ऐकणं हे एक Skill आहे, जे मुलांना शिकवायलाच हवं | Woman Ki Baat with Vaishali Sekar | Aarpaar Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #VaishaliSekar #Aarpaar #आरपार
    गोष्टी सांगणे हे काही जादूगाराचं काम नाही, पण ज्यांनी आपल्या शब्दांनी मने जिंकली, त्या वैशाली सेकर यांचा प्रवास मात्र खरोखरच जादुई आहे. "Women Ki Baat" मध्ये यावेळी आपले होस्ट विनोद सातव यांनी त्यांची मनमोकळी मुलाखत घेतली, जिथे त्यांनी आपल्या जीवनातील अनोख्या आणि प्रेरणादायी गोष्टी उलगडल्या.
    गोष्ट सुरू होते एका साध्या रस्त्याच्या कडेला, जिथे काही निरागस लहान मुलं बसली होती. त्या निरागसतेतच वैशाली सेकर यांनी पहिल्यांदा आपल्या स्टोरीटेलिंगच बीज रुजवलं. काही मुले ऐकत राहिली, काही त्यांच्या कथेचा भाग बनली, आणि जसजसा काळ पुढे गेला, तसंच त्यांचं गोष्टी सांगण्याचं कार्यही विस्तारत गेलं. त्यांच्या मते, मुलांसाठी कथा सांगणं ही एक साधी गोष्ट नाही-ती जीवनाचा भाग असायला हवी, कारण कथेच्या माध्यमातून मुलं ऐकण्याची कला शिकतात. पूर्वी ही जबाबदारी आजी-आजोबा निभावत असत, पण आता नुक्लियर कुटुंब पद्धतीमुळे ही परंपरा हरवली आहे.
    पण वैशाली सेकर यांची कहाणी इथेच थांबत नाही. त्यांचा वैयक्तिक जीवनप्रवासही तितकाच हृदयस्पर्शी आहे. आपल्या पतीला कर्करोगामुळे गमावल्यानंतर, त्यांनी मोठ्या धीराने जीवन पुढे नेलं. परत एकदा प्रेमाच्या शोधात असताना मुलीला बाबा हवे आहेत या टिपिकल लाईनच्या मागे नं लपता स्वतःसाठी पार्टनर शोधल्याचं वैशाली सेकर सांगतात. त्यांच्या या मोकळ्या आणि पारदर्शक बोलण्यामुळे त्या लाखोंच्या प्रेरणा नक्कीच बनतील.
    गोष्टी सांगण्याच्या आणि जगण्याच्या या अनोख्या प्रवासाचा अनुभव घ्या, फक्त Aarpaar च्या "Women Ki Baat"मध्ये वैशाली सेकर यांच्या असामान्य आयुष्याचा हा प्रवास नक्की पाहा!

Комментарии • 16

  • @vinayakkelkar1457
    @vinayakkelkar1457 3 часа назад +2

    अप्रतिम मुलाखत! वैशाली गोष्टीबद्दल चे इतके वेगळे वेगळे पैलू तू उलगडून दाखवून दिलेस. मोराच्या पिसाऱ्या सारखे ते खूपच भावले.
    तुझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच वेगळा पण अंतर्मुख करणारा आहे.
    विनोदजी खूप छान उपक्रम व आजच्या वैशाली बरोबरच्या गप्पा. गप्पा खूप छान फुलल्या.
    धन्यवाद

  • @dr.rohinisaid8290
    @dr.rohinisaid8290 13 часов назад +2

    संपूर्ण मुलाखत शब्द न् शब्द कानात आणि मेंदूत साठवावी आणि आचारावी अशी आहे, अप्रतिम हा शब्दही अपुराच आहे.वैशालीताई तुमचा दृष्टीकोन खूप भावला, असंख्य धन्यवाद

  • @swapnasamant9322
    @swapnasamant9322 6 часов назад +1

    खूपच छान मुलाखत.वैशाली म्हणजे अप्रतिम सकारात्मक व्यक्तिमत्व!!!

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 14 часов назад

    बरेच दिवसांनी अतीशय सुरेख मुलाखत ऐकली...श्री. सातव मनःपूर्वक धन्यवाद..

  • @anitagharpure5881
    @anitagharpure5881 11 часов назад

    खूपच छान मुलाखत,खूप समृद्ध विचार आणि अंतर्मुख करणारं व्यक्तिमत्व. अप्रतिम! अशा वेगळ्या आणि सकारात्मक व्यक्तीशी आमची ओळख करून दिलीत त्या साठी अनेक अनेक धन्यवाद

  • @shailajavaidya6937
    @shailajavaidya6937 13 часов назад

    खूप छान आणि वेगळं ऐकायला मिळालं इंटरव्यू खूपच छान झाला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @yashovani6394
    @yashovani6394 14 часов назад

    आतापर्यंतच्या सर्व interviews मधला THE BEST interview👍

  • @ameykhaire379
    @ameykhaire379 15 часов назад

    किती सुंदर दृष्टी आणि दृष्टिकोनही जिओ

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 13 часов назад

    खूप वेगळे व सुंदर ऐकायला मिळाले

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 15 часов назад

    अप्रतिम मुलाखत, मस्त सांगितल 👌👌👌👌👌

  • @aartipandere1005
    @aartipandere1005 11 часов назад

    Thanks mam ,it's very nice interview to help too learn story, and help me to teach my child. I am also pre primary teacher. ❤ thanks

  • @sandhyakulkarni3984
    @sandhyakulkarni3984 13 часов назад

    खूप सुंदर विचार

  • @veenashringarpurey6
    @veenashringarpurey6 12 часов назад +1

    तुमचं अगदी बरोबर आहे peer pressure is the root of these problems, like there is no communication in the homes. They communicate via Texts on the phone , even in the house. Very sad!

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 12 часов назад

    Superb interview 👏

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 12 часов назад

    Vety great lady

  • @veenashringarpurey6
    @veenashringarpurey6 12 часов назад +1

    हल्ली काय होतं कि तुम्ही च्या experience च्या गोष्टी मुलांना किंवा इतरांनन सागायला जाव तर लगेच ते म्हठतात कि google च्या research वर ह्या उलटचच सांगता येत व मग तुमचं तोंड बंद होत. किती ही सांगितलं तर त्यांना पटतच नाही.