प्रभाग स्तरीय क्रीडा महोत्सव अकोला काही क्षणचित्रे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024
  • अकोला: श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांचा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी वसंत देसाई स्टेडियम अकोला येथील मोठ्या थाटात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय ॲड. गजाननरावजी पुंडकर साहेब उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते. उद्घाटक म्हणून माननीय श्री. सतीशचंद्रजी भट जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला, प्रमुख अतिथी मध्ये माननीय श्री महादेवरावजी भुईभार माजी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती. माननीय श्री जनार्दनजी उगले आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री. अशोकराव उर्फ नानासाहेब देशमुख आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री. बाळासाहेब मोहोळ आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय डॉक्टर रामेश्वरजी भिसे, प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय अकोला, माननीय श्री. प्रकाशजी अंधारे शाळा तपासणी अधिकारी, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्रीमती राजश्री कासलीकर शाळा तपासणी अधिकारी श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री. विलासराव हरणे सदस्य शाळा समिती श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला, माननीय श्री विजय ठोकळ मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला, माननीय श्री मनोज देशमुख मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला तथा समन्वयक क्रीडा महोत्सव समिती आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर श्री. शिवाजी महाविद्यालयाची सिल्वर मेडलिस्ट, कुमारी. पलक झांबरे, शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा विजेती कुमारी. सानिका वाडेकर, श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेची खो-खो राज्य झारखंड येथे प्रतिनिधित्व करणारी कुमारी. आरुषी वानखडे, खो खो बंगलोर येथे प्रतिनिधित्व करणारी कुमारी. लक्ष्मी उंबरकर, झारखंड येथे राज्याचे प्रतिनिधित्व करणारी कुमारी. टिना परदे यांच्या हस्ते मशाल घेऊन क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. सर्वप्रथम क्रीडा महोत्सवाची प्रस्तावना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा तपासणी अधिकारी माननीय श्री. प्रकाशजी अंधारे साहेब यांनी मांडली. उद्घाटनीय उद्बोधनात माननीय श्री. सतीशचंद्रजी भट साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या क्रीडा महोत्सवाबद्दल गौरव उद्गार काढले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अडव्होकेट गजाननरावजी पुंडकर साहेब यांनी खेळातून तयार झालेली सांघिक भावना, आपल्या शाळा व कुटुंबात कायम तेवत ठेवावी असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती. अनुराधा मराठे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेचे मुख्याध्यापक तथा क्रीडा महोत्सव समितीचे समन्वयक श्री. मनोज देशमुख सर यांनी केले.
    द्वितीय सत्रामध्ये
    कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरणांनी करण्यात आली. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा तपासणी अधिकारी माननीय श्री. प्रकाशजी अंधारे साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेचे मुख्याध्यापक माननीय श्री. विजय.ठोकळ सर, क्रीडा महोत्सवाचे समन्वयक,श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोज देशमुख सर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील सर्व क्रीडा शिक्षकांनी नियोजना मध्ये खूप सहकार्य केले.

Комментарии •