ओवसा की ववसा?? || गौरीपुजन || ववसा कसा भरतात || सूप कसे भरतात || कोकणातील पारंपरिक पद्धत|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • ओवसा की ववसा?? || गौरीपुजन || ववसा कसा भरतात || सूप कसे भरतात || कोकणातील पारंपरिक पद्धत| | Gauri Pujan |
    ● कोकणातील प्रसिद्ध पद्धत वोवसा - ओवसा - औसा
    ● वसा :--- गौरी मातेचा वसा घेणे,
    ● हौसा :--- गौरीमातेकडुन हौस भागवणे,
    ● आय्स :--- आऊस - ( कोकणात आईचे पर्यायी शब्द )
    ।। वसा = आऊसा, औक्षणचा अपभ्रंश - औशा / औसा,
    ।। अखंड ओवाळणीचा + वसा, अहो ( अखंड ) + वसा
    ।। ( वंश ) = अहोवसा ( अखंड वंश पुढे चालत राहण्यासाठी )
    ।। प्रथम आपण वोवसा - ओवसा - औसा म्हणजे काय
    ।। ते पाहुया. एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५
    ।। प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे,
    ।। करंडा फणी, ओटी ( खण व नारळ ) आणि वानाच्या
    ।। पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून,
    ।। अशी ४ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्यासाठी -
    ।। ओवसा करण्यासाठी / भरण्यासाठी ठेवतात.
    ।। आता वोवसणे - ओवसा करणे / भरणे म्हणजे नक्की
    ।। काय ते पण सांगायला पाहिजे. घरातील सुवासिनी
    ।। गौरी समोर जाऊन पहिले हळद - कुंकू लावून गौरीची
    ।। पूजा करायची आणि मग २ हातांनी भरलेले सूप
    ।। धरून गौरी समोर करून खाली ३ वेळा सूप ओढायचे
    ।। या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हणतात. नवीन
    ।। लग्न झालेली मुलगी ५ सूप घेऊन पहिली आपल्या
    ।। माहेरच्या गौरीला वोवसा वोवसून सासरी सूप घेऊन
    ।। यायचे आणि सासरच्या गौरीला वोवसायचे अशी
    ।। पद्धत आहे.
    ।। ज्या वर्षी रवि पूर्वा नक्षत्रावर गौरी आवाहनाचा
    ।। दिवस असतो त्यावर्षी नवीन जोडप्यांचे वोवसे
    ।। असतात म्हणजेच सुर्याचा पुर्वा नक्षत्र प्रवेश साधारण
    ।। एका वर्षाआड गौरी आवाहनावेळी होत असतो तो
    ।। दिवस ( उदा. ऑगस्ट २०१७ ची गणेश चतुर्थी
    ।। पाहावी ) वोवसा करुन झाले कि सर्व जोडपी
    ।। आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून
    ।। वोवश्यातले पान वाण म्हणून त्यांना देतात आणि
    ।। सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरुपात भरगच्च
    ।। पैसे देतात...
    ।। अशा प्रकारे गौरी म्हणजेच साक्षात आदिशक्तीचे पुजन
    ।। करुन तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं
    🙏।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
    ।। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    या चॅनेलवर तुम्हाला कोंकणातील विविध ठिकाणांची व्हिडिओ, कोंकणी संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ आणि बरेच काही पाहायला मिळेल.
    आम्ही तुम्हाला कोंकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभवात घेऊन जाऊ, कोंकणी भाषेची गोडी शिकवू आणि कोंकणी जीवनशैलीचा जवळून परिचय करून देऊ.
    तुम्हाला काय मिळेल:-
    कोंकणातील विविध ठिकाणांची व्हिडिओ
    कोंकणी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन
    कोंकणी खाद्यपदार्थांची रंजक माहिती
    कोंकणी भाषेचे धडे
    कोंकणी जीवनशैलीचा जवळून अनुभव
    आजच "नाळ कोंकणाशी" चॅनेल सब्सक्राइब करा आणि कोंकणाच्या जगाचा आनंद घ्या!
    सोबतच
    Instagram - / naal_konkanashi
    Facebook - www.facebook.c....
    channel videos- • भोस्ते श्रीवर्धन कोंकण...
    • खेकडे पकडण्याची आगळीवे...
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    🙏धन्यवाद!🙏
    #गौरी #ओवसा #गौरीपूजन #गौरिचा_ववसा #कोकण #gauriganpati#konkan #kokanganpati #travelgrammiles #kokan#ganpatifestival #marathifestival
    #Gauri #GauriGanpati #गौरीपूजन #naalkonkanshi #konkanashinaal #naturephotography #sahyadri #msrtc #devgad #kokandiaries #mansa #konkanifood #travelphotography #sadhi #bhfyp #bholi #clickers #beach #love #desha #kokancha #insta #kokanacha #maharashtradesha #incredibleindia #vengurla #dapoli #kolhapur #malvani #photooftheday #streetsofmaharashtra #gav #westernghats #konkanphotography #thane
    Naal Konkanashi

Комментарии • 3