारिक गाणी पुढच्या पिढीला देखील कळायला हवीत त्या त निसर्गाच वर्णन त्यांची संस्कृती त्या गण्यांन मधून दर्शवली आहे तूमचे कुमशेतगाव खरच निसर्ग संपन्न गाव आहे. तसाच आमच्या कोकणात निसर्ग वेडा प्रसाद गावडे आहे. तो सुद्धा कोकणात राहून कोकण जपण्याचा प्रयत्न करत आहे. कोकणी रानं माणूस म्हणून त्याचे व्हिडिओ आहेत.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  4 месяца назад

      धन्यवाद. हे पाहिला का - ruclips.net/video/rpbgEuFmCBA/видео.htmlsi=LTOPQG85ad3SsGlL

  • @surajmoule47
    @surajmoule47 Год назад

    अप्रतिम सादरीकरण व आवाज तूमचा दादा खुप छान

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Год назад

    अप्रतिम निसर्ग पर्यावरण आणि सौंदर्य
    फोटोग्राफी, बॅकग्राऊंड साऊंड आणि आवाज एक नंबर

  • @shashikantmasane2294
    @shashikantmasane2294 2 года назад +17

    Dear Somnath Sir, you are the real natural ambassador of our tourism ,curtal heritage, nature of our world. The way you narrate beauty of heaven nature with your golden word's I am always speechless, & feel we are blessed with mother nature. I wish to join with you always during your travel nature journey. Hats off to you

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 Год назад +4

    जय आदिवासी जय जोहार

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 года назад +6

    हरवत चाललेली जीवन शैली दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏💐

  • @SHIVAJIPATIL-px9wd
    @SHIVAJIPATIL-px9wd Год назад +2

    काय मस्त गाव आहे

  • @girjuba8528
    @girjuba8528 5 месяцев назад +1

    खूप छान सोमनाथ नागवडे भाऊ

  • @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम

    खुपच छान वाटलं सर्व पाहून. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे येथे अनेक आदिवासी बांधवांचे धर्मांतर केले जात आहे याचे खुप दुःख होतंय. परप्रांतीय लोक सुद्धा इथल्या मुलींशी लग्न करतात ही खुप चिंताजनक गोष्ट आहे. आपल्या महान हिंदू धर्माचे महत्व यांना पटवून सांगितले पाहिजे आणि जी काही धर्मांतर, जिहादी कृत्य आहेत ती थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत. माझी सर्व हिंदू समाजाला विनंती आहे कुणीही धर्मांतर करू नका, आपला समाज सोडून इतरांशी लग्न करू नका. स्वधर्माचा अभिमान बाळगा..
    🚩🚩हर हर महादेव. जय शिवराय.🚩🚩

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @dnyaneshwargabhale2960
      @dnyaneshwargabhale2960 Год назад +3

      आदिवासी हा निसर्ग पूजक असून त्यांची वेगळी अशी संस्कृती आहे. दुसरे धर्मच नव्हे तर हिंदू धर्माशी सुद्धा आदिवासींचा काहीही संबंध नाही. विनाकारण आदिवासी लोकांना वेगवेगळ्या धर्मांत ओढले जात आहे.

    • @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम
      @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम Год назад

      @@dnyaneshwargabhale2960 ते निसर्ग पूजक आणि हिंदुही आहेत..

    • @dnyaneshwargabhale2960
      @dnyaneshwargabhale2960 Год назад +2

      फक्त निसर्ग पूजक आणि निधर्मी

    • @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम
      @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम Год назад

      @@dnyaneshwargabhale2960 होय हिंदूच🚩🚩

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 Год назад

    फारच सुंदर आणि निसर्गाने या त्यात असलेला आदिवासी गांव व् यातून मिळणार जगन्या बद्दलचा खरा ईश्वरी सन्देश इथे काय आहे हे माहीत होतं। जय बाबा।

  • @ajaysambare1992
    @ajaysambare1992 4 месяца назад +1

    आमची संस्कृती आमचा अभिमान.जय आदिवासी

  • @yogeshagivale2943
    @yogeshagivale2943 7 месяцев назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ दादा 👌🏻

  • @creatimages760
    @creatimages760 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आपले हार्दिक अभिनंदन

  • @mohinipatil204
    @mohinipatil204 Год назад

    खूप सुंदर आहे. आपला भारत खूप सुंदर आहे त्याच जतन करणारे हे लोकं आहेत

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад

    आपण अप्रतिम सुंदर अदभूत निसर्गरम्य परिसर व परिसरात रहिवास करणारे लोक पहावयास मिळाले. निश्चितच पर्यटनास योग्य आहे .

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Год назад +1

    अविस्मरणीय अनुभव

  • @hareshwarjadhav4253
    @hareshwarjadhav4253 Год назад

    खूपच सुंदर व्हिडिओ sir
    धन्यवाद ,
    खुप सुंदर आणि नविन अशी महिती दिली आहे.
    एक आदिवासीं गाव आणि येथील जीवनमान, कला आणि संस्कृती जोपासत आनंदाने जगत आहेत. वेळेत आनंदाने जगण्याचे कला दाखवली आहे. मनाला खुप हर्ष झाला.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад +1

      आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!

  • @sunilm.3224
    @sunilm.3224 Год назад +2

    Really thank you very much for bringing our culture in the front of world, for letting word know the hard work and simple lifestyle of our tribal peoples. ❤❤❤❤

  • @kirangavandhe9831
    @kirangavandhe9831 Год назад +4

    🇲🇨🏹❤️जय आदिवासी निसर्ग पुजक 🌾🌿🏹

  • @sahyadritourismsandhanvall6679
    @sahyadritourismsandhanvall6679 Год назад +2

    अतिशय चांगल्या प्रकारे सर तुम्ही काम करत आहात त्या बद्दल तुमचं आभार आणि असेच आदिवासींच्या परंपरा जगा समोर तुमच्या यूट्यूब चायनल द्वारे पोहविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आभार.👍👍👏

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 10 месяцев назад +1

    Khup ch chhan

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 6 месяцев назад

    खुप छान वातावरण आहे दादा ❤

  • @kiranshirsat9344
    @kiranshirsat9344 10 месяцев назад +1

    Far sunder khup avdale

  • @bhaskarlogade5521
    @bhaskarlogade5521 10 месяцев назад +1

    Khuup khup chan

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 Год назад

    खरच खूप सुंदर vlog बनवला आहे sir . किती सुंदर ते गाव ,तेथील मानस ,निसर्ग .हे पाहून मनाला खूप आनंद झाला .thank u❤

  • @santoshtaware3146
    @santoshtaware3146 9 месяцев назад +1

    फार सुंदर

  • @LaxmanSabale-n1y
    @LaxmanSabale-n1y Год назад +1

    अप्रतिम 💐💐

  • @ghoomantu52
    @ghoomantu52 2 года назад +6

    I am from mumbai never thought our maharashtra is so beautiful. Wonderful cinematic video plus your orator skill outstanding

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 2 года назад +1

    Kya baat hai sir one more excellent video zakassssss

  • @dattatraybande7752
    @dattatraybande7752 2 года назад +1

    धन्यवाद सर..... एवढ्या सुंदर पध्दतीने आमच्या अकोले तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव म्हणजे कुमशेत गावचे वर्णन केल्याबद्दल
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @adimnews2886
    @adimnews2886 Год назад +1

    सर
    शब्द अपूरे पडतात
    तुमचे कौतुक करायला
    तुमचा अभ्यास, मांडणी, शब्दांकन, आणि आवाज आणि अर्थातच एडिटिंग...
    100पैकी 100गुण...
    अभिमान आहे मला आदिवासी असल्याचा...
    आणि
    ऋणी आहोत आम्ही तुमचे तुम्ही आमच्या समाजाला, संस्कृतीला, निसर्गाला नेमक्या पद्धतीने अभिमानास्पद पद्धतीने जगासमोर आणल्याबद्दल...!
    👌👌👌👌💐💐

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      तुमच्या छान अशा प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार मानतो. ☺️

  • @sajeetmulani786
    @sajeetmulani786 Год назад +1

    Khup chhan mahiti detay . Gawach gawpan japal pahije

  • @AncientTraveller1
    @AncientTraveller1 Год назад +1

    सरजी खुप छान..अप्रतिम वर्णन ❤

  • @nileshkurhade9748
    @nileshkurhade9748 7 месяцев назад +1

    खूप छान सर एकदम मस्त

  • @RajendraDighe-q1d
    @RajendraDighe-q1d 11 месяцев назад +1

    मी हे गावातून. हरिश्चन्द्र गडावर गेलो होतो. व कोकण कडा. बघितला. फार समाधान झाले

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +1

    सुन्दर ठिकान। जाने आहे

  • @ashokvarhadi4887
    @ashokvarhadi4887 10 месяцев назад +1

    Best Nature village.
    Thanks lot sir
    Regards
    Ashok@pune

  • @dadapawar1532
    @dadapawar1532 Год назад

    माहिती आणि चित्रंणअतिशय सुंदर आहे धन्यवाद

  • @irfanmomin4702
    @irfanmomin4702 Год назад +1

    Manmohak Khoob Chand video hai

  • @maratha21j77
    @maratha21j77 Год назад

    खुप छान सर . हे जीवन फारच सुंदर आहे . आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात अस सौंदर्य बगायला मिळत नाही. खुप धन्यावाद.