सौंदर्य लहरी श्लोक पंधरावा
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Presenting you the 15th Shloka of the Adi Shankaracharya's ever iconic divine creation Soundarya Lahari.
Singer - Mrs Vaibhavi Shete
Composer - Isaignani Ilaiyaraaja
Lyrics - Adi Shankaracharya
So stream the perfect song to start your perfect day on a divine note.
शरज्ज्योत्स्नाशुद्धां शशियुतजटाजूटमकुटां
वरत्रासत्राणस्फटिकगुटिकापुस्तककराम् ।
सकृन्न त्वा नत्वा कथमिव सतां संन्निदधते
मधुक्षीरद्राक्षामधुरिमधुरीणाः फणितयः ॥ १५॥
संधिविग्रह - शरद्-ज्योत्स्ना-शुद्धां, शशि-युत-जटाजूट-मकुटां,
वर-त्रास-त्राण-स्फटिक-गुटिका-पुस्तक-कराम् ।
सकृत् न त्वा नत्वा कथम् इव सतां सन्निदधते
मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः ॥ १५॥
अन्वय - शरद्-ज्योत्स्ना-शुद्धां, शशि-युत-जटाजूट-मकुटां,
वर-त्रास-त्राण-स्फटिक-गुटिका-पुस्तक-कराम् ,
त्वा सकृत् न नत्वा सतां इव
मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः कथम् सन्निदधते ॥ १५॥
शब्दार्थ -
शरद्-ज्योत्स्ना-शुद्धां - शरद ऋतूतील ज्योत्स्नेप्रमाणे निर्मल (शरदऋतूतील चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शुभ्र असणार्या तुला
शशि-युत-जटाजूट-मकुटां - चंद्राने युक्त असा जटाजूटरूपी मुकुट धारण करणार्या तुला
वर-त्रास-त्राण-स्फटिक-गुटिका-पुस्तक-कराम् - वर = वरदान त्रासत्राण - त्रासापासून रक्षण करणारी, स्फटिकगुटिका स्फटिकाची अक्षमाला हातात असलेली. पुस्तककराम् - पुस्तक हातात असलेली
त्वा - तुला
सकृत् - एकदा
न नत्वा - नमस्कार न करता
सतां इव - पंडितांप्रमाणे
मधु- मध
क्षीर- दूध
द्राक्षा - द्राक्ष
मधुरिम- मधुरिमन् - माधुर्य
धुरीणाः - धुरंदर, अग्रेसर
फणितयः - फणिति = वागैश्वर्य
कथम् - कसेकाय
सन्निदधते - स्वाधीन करू शकतील.
अर्थ - शरद ऋतूतील चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शुभ्र वर्ण असलेली, चंद्रकोरीने युक्त असा जटाजूटरूपी मुकुट धारण करणारी, (भक्तांना) त्रासापासून अभय देणारी व वर देणारी व हातात स्फटिकाची अक्षमाला व पुस्तक धारण करणारी, अशा तुला जे एकदाही नमन करत नाहीत ते मध, दूध किंवा द्राक्षाप्रमाणे मधुरिमेने म्हणजे माधुर्याने युक्त अशी कविता करण्यात जे धुरंधर / अग्रेसर आहेत त्यांच्या सारखे काव्य सहजगत्या कसे करू शकतील ?
Kuph kuph dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏
Thanku
Jaitrepursumm