सांज दर्या - DNYANESHWARI VELANKAR | Relaxing sea waves |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • समुद्राकडे टक लावून बघताना, लाटांचा आवाज स्वाभाविकपणे कानी पडतो. पण लाटांचं गाणं आपल्याला ऐकू येतं का? Subscribe to Flow!
    Credits:
    Written and Recited by
    DNYANESHWARI VELANKAR: / the_curly_chaivinist
    Visuals: Neel Salekar
    एक काम कर,
    समुद्राकडे एकदा एक टक लावून बघ
    निक्षून कानोसा घे
    काही ओळखीच्या लाटा आजही किनाऱ्यावर
    तेवढ्याच त्वेषाने आदळत असतील
    समुद्राच्या आत आत कुठेतरी
    त्यांचं ठरत असेल
    आणि मग आपली सगळी शक्ती पणाला लावून
    त्या धाव घेत असतील किनाऱ्याकडे
    वाटेत काही इतर सौम्य लाटांचा
    अडथळा होत असेल त्यांना
    वाऱ्याशी थोडी बाचाबाची होत असेल
    आपली फेसाळ तोंडं घेऊन त्या करत असतील
    हा लांबच लांब प्रवास
    कधी अनेक वर्षांचा
    कधी अगदी काल परवाचा
    खूप जोश
    खूप ताकद
    खूप निग्रह
    स्वच्छ दिसेल
    त्यांच्या पारदर्शक असण्यातूनही
    त्यांच्या येण्याचा एक विशिष्ट आवाज असेल
    तू त्याला 'गाज' म्हण
    जीवाचा कान करून ऐक हा नाद
    आता त्यांच्या गाण्यातला वेदनेचा खर्ज
    त्यांच्या प्रवाहामागून तुला जाणवेल
    तू अजूनही समुद्राकडे तसाच
    एकटक पाहत रहा
    जसजसा तो खर्ज तुला
    अधिक सुस्पष्ट ऐकू येईल
    तसतसा तुझा समुद्र
    आणखीन स्थिर होत जाईल
    आणि त्याच्या पोटातली काही वादळं तरी
    आता शांत झोपी जातील
    Follow us at :
    / meet_the_flow
    Like our page at :
    / meettheflow
    Neel: / just_neel_things
    Aabha : / aabha_soumitra

Комментарии • 23