झेंडू लागवड | unali zendu lagwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉कंपोस्टिंग जिवाणू - krushidukan.bh...
    👉मायक्रोनुट्रीएंट - krushidukan.bh...
    ===============================================================================
    ✅आजचा विषय - 🌱झेंडू लागवड | unali zendu lagwad👍
    ✅जमीन : उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा.
    ✅हवामान : उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात याची वर्षभर लागवड करता येते. फुलांच्या उत्पादनासाठी मध्यम हवामान लागते. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाची वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. जास्त पावसाचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
    ✅रोपनिर्मिती :
    👉 रोपे तयार करण्यासाठी प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिट वापरावे.
    👉 निर्जंतुक केलेले कोकोपिट ट्रेमध्ये भरून प्रत्येक पेल्यात एक बी टोकून पाणी द्यावे. या पद्धतीने रोपे तयार केली तर २५० ग्रॅम बी पुरेसे होते.
    👉 बी पेरल्यापासून ३० ते ३५ दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.
    ✅पूर्व मशागत : ज्या शेतात झेंडू लागवड करावयाची आहे त्या क्षेत्राची चांगली नांगरणी उन्हाळयात करून घ्यावी. आवश्यकतेनुसार दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. यानंतर चांगले कुजलेले 10 ते 12 क्विंटल शेणखत किंवा कंपोष्ट जमिनीत मिसळून जमीन तयार करून घ्यावी.
    ✅गादीवाफ्यावर लागवड :
    👉 रोपांची उत्तम वाढ, फुलांचे जादा उत्पादन व चांगली प्रत मिळण्यासाठी रोपांची लागवड गादी वाफ्यावर करावी.
    👉 जमिनीची पूर्व तयारी झाल्यावर ६० सें.मी. रुंद आणि ३० सें.मी. उंच व सोयीनुसार लांब गादी वाफे तयार करावेत. दोन गादी वाफ्यामध्ये ४० ते ४५ सें.मी. अंतर ठेवावे. गादी वाफ्यावर ४५ सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
    👉 ट्रेमधील रोपे कोकोपीटसहित हळुवार काढून कोकोपीटच्या गठ्यासहित वाफ्यावर लावावीत. लागवड केलेल्या दोन रांगांमध्ये ठिकाणी ठिबकची नळी ठेवावी.
    👉 ठिबक सिंचनामधून पाणी व विद्राव्य खतांची मात्रा द्यावी. लागवड करताना प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. बाजारभावाचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन करावे.
    👉 या पद्धतीने पारंपरिक सरी वरंब्या पद्धतीने लागवड केल्यास एकरी २२,०००, तर गादी वाफा पद्धतीसाठी २६,६०० रोपे लागतात.
    ✅रोपांच्या ओळीमधील अंतर (सें.मी.) :
    👉 पावसाळी हंगाम : उंच जात ६० बाय ३०, मध्यम जात ६० बाय ४५
    👉 हिवाळा हंगाम : उंच जात ६० बाय ४५, मध्यम उंच जात ४५ बाय ३०, बुटकी ३० बाय ३०
    👉 उन्हाळी हंगाम : उंच जात ४५ बाय ४५, मध्यम जात ४५ बाय ३०
    ✅खत व्यवस्थापन :
    👉 जमिनीची मशागत करताना एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत + कंपोस्टिंग जिवाणू २ लिटर मातीत मिसळावे.
    👉 माती परीक्षणानुसार ४० किलो युरिया, ५० किलो डी.ए.पी. ५० किलो, पोटॅश ५० किलो, मायक्रोनुट्रीएंट १० किलो + सल्फर ४ किलो एकत्र करून बेड भरून घ्यावेत. पुनर्लागवडीनंतर एका आठवड्यांनी 12:32:16 हे खत ५० किलो द्यावे.
    👉 नत्राची मात्रा जास्त झाल्यास पिकाची शाखीय वाढ भरपूर होते. फुलांचे उत्पादन कमी मिळते. दर्जेदार उत्पादनासाठी शिफारशीनुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ठिबक सिंचनाने शिफारशीनुसार विद्राव्य खते वापरावीत.
    ✅पाणी व्यवस्थापन :
    👉 खरीप हंगामात पाऊस नसेल तर १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
    👉 रब्बी हंगामात ८ ते १० दिवसांनी, तर उन्हाळी हंगामात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.
    👉 फुलांचे उत्पादन चालू झाल्यानंतर फुलांची काढणी पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
    ✅शेंडा खुडणे :
    👉 उंच वाढणाऱ्या जातीची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त फुटवे येण्याच्या उद्देशाने शेंडा खुडला जातो.
    👉 शेंडा खुडण्याने उंच सरळ वाढणाऱ्या रोपाची वाढ थांबते, भरपूर बगल फुटी फुटतात, त्यामुळे झाडाला झुडपासारखा आकार येतो.
    ✅आंतरमशागत :
    👉 रोप लागवडीनंतर दोन आठवड्यांनी खुरपणी करावी.
    👉 खुरपणी करताना रोपाला भर द्यावी, त्यामुळे रोपे फुलाच्या ओझ्यांनी कोलमडत नाहीत.
    ✅कीड रोग - झेंडूवर पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळीचा या किडींचा प्रादुर्भाव आणि मर आणि करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या साठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
    ✅फुलांची काढणी :
    👉लागवड केल्यापासून ६० ते ६५ दिवसांत फुले काढणीस तयार होतात.
    👉फुले पूर्ण उमलल्यानंतर काढणी करावी. उमललेली फुले देठाजवळ तोडून काढावीत.
    👉काढलेली फुले थंड ठिकाणी ठेवावीत, काढणी शक्‍यतो संध्याकाळी करावी.
    👉स्थानिक बाजापेठेसाठी बांबूच्या करंड्या किंवा पोत्यात बांधून फुले पाठवावीत.
    ✅उत्पादन (प्रति एकरी) :
    हंगाम, जात, जमीन, हवामान यानुसार फुलांच्या उत्पादनात विविधता आढळते.
    👉आफ्रिकन झेंडू : ६ ते 7 टन
    👉फ्रेंच झेंडू : ४ ते ५ टन
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Комментарии • 40

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Год назад +1

    Very good video by BharatAgri!

  • @khgoundi1993
    @khgoundi1993 Год назад

    Ya video chi brech divsapAsun vat pahat hoto tq bharat agri

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      धन्यवाद सर ! क्षमा असावी थोडा उशीर झाला .

  • @avadhutpatil2959
    @avadhutpatil2959 5 месяцев назад

    Khup ch chan sar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @spcreation7753
    @spcreation7753 Год назад +3

    खुप खर्च होतो झेंडूला आणि कधीकधी बाजार पण नसतो

  • @sadashivzanjage
    @sadashivzanjage Год назад +1

    सर झेंडू मध्ये कोबी आंतरपीक घेवु शकतो का

  • @avinashkedar1209
    @avinashkedar1209 Год назад

    Plot kiti divas chalto..

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Год назад

    दादा शेवगा लागवड यावर संपूर्ण माहिती असा व्हिडिओ बनवा जेणे करून पूर्ण माहिती मिळेल

  • @sourbhkadam9853
    @sourbhkadam9853 8 месяцев назад

    सर गुलाबाला जास्त फुटवा व कळी येण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी प्लीज सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @santoshrathod463
    @santoshrathod463 Год назад

    SCT वर व्हिडीओ बनवा सर आणि सोप्या पद्धतीने समजून सागा ❤😊

  • @bhikajipawar4524
    @bhikajipawar4524 Год назад +2

    सर फुटात सांगा

  • @pmugle2547
    @pmugle2547 Год назад

    DraganFruit ची लागवड यावर विडिओ बनवा सर

  • @bharatsuryawanshi3339
    @bharatsuryawanshi3339 Год назад

    ऍग्रोस्पा वापर सांगा व्हिडिओ बनवा

  • @gaykawadmohan3625
    @gaykawadmohan3625 Год назад

    झेंडू पीक आहे त्याच्यावर तांबोरा रोग आलेला आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      साफ ( कार्बेन्डाझिम १२ %+ मॅंकोझेब ६३% ) @३५ ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी . नंतर - ७ दिवसांनी - वेस्पा -( प्रोपिकोनाझोल 13.9% + डिफेन्कोनाझोल 13.9% EC) - १५ मिली + सागरिका ७५२५ - ३० मिली + कॉन्फिडोर( इमिडाक्लोप्रिड 200 एसएल (17.8% w/w)) - १० मिली + स्टिकर ५ मिली - गरज असेल तर कीटकनाशक टाकू शकता - १५ लिटर फवारणी .

    • @gaykawadmohan3625
      @gaykawadmohan3625 Год назад

      धन्यवाद सर

  • @ashokphalke3427
    @ashokphalke3427 Год назад

    झेंडू वरील फादी करपा ऊपाय काय

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 6 месяцев назад

    एकरी 26000 रोपे म्हणजे 75000 रू ची रोपेच झाली की😮

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @sandipchaudhari7377
    @sandipchaudhari7377 Год назад

    1🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamparadepatil4670
    @shubhamparadepatil4670 6 месяцев назад

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🚩🚩

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      सर क्षमा असावी हा व्हिडिओ अगोदर चा आहे त्या वेळेस औरंगाबाद हे नाव होत , धन्यवाद सर !

  • @dhirajdange4182
    @dhirajdange4182 Год назад

    खर्च खूप येतो आणि भाव कधी तरीच सापडतो जास्त भाव कमी दिवस व कमी भाव जास्त दिवस सापडतो

  • @yashodhanchorghade3106
    @yashodhanchorghade3106 Год назад

    फुलला मार्केट मध्ये भाव काय भेटतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад +1

      समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
      23/01/2023
      पुणे लोकल क्विंटल 313 3000 7000 5000

  • @shivamsakhare9412
    @shivamsakhare9412 Год назад +2

    Seed kute midnar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Год назад

      तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करून बियाणे खरेदी करू शकता -
      krushidukan.bharatagri.com/products/marigold-brezza-yellow-f1-shine-brand-seeds?_pos=1&_sid=5f1a1502f&_ss=r
      krushidukan.bharatagri.com/products/marigold-bolt-orange-f1-hybrid-shine-brand-seeds-1?_pos=3&_sid=5f1a1502f&_ss=r