INTERVIEW : Ajay Purkar | खिंडीत शूट करताना झालेले भास | Pawankhind
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- अजय पुरकर पावनखिंड या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका साकारणार आहेत. या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, शूटदरम्यान खिंडीत झालेले भास याविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Watch this video to know more.
Senior Correspondent- Darshana Tamboli,
Camera- Faizan Ansari,
Video Editor- Ganesh Thale.
#AjayPurkar #Pawankhind
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
अप्रतिम चित्रपट.. पाहताना डोळ्यातून पाणी आल.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व मावळ्यांना शतशः नमन आणि मानाचा मुजरा 💐💐💐
जय शिवराय 🙏
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
अतिशय सुंदर आहे. पाहताना डोळ्यात पाणी आले.. जय शिवराय जय शंभुराजे
मी पण रडलो..पुन्हा चित्रपट बघण्याची हिम्मत नाही...
ruclips.net/video/4HL7SOXFGtg/видео.html
कालच बघितला ..."पावनखिंड" ...अगदी भारावून गेलो ...शहारे आले ...डोळे भरून आले...
अप्रतिम कलाकृती... निशब्द झालो ...मराठीतल्या इतक्या सुंदर कलाकृतीचा अभिमान वाटला... अजय पुरकर यांनी तंतोतंत बाजीप्रभू देशपांडे साकारले आहेत.... संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
ruclips.net/video/uxvMb2kP8XI/видео.html धनंजय भाई देसाई हिंदू राष्ट्र सेना 🚩 का प्रसार माध्यम बनले देश विरोधी🚩 ॐ हर हर महादेव
Konalde telegram link aahe ka ya movie chi plzz sanga
इतर भाषांत डब करावा,पूर्ण देशाला आणि बाहेर ही हा इतिहास माहीत झाला पाहिजे.सादर वंदन सगळ्या टीमला
Paise nastat bhai apla marathi producers kade ani jyancha kade ahe te fakt movie banaun vikun taktat ritesh bagha kiti divas zale antoi movie ajun nhi kahi
@@swapyworld09 सहमत!
बरोबर 🤗🙏🙏🙏
🙏❤️
खूप छान अभिमान वाटतय अपल आम्हला . पण संपूर्ण देशात अनेक भाषेमध्ये आल पहिजे सर तरच पुडच्या पिढीला आकर्षित असणार चित्रपटा मध्ये
नमस्कार सर..
मी माझ्या कुटुंबासह काल पावनखिंड हा शौर्यपट बघीतला आणि आज आपली ही मुलाखत बघत असतांना आपणास बघुन माझी 4 वर्षाची मुलगी तीने आपणांस ओळखले आणि म्हटली हेच ते बाजी बाबा आहेत न जे काल movie मधे तलवार घेऊन लढत होते... सर आपण सर्वानी आपल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे पावनखिंडीचा ज्वलंत इतिहास अबालवृद्धांपर्यत पोचवला आपणा सर्वांचे खुप खुप आभार.. जय भवानी जय शिवाजी
Pawankhind is not just a movie , it's an emotion❤ literally cried while watching 🥺
अजय सर तुम्ही खूपच भाग्यवान आहात की तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे यांचा रोल मिळाला👍 महाराजांच्या काळातील मावळे म्हणून काम करायला खूप पुण्य करावं लागतं ते तुम्ही निश्चितच केल आहे 🙏 आणि तुमची पर्सनॅलिटी 🔥 तुमचा लूक ❤️ तुमचा आवाज खरच तुम्ही खरेखुरे बाजीप्रभूंचा अवतार वाटता🙏 आणि तुम्हाला जो भास झाला आहे तो भास नसून त्या, पावन खिंडीत ते सर्व शूरवीर तुमच्या सोबत असणार खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात . सॅल्यूट तुमच्या कार्याला 🔥
बाजूला व्हा..... डायलॉग आवडला.अंगावर शहारे आले.
बाजी प्रभूंची भुमिका दमदार वठवली गेली आहे. मनापासून धन्यवाद आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा.नक्की थिएटर लाच बघणार.
कमाल ❤️❤️❤️😇
जय शिवराय 🚩 #mrnams
@@MrNams जय शिवराय 🚩🚩
✌️
@@jaymaharashtra1981 जय शिवराय 🚩 #mrnams
राजस्थानमधील आमेर किल्ल्यावर संध्याकाळी Light and Sound Show असतो...अमिताभचा भारदस्त आवाज....सोबत उत्कृष्ट Narrative...त्या भागातील इतिहास जिवंतपणे मांडलेला आहे, असं वाटतं....
शो सुरु असतानाच मनात विचार येत होता....आपल्या महाराष्ट्राकडे तर अजरामर गाथांची कधी न संपणारी माळ आहे....हा ईतिहास जर स्क्रीनवर प्रभावीपणे मांडला तर....वाह् ....लहान पिढीवर किती मोठा प्रभाव पडेल....
आम्ही जाणता राजा पाहुन मोठे झालेलो....ह्या नवीन पिढीला ते अनुभवता येत नाहीये....
ओम राऊतांनी "तान्हाजी" आणला....थोडीशी बाॅलीवुडच्या मसाल्याची अतिरंजक फोडणी वगळता, सुंदर सिनेमा होता.....
पण, मराठीत तसे सिनेमे येतच नव्हते....बजेट नाहीये - प्रेक्षक नाहीये, ह्या Catch 22 Situation मुळे तर अतोनात नुकसान झालं सर्वांचच....
आता एक माणुस मात्र पेटुन उठल्यासारखे काम करतोय....
दिगपाल लांजेकर नाव त्यांचं...
त्यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त ने सुरुवात केली...
आणि, पावनखिंड घेऊन आलेयेत आता....
मागील एक आठवडा तिकीट मिळत नव्हते कुठेही....लोकांची पसंती मिळालीच आहे ह्या सिनेमाला....
आज योग आला पाहण्याचा....
खरं म्हणजे, समीक्षण किंवा टिप्पणी करण्याची आपली लायकी नाहीये....हा सिनेमा त्याच्या पुढे आहे....
स्वामिनिष्ठा - हा सर्वांत मोठा गुण होता मावळ्यांचा...जाती धर्म विसरले सगळे...स्वराज्य हेच एक ध्येय....ते मिळवणंच अंतिम ध्येय नव्हे, तर सुराज्य टिकवणे हे पुढचे काम....
तेव्हा सगळे एकत्र होते....आज का जातीवरून माती खातायेत....कुणी पेरलं हे विष सर्वांत....असो....
उत्तरार्धानंतर कमीत कमी चारेक वेळेस डोळ्यांच्या कडा पाणावल्या....एकेक सिन उत्तम जमलाय....कुठेही फाफटपसारा नाहीये....तंतोतंत जुळणारी Casting....
शेवटचा अर्धा तास तर.....काय लढले असतील बांदल आणि बाजी....काय वाटलं असेल जीव झोकुन देताना....
धन्यवाद दिगपाल लांजेकर....तुम्ही खुप मोठं काम करताय....कित्येक तरुणांना नव्याने इतिहासाची ओळख करुन देताय....मराठ्यांच्या अद्वितीय पराक्रमाची गाथा, जी मोठ्या पडद्यावर उपेक्षितच होती, तिला तुम्ही यथार्थ न्याय देताय....
अपेक्षा म्हणा हवं तर....एक अशीच माळ "पानिपत" वर पण बनवावीत....
आमची आणि येणारी पुढची प्रत्येक पिढी तुमची सदैव ऋणी राहील....
हर हर महादेव.....
दिग्पाल लांजेकर हा ध्येयवेडा, झपाटलेला तरुण आहे. जणू भालजी च पुन्हा आलेत असे वाटते! सर्वांचेच अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य निर्माण झाले, त्यांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, जिवा महाल, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, फिरंगोजी नरसाळा, धनाजी व संताजी घोरपडे यांनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांना आदरांजली🙏
पावनखिंड .... Superb movie yar डोळ्यातून पाणी आले ...जय शिवराय ❤️
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
आपली माहितीपूर्ण मूलाखत खूप दर्जेदार वाटली ..भावली ..ती ऐकून हा चित्रपट पहावा अशी बरोच जणांना इच्छा होणार,यात वादच नाही ..खरच छत्रपती शिवरायांचा इतिहास ...त्यातील बरेचसे म्हणण्यापेक्षा जवळजवळ सगळेच मावळे खंदे शूर न त्याचबरोबर दृढ निष्ठावान होतेच ...हा सगळा हेतूपूरस्सर दडपलेला इतिहास खरच असे चित्रपट निर्माण करून पुढील पिढीच्या समोर,आणण्याचे कौतूकास्पद काम आपली टिम करतेय ...खूपच छान ...देव आपल्या कार्याला भरभरून शक्ती देवो न आपल कार्य निर्विघ्नपणे पार पडो ही त्याच्याच चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम.. अविस्मरणीय.. अतुलनीय.. अद्भुत..
कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतील असा चित्रपट.. पावनखिंड हे फक्त नाव नाही,तर आहे मराठी मनाचा मानबिंदू, पराकोटीच्या बलिदानाचा साक्षीदार..स्वामीनिष्ठेचा तेजस्वी अध्याय...
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, सर्व कलाकार आणि टिमचं कौतुक करावं तेवढं थोडं... उत्कृष्ट संवादलेखन, ग्राफिक्स, चित्रपटातील गीते,कलाकारांची निवड, वेशभूषा इ. आणि सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला साजेसे काम केले आहे... सर्वगुणसंपन्न असा चित्रपट कि जो सहकुटुंब सहपरिवार पाहावा आणि पराक्रमाची गौरवगाथा याची देही याची डोळा अनुभवावी..
चित्रपटातील साहसी दृश्ये पाहताना तुमच्या अंगावर काटा उभा राहतो आणि काही दृश्ये पाहताना नकळत डोळ्यांत पाणी येतं ... महाराजांच्या जागी शत्रूच्या गोटात जाणारे वीर शिवा काशिद निधड्या छातीने मृत्यूला कवटाळतात...
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांनी घोडखिंडीत गाजवलेला पराक्रम डोळ्यासमोर उभा राहतो..
स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजेच बहिर्जी नाईक गुप्तहेर म्हणुन त्यांचं काम चोख पार पाडताना दिसतात...
रक्ताचा चिखल होईपर्यंत आणि शरिरावर होणारे अगणित वारांची पर्वा न करता सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतात.. महाराजांच्या इशारतीकडे कान लावून साक्षात यमालाही वाट पाहायला लावणारा सेना धुरंदर जणू गणिमाच्या मस्तकावर रणतांडव घालताना दिसतो...
महाराजांच्या केसालाही धक्का लागला तरी आख्खा सह्याद्री उलथापालथ करीन हा बाजी अशी सिंहगर्जना करणाऱ्या आणि बांदल सेनेच्या शौर्याने घोडखिंड पावन करणाऱ्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🚩🙏🏻
✍️श्री.गणेश आनंदराव दौंडकर.(सह्याद्रीचा दुर्गसेवक)
👌
🚩जय भवानी ...जय शिवराय...🚩
Khup chan bolalat👌
Amchya manatale shabd mandlet tyabaddal dhanyavad🙏🙏
I literally cried when the scene was going the discussion between shiva kashid and shivaji mahraj the way shiva kashid describe his feelings for maharaj amazing hats off awesome movie 👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
Perfectly Said
खरंय मला सुद्धा रडू थांबवता आले नाही....
शुभेच्छा ! मराठी वीरांचा इतिहास जनतेच्या समोर आणत आहात. अभिमान आहे मराठी असल्याचा
ruclips.net/channel/UCykstD-tbH2tXbLKNLVJ9zQ
खरच हा चित्रपट बघते वेळेस डोळ्यांत अश्रू आले अंगावर काटा आला...
🙏 धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज 🚩
🙏 धन्य ते बाजीप्रभू🚩
🙏 धन्य ते मावळे🚩
" पावनखिंड बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली . जेथे बाजी - प्रभूंनी देह ठेवला . जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले . " " " इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो . " पावनखिंडितला हा अविस्मरणीय असा एक अनुभव ... आयु ष्यावर कायमचा कोरला गेलेला ...
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
पन्हाला किले का दर्शन जरूर करना जीवन मे 1बार तो !👍👍!
खरय
Yes
खूपच अप्रतिम शौर्य गाथा आहे वीर शिव मराठ्यांची ...माझ्या पेक्षा माझी ७वर्षाची मुलगी उत्सुक होती आणि चित्रपट पाहून अगदी भारावून गेलौत आणि खरच चित्रपट सिनेमा ग्रुहात जाऊनच पहा जय शिवराय 🇨
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
खुप छान असा सिनेमा तयार करण्यात आला असून आज पर्यंत असा सिनेमा तयार झाला नाहीं पाहता पाहता मन भरून येते
@@Gardening_with_sandip विमल पान मसाला की कहानी.
Vimal pan masala kahani
ruclips.net/video/xXGGv42Tds4/видео.html
Chitrapat khup chan aahe talkies la javun bagava aasa
Inside Ajay purkar's house
ruclips.net/video/aE8n37BIGgs/видео.html
तुम्ही सर्वांनी मिळून तो काळ उभा केला आमच्यासमोर, कधी भेट झाली तर प्रत्येकाला मानाचा मुजरा करेल!!
जय भवानी जय शिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान चित्रपट आहे पाहुन डोळ्यात पाणी आले..खरच बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांधल,फुलाजी प्रभु आणी पावनखिंडीत विर मरण पावलेल्या 600 मावळ्यांना माझा मानाचा मुजरा.. आणी हो चित्रपट पाहुन अस वाटतय की आज ही बाजीप्रभू खिंडीत नक्कीच वावरत आसतील आजरामर आहेत बाजीप्रभू.
*खुप उत्सुकता आहे... कधी एकदा उद्याचा १८ फेब्रुवारी उजाडतो आहे आणि चित्रपट पाहतो असे झाले आहे... आपला दैदिप्यमान इतिहास, आपले मराठी चित्रपट, आपले मराठी कलाकार सातासमुद्रापार सर्वांपर्यंत पोहोचायला हवेत... मराठी प्रेक्षकवर्ग नक्कीच हा ऐतिहासिक चित्रपट अशा कोरोनाच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात उचलून धरतील... या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद देतील यात शंका नाही... हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत व एकूणच चित्रपट क्षेत्रात नवीन इतिहास निर्माण करणारा आहे... "पावनखिंड " चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरणारं आहे...* 🚩🚩🚩
*#मराठी*
*#मराठी_चित्रपट*
*#मराठी_मनोरंजन*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
खरोखरच हा पिक्चर बघताना डोळ्यात पाण पावनखिंड बाजीप्रभू असा मावळा पुन्हा जन्माला येणार नाही खरोखरच बघताना खूप रडलो असे राजे आणि असे मावळे देवाने जन्माला घालावीत अशा आमच्या आमच्या राजांना मावळ्यांना मानाचा मुजरा
खुप छान, आपला मराठा इतिहास इतका अभिमानास्पद आहे, अजयजींचा अनुभव ऐकताना अंगावर काटा आला नकळत डोळ्यांत पाणी आले
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
Khupch chan
दादा🙏. पावनखिंड चे शब्दात वर्णन करण्याची आमची पात्रता नाही🙏........ प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे, टाळ्यांचा कडकडाट अन् आदराने झुकलेले मस्तक सगळं काही सांगून जातो🙏🙏....... तोफांचा आवाज ऐकल्यावरचे बाजीप्रभूंचं हास्य पाहील्यावर प्रेक्षकांच्या मनात अभिमान, आदर, कौतुक, आता शेवटचा क्षण जवळ आला याचे दुःख, नियतीने अशा रत्नाला मरण का द्यावं या विचाराने नियतीबद्दलचा संताप यांसारख्या असंख्य भावना........ डोळ्यात पाणी अन् चेहर्यावर हसू होतं ........ चित्रपट संपल्यावर हरहर महादेव! छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणा द्यायच्या असं ठरवून theater मधे गेलो होतो पण बाहेर येताना मात्र त्यासाठी गळा मोकळा नव्हता.......... आमच्या या प्रतिक्रियांच्याही पलिकडे जाऊन बरंच काही आहे जे आम्हाला सांगता येण्यासारखे नाही. ते योग्य शब्दात मांडता येण्याची आमची पात्रता नाही. त्यासाठी कुसुमाग्रजांसारखे कवीच योग्य आहेत आम्ही त्यालायक नाही.🙏
उद्या प्रदर्शित होणार चित्रपट...बघण्यासाठी आम्ही सर्व प्रेक्षक खूप उत्सुक आहोत...🚩🚩🙏 सर्व प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल ....🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌
'शर्थीने खिंड लढवली' हा पाठ इयत्ता चौथी च्या वर्गात मी जेव्हा जेव्हा शिकवला तेव्हा तेव्हा मी आणि माझे विद्यार्थी रडलो आहोत.(मी शिकवताना आणि विद्यार्थी शिकतांना) प्रत्येकवेळी .🙏🙏🙏
@@sumedhachaskar8008 ।।
। b
Inside Ajay purkar's house
ruclips.net/video/aE8n37BIGgs/видео.html
आजच बघितला 'पावनखिंड ' आणि चित्रपटगृहातच बघितला.👍👍👍
खुप छान चित्रपट 👌👌👌👌
सगळ्याच कलाकारांनी भुमिका छान वटवल्या आहेत. बाजीप्रभू देशपांडे तर अप्रतिमच 👌👌👌👌 अगदी खरयं बाजीप्रभू आणि शिवरायांचा शेवटची भेट सर्वांना रडवते.
सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आभार 🙏 एक छान कलाकृती आम्हा प्रेक्षकांना दिल्याबद्दल.
धन्य ते शिवराय आणि धन्य ते मावळे 🙏
शिवरायांचा प्रत्येक शिलेदारावर एक एक चित्रपट निघु शकेल इतक मोठ कार्य आहे त्यांच। छत्रपति ना आनी सर्व शिलेदाराना मानाचा मुजरा 🙏
खूप छान चित्रपट आहे ❤️ आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन पाहिला 👍 सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे हे संपूर्ण चित्रपट पहाताना लक्षात येते. जीवाची बाजी लावणारे ते बाजी प्रभू देशपांडे 🙏 पावनखिंड ❤️ जय भवानी 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
खूप छान सिनेमा आहें काल शिवजयंती चा निमिता ने पावनखिंड बघितला. खूप आवडला. सर्वांची कामे छान आहेत. सर्व कलाकारांनी खूप छान केली आहेत.
Mool
पूर्ण फिल्म पाहताना डोळ्यात पाणी , अंगावर शहारे आणि रक्त सळसळत होते..
आणि तुमचे शुटिंगचे अनुभव ऐकून ही अंगावर शहारे आले...🔥
जय जिजाऊ.... जय शिवराय... जय भवानी...🚩
Let's make this movie Superhit.. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदवी स्वराज्यातील महान वीर मराठी योद्ध्यांचा डंका संपूर्ण भारतात वाजला पाहिजे..
क्रुपया सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघावा..🚩🤩
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
Movie fakt maharashtra madhe release hot astana danka sampoorn bhartat kasa vajel?
आजच्या घडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम ह्यांचा डंका भारतातच नव्हे तर विदेशात वाजतोच आहे पण असे ऐतिहासिक चित्रपट अधिकाधिक बनायला हवेत.आताचे ते टीनपाट हिरो आणि बादलीभर मेकअप फासलेल्या अर्धनग्न नट्या बघून किळस येते.ना कथेचा पत्ता, ना कसदार अभिनय तरीही ह्या फालतू लोकांना डोक्यावर कां घेतलं जातं तेच कळत नाही.खरे हिरो तर हे इतिहास गाजवलेले शूर,वीर आहेत. हे प्रसंग एके काळी प्रत्यक्षात घडलेले आहेत.
Yes bro
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
मी स्वतः पावनखिंड या पवित्र ठिकाणी जाऊन आलोय....हा सिनेमा बघताना खरच अंगावर काटा आला....जय शिवराय
ही मूलाखत ऐकताना अनेक वेळा अश्रु अनावर झाले !!
धन्य ते छत्रपति आणि धन्य ते बाजी प्रभु !!
साष्टांग नमन !!
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
उत्कृष्ट संकलन, अप्रतिम दिग्दर्शन,दमदार अभिनयाने साकारला पावनखिंड
569
खरच खूप छान चित्रपट, डोळ्यात पाणी येतं.प्रत्येकाचा त्याग ,समर्पण व राष्ट्रप्रेम दिसून येतं.छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांना मानाचा मुजरा.
👍 शिवरायांचे एक-एक शिलेदार इतके उत्तुंग उंचीचे पराक्रमी व स्वराजासाठी देहाची कुड़ी ओवाळून टाकनारे नरवीर होते की.....त्या प्रत्येकावर एक एक चित्रपट होऊ शकतो !!!
बरोबर बोललास भावा 🚩🚩🚩🚩🚩👍
इस कारण ही छत्रपतिशिवाजीमहाराज एकमेवद्वितीय देश दुनिया मे प्रजा का उपभोगशून्य स्वामी !💐💐!
Nakkich Sir...
प्रतापराव गुजर यांच्यावर देखील एक चित्रपट यायला हवा..स्वराज्याचे सरसेनापती लहान मुलांना कळले पाहिजेत ..जसे तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू कळले आता तसे आता प्रतापराव कळायला हवेत
बहलोल खान को छोड़ा वो प्रतापराव गुजर जिकी हिमालियिन गलती /वेडात दौडले वीर मराठे सात ये गीत शायद प्रतापरावगुर्जर पर आधारित
I am not Marathi but I feel so proud that baji Prabhu ji and Shivaji is the real soul india and the glue to unite Hindus. This is the best movie I have ever seen. Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 vande Mataram
इंग्लंड मध्ये करणार relese? फर्जंद भारतात बघितला. सर्व जण भारावून गेले होते. वय वर्ष ८ ते ८६. असे चित्रपट चित्रपट गृहात जावून बघावे असेच घडवलेले आहेत. कृपया इंग्लंड ला प्रदर्शित करा. 😊
Boris Johnson palun jail ashi loke baghun. Tyala fakt World Economic Forum aani tyani kadhalele pandemic yatach interest aahe.
होऊन जाऊदे इंग्लंड मध्ये पण प्रदर्शित...
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
ho kruyat na nakkich....pn adhi England chya museum 😂 madhil maharashtra cha hukkachi Rajanchi Talwar wapas kara 😜 Kidding.
@@Nil_Abhyankar राजांची तलवार ज्यांच्या काळात इंग्रज घेऊन गेले ना त्यांना आधी विचारावं की ती का जाऊ दिली अन् आता कधी आणताय परत म्हणून....!!!
Saw this movie today. A must watch for everyone specially, new generation . What a sacrifice for Swaraj . Literally crying 😢 in the second half. Well done.
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
Actually 😭😭
@@vaibhavshinde4740 विमल पान मसाला की कहानी.
Vimal pan masala kahani
ruclips.net/video/xXGGv42Tds4/видео.html
Bhava pahilyanda movie baghtana radlo
Aa
All the best dear Ajay Purkar!!
बाजीप्रभूंना त्रिवार वंदन🙏
Saw this movie in theatre just now....Awesome movie ....every scenes gives goosebumps.... The way they all sacrificed there lives ....Not a joke to fight continuously for many days...hatoff.....
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏🏻🚩 केवळ मराठी कलाकारच अशा चित्रपटांना न्याय देऊ शकतात ❤️🔥
अप्रतिम अभिनय... खरच इतिहासात गेल्या सारखं वाटलं... अंगावर शहारे येतात बघताना.... स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केला आहे त्या प्रत्येक मावळ्यांवर चित्रपट काढला पाहिजे.... तरुण पिढीने तर असे चित्रपट नक्की पाहिले पाहिजेत..... जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे...🚩🙏
दिगपाल आणि टीम,
आम्ही सगळ्यांनीच इतिहास वाचला आहे...तो तू प्रत्यक्षात उतरवत आहेस ( सिनेमा मार्फत ) हे आम्ही आमचे भाग्य समजतो...तू बनविलेला "फत्तेशिकस्त" खूप मनाला भावून गेला आणि पावनखिंड हाही चित्रपट खूप काही गोष्टी आम्हा मराठी प्रेक्षकांना सांगून जाईल हीच इच्छा.....आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो दिवस उजाडला आहे....आमच्या सर्वांतर्फे तुमच्या ह्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा !!! जय भवानी जय शिवाजी !!!
मांजरेकर ( एक मराठी )
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
कालच पाहिला चित्रपट.अप्रतिम चित्रिकरण. ....
कसा असेल तो काळ.. चित्रपट पाहताना आणि कल्पना करून डोळ्यातून अश्रू ओघळले... महाराजांप्रति असणारे प्रेम..स्वराज्यासाठी केलेला सर्व शूर वीर मावळ्यांनी केलेला त्याग....
धन्य ते महाराज..
धन्य ते शूर लढ्वये...
चित्रपटातील सर्व कलाकारांनी, सह कलाकारांनी आपली भूमिका जगली.....अजय पूरकर यांनी बाजीनची भूमिका खूप छान केली...... 🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वामींनिष्ठेच जिवंत उदाहरण.....! 👍 हा चित्रपट नक्की बघणार
साहेब खास तुमचा साठी चित्रपट पहिलं मी ते pan ५वेळा तुमची अक्टिंग अंगावर काटे आला माझा खरच तुम्ही खूप ग्रेट आहेत ❤️
शिवाजी महाराज की जय 🙏. बाजीप्रभू वर चित्रपट बनवणं ही खूप मानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन. 🙏
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
शब्दात वर्णन करता येणार नाही असा हा भव्य चित्रपट ,एक अद्वितीय शौर्यगाथा, निस्सिम त्याग, स्वराज्य हाच प्राण....प्रत्येक पात्राची निवड अत्यंत योग्य...प्रत्येक पात्रा च अभिनय अत्यंत भारावून टाकणारा....सर्व टीम ला शतशः प्रणाम....मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास तुम्ही आमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा केलात...शब्द कमी पडतायत वर्णन करण्यासाठी...खुप खुप शुभेच्छा
Khup maste aahe movie . I cried at last scenes. Really salute to all the actors.
Khara.. Pawar Rao 🚩👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
ruclips.net/channel/UCykstD-tbH2tXbLKNLVJ9zQ
तुम्हा सर्व कलाकारांचे आणि संपूर्ण Unit चे आभार 🙏💕 उत्कृष्ट कलाकृती बनविल्याबद्दल Emotions, Emotional and Thriller सर्वच छान
काल चित्रपट पाहिला.संपूर्ण टीम आणि कलाकारांचे खुप अभिनंदन ....अजय दादा ञिवार मुजरा .....मध्यंतरानंतर अश्रू आवरत नाहीत ...आताच्या पिढीसाठी यातून उत्तम ऐतिहासिक शिक्षण मिळेल .सगळेच निशब्द झालो .
दिग्दर्शक लांजेकर दंडवत प्रणाम....आज मुले वाचन करत नाहीत ..फर्जंद पासुन सुरु करण्यात आलेला हा प्रवास थांबू नये.. अशाच अप्रतिम कलाकृती निर्माण करा.मनःपूर्वक शुभेच्छा.
मृणाल चिन्मय तुमच्या रुपात आईसाहेब व राजे पहाताना डोळे भरून येतात . आपण सगळेच जण खूप भाग्यवान जणू या भूमिकांसाठी जन्म घेतला
🙏🙏❤️ Pawankhind Video - ruclips.net/video/cM0XleKJ6LQ/видео.html
काल शिवजयंती आणि पवनखिंड एक स्वर्णशण.....!!!! Blessed...
पावनखिंड ह्या चित्रपटात मला बाजीप्रभू देशपांडे यांचा रुल खूपच आवडला कारण खरोखरच बाजीप्रभू देशपांडे वाटतात
आताच पाहून आलो पावनखिंड, दादर, प्लाझा मध्ये. फक्त अंगावर शहारे नाही तर रक्त सळसळून निघालय ३ तास. राजा साठी काहीही करायला तयार मराठे. हर हर महादेव.
नुसती ही मुलाखत पाहूनच डोळ्यांत पाणी आलं... सिनेमा पाहताना ४ रुमाल घेऊन जावे लागतील असं वाटतय.
हंबीरराव मोहिते
प्रतापराव गुजर
तानाजी मालुसरे
जीवा महाला
बहिर्जी नाईक
कोंडाजी फर्जंद
मोरोपंत पिंगळे
शिवाजीराव इंगळे
कान्होजी जेधे
माणोकजी दहातोंडे
सूर्याजी काकडे
हिरोजी इंदलकर
येसाजी कंक हे सर्व आणि...
धन्य ते बाजी आणि धन्य तो माझा राजा ज्याने इतक्या माणसांना आपलंसं केलं की त्यांनी पार जीव ओवाळून टाकावा आपल्या राजासाठी! ही माणसं फार मोठी ताकद शिवरायांसठी.
जय शिवाजी जय भवानी!!
हरहर महादेव!!!
थेट्रात जाऊनच चित्रपट पाहणार!!!
खूपच सुंदर चित्रपट .आत्ताच्या पिढीला हा इतिहास कळणे गरजेचे आहे.
अभिनेता अजय पुरकर यांना मनापासून धन्यवाद त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अगदी अप्रतिम साकारली आहे...शब्द कमी पडतात 🥺
Thank you very much for glorifying Chatrapati Shivaji Maharaj and Veer Bhaji Prabhuji Deshpande saheb !!! I am awestruck with the trailer!!! ❤️❤️
This excellent master piece should be dubbed and released in maximum Indian languages.Let each and every Indian know the greatness valour and courage of Chatrapati Shivaji Maharaj and his brave patriotic men.
हा चित्रपट New Jersey मध्ये release व्हायची काही शक्यता आहे ? राजश्री मराठी ला कळकळीची विनंती आहे की हा चित्रपट सातासमुद्रापार पण दाखवला जावा theatres मध्ये... महाराजांना आणि बाजी प्रभुंना मोठ्या screen वर पाहायची उत्सुकतेने वाट पाहतोय.....
जय शिवराय.
- From New Jersey...
पावन खिंड. .......
स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग
नविन पिडीला ईतिहास कळाला.
धन्य ते मावळे.
आणि बाजीप्रभूंनी प्रसंगावधानाने घेतलेला निर्णय .
जय भवानी जय शिवाजी हर हर🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 महादेव
मानाचा मुजरा सर्व कलाकारांना..असाच ईतिहास चित्रपटाच्या माध्यमातून सादर करत जा...🙏🙏🙏
खूपच छान चित्रपट आहे.... पावनखिंड. उत्तम सादरीकरण . खरंच अंगावर शहारे आले चित्रपट पाहून, अभिमान वाटतो मराठा असल्याचा. धन्य ते आपले राजे शिवाजी महाराज आणि धन्य ते जीवाला जीव देणारे वीर मावळे... बाजीप्रभू , रायाजी, फुलाजी आणि बांदल सेना यांना मानाचा मुजरा... जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे 🙏💐🚩
I dont speak marathi, but read a lot about छत्रपति शिवाजी महाराज (Dennis Kincaid; The Grand Rebel) and valour of Baji Prabhu Deshpande, love this movie. Hats off salute.
Chatrapati Shivaji Maharaj
Plz their is not just a human . So don't say shivaji say shivaji Maharaj . Person like shivaji Maharaj born after lacs of year.
@@rahulvetal933 छत्रपती शिवाजी महाराज....
आणि त्यांचा सारखा कोणी होऊ शकणार नाही मित्रा....
@@shribhangare8105 dev honyasathi khup kahi tyag ani kasht karave lagtat mag maharaj hon kas shaky hoil bhava 🙏
Chatrapati Shivaji Maharaj
अप्रतिम इमोशनल अनुभव. विषेशतः भास....
नक्की बघणार.
मनापासून आभार आणि शुभेच्छा.
🙏👏🙏
चल..... एकाच शब्दात सर्व काही..... 🚩
मुजरा राजेंना, मुजरा बाजीप्रभू'च्या स्वामिनीष्टेला..... लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे,...... खरंच त्याग काय असतो, हे नक्कीच समजेल पावनखिंड पाहून...... आणि ही भूमिका करायला मिळणं हे फारच पुण्याईचं काम...... अशाच सिनेमांची गरज आहे सध्या.... या सिनेमासाठी खूप साऱ्या सदिच्छा.....हा चित्रपट थिएटर फुल्ल करून टाको हिच दक्खनचा राजा जोतिबा आणी आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना......
कुणीतरी आपल्याकडे बघतय...
साक्षात बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांनी तुम्हाला आशिर्वाद दिला 🙏🙏🙏
Yesterday Watched it , On the occasion on Shivjayanti
Dhanya te Chatrapati Shivajiraje
Dhanya Te Maharajanache Mavale
🙏🙏🙏Parnavar Jase dav padte tasa nantar ashru santatdhar vahatat
योग्य कलाकाराला योग्य भुमिका
खुप छान तब्येत आणि भरदार आवाज
चल हा एकच शब्द तुमच्या मुखातून सर्व काही सागुंन जातो असेच महाराजाच्या मावल्यांच्या जिवणावर चित्रपट बनवत रहा भव्य दिव्य लहान मुलांना आपला ईतीहास माहीती पडतो
आणि ते लहान मुल प्रश्न विचारत असतात
मला वाटतं नकळत बाजीच तुम्हाला बघायला आले असतील तिथे...superb movie 👌
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणखी एका मावळ्या चा अप्रतिम चित्रपट..🙏🙏 धन्य ते शिवराय,धन्य ते बाजीप्रभू देशपांडे🙏🙏
खरंच आपली मराठी चित्रपटसृष्टी खूप मोठी झाली पाहिजे.
अप्रतिम चित्रपट सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐💐👌👍🙏
प्रश्नच नाही... चित्रपट नक्कीच पाहणार सहकुटुंब 👍🏻.. इतिहासाच जणू जिवंत होऊन येत आहे 🙏
जय शिवराय पावनखिंड हा चित्रपट बघितला तेव्हा खरंच अस वाटलं की सगळं रिअल वाटत नमन त्या मावळ्यांना ज्यांनी घोडखिंड लढवली आणि आज अजरामर आहे ते नाव बाजी प्रभु देशपांडे 🚩
चित्रपट पाहिला, खुप अभिमान वाटावा असा आपला इतिहास मुलानबरोबर पाहतांना अजुनच गर्व वाटला.
महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा सार्थ अभिमान आहे.
खूपच जबरदस्त चित्रपट आहे, सगळ्यांनी नक्कीच बघा,, खूपच सुंदर काम केलय सर्व ठीम ने,,,
रविवारी चित्रपट बघायला गेले होते, चित्रपट सुरू असताना सिनेमागृहामध्ये एक क्षण असा आला की खुर्चीवर सिनेमा बघायला बसलेला प्रत्येक मावळा डोळे पुसत होता....
महाराज आज ही जिवंत आहेत .. प्रत्येकाच्या हृदयात याची पुनः एकदा जाणिव झाली....
मराठी चित्रपट आशेच मोठे होऊ दे 🙏
अजयजी, तुम्ही जे बोललात तसेच होणार . आपण शिवरायाचेच मावळे, माणसे आहोत. आपल्याला आपल्या शिवरायांचा खूप...खूप........मोठ्ठा अभिमान आहे. त्यामुळे सिनेमागृहात जाऊनच हा चित्रपट पाहू. या चित्रपटाची ख्याती खूप... खूप...... ऐकली. तुम्हां सर्वांना होणारा भास ऐकून तर अंगावर शहारे आले. खरोखर शिवराय आणि मावळे हे नक्कीच पहात असणार आणि त्यांनी ही तुम्हाला नक्कीच आशिर्वाद तर दिलाच असणार त्याच बरोबर मोठ्ठा सलाम 🙏🙏🙏ही केला असणार, ती ही तुमची कामगिरी पाहूनच आणि आता आमच्याकडून ही मोठ्ठा सलाम तुमच्या सर्वांच्या कामगिरीला🙏🙏🙏 आपल्या लाडक्या शिवरायराजाला आणि आपल्या लाडक्या मावळ्यांना💐🙏💐🙏💐🙏
जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे ! उत्कृष्ठ!!!!
पावनखिंड पुन्हा पावन केली आपण ( मराठी चित्रपट🎥🎬👀 सृष्टीने) हार्दिक💐 अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
First day first show pahila
Ohaaaa bhai just mind blowing......
Marathi kalakar kisi se kam nahi hai
Kute ahe movie
अप्रतिम बोलावं तितके शब्द कमीच पडणार , सर्व कलाकारांचे काम खूप छान,अगदी काळजाला भिडून गेले , शुर विर लोकांचा इतिहास साक्षात डोळ्यांनी बघायला भेटला , अश्रू आवरत नव्हते डोळ्यातले , मूवी बगून झाल्यावर सुधा 2 तास डोळ्यातून पानी येतं होते , खरच शब्द नाहीं बोलायला , सर्वां कलारांचे मनापासून आभार 🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी 😘❤️ हर हर महादेव 🔱
छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक शिलेदारांना कोटी कोटी प्रणाम
जय शिवराय 🚩 #mrnams
ruclips.net/user/shortskzxftpLAuIQ?feature=share
आपण इतिहासात जगत आहोत असेच वाटले. प्रचंड मेहनत करून अशी अनुभूती लाखो मराठी माणसांना आणि शिवभक्तांना करून दिल्याबद्दल आपल्याला शतशः प्रणाम!!!
स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यांचा इतिहास असाच पुढे येऊद्या ,,,, जय शिवराय
सगळ्यांनी आवाॆजुन बघा आपल्या राज्याच्या सेनापती कसे होते आपले राजे कसे होते अंगावर शहारे येतात असे वाटते कि आपण जिवंत इतिहास बघतो आहे🙏 आपण च आपला इतीहास जपावा ऐकदा आपल्या कुटुंबाला घेऊन बघाच मी बघीतला आहे खूप भव्य आणि दिव्य आहे लयी भारी 🙏🙏🙏👍👍👌👏👍👌👏👍👏👍👏👌👏👌👏👌👏👌👍👍👌👍👌👍👌👌👍👍👍👍
Watched Pavankhind today in Sydney. Need to watch by each and every Marathi as Ajayji said. No words to express feelings. What a sacrifices!!!! salute 🙏🙏🙏
Did you watch in theatre in Sydney? Let them send to Adelaide also.😀 We are very interested!
जिंदगी में यह व्हिडिओ जरूर देख लो | 😍🇮🇳👇🙏👇🇮🇳😍
ruclips.net/video/no_VymEiV88/видео.html
How can we see in kumta ..karnataka where only one Theater and don't think this film will
be released
@@annapurnakamath9732 विमल पान मसाला की कहानी.
Vimal pan masala kahani
ruclips.net/video/xXGGv42Tds4/видео.html
@@uttamgaekwad5934 विमल पान मसाला की कहानी.
Vimal pan masala kahani
ruclips.net/video/xXGGv42Tds4/видео.html
🙏 खूपच 👌 सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद.
आपली भूमिका छानच.🙏
हर हर महादेव 🦁
जय भवानी जय शिवाजी 🦁
चला तर मग मित्रांनो, या चित्रपटाला भरभरून प्रेम देऊ.
खरचं अप्रतिम चित्रपट आणि सर्व कलाकारांची चोख भूमिका. असाच इतिहास मांडत रहा सर येणार्या पिढीला या माध्यमातून तरी तो अनुभवता येईल कारण पुस्तकातून तर तो काढायला सुरुवात झाली आहे.... आपल्या लोकांनी मुलांना उच्च शिक्षित नक्की करा हो पण त्यांना आपली संस्कृती आणि इतिहास नक्की सांगा... तेच काय ते आपल्याला इथुन पुढे आयुष्यातील काही संकटांना आणि अडचणींना सामोरे जाण्याची उमेद देतात....
खरंच आतुरता वाढवली आहे . कधी बघते असा झालय. जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम चित्रपट सर्वांनी आवर्जून बघावा असा धन्य ते मावळे या मावळ्यांच्या साथीदाराने उभारलेले ते स्वराज्य जय भवानी जय शिवाजी
खुप छान कलाकृती निर्माण झाली, सर्वांचे आभार
अप्रतिम चित्रपट ... 🙏🙏 जय भवानी जय शिवराय 🙏🙏
खूपच सुंदर चित्रपट... अंगावर शहारे आनणारे क्षण..उत्कृष्ट सादरीकरण...
खूप छान काम केलंय सर तुम्ही आज आम्हाला बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा पण भास झालाय की काय केलंय त्यांनी स्वराज्या साठी माझी विनंती आहे महाराष्ट्रातील कलाकारांना की माझ्या राज्याचा इतिहास तुम्ही जगासमोर आणत आहे तर जशे शुर तानाजी, पावनखिंड, हंबीरराव मोहिते, असे अजून चित्रपट काढावं आणि जगासमोर आणावं की माझा अकाच राज आणि त्याचं मवाळ काय होत ते जय शिवराय 🙏
अजयजी या भूमिकेत अगदी शोभतात, यात शंकाच नाही.
पावनखिंड चित्रपट पाहिला. चित्रपटातील सर्वच भूमिका अप्रतिम. प्रसंग असे चित्रित केले आहेत की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, स्वराज्यासाठी किती मावळ्यांनी प्राणांची बाजी लावली आहे, तसेच राजांची मावळ्यांप्रती असलेली आपुलकी पाहून मन अगदी भरून आले
राजं सुखरूप गडावर पोहचले म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारे बाजीप्रभू देशपांडे 💯🔥❤️
काळजाचा एक भाग आहेत बाजीप्रभू!!महाराजांसाठी जीवातजीव ठेवून तोफेची वाट बघणं,आणि 'मुजरा महाराज ' ही वाक्यं रूतून बसलेली आहेत.
आता तुम्ही सांगितलेला भास तेंव्हाच होतो जेंव्हा समरस होता. छान समरसून केलेलं जाणवतेय .असेच भव्य दिव्य करीत रहा .पुढील पिढीसाठी हाच एक मार्ग आहे .
आणि तुम्ही गाता ही खूप छान! 👍🙏⚘🎶🌝🌟💖