ZP School Student Cannot Read Marathi | धक्कादायक! झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 284

  • @leenabobade7338
    @leenabobade7338 День назад +66

    शिक्षकांना‌ वर्गात शिकवू दया ... शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा... वर्गात शिकवायला वेळच नाही सध्या ऑनलाइन कामांमुळे... सरकारला विनंती असली कामे बंद करा..... सरकारी शाळांना ही कामे कंपल्सरी आहे.... मात्र खासगी शाळांना नाही .....

    • @aaryaschannel9352
      @aaryaschannel9352 День назад +2

      आत्ता काय हे कारण पुढे करुन जिल्हा परिषदेच्या शाळांना टाळे लावते का काय?

    • @aaryaschannel9352
      @aaryaschannel9352 День назад +4

      माझ्या दोन्ही मुली जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत,उत्तम इंग्लिश व मराठी वाचतात

    • @ankushmormare3351
      @ankushmormare3351 18 часов назад +2

      काहीही बोलू नका..खरच शिकविण्याचे काम करता का? जर करत आहात तर तुमचे स्वतःचे मुले zp शाळेत का नाही घालत? स्वतःचे कामावर स्वतःला विश्वास आहे का?

    • @prabhakard07
      @prabhakard07 5 часов назад

      काही तरी कारण नका देऊ मन लावून शिकवत नाही शिक्षक

    • @irfansheikh-yc4gd
      @irfansheikh-yc4gd 2 часа назад

      Apaar ID banwale lawa , BLO che kam dya etc

  • @abcd76958
    @abcd76958 День назад +33

    7वी पर्यंत शाळा असलेल्या शाळेत फक्त 2 शिक्षक शिकवितात.50हजार + जागा रिक्त असूनही शिक्षक भरती करत नाही.

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et День назад +24

    सगळी चुक शासनाची आहे जाणीवपूर्वक शिक्षकाची पदे रिक्त ठेवली जात आहे....शिक्षक नसल्यावर विद्यार्थी शिकणार कसे..

  • @shubhammagadalwar8505
    @shubhammagadalwar8505 День назад +36

    राज्यात 61 हजार शिक्षक भरती करा एकट्या नांदेड जिल्ह्यात 600 पदे रिक्त आहेत ते भरा मग गुणवत्तेवर बोला

  • @Suroshe123
    @Suroshe123 День назад +42

    अहो 10 वीच्या विद्यार्थ्यांना पण वाचता येत नाही नीट मराठी इंग्रजी गणित सोडून द्या सायन्सचा तो विषयच नाही सरकारला आता जाग आली का अडीच वर्षांपासून भोंदू बाबा शिक्षण मंत्री होते फक्त मान हलवायचे आणि प्रेमळ बोलायचे एवढेच काम आधीच्या मंत्र्यांनी केले गरिबाचं लेकरू शिकले तर प्रश्न शासनाला विचारेल आणि आमदारा खासदाराच्या सतरंज्या कोणी उचलायच्या म्हणून यांना अडाणी ठेवायचं आणि यांच्यावर राज्य करायचं एवढेच काम मंत्र्यांना आमदारांना आहे आणि शिकत असेल तर हेच म्हणणारा शिकून काय दिवे लावणार या अगोदर सुद्धा पाच वर्ष महायुतीचे सरकार होत

    • @sagarawaghad4433
      @sagarawaghad4433 День назад

      केसरकर साहेबांनी अनेक काम केले याच्या 15 वर्षा अगोदर पासून दर्जा घसरण्यास सुरुवात झाली

    • @santoshbhise-oe4ik
      @santoshbhise-oe4ik День назад

      याला तुम्हीच जबाबदार आहात हे सर कर भरती करत नाही काही कारण सांगत जात्त आधी भरती कर हेच उपया आहे

    • @kavitasalve9212
      @kavitasalve9212 17 часов назад

      Ho agdi kharey 10,12vi chya vidyarthyanna mrathi English vachata yet nahi.

    • @ManjushaTandon
      @ManjushaTandon 4 часа назад

      ​@@kavitasalve9212आताचे शिक्षण म्हणजे रात्र थोडी सोंगे फार.

  • @ravirajsutar
    @ravirajsutar День назад +24

    Zp शाळेतील शिक्षक भरती वेळेवर होत नाही. पवित्र पोर्टल शिक्षक भरती सेकंड फेज त्वरित सुरु करण्यात यावा.

  • @rauteducationpoint9758
    @rauteducationpoint9758 День назад +34

    6 वर्गाला 2 शिक्षक कुठे
    तर 4 वर्गाला 1 शिक्षक
    अवघड आहे

    • @ManjushaTandon
      @ManjushaTandon 4 часа назад

      विद्यारथीं ची संख्या किती आहे .

    • @rauteducationpoint9758
      @rauteducationpoint9758 4 часа назад

      @ManjushaTandon आमच्या गावात 8 वा वर्ग आहे शिक्षक 5 आहेत

  • @dnyaneswari1776
    @dnyaneswari1776 День назад +9

    रोज रोज चार-चार पाच-पाच प्रपत्र पडतात आणि त्याची माहिती लगेच द्यावी लागते त्यातच सर्व वेळ परत सर्व ऑनलाईन काम करणे

  • @santoshkulkarni9642
    @santoshkulkarni9642 День назад +16

    घर पक्क होण्यासाठी पाया पक्का करावा लागतो त्याचं प्रमाणे मुलांचा पाया पक्का होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अंगणवाडीतील मुलांना निदान अक्षर ओळख होणे तरी गरजेचे आहे पण अंगणवाडीत काहीच शिकवले जात नाही बऱ्याचश्या अंगणवाडीत शिक्षण नाही तर वाशिल्यानेच भरती झालेले आहेत त्यांनाच काही येत नाही ते काय बदलत्या युगातील मुलांना घडविणारं....

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs День назад +13

    आहो मॅडम पुर्वीच्या काळात ग्रामीण भागातुन खुप मोठ मोठ्या पदावर गेलेले लोक आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात हे सुधा सत्य आहे

  • @dnyaneswari1776
    @dnyaneswari1776 День назад +13

    शिक्षकांचे अशैक्षणिक कामे बंद करा

  • @PranaliGaikwad-gb3bf
    @PranaliGaikwad-gb3bf День назад +9

    1 ली ते 8 वी सरसकट पास करणे ही पद्धती बंद करा . शिक्षकांच्या शिकवण्या वर लक्ष देणं व शिक्षकांची अतिरिक्त कामे बंद करावी 15 दिवसात पहाणी करावी

  • @SN-qs8xg
    @SN-qs8xg День назад +13

    शिक्षण मंत्री श्री.दादा भुसे नक्कीच शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवतील हे नक्की.

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 День назад +11

    7वी पर्यंत शाळा पट 120 आणि 2 शिक्षक काय डोक आपटणार का? आधी पुरेशे शिक्षक द्या?

  • @sagarawaghad4433
    @sagarawaghad4433 День назад +15

    शिक्षक भरती 100% करा,
    अशैक्षणिक कामे बंद करा...
    प्रत्येक केंद्रात 2 क्लर्क ठेवावे
    शिक्षकांना मुलांसाठी वेळ मिळु द्या

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 День назад +7

    आतापर्यंत जि.प. शाळेतुनच सर्व जणांची प्रगती झाली . शिक्षकांना प्रायव्हेट शाळे प्रमाणे सुविधा द्या .कमी पटसंख्खा असली तरी मुख्यांध्यापक , शिपाई , क्लार्क शाळेत नेमणूक करा.

  • @ekbanjara2069
    @ekbanjara2069 День назад +8

    शिक्षकांची 10-10 वर्ष भरती करत नाही आणि काय तर म्हणे गुणवंत्ता नाही

  • @atmarambedse9317
    @atmarambedse9317 День назад +7

    मंत्री साहेबांनी सत्य परिस्थिती सांगितली जे विद्यार्थी शाळेत अनियमित येतात त्याच विद्यार्थ्यांना वाचन लेखनाविषयी अडचणी आहेत

  • @shivrajbhise6331
    @shivrajbhise6331 День назад +6

    शिक्षक भरती करा म्हणुन कधी बातमी देत नाही शिक्षकावीना शाळा चालवल्या जातात मग येणार कसं वाचता शिक्षकांना अध्यापना शिवाय अनेक कामे आहेत अध्यापन सोडून बारा भानगडी त्यांच्या मागे मग शिकवणार कधी

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 17 часов назад +2

    पहिले शिक्षकांचे मुल मुली पण जिल्हा परिषद शाळेत शिकायला पाहिजे
    आणि शिक्षकांना शाळेत येने जाण्यासाठी बायोमेट्रिक चा अवलंब करायला पाहिजे

  • @dineshraywade8851
    @dineshraywade8851 День назад +15

    शिक्षकांनी आपल्या पाल्यांना त्याच शाळेत टाकण्याची सक्ती केली पाहिजे

    • @vikasbadhe4470
      @vikasbadhe4470 День назад +1

      माझा मुलगा माझ्याच शाळेत शिकतो

    • @dineshraywade8851
      @dineshraywade8851 День назад

      @vikasbadhe4470 तुमचा आदर्श महाराष्ट्रांतील इतर शिक्षकाणी घेतला पाहिजे

    • @dattashinde9605
      @dattashinde9605 16 часов назад

      माझा पण शिकतो
      सर्व जण टाकतील पण शासन आम्हाला शिकवू देत नाही
      माझा मुलगा वर्गात आहे पण मी वर्गाला शिकवू शकत नसेल तर काय करायचं? ​@@dineshraywade8851

  • @PRAVINSAWARKAR-p1s
    @PRAVINSAWARKAR-p1s День назад +3

    कराना अनपड शिक्षकांची भरती
    शिक्षक अनपड आहे तर मुलं कसे राहणार
    मुलं कसे हुशार राहणार
    ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 День назад +6

    Zp च्या दीड लाख जागा रिक्त आहे त्यामुळें शिक्षक किती लक्ष देतील त्यात त्यांना इतर कामेच लावले जातात

  • @FFGaming_varad
    @FFGaming_varad День назад +5

    सर्व सरकारी शिक्षकांना आपली मूलांच सरकारी शाळेत शिक्षण सक्तीचे करा,,

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt День назад +2

    Kgbv अंशकालीन शिक्षकांनी चांगलं काम करून देखील अशिक्षित P. M. ने पगार वाढविले नाहीत ! प्लॅटफॉर्म वर लघवी करायचे पैसे घेऊन जग फिरतो.. बा. ळ. !

  • @laxmanshinde2006
    @laxmanshinde2006 День назад +15

    शिक्षक लोक ध्यान देत नाही त्यामुळे असं होतं शिक्षक लोकांची कमी नाही शाळांमध्ये जाऊन नुसत्या गप्पा म्हणतात😂

    • @shivanilabhe4372
      @shivanilabhe4372 День назад +2

      ZP shaletalya shikshakana la fakt salary bharamsath milate pan shikavat kahich nahi mag asa astatana kasa yenar lohita wachata

  • @pramodgawhane8306
    @pramodgawhane8306 День назад +2

    सर्व शिक्षक पैसे भरून लागले असतात, त्यांनाच काही येत नाही.TET,CET ,1,2 लाख देऊन पास झालेत,10,15,20,25 लाख देऊन हे सर्व शाळेत शिक्षक म्हणून लागले.त्यांना काही येत नाही मुलांना काय शिकवतील ते.पैसे देऊन गाढवाचे घोडे केलेत.मुलांचा काही दोष नाही.❤

  • @ekbanjara2069
    @ekbanjara2069 День назад +6

    शिक्षण सेवक योजना आधी रद्द करा

  • @PRASHANT_INGOLE_MH37
    @PRASHANT_INGOLE_MH37 День назад +3

    अशैषणिक कामाबद्दल पण बोला मॅडम

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 День назад +8

    द्या पगार वाढवून खूप पगार मिळतो आहे पण विद्यार्थी घडविता येत नाही म्हणून खाजगी शाळेत विद्यार्थी घालतात पुणे जिल्ह्यातील हिच स्थिती आहे

    • @SwaraPotkule
      @SwaraPotkule День назад +3

      मुळात जिल्हा परिषद च्या शाळेत शिक्षकांना दुसरे खूप काम दिले आहेत, त्यात 6वर्ग साठी 2 शिक्षक आहेत, कसे शिकणार मुले, शिक्षक मनापासून शिकवतात, त्यात मुलाच्या घरचे त्याचा घरी अभ्यास घेत नाहीत.

    • @pratikgadve3731
      @pratikgadve3731 День назад +2

      भाऊ 7 वी पर्यंत च्या शाळत 2 शिक्षक आहेत एक एक शिक्षक 4 vrg सांभाळतो कोठून येईल गुणवत्ता

    • @ravindrakhurkute7407
      @ravindrakhurkute7407 День назад +1

      पगार जास्त म्हणून विचार मांडण्याऐवजी समस्या काय आहेत हे जाणून घ्या एक शिक्षक 1ते 4वर्ग सांभाळतो त्यात इतर कामे सुध्दा करावी लागतात. इतर डिपार्टमेंटमध्ये बघा त्यांनी किती प्रगती केली आहे. आजही शाळेत जायला रस्ता नाही

    • @jayapatil6629
      @jayapatil6629 День назад

      @@vivekkshirsagar7983 mahit nasel tr vinakaran dok lavu naye. Zp Yeun bagha mg samjel. Regular mul yet nahi parents udasin astat. Private school la parents aware asatat laksh detat regular astat te mul mhanun Ani ithe fakt yayach mhanun yetat nahitr yet hi nahit.1-5 class la 1ch teacher shikvate sarv class la ekach veles kas teach karav.

  • @FreshMindFlow
    @FreshMindFlow День назад +2

    ग्रामीण भागातील विदयार्थी - 1.पालकासोबत कामानिमित्त स्थलांतर,
    2.विद्यार्थी नियमित शाळेत न येणे.
    3.शिक्षकांना शैक्षणिक पेक्षा इतर कामे जास्त
    4.वर्ग 1ली मध्ये अक्षरलेखन ओळख व लेखन शिकवावे लागते.
    5.शहरी भागात 3 वर्ष पूर्व प्राथमिक शिक्षण घेऊन पहिलीत येतो.
    6.ग्रामीण भागात शिक्षणाबद्दल पालकाची उदासीनता.
    7.शिक्षकांची कमतरता.
    8.शालेय भौतिक सुविधा.

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 День назад +3

    शिक्षकांना विविध कमा पासून आणि विविध उपक्रमांचा भार कमी करावा आणि विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी पूर्णपणे वेळ देण्यात यावा.

  • @Suroshe123
    @Suroshe123 День назад +5

    सर्वात आधी शिक्षकांची कामे कमी करा आणि त्यांना त्यांच्या मनाने शिकू द्या जवळपास दहा दहा वीस वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे ते कधीच कमी पडणार नाही शासनाच्या धोरणामुळे प्राथमिक शिक्षक नैराश्य आहेत आधी त्या शिक्षकांना शाळेत प्रती आवड निर्माण करणे गरजेचे आहे तरच विद्यार्थ्यांचा गरिबांचे कल्याण होईल

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c День назад +7

    छान माहिती दिली मॅडम

  • @anuragpawar7346
    @anuragpawar7346 День назад +2

    दादा भुसे झाले आता शिक्षण मंत्री आता काही टेन्शन घेऊ नका सगळे कामे वेळेच्या आधीच पाहायला मिळतील साहेबांचा काम करायचं पॅटर्न च वेगळा आहे 👑🚩 भावी मुख्यमंत्री दादा भुसे ✌️

  • @kalyani4917
    @kalyani4917 День назад +5

    जे येत नाही ते आधी सांगा...
    जे येते ते नका सांगू....
    नेहमीच negative report देऊन शिक्षण व्यवस्था बदनाम करत आहात

  • @Pranesh2407
    @Pranesh2407 17 часов назад +1

    दुसरा टप्पा शिक्षक भरती त्वरित पूर्ण करावी गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील त्यांना त्वरित पूर्ण करा दुसरा टप्पा शिक्षक भरती....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔😔

  • @SantoshGajbhar-q1v
    @SantoshGajbhar-q1v День назад +2

    असे आणखी भरपूर मराठी वाचता न येणारी मूल मिळून येतील.. प्रत्यक्ष अधिकारी यांनी प्रामाणिक तपासणी करावी...

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 День назад +5

    रिक्त पदांचीपण बातम्या दाखवा मग कळेल असं का होते ते

  • @mitwa7324
    @mitwa7324 День назад +7

    जी बातम्या देते तिला 29 की39हे माहिती नाही😂😂 मोजता येत नाही...😂😂

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे День назад +5

    खरंतर आमदार प्रशांत बबं चे अभिनंदन

  • @MayaV.Enchilwar
    @MayaV.Enchilwar День назад +2

    एका शाळेतील विद्यार्थ्यांना आले नाही म्हणून सगळ्याच शाळेतील विद्यार्थ्यांना संख्यावाचन, वाचन येत नाही असं होतं नाही. शितावरून भाताची परीक्षा करू नये.

  • @sandipborse7504
    @sandipborse7504 День назад +3

    फक्त वरच्या वर्गात ढकला ही पद्धत बंद झाली पाहिजे

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 День назад +5

    अहो शिक्षक शिकवतच नाही तर त्यांना वाचता का येणार आणि झेडपी नी त्या शिक्षकांकडे लक्ष द्यायला पाहिजे सरपंचांनी फुकटचे तुम्ही पगार पाणी देते सरपंचांना वगैरे त्यांनी पण लक्ष दिले पाहिजे

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 День назад +4

    आगोदर मास्तरांना मराठी
    वाचता येत काय बघा

  • @mahendrajagtap4180
    @mahendrajagtap4180 День назад +2

    100 % पदभरती करा तरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल.

  • @shankarpadgilwar4389
    @shankarpadgilwar4389 День назад +2

    मराठवाड्याचे माजी आयुक्त माननीय व्ही रमणी साहेब यांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी खूप सुंदर उपक्रम राबवला होता. परत तसाच उपक्रम राबविणे आवश्यक आहे.त्याशिवाय गुणवत्ता सुधारणे शक्य नाही!
    कागदी अहवाल कमी करून गुणवत्तेवर भर देणे अत्यावश्यक आहे.

  • @damodarpagi2607
    @damodarpagi2607 День назад +2

    यासाठी आवश्यक शिक्षक भरती लवकर पूर्ण करावी व शिक्षकांना शाळाबाह्य काम व ऑनलाइनची कामं मंत्री साहेबांनी प्रथम बंद करावीत नंतरच गुणवत्तेचा विचार करावा.

  • @sarikapatil2466
    @sarikapatil2466 3 часа назад

    माननीय, आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांची बरोबर समस्या ओळखली.

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 19 часов назад

    शिकवायचे सोडून भलतीच ऑनलाईन कामे देऊन सरकारनेच वाटोळं केलं शिक्षणाचं,आम्हाला विद्यार्थ्यांना फक्त शिकवू द्या

  • @atultidake6731
    @atultidake6731 День назад +2

    कशाचा अभिजात दर्जा....आम्हला Bmc ने मराठी माध्यम होते म्हनुन् काढून दिल....हे बोलतात फक्त

  • @dagadchandtayde8776
    @dagadchandtayde8776 День назад +1

    वर्गातील सर्व विद्यार्थी सारखे राहत नाही.ज्यांना वाचता येते त्यांनाच शिकवतात का शिक्षक,यांना पण शिकवतात च ,शिक्षकांचे इतर कामे बंद करावे.प्रत्येक जन माझे एकच काम आहे.प्रतृयेक विभागाचे काम आहे.जे मुले शाळेत येत नाही त्यांनाच येत नाही.जे शाळेत रोज येतात त्यांना वाचता येतेच

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 День назад +5

    शासन शिक्षकांना शिकवायला वेळ देतेय का? तात्काळ माहिती ऑनलाईन माहिती लिंक भरणे आधार काढणे आधार न निघणे अपार ID य इलेक्शन ड्युटी कमी शिक्षक संख्या कशी अपेक्षा पुर्ण होणार? पाय बांधून पळायची शर्यत शासनाने लावली आहे . कसे पळतील? विचार करा शिक्षकांना दोष देवून काही होणार नाही .

  • @chandubhadane4145
    @chandubhadane4145 День назад +2

    पूर्वीची बाळाभारतीची पुस्तके द्या. कारण जुनं ते सोन. सर्व शाळांना क्लार्क द्या. उपक्रम कमी करा. तात्काळ महत्वाचे लगेच ऑनलाईन द्या.अन्यथा कार्यवाही हे थांबवा.

  • @hakimziya5785
    @hakimziya5785 4 часа назад

    Nice Info by Dadaji Dagdu Bhusey saheb

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 День назад +2

    पालंकांची पण जबाबदारी असते. ते पालक तर आंदोलने मोर्चे रॅली उपोषणे या मधे बिझी असतात. कींवा आमदार मतदारसंघ या मधे बिझी असतात. शिक्षक काय करणार? पालकच आडमुठे.

  • @Lakhan2706
    @Lakhan2706 День назад

    रिक्त होणारी शिक्षकांची पदे दरवर्षी भरली पाहिजे.TET, TAIT दरवर्षी झाली पाहिजे.. परीक्षा ही ऑफलाईन एका दिवशी एकाच वेळेत घेतली पाहिजे. ती ऑनलाईन नको, नॉर्मलायझेशन पद्धत नको.. शिक्षण सेवक पद रद्द केल पाहिजे.. त्याचप्रमाणे मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारती नव्याने बांधल्या पाहिजे. आणि खाजगी अनुदानित शाळेवर मुलाखत न घेता जि प. शाळेप्रमाणेच केवळ परीक्षेतील गुणानुसार शिक्षकांची निवड व्हावी म्हणजे गुणवंत उमेदवाराची निवड होऊन शिक्षणाचा दर्जा उंचावेल..

  • @TatyaraoKanle
    @TatyaraoKanle День назад +1

    सरल पोर्टल ' युडायस प्लस 'अपार आयडी
    ड्रॉ बॉक्स . इतर ऑनलाईन कामे यातच शिक्षक बेजार शिकवायला पुरेसा वेळच मिळत नाही शिक्षक संख्या कमी

  • @VishalThikane
    @VishalThikane День назад +3

    मोदी ला हा व्हिडीओ दाखवा, मेक इन इंडिया
    आय पी एस, आय ए स चे विद्यार्थी पैसे देऊन आणि वशिला लाऊन पास होत आहे.आणि डॉक्टर इंजिनिअर जज असे सगळे विद्यार्थी पैसे देऊन च पास होत आहेत.
    अंधभक्ता उघडा डोळे. एवढा भ्रष्ट झाला आहे माझा भारत देश.

  • @श्री.रंगसिद्धकोरेसर

    शिक्षकांना करावी लागणारी इतर कामे आणि उपक्रम बंद करा.आम्ही शिक्षक स्वतः होऊन गेल्या दोन तीन वर्षांपासून आम्हाला शिकवू द्या म्हणून आंदोलन करत आहोत पण कोणीही आमचे ऐकत नाही,online कामे तर एवढी वाढलेत की,शिक्षक त्यातच गुंतलेले आहेत. ना क्लर्क ना शिपाई. सध्या हेडमास्तर तर हेडक्लर्क झाला आहे,कोणाला सांगायचे? रोज व्हाट्सएपवर दोन चार विषय टाकतात. शा.पो.आ.ची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेला द्यावे. इतर कामे खूप झाली. कशी गुणवत्ता वाढणार?

  • @GitanjaliHadal
    @GitanjaliHadal 4 часа назад

    जे शिक्षक भरलेत ,त्यांनाही वेळेवर पगार द्यावे.

  • @R.one5151
    @R.one5151 День назад +2

    मॅडम स्क्रिनवर एकोणचाळीस दिसतंय तुम्ही एकोणपतीस वाचताय असंच काहीसं होतय पहिलीच्या मुलांना.

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p День назад +3

    राजकारणातील नेत्यांना काय घेण देण आहे.पैसा पद मिळाले की झाले.साले जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत नाहीत.

  • @Prem--Ved..137
    @Prem--Ved..137 День назад +3

    Zp शाळांना शिक्षक भरती करा शिक्षक नाही

  • @manishaumap2491
    @manishaumap2491 День назад

    शिक्षकांची अतिरिक्त कामे कमी करा त्यांना फक्त मुलांवर लक्ष देऊ द्या तरच मुलांची प्रगती होईलझेडपीच्या शाळातील

  • @SwaraPotkule
    @SwaraPotkule 17 часов назад

    50 हजार पेक्षा जास्त शिक्षक शाळेवर कमी आहेत. केसरकर शिक्षणमंत्री असताना कंत्राटी भरती केली, ते लोक शाळेत मुलावर शिकवत नाही. माझ्या समोरची गोष्टी आहे.

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 День назад +1

    Zp च काय सर्वत्र खाजगी शाळात ही अशीच अवस्था आहे,सर्वच प्रकारच्या शाळात मुळात शिक्षक च भरती नाही
    विद्यार्थ्याच्या गैरहजरी चे प्रमाण प्रचंड आहे, पालक बेफिकीर आहेत, खाजगी शाळांची अवस्था तर प्रचंड चिंताजनक आहे

  • @Song30090
    @Song30090 2 часа назад

    ऑनलाईन कामांचा आणि उपक्रमांचा एवढा भडीमार या लोकांनी केला आहे की शिक्षकांना वर्गात जायला वेळच यांनी ठेवला नाही. जाहीर निषेध या यंत्रनेचा

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 3 часа назад

    अशैक्षणिक कामे आधी बंद करा. शिक्षक पूर्ण क्षमतेने शिकवतात. पण या बरोबर त्यांना अनेक इतर कामे करावी लागतात. निवडणूक, जनगणना, शालेय पोषण आहार, असे अनेक कामे देखील करण्यासाठी वेळ खर्च होतो. याकडे कोणीच लक्ष देत नाही.दोष देण सोपे असते. पण जे कामं करत आहेत त्यांना माहित...

  • @pathanhospital
    @pathanhospital День назад +2

    Teachers are not responsible but controlling system like BDO and govt is responsible.
    BDO and Govt is not monitoring properly. Instead of this govt is focusing on NO FAIL ONLY PASS agenda...

  • @yogeshpawar1677
    @yogeshpawar1677 12 часов назад

    तुम्ही शिक्षकांना शिकवू दिले तर नक्कीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल. सकाळी शाळा सुरू झाल्यापासून तर संध्याकाळीपर्यंत ऑनलाईन कामे करावे लागतात.

  • @kishorpawar6425
    @kishorpawar6425 12 часов назад

    Zp च्या विद्यार्थ्यांवर सरकार जो काही खर्च करते तो खर्च पालकांच्या खात्यावर टाकले तर पालक पाहिजे त्या शाळेत शिकवतील आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार खर्च होईल शिक्षकांची भरती जर करायची नाही तर हा निर्णय घ्यावा

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa 5 часов назад

    सत्य बाहेर येईल पण केव्हा अहो शिक्षक यांना शिकवायला वेळ मिळेल तेव्हा.

  • @Gpsk-cz8tj
    @Gpsk-cz8tj День назад +2

    भरत्या वेळेवर होतात.... भ्रष्टाचार कमी झाला आहे....त्यामुळे हेच होत असाव

  • @zppskolsakolsa
    @zppskolsakolsa 5 часов назад

    आपणही एकदा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बघाव्या. रिक्त पदे बघावी. शाळेची भौतिक अवस्था बघावी. पालकांचे स्थलांतर बघावे. पालकांची शिक्षणाबद्दल अनास्था. अशैक्षणिक कामाचा रोजचा भडिमार. रोज नवीन उपक्रम. वेगवेगळे सप्ताह.... याचाही विचार करणे गरजेचे आहे याबाबतही आपल्या चॅनलने एखादी बातमी दाखवावी. खाजगी संस्थेतील गुणवत्ता सुद्धा तपासणी होणे गरजेचे आहे.

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 День назад +1

    😂😂😂 काय पण होऊ जातीला व धर्मालाच मतदान करू😂😂
    1ली ते 7वी पर्यंत 2 शिक्षक
    8 वी पर्यंत पास हे मेन कारण

  • @Sachin35696
    @Sachin35696 День назад

    शिक्षक भरती करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण द्यावे तेव्हा तर मुलांना वाचता येईल ना. ? 🎉🎉

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 6 часов назад

    अपेक्षा फक्त वाचन लेखन गणित क्रिया असुद्या इतर रेकॉर्ड किचकट प्रशिक्षण इतर बाबी बंद करा व शिक्षक संख्या व सोईसुविधा द्या तसेच पोषण आहार सोपा करा हे सुद्धा खुप मोठे उपाय आहेत.

  • @vishaldkunale4863
    @vishaldkunale4863 День назад +1

    लाज वाटते का अशी बातमी द्यायला, जाऊन सर्व करा कोणत्या शाळेत किती विद्यार्थी आहेत आणि किती शिक्षक कळेल सत्य कारण याच..

  • @manishchaudhari6257
    @manishchaudhari6257 День назад +1

    पेठ तालुक्यात लक्ष द्या

  • @prajapatimusical7948
    @prajapatimusical7948 14 часов назад

    शासन फक्त कोणाला ओढायचे कोणाला पडायचे एव्हढेच पाहत आहेत.. 😊

  • @नादगंगा
    @नादगंगा День назад +1

    हे यांना आत्ता समजलं ZP मध्ये एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो सरकार शिक्षक भर्ती करत नाही ZP शाळेत कोणताही अधिकारी डोकून सुद्धा बघत नाही काय चालले ते

  • @ganeshpardhi9610
    @ganeshpardhi9610 13 часов назад

    मुलांना वाचता न येण्याला शासन जबाबदार आहे विद्यार्थीना शिकविण्यासाठी शिक्षक नाहीत शिकवण्या व्यातिरिक्त इतर कामे करावी लागतात
    नवीन तरून पिढील संधी देत नाहीत
    पात्रता धारण केलेल शिक्षक यांना संधी न देता रिटायर शिक्षकांना संधी दिली जाते याला जबाबदा कोण .....? शासन
    बदल घडवायचा असेल तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे
    आणि स्तरानुसार अध्यायन केल पाहिजे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 День назад

    या सर्व गोष्टींला महाराष्ट्र राज्याचे शैक्षणिक धोरण कारणीभूत आहे शिक्षक कर्मचारी यांना सरकारी इतर कामे बंद करा B M C जिल्हा परिषद शाळेमध्ये आमची पोरं लोक प्रतिनिधींची इतर देशांत शिक्षण घेत आहेत हा फरक आहे

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 День назад

    जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी आणि प्रत्येक शाळेला महिन्यातून तीन-चार वेळा विजीट झाली पाहिजे तर सुधारणा होईल नाहीतर अशा शाळांची मान्यता काढून घ्यावी

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 День назад +1

    कधीही सभा कुठेही सभा लाखांनी पालक हजेरी लावतात. मुलांचा अभ्यास गेला तेल लावत आमचा आमदार निवडून यायला पाहीजे

  • @dhammpaldhurandhar5090
    @dhammpaldhurandhar5090 3 часа назад

    शिक्षा चा का पगार वाडवा😢😢😢

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 День назад +1

    खुप छान विश्लेषण साहेब पुढील कार्यास शुभेच्छा

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 День назад

    फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही असे नाही शहरातील काही शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाचता लिहिता अंक ओळखता येत नाहीत

  • @vaishalisuryawanshi9817
    @vaishalisuryawanshi9817 День назад

    शिक्षकांची अवांतर काम बंद करा. त्यापेक्षा जास्त म्हणजे सरसकट सर्व मुलांना पास करणं बंद करा. ब-याच १०वी पर्यतच्या मुलांना सुद्धा वाचता येत नाही

  • @श्री.रंगसिद्धकोरेसर

    काही जिल्ह्यात इंग्रजी आणि विज्ञान पदवीधर शिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती दिली आहे. मराठी विषयाचे सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती दिली नाही. मग मराठी कच्ची राहणारच!

  • @vijaykshirsagar6049
    @vijaykshirsagar6049 23 часа назад

    पगार वर बोलणारे हे ज्ञानी पत्रकार.. शिक्षकांना काय काम आहेत बघ शाळेत येवुन ,विद्यार्थी यांच्पा जवळ शिक्षक पोहचत नाही.समिती काढुन काय होत बाबा!

  • @Administrative_thinkers
    @Administrative_thinkers 10 часов назад

    मराठी शाळेकडे शासनाने लक्ष द्यावे व शिक्षकांना आवांतर कामे लावणे बंद करा.

  • @MrSpol1
    @MrSpol1 День назад +1

    शिक्षकांना मुलाना शिकवायला वेळ द्या. सतत ऑनलाईन कामात व्यस्थ ठेवतात. मग शिकवायचा कधी. साफसफाईसाठी कर्मचारी ठेवत नाहीत, एक एक शिक्षक दोन तीन वर्ग सांभाळतो, क्लर्क ठेवत नाहीत ती काम पण शिक्षकाने करायचे. मग कस होणार

  • @RajshriShinde-q5m
    @RajshriShinde-q5m День назад +5

    शिक्षकांना फक्त मुलांना शिकवायचं कामासाठी शिक्षण सोडून इतरत्र काम बंद करण्यात यावी

  • @DHONDABAIMETKAR
    @DHONDABAIMETKAR День назад

    विद्यार्थींना शिकवण्यासाठी पाहिजे तेवढे शिक्षक नाहीत शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षक दिले पाहिजे

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik День назад +1

    भरती करा पाहिले उगीच ढोंग नका सांगू साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 4 часа назад

    हायस्कुलच्या तीन वर्गाना 5 शिक्षक 4 शिपाई व 1 क्लार्क मिळतो पण त्याच पटसंख्येच्या पहिली ते सातवीच्या ZP मराठी शाळेला फक्त चार शिक्षक मंजूर आहेत. मग काय होईल ?

  • @prakashdhumal5130
    @prakashdhumal5130 17 часов назад

    हेच विद्यार्थी पुढे लातूर पॅटर्न मध्ये बोर्डात येतात

  • @onlywhatsappstatus2973
    @onlywhatsappstatus2973 День назад

    हो बरोबर बोलले सर, अशैक्षणिक कामे बंद करा