कढातल्या अंड्याचे कालवण आणि भाकरी खावून धावत-पळत जावून धरली मेंढरं | dhangari jivan | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 279

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Год назад +159

    हाके पाहुणे, आपले मनापासून आभार मानतो कारण एवढ्या धावपळीतून बारीक सारीक क्षण तुम्ही व्हिडिओ मध्ये पकडता आणि आमच्यापर्यंत पोहचविता हे अतिशय कठीण काम आहे. सातत्याने एखादी गोष्ट न कंटाळता करत राहणे हे सोपे नाही. पण तुमचा दिनक्रम पाहता कोणताही आळस न करता प्रत्येक काम मनापासून करणे ही तुमची खासियत आहे.
    म्हणूनच एका तासात तेरा हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. खरे तर हे पाहणारे लोक तुमचे मनाने जोडलेले आप्त परिवार बनले आहेत. सर्वांचे तुमच्याविषयी खूप प्रेम आहे. हा ठेवा तूम्ही कष्टाने कमविला आहे. हा परिवार असाच वाढत राहो हीच मनोकामना.
    आजचा व्हिडिओ छानच आहे. बानाई ताई नेहमीच छान माहिती देत असतात. किसन भाऊ आणि अर्चना ताई त्यात भर घालतात. सागर एकदम आनंदी बाळ आहे.
    सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад +21

    तुमच्या बाया कीती कष्टाळु आहे,घरी रहाते ती दळण मळण करते मेढरामागे जाते ती शिवनकाम करते, बानाई आणि अर्चना दोघींना सलाम व्हिडिओ खुप छान

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +38

    धान्य व इतर सामान अगदी कसे नीटनेटके पने ठेवता अगदी सुरक्षित .कमाल आहे तुमची .आमच्याकडे मोठमोठी घरे असून देखील वस्तू जाग्यावर नसतात

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад +48

    तुमचा व्हिडिओ बघताना ,खुप प्रसन्ना वाटते ...माझा आळस पळून जातो ..मन एकदम उत्साही होते ...फ्रेश, टवटवीत मनाने दिवसाची सुरवात होते ...

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Год назад +8

    सिध्दू दादांना खरंच लाईकस करत जा मित्रांनो, कारण खूप संघर्षातून व मेहनतीने आपलं जीवन जगत आहेत, माणूसही खुप साधा व तितक्याच मोठ्या मनाचा आहे

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 Год назад +11

    ताई तुम्ही साडी नेसुन किती सहज कामं करता.घरातील सर्व कामं आणि मेंढराच्या मागं जायचं.डोईवरचा पदर खाली येत नाही.प्रतिकूल परिस्थितीत सगळं काम करणे.यु आर ग्रेट....

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Год назад +6

    दादा सलाम तुम्हा सर्व कुटुंबीयांना .सगळेच किती कष्ट करताय . बानाईच जेवण तर ऐक नंबर.आणि सागर किती छान राहतो खूप शहाणा आहे.

  • @anilmhaske9650
    @anilmhaske9650 Год назад +4

    धनगरी जीवनावरचे आपले व्हिडिओ खरच खूप वाखाणण्याजोगी आहे एवढे कठीण वातावरण असतानाही आपली सर्वांचीच धडपड जगण्यासाठीचे प्रयत्न मनाला उमेद देणारी आहेत ऊन वारा पाऊस या सर्व परिस्थितीत आनंदी जीवन जगणं एक कलाच म्हणावी आपण अधिक पुढे जा ही शुभेच्छा

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 Год назад +5

    तुमचा व्हिडियो पाहून मनाला खूपच प्रसन्न वाटते येवढ्या ऊन्हात एवढा चांगला प्रपंच उभा करता खूपच छान

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Год назад +3

    मी आगोदर लाईक करते मग पहाते खुप सुंदर गाव खुपच सुंदर जीवन नशीब लागते असे जगण्या साठी

  • @surekhapatil103
    @surekhapatil103 Год назад +8

    खुप मेहनत आहे तरीही किती आनंदी राहतात खुप छान वाटत असते तुमचे व्हिडिओ बघुन

  • @prakashkale-wk2wi
    @prakashkale-wk2wi Год назад +3

    दादा तुमचे निसर्गाच्या सानिध्यातले जीवन खरच खूप छान आहे असे जीवन जगले पाहिजे वा खूप छान

  • @arunjadhav1944
    @arunjadhav1944 Год назад +7

    मम्मी पप्पा च्या युगात आई हा शब्द ऐकून समाधान वाटले

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +16

    दादा मी व्हिडिओ ची दोन दिवस वाट बघत होते खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात दादा बनाई ने छान सावली केली सागर ल❤यू सागर बाळ

  • @mk79139
    @mk79139 11 месяцев назад +1

    खूपच विचार सुंदर आहेत तुमचे आणि कुटुंबांचे.
    कोंबडी आंधळी आहे पण तिचा संभाळ ही किती ममतेने केला जातो...हे बघून खूप समाधान वाटलं🙏.नाहीतर लगेच कापून खाणारे जगात कमी नाहीत.तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा 🙏

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Год назад +22

    भाऊ रोज व्हिडिओ ची वाट बघतो प्रतेक व्हिडिओ दोन वेळेस बघत असते खूप छान व्हिडिओ असतात

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад +3

    सागर बाळ गावातील खडे काढून देतो...त्याच्या मोठे आई ला...इतका लहान असून....किती शहाणा...हुशार आहे खूपच..👌👍

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Год назад +5

    छान आहे विडियो वहिनी दादा तुम्ही खुप कष्ट करून सुद्धा छान आहे

  • @CA-ht9rs
    @CA-ht9rs Год назад +4

    तुमचे व्हिडिओ पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे अजुनही ग्रामीण जीवनशैली टिकून आहे. आणि या गोष्टीचे मना पासून समाधान वाटते.
    जो पर्यंत ग्रामीण जीवन शैली टिकून आहे तोपर्यंत मानव संस्कृती टिकून राहील.
    ग्रामीण जीवन शैली टिकून ठेवण्यासाठी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.
    भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    🙏🙏

  • @ShubhangiBhuwad
    @ShubhangiBhuwad 7 месяцев назад

    बाणाई तू खरच देवगुणी आहेस. मुक्या प्राण्यांवर पण किती प्रेम करतेस ग देव तुला खूप सुखात ठेवो❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Год назад +2

    बाणाई ताई खूप खूप गुणी , हुशार आहेत.खूप छान स्वयंपाक करते..कंटाळा आळस त्रागा नाही..सार हसतमुख काम.👍👍👍🌹🌹🌹🙏

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 Год назад +6

    दादा व्हिडिओ एकच नंबर असतो

  • @gulabchavan7454
    @gulabchavan7454 Год назад +1

    अस्सल ग्रामीण जीवनचा आनंद मिळवून देताय त्या बद्धल मनापासून धन्यवाद

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Год назад +7

    बानाई खूप हुशार आहे भाज्या खूप छान बनवते

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 Год назад +5

    भाषा खूप गोड.... मोकळ्या आभाळागत मोकळी माणसं

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 Год назад +2

    सिद्ध दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते आम्ही फ्लॅट मध्ये राहतो पण तुमचं हे धनगर जीवन खूप छान वाटते बांधावी दळण कुठून आणतात

  • @borkar9458
    @borkar9458 Год назад +9

    खरोखरच सुगरण आहेत ताई

  • @maliniwani207
    @maliniwani207 Год назад +2

    सागर खुप गुणी मुलगा आहे, दळणाच्या पीशव्या खुप छान,दाने ठेवायचे कोठार खुप छान आहे,

  • @Parthr878
    @Parthr878 Год назад +2

    तुमचं खूप कौतुक वाटत खूप मेहनत करता तूम्ही

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Год назад +8

    Dada vahiny kade pahun chaan batate
    Evdhya kathin paristhitit rahun Sudha saglyanch lux thevate satat hasat raahate Dada tumhi khup lucky aahat God bless both of you

  • @sunilpawar4701
    @sunilpawar4701 Год назад +5

    ताई. तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात...❤❤

  • @laxmikenjale2629
    @laxmikenjale2629 Год назад +202

    मी video बघायच्या आगोदर like करते मग बघते

  • @savitapanzade9492
    @savitapanzade9492 Год назад +2

    आम्ही महाराष्ट्रच्या बाहेर राहतो तुमचे vido बघतानी गावाकडे आपल्या माणसं सोबत असल्याचा आनंद मिळतो.
    gred job Dada

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Год назад +10

    Haky dada tumcha jivan khup kashtalu ahe ya jivanala salam 🌹😘

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Год назад +6

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ

  • @suvichar1mansanskaar
    @suvichar1mansanskaar Год назад +12

    जीवनाचे यथार्थ वर्णन असणारे तुमचे video असतात. 👌🏻

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Год назад +2

    खुप सुंदर व्हिडिओ धन्यवाद

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Год назад +3

    दोघी वहिनींना खूप काम असतात.
    खूप कष्ट आहेत.
    दादा अर्चना वहिनी कशी नक्षीकाम करते ते पण दाखवा, तुम्हाला वेळ मिळाल्यावर.
    सागर बाळ खूप गोड आहे.👌👌

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад +5

    तुमचा मेंढा चा पाडा कुठे आहे ...आम्हाला पण तुमच्या पाड्यात यायची खूप इच्छा होते ...how sweet ...🎉

  • @sonalisonwane2824
    @sonalisonwane2824 Год назад +3

    दादा मला तुमचे विडीओ छान असतात मला खुप आवडतात

  • @shubhamtembhukar2544
    @shubhamtembhukar2544 Год назад +1

    हिच आपली संसकृति मस्त वाटल 🙏

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b Год назад

    दादा खरच तुमच्या ह्या रोजच्या कटकटी जरी असल्या तरी आत्ता तुम्हाला त्याची रोजची सवय झाली आहे त्यासाठी तुम्ही रात्र दिवस मेहनत करत आहे ही परिस्थिती कधी बदलेल व्हिडिओ बघताना खूप दुःख पण होते पण जे सत्य आहे ते तुम्ही लोकांना सांगत आहेत खूप प्रामाणिक असा तुमचा समाज आहे प्रेमळ धार्मिक परोपकारी आहे देव तुमचे भके करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤

  • @sunitapatil3332
    @sunitapatil3332 Год назад +16

    बांनाई.लय.हुशार.आहे.स्वंयपाक.पण.छान.करतात

  • @chandumanjarkar1101
    @chandumanjarkar1101 Год назад +2

    Mala tumche video Khup chan vat tay pahayla

  • @shubhangigandhat3578
    @shubhangigandhat3578 Год назад +3

    दादा तुमचा धनगरी प्रवास खुफ आवडतो तुमच्या मेहनतीला त्रिवार सलाम बाणाई खूप मेहनत करते उन्हा तानात तुम्हाला आनंदाने साथ देते तुमच कुटुं ब नेहमी निरोगी राहो मि आता ससक्राइब आणि लाइक पन केल तुमच चायनल नेहमी पाहते दादा आणि बाणाई ला 🙏👍👌🌹

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 Год назад +3

    तुमच्या विडियो आवडतात. छान. आणखी विडियो बनवत राहा.

  • @swatishinde2971
    @swatishinde2971 Год назад +2

    Khup mehnat ani kasht ahet tumche

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Год назад +5

    दादा तू ग्रेट आहेस. नमस्कार

  • @rtgaming2772
    @rtgaming2772 Год назад

    खूप छान वाटते तुमचं जीवन बघून फ्रेश वाटते

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 Год назад +3

    खुप छान व्हिडिओ दादा 👌👌👍🙏🙏😊

  • @CharanJaiswal-ds8tp
    @CharanJaiswal-ds8tp Год назад +6

    सागर खुप सुधार आणि गुणी मुलगा आहे

  • @vikaskad9952
    @vikaskad9952 Год назад +3

    खूप छान व्हिडिओ होता

  • @shashikantbhalerao5127
    @shashikantbhalerao5127 Год назад +2

    Banai.. lay kashtachi hay ... Dada... Dev tumhala khup Maya devi

  • @sandhyasulke7715
    @sandhyasulke7715 Год назад +4

    खूप छान 🙏 रोज तुमचे व्हिडिओ बघून आता असे वाटायला लागलेय आम्ही पण तुमच्याबरोबरच रहातोय. आमचे नेहमीचे रूटीन असते, पण तुमचा दुसरा दिवस कसा उजाडेल सांगता येत नाही. तरीही येणारा प्रत्येक दिवस तुम्ही छान पद्धतीने, सकारात्मक राहून घालवता. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते 🙏

  • @akhadeusha1000
    @akhadeusha1000 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे

  • @ranjanasonwane4825
    @ranjanasonwane4825 Год назад +4

    Khupach chan vedio dada

  • @gorakhnathbahiram4952
    @gorakhnathbahiram4952 Год назад +5

    खूप धन आहे भावाकडे. फक्त उन्हातन्हात कष्ट करावे लागतात... शेतकरी सारखच...

  • @SonaliGaikwad-cq2fm
    @SonaliGaikwad-cq2fm Год назад +5

    तुम्ही सगळे खुप छान आहे

  • @manishavaity3882
    @manishavaity3882 Год назад

    बाणाई खूपच सुंदर नमस्कार दादा

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Год назад +4

    दादा काल तुमचे 1 लाख 99 हजार suscriber होते आज 2 लाख झाले...

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад +5

    खूप खूप छान विडिओ

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 Год назад

    वहिनी साहेब आपण खूप ग्रेट आहात

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 Год назад +4

    मी तुमची नवीन सबस्क्रायबर आहे काल पासून बरेच व्हिडिओ बघितले ...खुप कष्टाळू मेहनती आहात तुम्ही बानाई वहिनी तर न कंटाळता सगळी कामं आवडीने करतात

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Год назад +3

    एकच. नंबर
    अंड्याचे. कोड्यास

  • @ganesheshwarbhise798
    @ganesheshwarbhise798 Год назад +2

    खूप छान ताई जेवण छान आहे 😘💗💯 लयभारी

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 Год назад +7

    दादा ऊन एव्हड आहे आम्हाला घरात बसवत नाही तुम्ही उनात कस काय रहता कमाल आहे तुमची सावली साटी तादपत्री लावा उणात नका बसू

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +3

    Daada waheeni tumhi mukya janavravat khup prem karta eka anadha komdivar pan kiti kalji gheta aani jiv lavta aajcha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @gokulgangurde429
    @gokulgangurde429 Год назад +1

    Banubai tumchi legeche khup Chan aahe an tumchi cooking pn mazya Tai sarkhi 👌👍🥇

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +8

    दादा तुमचे विडियो आम्ही रोज बघतो खूपच छान असतात..पण तुमचा एक शब्द फार आवडतो...
    .. मस्त पाकी😂🙏👍

  • @vighneshtravels
    @vighneshtravels Год назад +1

    छान व्हिडिओ. मस्त

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Год назад +5

    फेटा बांधून एखादा व्हिडिओ बनवा मस्तपाकी।👍👌

  • @swarajavhad5281
    @swarajavhad5281 Год назад +6

    Mast ahe video🙂

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Год назад +3

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार 🌹🌹 खूप छान

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Год назад +3

    मी व्हिडिओ पाहायच्या आधीच लाईक करते👌👌👌👌👌😍😍😍😍😍

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 Год назад +25

    Dada 4 person tent घ्या 7000 la येतो ऊन वारा पाऊस साप विंचू येत नाही तुमचा सागर लहान आहे काळजी घ्या

  • @SangeetaArak-xw3ds
    @SangeetaArak-xw3ds 2 месяца назад

    छान ताई खुप कष्ट करता तुम्ही

  • @jyotishinde5342
    @jyotishinde5342 Год назад +7

    Great job Dada

  • @ChaiitaliJoshi
    @ChaiitaliJoshi Год назад +2

    Khup chan video astat

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 7 месяцев назад

    किती छान सूप वापरता येतेय बनाईला.

  • @kamalkale3674
    @kamalkale3674 Год назад +2

    Mala tumch video kup aavdtat ❤❤

  • @shubhangigandhat3578
    @shubhangigandhat3578 Год назад +2

    खेळ मानडियला वाळवंटी घाई नाचती veyshnva भाई रे बाणाई साठी 🌹🌹🌹🌹🌹👍

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Год назад +1

    Chhan khup chhan video Jay malhar

  • @chikya_821
    @chikya_821 Год назад +5

    खुप छान विडीओ 💖💖🙏🏻💖❤️

  • @premadhote5085
    @premadhote5085 Год назад +3

    खुप छान दादा

  • @pratibhakale2776
    @pratibhakale2776 Год назад +1

    जय मल्हार खूप छान असता तुमचे विडिओ

  • @ahire871
    @ahire871 Год назад +6

    दादा तुम्ही टेन्ट घ्या अशी सावली करायची गरज नाही पडणार सागर साठी आणि तुमच्या साठी सुरक्षित राहील त्याची घडी पण करता येते तुम्ही दोघं भाऊ साठी २घेतले की छान होईल सोईच होईल

  • @swatijadhav2077
    @swatijadhav2077 Год назад +6

    nice video Dada 👍👌

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Год назад +2

    Lay bhari video dada

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад +5

    लय भारी 👌👌👌👌👍

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Год назад +15

    छान 👌 मेजवानी दादा वहिनी

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Год назад +1

    🙏 किती व्यवस्थित पणा जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कष्टाला सीमा नाही सर्वांना खूप धन्यवाद 🌹🌹❤🎉🇳🇪🙏

  • @shankarapatange1803
    @shankarapatange1803 Год назад +2

    Mast zali bhaji 🎉

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Год назад +1

    बाणांई सूती साडी नेस खुप गरम होतय.

  • @mangalbothe6802
    @mangalbothe6802 Год назад +2

    Sagar chya payat kahich ghatlele nahi ho dada..., Khup unhat chalto to..

  • @sahilinaik9904
    @sahilinaik9904 Год назад +3

    Vahini kiti premal Aahe sagal kahi aandane karata 🙏

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 Год назад +2

    Dada khandesh madhe ya aamchya shetamadhye Plz aamhala mendhi chya khatachi khup garj aahe

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Год назад +4

    ❤छान व्हिडिओ असता दादा तुमचे पण उन्हातडोक्यावर छत्री घेत जा नाही तरी काहीतरी घेत जा❤

  • @jayshriavhad6209
    @jayshriavhad6209 Год назад +7

    सुखी जीवन

  • @supriyaalhat3814
    @supriyaalhat3814 Год назад +4

    रोज विडियो ची वाट बघते,,,,

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Год назад +2

    खरच व्हिडिओ बघण्या सारखे