कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत /An easy way to make compost / Compost khat kase tayar karave.
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- कंपोस्ट खत कसे तयार करावे याची सोपी पद्धत येथे सांगितली आहे. एक बादली घ्यावी बादलीच्या झाकणाला आठ ते दहा आणि तळाला एक छिद्र पाडावे. त्यामध्ये पहिला पहिला थर सुका पाला-पाचोळा हे खतामध्ये तयार होणारे पाणी शोषून घेते. कडुलिंबाचा पाला पाचोळा घेतला तर किडीपासून संरक्षण होते. दुसरा थर ओला कचरा त्यामध्ये पाले भाज्यांची देठे, बटाटा कांद्याची साले, फुलांचे निर्माल्य, अंड्याची टरफले घालावे. थर करताना मुठभर झाडाची माती घालावी. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होऊन खताची प्रोसेस सोपी होईल. बादली भरल्यानंतर झाकण घट्ट लावावे. ती बादली विटा वर ठेऊन त्या खाली प्लास्टिकचे भांडे देवावे जेणेकरुन त्यामध्ये खताचे तयार होणारे लिक्विड त्या भांड्यात जमा होईल. चार ते पाच दिवसांनी बादलीतला कचरा पूर्णपणे खालीवर करून ढवळून घ्यावं.
आणि पहा तीस दिवसांनी आपले कंपोस्ट खत पूर्णपणे तयार झालेले असेल.
धन्यवाद !!