Shree Sadguru Shankar Maharaj Samadhi Trust Live Darshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024
  • स्वारगेट कडून साताऱ्याकडे जाताना पुणे - सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूस स्वारगेटपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर धनकवडी येथे श्री शंकर महाराजांचा मठ (समाधीस्थान) आहे. तेथे जाण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व कात्रज येथुन बसची सोय आहे, तसेच कात्रज - स्वारगेट फेऱ्या करणाऱ्या सहा आसनी रिक्षांची सुद्धा सोय आहे.
    सुमारे अर्धा एकर जागेत मठ (समाधी मंदिर) आहे. पश्चिम दिशेस सातारा रोड वर मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर डाव्या बाजूला चप्पल स्टँड तर उजवे बाजूस हात-पाय धुण्याची सोय आहे. हात व पाय धुवूनच गाभाऱ्यात जाण्याचा रिवाज आहे. समाधी मंदिर दक्षिणोत्तर आहे. मंदिरात जाण्यासाठी उत्तरेकडून दार आहे. दारातून गेल्यावर प्रशस्त सभामंडप असून त्याच्या मध्यभागी मोठे यज्ञकुंड आहे व समोरच गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दिसते. गाभाऱ्यात श्रींची समाधी व सुरेख संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीचे दर्शन सभामंडपाच्या प्रवेशद्वारातूनही होते. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीच्या पुढे दक्षिणोत्तर अशी महाराजांची समाधी आहे. गाभाऱ्यामध्ये महाराजांचे निरनिराळ्या पोषाखांमधील फोटो लावलेले आहेत. समाधीच्या उजव्या बाजूस श्री स्वामी समर्थांचा फोटो व पादुका आहेत. तसेच देवळीत श्री गजाननाची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस सोलापूरच्या जानुकाकांचा (जनार्दनस्वामी) यांचा फोटो आहे. गाभाऱ्याचे मागील बाजूस ट्रस्ट चे कार्यालय व महाराजांचे शेजघर आहे. शेजघरात महाराजांच्या काही वस्तू संग्रहित केल्या आहेत.
    सभामंडपाच्या वरच्या मजल्यावर ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिरात श्री अक्कलकोट स्वामी व श्री शंकर महाराजांच्या भव्य तसबिरी आहेत. सामुहिक ग्रंथ पारायण तसेच मठातील इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी ध्यान मंदिराचा उपयोग होतो.

Комментарии •