गं सांग आये काय आणू गणपतीला | aaye kay anu Ganpatila | Vikas Lambore | Nitin Pawar G Aaye | गं आये |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @VikasLambore
    @VikasLambore  Год назад +233

    हे माझं अर्थात विकास लांबोरेंचे चॅनेल आहे. नक्की connect होऊन रहा.

    • @RonakPawar-q9o
      @RonakPawar-q9o Год назад +20

      Ok sir

    • @WAFteam45
      @WAFteam45 Год назад +3

      Okay

    • @shrushtitaral725
      @shrushtitaral725 Год назад +3

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @dipakkirve2525
      @dipakkirve2525 Год назад +6

      Buva phone नबर patvaa na

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад +3

      77100 32975

  • @janardanjadhav3601
    @janardanjadhav3601 Год назад +46

    गाण कितीवेळा ऐकल तरी मन भरत नाही ❤❤❤❤ गावाकडची आठवण येते ❤❤❤

  • @dilipyerim7903
    @dilipyerim7903 Год назад +34

    गाणं ऐकता ऐकता मन एकदम भावूक झालं! जबरदस्त गाणं 💫💫💫 आणखीन सुपर डुपर हिट होवो. हीच सदिच्छा!!

  • @kokanikarti
    @kokanikarti Год назад +98

    अप्रतिम शब्दरचना , खूप सुंदर गाणे, सार डोळ्यासमोर उभे केलेत 😢 निःशब्द!

  • @-shree
    @-shree Год назад +42

    आज पर्यंत शक्ती तुऱ्या मध्ये बरीच गाणी ऐकली होती. बरीच गाणी आली सुद्धा. पण या गाण्याचे प्रत्येक शब्द ❤️इथे लागले.. तुमच्या बोलण्यात जादू आहे. अशीच गाणी येउदेत.. सगळ्या शाहिरानंपेक्षा रशिकांच्या मनातलं ओळखून लिहणारा आणि बोलणारा एकमेव शाहीर....
    अप्रतिम लेखणी शाहीर विकासजी लांबोरे साहेब ❤️

  • @sachinchandurkar6754
    @sachinchandurkar6754 Год назад +58

    ये आय म्हटलं कि सगळं सुख आहे दादा खूप सुंदर गाण आहे ❤❤❤

  • @MangeshGomane-s5s
    @MangeshGomane-s5s Год назад +64

    ग आए ....या शब्दात सगळं सुख दडलंय दादा आपलं ऐकताना मन खूप भरून येतं एकीकडे महागाई ने बेजार असताना सुद्दा नव्या जोमाने बाप्पा साठी गावी जाण्याचा उत्साह तुमच्या गाण्यातून अजून द्विगुणित झाला ,चाकरमनी आणि कोकण एक अतुट नात व्यक्त झाले आपल्या गाण्यातून👍👍💐💐

  • @mybhumikokan_6k
    @mybhumikokan_6k Год назад +8

    विकास माऊली दररोज एकदा तरी गाणं ऐकतो आणि आईची आठवण पण येते दरवर्षी गणपती आलं की आई बरोबर माझं हेच बोलणं होतं तेच तूम्ही गाण्यात उतरलं आहे...
    एक नंबर माऊली
    काव्या रचना खुप सुंदर केली आहे
    तुमचा तर 2010 पासून चा मी मोठा फॅन आहे जेव्हा तुम्ही वाडगांव कातकर वाडीत बारी केली तेव्हा पासून ❤❤

  • @dipatidhumak.....
    @dipatidhumak..... 9 месяцев назад +5

    👍👍👍💐🌹nice song dada 👍👍👍

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 Год назад +31

    सध्याच्या अश्लील गाण्याच्या जमान्यात विकास सर आपण जे काही काम करत आहेत त्याला तोड नाही. खूप साऱ्या अडचणींवर मात करून आपण हे गाणं बनवलं आहात त्यासाठी आपलं खूप खूप कौतुक. गाण्याचे बोल मनाला एकदम भारावून टाकतात खूप खूप धन्यवाद या वर्षीचा गणेश उत्सव या गाण्यामुळे अजून आनंदात जाणार आहे आमचा 😍😍😍

  • @santoshposture1912
    @santoshposture1912 Год назад +1

    लय भारी माऊली,दिवसभर हेच गीत ऐकत रहावं अस वाटत आणि मी तेच करत असतो,तेच गाणं गुणगुणत असतो
    लय भारी

  • @pravinshigwan1256
    @pravinshigwan1256 2 месяца назад +8

    हे गाण खुप वेळा ऐकतो डोल्यात पाणि येतो येवडा छान गाण आहे विकास बुवा खुप छान🎉❤❤❤

  • @mangeshbhayaje-x5m
    @mangeshbhayaje-x5m 2 дня назад +1

    सुबक सुंदर लेखन, त्यासोबत सरळ सोपं गायन..मनं भारावून गेलं..

  • @babudignkar4940
    @babudignkar4940 Год назад +14

    दोन हजार तेवीस लंबोरे.बुवांच एक नंबर गाणे आहे अभिनंदन बुवा.

  • @siddhugavade1911
    @siddhugavade1911 Год назад +2

    खूप सुंदर माऊली गावाला जयाचि ओढ लागली आता काहीच दिवस शिल्लक राहिले... माझ्या बाप्पाला यायला घरी❤😍🤩🥳

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 Год назад +19

    कुठून सुचतात रें बावा हे शब्द हृदयस्पर्शी...... वाजाप लय भारी नमन ठेका......
    आपल्या तालमीत शिकत असलेला एक विद्यार्थी NSR❤

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Год назад +1

    Very nice song
    Bappa cha aashirvad ahe pathishi.

  • @Natureofkokan0411
    @Natureofkokan0411 3 месяца назад +4

    खरंच खूप छान शब्दरचना सर.... कारण गणपती ची मज्जा काय असते ते आम्ही तुमच्या गाण्यातून अनुभलं.... जे गणपती मध्ये आपण सुख अनुभवतो ते तुम्ही 5 मिनिटाच्या song मधून प्रदर्शीत केलंत अतिश सुंदर रचना... 🥰🥰🥰👌👌

  • @atejasvikokare1834
    @atejasvikokare1834 Год назад +2

    विकास मित्रा
    गण खूप छान रचियाला आहे आणि अप्रतिम गायलं आहे . २०२३ चा गाजलेला गाणं होणार.

  • @ajaymandavkar6762
    @ajaymandavkar6762 Год назад +15

    सर्वोत्तम पैकी एक... मी जवळजवळ हा गण Yotube माध्यमातून २५ ते ३० वेळा ऐकतोय. अजून ऐकावासा वाटतोय. एक एक शब्द शब्द अर्थपूर्ण आहे. भावुक करणारा गण. शाहीर खूब लिखे हो... शुभेच्छा💐

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 5 месяцев назад +2

    बुवा छान अशी शब्द रचना आणि गायन अप्रतिम बुवा 🎉🎉

  • @Sanjaydhavale3346
    @Sanjaydhavale3346 Год назад +6

    100 पटीने फॅन वाढले दादा तुझे ह्या गाण्यामुळे खूप छान गान्

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 10 месяцев назад +2

    खूप सुंदर आहे गाणं सलाम तुमच्या कार्याला❤

  • @pratikmore3767
    @pratikmore3767 Год назад +8

    या वर्षातला सुपरहिट गण..
    गाण्यातील शब्दरचना सर्वसामान्य लोकांच्या मनातील आहेत.
    गाणं ऐकल्यावर च संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहत.
    जे शब्द तुम्ही वापरलेत ते लोकांच्या परिस्थितीशी जुळून आलेत..
    ..❤❤❤❤

  • @yashwantnawathe1984
    @yashwantnawathe1984 Год назад +2

    शब्द कोश आणी बारीक लेखणी खूप सुंदर आहे त्या प्रत्येक शब्द ला लावला तो सूर खूप च सुंदर

  • @DilseKokankar
    @DilseKokankar Год назад +17

    प्रत्येक चाकरमान्यांच्या जीवनातील खरेखुरे अनुभव अगदी समर्पक शब्दात मांडले आहे, प्रत्येकजण हे जगला आहे आणि अजूनही जगत आहे.. अंगावर शहारा आला... जबरदस्त सर ❤❤❤

  • @sunilgoriwale1977
    @sunilgoriwale1977 4 месяца назад +1

    गाण्याची रचना खूप चांगली आहे, आपल्या कोकणातील छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं बारकाईन निरीक्षण, खास करून आपले राहणीमान यावर आधारित शब्द रचना.

  • @DnyandeepBhoinkar
    @DnyandeepBhoinkar Год назад +9

    आत्मा आणि ईश्वर या दोन्हींचे मुर्तीमंत सगुण रूप म्हणजे आई!!! त्या मुळे गणपती सणा निमित्त काय काय आणू हे ईश्वर रुप आईलाच विचारण ही संकल्पना मनात येणं हे आपल्या आईवर आई ईश्वरावर असलेले निस्सीम प्रेम दर्शवते!!!❤❤❤
    खुप सुंदर गीत,संगीत आणि संगीत संयोजन त्याच ताकदीच गायन !!! खुप सुंदर लांबोरे बंधु!!!🎤🎵🎹🎼🎶🖋️🌹🌹🌹

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад +1

      व्वा सर!
      नेहमीप्रमाणे वेगळा दृष्टिकोन

  • @SatishMandavkar-w3x
    @SatishMandavkar-w3x 3 месяца назад +2

    Vikas lambore khup fan aahe tumcha aani ya song madhe tumhi sagl hakigat real story mandli aahe aaplya koknachi❤

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 8 месяцев назад +7

    माऊली खूपच छान गीत अप्रतिम आहे 🙏🌹

  • @VijayModak-y8j
    @VijayModak-y8j 4 месяца назад +1

    लांबोरे बुवा अप्रतिम ऐकावे गाणे तेवढे थोडेच जाकडी साठी नवीन पिढीला काहीतरी मिळावं रोजगार मेळावा आणि त्यांच्या उत्पन्नात भर पडावी जाकडी व्यावसायिक यासाठी प्रयत्न करावेत बुवा एक नंबर आवाज आणि शब्दरचना

  • @santoshmasane7408
    @santoshmasane7408 Год назад +6

    अप्रतिम काव्य रचना माऊली. अगदी मन मोहून टाकणार गीत ऐक देवाने देणगीची दिली आहे तुम्हाला. असा शाहीर आणि कवी होन शक्य नाही. ऐक लांजा तालुक्याची शान आणि अभिमान फक्त आणि फक्त माऊली तुम्हीच आहात. ❤

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад

      नमस्कार गाववाले

  • @dattaramshivgan1190
    @dattaramshivgan1190 5 месяцев назад +2

    खूप खूप छान रचणा केली आहे गण्याची लय भारी 2024 मध्ये गणपती मध्ये प्रत्येक घरी ऐकायला
    मिळणार मस्त 🎉

  • @bhaskaragre1400
    @bhaskaragre1400 Год назад +15

    प्रत्येक कोकणी माणूसाच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारा हा गण आहे.सलाम तुम्हाला 🌹👌😘

  • @anantbandre1180
    @anantbandre1180 Год назад +1

    खुप छान बोल आहेत आणि कोकणातल्या मानसांच्या चालीरीती आहे त आणि प्रत्येक घरात मध्ये हे बोल पुर्वीपासुन चालत आलेलेआहेत खुप छान मन भरून आले भुवा नमस्कार.खूप छान गाण्याचे बोल आहेत

  • @aakashgawade1023
    @aakashgawade1023 5 месяцев назад +4

    अप्रतिम दादा ❤

  • @sushantvishwasrao1389
    @sushantvishwasrao1389 5 месяцев назад +1

    हे गाणं ऐकताना अंगावर शहारे नाहीं आले तर तो कोकणी कसला खुप सुंदर गीत आणि गीत रचना 👌🏻👌🏻🙏🏻🌹

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 8 месяцев назад +3

    माऊली या संगीताची रचना खूप सुंदर लेख माहीत छान अप्रतिम केली आहे तूमचा गायकीला सलाम

  • @jiteshrewale6140
    @jiteshrewale6140 2 месяца назад +1

    खरंच मस्त गाणं आहे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभ केलंत ❤️😊

  • @sureshlase
    @sureshlase Год назад +35

    दादा जबरदस्त लेखणी.दादा तुम्हाला ही देवाची देणगी आहे. काय एक एक विषय असतात तुमचे गाण्याचे व्हा व्हा क्या बात है दादा.

  • @akshaybenkar4059
    @akshaybenkar4059 Год назад +1

    खुप सुंदर लेखनी आहे दादा ,कोकण ची शान आहात आपण...
    ,

  • @rahulgawade4385
    @rahulgawade4385 Год назад +23

    2024 मध्ये श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त वेळा हे गाणं ऐकलं जाणार आहे...
    कारण या गाण्यामधे कोकणातील प्रत्येक चाकरमान्याचे जीवन जसच्या तस मांडलेल आहे...

  • @AnvayiKushte
    @AnvayiKushte 10 месяцев назад +2

    खुप सुंदर. मनाला भावणारं गीत ❤

  • @harishelake1418
    @harishelake1418 Год назад +5

    कामावर सुट्टीच आये आजुन तरी नाही खरं... ही लाईन आंगावर शहारा आणते ..All time Great गण

  • @vinodrenuse422
    @vinodrenuse422 5 месяцев назад +2

    खूप छान बुवा तुम्हा मानाचा मुजरा🎉

  • @devendraorpe842
    @devendraorpe842 2 месяца назад +3

    खुप छान गाणं विकास दादा ❤❤

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial Год назад +1

    कोकणी बोलीभाषेत गाणी व्हायलाच पाहीजे खुप खुप अभिमान बोलीभाषेचा आणि शाहीर खुप जवळचे जिव्हाळाचे आशय मातीतले विषय लेखणीतून मांडून चला तर आपलीच ओळख घडवू लाजवाब रचना

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад

      धन्यवाद कविराज

  • @ulhasnevarakar6105
    @ulhasnevarakar6105 Год назад +3

    खुप छान गीत मी हे गाण एका दिवसात 10 वेला ऐकल खुप छान

  • @ganeshmahadik2138
    @ganeshmahadik2138 6 месяцев назад +2

    आपल्या ग्रामीण भाषेतील सादर केलेले हे गीत एकदम डोळ्यात पाणी आणत... बुवा तुमच्या या रचनेला हजार सलाम ❤❤

  • @rupalichaughule4907
    @rupalichaughule4907 9 месяцев назад +3

    खूप छान आहे

  • @vikasmahadevchavan4888
    @vikasmahadevchavan4888 3 месяца назад +2

    एक नंबर गण किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.

  • @maheshbirwadkar5936
    @maheshbirwadkar5936 Год назад +3

    जेव्हा पासून मी मुंबई मध्ये आलो ते 2022 पर्यंत प्रत्येक वर्षी गणपतीला गावी गेलो आहे पण ह्या वर्षी सुट्टी भेटली नाही त्यामुळे ह्या वर्षी गावी जाता येणार नाही परंतु तुमचे हे गाणे मी 20 ते 25 वेळा ऐकले आणि आता काही करून दोन दिवसासाठी गावी जाणार आहे.❤❤

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад +1

      Kya baaat hai

    • @maheshbirwadkar5936
      @maheshbirwadkar5936 Год назад

      गीतरचना आणि आवाज एक नंबर आहे. गावाकडच्या आठवणीनी मन व्याकुळ झाले सर आपणास शाहीरी मानाचा मुजरा 🙏🙏❤🌹

  • @sutarvicky
    @sutarvicky Год назад +6

    प्रत्येकाच्या मनातल्या भावना.... गावी असणाऱ्या माऊलीशी घडलेला संवाद... मनाला खुलवून गेला.... आपल्या लेखणीला वंदना... गणपती बाप्पा मोरया 🪷

  • @vikasguravdogloves7454
    @vikasguravdogloves7454 4 месяца назад +2

    अप्रतिम शब्द रचना लंबोरे बुवा... खुप वेळा गाणं ऐकलं डोळे भरून आले

  • @Tr.Sambhaji.S.S.Dhumak
    @Tr.Sambhaji.S.S.Dhumak Год назад +17

    एक नंबर लांबोरे सर ❤ गीतरचना सर्वोत्तम...आवाज तर एकदम हृदयाला स्पर्श करून गेला... गावाकडच्या आठवणींनी मन व्याकूळ झाले 😢आपण एक अष्टपैलू कलाकार आहात... आपणांस शाहिरी मानाचा मुजरा ❤🙏

  • @mahendrabhogale8890
    @mahendrabhogale8890 Год назад +2

    बुवा.. पेटवल मनाला,,🔥🔥🔥🔥🔥

  • @nitinveer883
    @nitinveer883 5 месяцев назад +3

    खूपच अप्रतिम शब्द रचना केली आहे 👌👌👌

  • @nileshlanjekar7372
    @nileshlanjekar7372 Год назад +1

    1 no लांबोरे बुवा

  • @narendralodikhan2018
    @narendralodikhan2018 3 месяца назад +3

    💐🌹💐कौतुक आहे शाहीर आपले,
    कवन सुंदर मनापासून सलाम ❤️ 🚩 🚩

  • @rutujatambe1995
    @rutujatambe1995 5 месяцев назад +1

    मला हे गान खूप आवडत, मला लग्नाअगोदचे दिवस आठवतात, मी आईला विच्यारायची मी काय घेऊन येऊ आई गणपती साठी ते दिवस आठवतात.thak you dada heart touching song ❤🙏🙏

  • @Plvi.......1228
    @Plvi.......1228 Год назад +17

    Finally Thanq sir. such a Heart touching song ..जेव्हा हा गण live एकला तेव्हा आम्हा सर्वांचे डोळे पाणावलेले...Best of luck ..👍

  • @ajayjaurat3710
    @ajayjaurat3710 3 месяца назад +2

    कोकणी माणसाच्या मनातलं गाणं ❤❤

  • @JayKadam-vk9ug
    @JayKadam-vk9ug 4 месяца назад +4

    मनाला चटके लावणारे सुंदर गाणं

  • @sanjaymanjrekar445
    @sanjaymanjrekar445 5 месяцев назад +1

    Khup sundar vakya rachana aahe ...ha tumhi lihlela gan ek sarkha aikva asa vat to...❤

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 Год назад +3

    विकास लांबोरे यांनी हे गीत अतिशय सुंदर गायले आहे. हे गाणे गणपतीत नक्की धुमाकूळ घालनार आहे. मला खूप आवडले आहे.

  • @VaidehiChavan-h6z
    @VaidehiChavan-h6z 2 месяца назад +2

    Khup chan dada hya ganyane mazi sakal ujadate mala khup aavadate gan tumhala maza Salam ❤❤

  • @pradeepshitap8074
    @pradeepshitap8074 Год назад +3

    खुपच छान 1नंबर गाण झाले आहे 👍🏻👍🏻💐💐

  • @akshayradye7917
    @akshayradye7917 Год назад +1

    शाहीर अतिशय सुरेख शब्दात गाणं लिहिलंय आणि त्याच सादरीकरण सुद्धा खूप सुंदर.

  • @eknathjankar2832
    @eknathjankar2832 Год назад +7

    शब्दरचना, संगीत, आवाज, कोरस सगळ्या गोष्टी छान जुळून आल्यात. त्यामुळे गीत अतिशय श्रवणीय झाले आहे. आपल्या कष्टांना,कल्पकतेला आणि कलाप्रेमाला सलाम.. यावर्षी हे गाणं घराघरात वाजणार. एवढं सुंदर आहे. आपल्याला शुभेच्छा!

  • @niteshadbal7511
    @niteshadbal7511 Год назад +1

    आये हा शब्द ऐकला की मन भरून येत ....काही ही झालं की तोंडातून आय हा शब्द बाहेर येतोच ...तुझी खूप आठवण येते ग आये ..तुला आये बोलण्यात च खूप ताकद आहे 🙏🙏

  • @sahilvarishe4650
    @sahilvarishe4650 Год назад +6

    सुंदर लेखणी दादा... कोकणीमाणसाच्या हृदयाला भिडणारी काव्यरचना आहे❤️

  • @gajdassutar4344
    @gajdassutar4344 Год назад +2

    दादा मला तुमची गाणी खुप आवडली आहे गाणी लयभारी आहेत 😅😅

  • @sachinvele9218
    @sachinvele9218 Год назад +4

    ग आये या एका शब्दामधेच सर्व काही आले अप्रतिम रचना मनाला भिडणारे गाणे ❤

  • @arungosavi8122
    @arungosavi8122 5 месяцев назад +1

    ज्याने गाणं, आणि संवाद लिहिले त्यांना माझा नमस्कार,खर वास्तव दाखवले,डोळे पाणवले

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 Год назад +3

    अप्रतिम गाण आहे सर
    तुमच्या शब्दरचणेला सलाम
    एका सामान्य माणसाच्या परिस्तिथीच वर्णन आणी कोकणी माणसाची गणपती सणाची ओढ खूप मस्त वर्णन केलीत👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @dipak_bhikane
    @dipak_bhikane Год назад +4

    गाण्याचे धृवपद ऐकून या गाण्याच्या प्रेमात पडलो होतो, आज पूर्ण गाणं ऐकून मन तृप्त झाल. हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत... धन्यवाद शाहीर

  • @VinayakGurav-dx7ft
    @VinayakGurav-dx7ft 2 месяца назад +1

    नमस्कार बुवा हे गण जे गायलत ते छानच आहे पन तुम्ही काव्य रचना जी लिहीली तीला तोडच नाही बुवा असेच काव्य रचना असु द्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @santoshberde2600
    @santoshberde2600 7 месяцев назад +3

    ❤😍खूप छान आवाज आहे ...सुंदर ❤❤

  • @vasantmahadik7717
    @vasantmahadik7717 6 месяцев назад +1

    खूप छान गीत सर 👌🏻👌🏻

  • @pravingarate9264
    @pravingarate9264 Год назад +3

    विकास दादा खूप सुंदर...अगदी सत्य परिस्थिती मांडली आहे गाण्यात....आमचं नशीब खूप चांगलं आहे जे शिवाजी मंदिर दादर येथे original गाणं ऐकायला मिळालं.....आणि पाहायला मिळालं....❤️❤️❤️❤️👌👌👌👌
    ११ तारखेला तुमच्याकडून अजून एक नवीन विषय ऐकायला मिळेल यात शंका नाही......❤

  • @nitinbhadvalkar1069
    @nitinbhadvalkar1069 Год назад +1

    छान गाण झालं आहे दादा ,अशीच गाणी अजून हि पुढे एकायची आहेत आम्हाला.

  • @pranaligarate1262
    @pranaligarate1262 Год назад +3

    Khup Sundar aavaj ....ani chhan gane aahe.....👌👌👌
    3 show pahile tumche......
    "The best shahir of the year"❤
    Mast ...👌👌👌

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 3 месяца назад +1

    He gan kiti Vela aikal tri man bharat nhi me mordyat aikal hot he gan jeva Sachin kadam ani hyanchi bari hoti Teva Teva PAsun mala he gan khup aavdat😍😍jeva mazha mood kharab asto me me hech gan aikte ani lagech mood changla hoto 😍😍

  • @pradeep595
    @pradeep595 Год назад +4

    खरंच वडदहसोळ प्रीमियर लीग च्या मार्फत ठेवण्यात आलेल्या या शक्ती तुरा मधील शाहीर विकास लांबोरे बुवा चे एक अप्रतिम गाणे, हे गाणे live पहाताना डोळे भरून आले

  • @vijaydandane1700
    @vijaydandane1700 6 месяцев назад +1

    Mast song dada man bharun aale aaikun

  • @akshaychavan9825
    @akshaychavan9825 Год назад +12

    बुवा तुमच्या या लेखणीला सलाम आणि लांबोरे बुवा तुमचा आवाज तर खूपच गोड आहे. बुवा या गायातून सर्व आठवणी जाग्या झाल्या खरोखरच लेखणी खूपच सुंदर आहे. अशीच नवीन नवीन गाणी येत राहूदेत. आणि बुवा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्या ♥️🥰🙏🙏🙏🙏

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад

      It's my pleasure
      Thank-you Akshay 😊💐

    • @rameshambekar2530
      @rameshambekar2530 Год назад

      अप्रतिम काव्य रचना आणि सुस्वर स्वर पुढे ही अशी भावुक गीत घेऊन रसिकानच मनोरंजन करा हिच संधीच्या 🙏🏼🙏🏼

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 Год назад +2

    माऊली खूप च छान अप्रतिम सुंदर लेख गीत 🙏

  • @nitintanavade5952
    @nitintanavade5952 4 месяца назад +6

    2023/24 वर्षातील सर्वांचे लाडके तुरेवाले शाहीर विकास लांबोरे बुवा खूप छान रचना

  • @sunilchaugule27
    @sunilchaugule27 Год назад +1

    खूप चांगला गण शाहीर साहेबांनी गायलेला आहे या गणातून सार्वजनिक प्रबोधन करण्याचे काम केलेले आहे तरी पण शाहीरणा मानाचा मुजरा

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 Год назад +3

    विकास लांबोंरे माऊली यांचा आवाज म्हणजे
    कोकणचा जसा गोड मेवा ❤❤❤❤

  • @dipeshgorle6847
    @dipeshgorle6847 Год назад +2

    मनाला भिडणारे शब्द, छान बुवा अप्रतिम

  • @GaneshTawade-p3o
    @GaneshTawade-p3o Год назад +3

    गायकीला तोड नाही शाहीर विकास ,कोकण संस्कृती जपणार शाहीर ग्रेट ❤❤

  • @sukantdalvi1477
    @sukantdalvi1477 Год назад +1

    गणपतीला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची व्यथा आहे ही ही खूप छान दोल्यातन पाणी आले गाणे एकले तर

  • @sandeshbhuvadofficial
    @sandeshbhuvadofficial Год назад +6

    नित्य भावनेचं प्रेमळ गीत खूप जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातो...❤अप्रतिम शाहीर लांबोरे बुवा...❤❤

  • @ShrutikPandav
    @ShrutikPandav 5 месяцев назад

    Editing khup chan aahe Bhai aani geet pn khup chan aahe ❤❤🎉🎉

  • @rajumandavkar4180
    @rajumandavkar4180 Год назад +6

    विकी काय काय लिहू आता ते समजत नाही आहे..
    कसं आहे बघ ना... खासकरून आपल्या कोकणात,, गणपती म्हटलं की आम्हा कोकणवासियांना दुसरं काहीच दिसत नाही.. मग तो गरीब असो वा श्रीमंत,, इथे गणपतीचे आठ-दहा दिवस प्रत्येक घराचं मंदीर झालेलं असतं.. कारण समस्त कोकणकरांचा त्राता, पालणकर्ता आहे. तारणारा मारणारा हाच लंबोदर आहे.. आता सध्याचा काळ-परिस्थिती थोडी बदललेय.. पण मागच्या पंधरा विस वर्षापुर्विचे दिवस आठवले तर हे गाणं ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून नक्की पाणी येईल.. एक चाकरमाणी उभ्या कुटुंबाची जबाबदारीचं ओझं घेवून शहराच्या ठिकाणी चाकरीला यायचा.. खर्चाचा पुरा बोजा त्याच्याच डोक्यावर..
    न्याहरी, दोन वेळचं पोटभर जेवण आणि मोजकीच मोलमजूरी करुन मिळवलेली खर्ची.. हीच काय ती आम्हा कोकण्यांची जमेची बाजू.. बाकी सनसूद, हौसमौज कपडालत्ता हे सगळं त्या चाकरमाण्याचीच जबाबदारी.. पण गणपती म्हटलं की हा बिचारा चाकरमाणी माझ्या बाप्पाला काही कमी पडू नये म्हणुन खिशात दमडी असो नसो.. या वर्षी नाही जमलं तर नव्या जोमानं पुढच्या वर्षी.. पै पै जमा करुन इकडून तिकडून काडओढ करुन आपल्या आई बापला एखादी अंतरदेशी पाठवुन विचारत असे... आये गनपतीला यताना काय काय आनू?? तुला काय आणु , बाबांना काय आणु.. आणि कोणाला काय आणु.. काय होती ती आपल्या बाप्पाची ओढ आणि काय होती ती आपल्या परीवाराची जबाबदारी आणि आपल्यांची माया-आपूलकी..
    आज या सगळ्या गोष्टी एकदम सहजासहजी मिळू लागल्या आहेत.. पण एक काळ नक्कीच होता या शब्दांचं, वस्तुंचं खूप मोल होतं..
    आज तु जुण्या आठवणी जाग्या केल्यास .. या पिढीला देखिल या सर्व शब्दांचं महत्व काय होतं ते कळेल..
    अप्रतिम...
    तुला माझ्याकडून पुन्हा एकदा मनपुर्वक शुभेच्छा..!!

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад

      Thank you 😊😊💐

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад

      Raja
      आपण आपला ठरलेला प्रोजेक्ट नक्की करू

    • @rajumandavkar4180
      @rajumandavkar4180 Год назад

      @@VikasLambore नक्कीच..

  • @SwapnilJadhav-x5o
    @SwapnilJadhav-x5o 2 месяца назад +1

    खूप सुंदर गीत.. खूप वेळा ऐकलं डोळ्यातून पाणी आलं 👌👍🙏🙏

  • @shashikantchavan7550
    @shashikantchavan7550 Год назад +3

    अतिशय सुंदर अब्यास पूर्ण गन मनाला भावला तुम्हाला शायिर मानाचा मुजरा लांजा तालुक्यातील विवलि गावचे आमचे तूरेवाले आम्हाला सार्त अभिमान आहे आई नवलाई देवी तुमच्या पाठीशी आशिर्वाद असाच राहो ❤

    • @VikasLambore
      @VikasLambore  Год назад +1

      गाववाले आभार😊💐

  • @maheshpatil4860
    @maheshpatil4860 5 месяцев назад

    प्रत्येक कोकणी माणसाच्या काळजाला भिडणारी शब्द रचना शाहीर , आवाजाला तोड नाही

  • @avinashkulye3413
    @avinashkulye3413 4 месяца назад +3

    Dada khup chan shabdh rachana ahe ❤❤