Interview : Saurabh Netravalkar याच्याशी खास मराठीमध्ये गप्पा | T20 World Cup 2024 | Sunandan Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • भारतीय १९ वर्षांखालच्या संघाचा तो सदस्य होता. खेळाबरोबर देवाने त्याला बुद्धी दिली होती. मुंबई रणजी संघाकडून खेळात असताना त्याने इंजिनीयरिंगची डिग्री पूर्ण केली. योग्य वेळी खेळातील अपेक्षित गियर पडला नाही म्हणून त्याने काळजावर दगड ठेऊन निर्णय घेतला कि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे. अमेरिकेत येऊन त्याने उच्च शिक्षण मस्त मार्क्स मिळवत पूर्ण केलेच आणि त्या सोबत क्रिकेटचे प्रेम जपले. आणि आता तो मस्त कामगिरीच्या जोरावर आँखोंका तारा झाला आहे. होय सौरभ नेत्रावळकरची कहाणी प्रेरणादायी आहे.
    खूप क्रिकेट रसिकांनी तुम्ही सौरभ नेत्रावळकरची मुलाखत घया म्हणून सांगितले. अमेरिकन संघ सुपर ८ फेरीत दाखल झाला आणि सौरभने मला वेळ दिली. क्रिकेट सोडून त्याच्याशी मारलेल्या गप्पा बघा तुम्हाला आवडतात का.
    🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket

Комментарии • 302

  • @shelkenaresh
    @shelkenaresh 3 месяца назад +152

    सौरभ जाणीवपूर्वक इंग्लिश शब्द टाळत होता.. मराठी भाषेचा अभिमान जाणवतो.. फक्त मराठी म्हणून नाहीतर भारतीय म्हणून सगळ्यांच्या शुभेच्छा

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +198

    सौरभ च्या मुलाखतीतून त्याचा साधेपणा, सुसंस्कृतपणा, मेहनत करून यश मिळवूनही निरहंकारी राहाता येतं हे जाणवतं. सौरभला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 3 месяца назад +98

    लेलेसाहेब गेल्या १० दिवसांपासुन अनेक
    मराठी क्रिकेट रसिकांची मागणी चालली होती ती पुरी केलीत !सौरभ ची मराठीत
    मुलाखत बघायला आणि ऐकायला मिळाली ! ६फुट उंचीचा हा मराठमोळा
    खेळाडु क्रिकेटमधेही ऊंच व्हावा ही प्रार्थना
    करतो . शिवतीर्थावर सत्काराच्या प्रसंगी २०,००० प्रक्षकांनी आग्रह केला , तेव्हा
    एकनाथ सोलकरने निरोप पाठवला की तुमचे प्रेम आम्हाला कळत आहे पण
    २०,००० प्रेक्षकांसमोर आम्हाला खेळायला
    सांगा पण बोलायला लावु नका धन्यवाद !!

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 3 месяца назад +85

    भारताने एक चांगला डावखुरा गोलंदाज गमावला .

    • @VitthalGaikwad-hf7cd
      @VitthalGaikwad-hf7cd 3 месяца назад +1

      Yeda ahe ka tu khup booler ahet India madhe tyana jaun vichar ekda

    • @ashwinb6435
      @ashwinb6435 3 месяца назад +2

      @@VitthalGaikwad-hf7cd kon ahet ?

    • @nuranichandra2177
      @nuranichandra2177 3 месяца назад +2

      He is very happy in the US and probably gives a damn about Indian cricket and that’s how it shouid be. Karmabhoomi should come before Janmabhoomi

    • @mangalajoshi1541
      @mangalajoshi1541 3 месяца назад +2

      किती छान मराठी, स्पष्ट विचार.
      कुठे ही राहा,यशस्वी व्हा,आनंदी राहा.कुटुंबाला पण जपा.

    • @mrunalpednekar7145
      @mrunalpednekar7145 3 месяца назад

      Ho khara aahe

  • @championcorner8449
    @championcorner8449 3 месяца назад +65

    पुण्याचा माणूस कुणाकडूनही गुपित काढून घेण्यात किती सक्षम असतो, हे लेले काकांच्या कडे पाहून समजत. उत्कृष्ट मुलाखत.

  • @abhijitvaze2745
    @abhijitvaze2745 3 месяца назад +47

    सुरेख मुलाखत ,
    सौरभ बोलताना अडखळतो पण गाणं मात्र सुरेल म्हणतो.
    आयुष्याच्या या अडथळ्यावर पण त्याने मात केली आहे. हा पण आदर्श त्याने घातलेला आहे

    • @furious_dracko583
      @furious_dracko583 3 месяца назад +1

      tya Desha madhe faaltu aggression ni je india madhe aahe to American ch aahe visru naka..

    • @furious_dracko583
      @furious_dracko583 3 месяца назад +1

      Bol bacchan dene aani Actual kaama karne ya madhe farak asto

  • @Abhishekb936
    @Abhishekb936 3 месяца назад +60

    इतके यशस्वी होऊनही ते सुंदन सरांसोबत अत्यंत आदराने उभे आहेत.

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 месяца назад +32

    आदर्श व्यक्तिमत्व... किती तो साधेपणा... बोलण्यातील नम्रता... खरंच.... सलाम....

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 месяца назад +17

    कॉम्प्युटर सायन्स हा अत्यंत अवघड विषय आहे आणि क्रिकेट सुद्धा रोज चार तास प्रॅक्टिस खरोखर कठीण आहे. अत्यंत मेहनती मुलगा आहे.

  • @pramoddarwai2002
    @pramoddarwai2002 3 месяца назад +41

    लेले सर धन्यवाद सौरव ची खूप सुंदर मुलाखत सौरव साधा निर्मळ सुसंस्कृत प्रामाणिक मेहनती आहे हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर वरून दिसून येते एवढा प्रसिद्ध होऊ नये जो त्यांनी आपला साधेपणा मराठमोळे पण कायम टिकवून ठेवला आहे त्याला शतशत नमन खूप गर्व आहे मित्रा तुझ्यावर खूप मोठा हो व आपल्या अमेरिकन क्रिकेट संघाला उच्च स्थानावर घेऊन जाशील याची खात्री आहे

    • @vivekmorekar5735
      @vivekmorekar5735 3 месяца назад

      धन्यवाद लेले सर.

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 3 месяца назад +34

    सौरभ दादा एवढा महान खेळाडू असून सुद्धा एवढा साधा राहतो , बोलतो खूप छान ❤❤

  • @harshal_naik
    @harshal_naik 3 месяца назад +9

    लहान व तरुणांनी खूप शिकण्यासारखे आहेत सौरभ कडून.
    मी सुद्धा पूर्ण वेळ नोकरी करतो आणि अमेरिकेत मिशिगन क्रिकेट असोसिएशन मध्ये T20 लीग खेळतोय. म्हणून मला सौरभ चा प्रवास फार जवळचा वाटतो.
    ऑल द बेस्ट. जय हिंद.

  • @ashwinsorte4536
    @ashwinsorte4536 3 месяца назад +46

    IPL मध्ये संधी द्यायला हवी सौरभ ला..

    • @nuranichandra2177
      @nuranichandra2177 3 месяца назад

      Indian Pavement League? Kashala? Kahihi garaj nahiye.

    • @Seungminlix08
      @Seungminlix08 3 месяца назад

      ​@@nuranichandra2177aee bhai ja tu gally cricket bgh🙂🙏🏻

    • @Seungminlix08
      @Seungminlix08 3 месяца назад

      ​@@nuranichandra2177aee bhai ja tu gally cricket bgh🙂🙏🏻

  • @Apnabanda1
    @Apnabanda1 3 месяца назад +7

    आपला मराठमोळा सौरभ 🌹.. लई भारी रे

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 месяца назад +19

    काय सालस पोरग आहे, सुसंस्कृत नम्र टफ आहे सौरभ 💪👍 धन्यवाद लेले सर 🙏

  • @harshhorat4938
    @harshhorat4938 3 месяца назад +19

    आभारी आहे सर नेत्रावळकर यांची मुलाखत घेतल्याबद्दल

  • @dnyaneshwarpandhare8714
    @dnyaneshwarpandhare8714 3 месяца назад +29

    वाह!छान मुलाखत दोन मराठी माणसाची.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 месяца назад +7

    बहुतेक सारे शुद्ध,सुंदर मराठीत ---अभिनंदन! आपल्याकडे बऱ्याच मंडळींना मराठी वर्ड्स रिमेम्बर करायला डीफिकल्ट जातं. सौरभ जी यांना शुभेच्छा 🎉आणि सुनंदन जी यांना धन्यवाद!

  • @jokar12345
    @jokar12345 3 месяца назад +25

    I guess he is stammering in between and while doing that in interview he said sorry in between, I just want to tell you Saurabh, there is absolutely no need to say sorry. what you have done in your life and what you have achieved till now if far far greater than what 99.99% people can do in this world. so please never say sorry if you stammer. we all proud of you. always

    • @aniketshewale5359
      @aniketshewale5359 3 месяца назад

      I think the stammering is not so frequent .. it’s fine

    • @udaypadhye3835
      @udaypadhye3835 3 месяца назад +1

      He was avoiding English words,not stammering

    • @priyankab2647
      @priyankab2647 3 месяца назад

      No he stammer Lil bit Mi baghitlet bakiche interview

    • @sanjeevundalkar646
      @sanjeevundalkar646 3 месяца назад

      Perhaps this stammering ,partially eminates from his struggling for correct Marathi words . This is natural ,as he is basically doing computer science job in USA .

  • @arunbhalekar4397
    @arunbhalekar4397 3 месяца назад +12

    सौरभ ने दोन्ही देशाचे नाव मोठे केलेय ,लेले काका आपण माणसासोबत विविध देश ही जोडत आहात,खूप छान .

  • @suhankashved4297
    @suhankashved4297 3 месяца назад +10

    लेले काका खुप मेहनत त्यांची बोलण्याची पद्धत आहे.समोरच्या मनातून कसं प्रश्नांची गुगली टाकायची हे त्यांच्या मध्ये जन्मापासून गुण आहेत हे परमेश्वरा कडून मिळालेल शस्त्र आहे.......Dil se ❤❤❤❤❤

  • @mmraueters
    @mmraueters 3 месяца назад +6

    नम्रता, सुसंस्कृत बोलणं, संस्कारी कुटुंबाचे पाठबळ, समोर असलेल्या कामात सदैव उत्कृष्टतेचा ध्यास , त्यासाठी लागणारे कोणतेही कष्ट उचलण्याची तयारी आणि या सर्वाला अध्यात्मतेची बैठक...एक खूप मोठं होऊ शकणारे अजून एक महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय व्यक्तिमत्त्व पाहतोय आपण..

  • @rajeshuniyal1140
    @rajeshuniyal1140 3 месяца назад +3

    Saurabh is a very talented and humble person 🙏

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 3 месяца назад +9

    खुप छान मुलाखत. पाय जमिनीवर ठेवून आत्मविश्वासाने सर्व आव्हानं पेलत, आपलं ध्येय नेटाने साध्य कसं करायचं याचा उत्तम वस्तुपाठ सौरभच्या आयुष्यातून दिसतो. सर्वांनी लाभ घ्यावा असा प्रेरणादायी प्रवास.👏👏

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 3 месяца назад +8

    Kitti sadha ahe re ha mulga..
    Asach raha re Surabh...
    World cup sathi shubhechcha 👍👍🍁👍👍

  • @BhagyashriDhebe-kq1gi
    @BhagyashriDhebe-kq1gi 3 месяца назад +11

    थँक्यू sir आम्ही बोललो होतो ते पूर्ण केली इच्छा मराठी मध्ये मुलाखत घेवून❤

  • @swatiparulekar898
    @swatiparulekar898 3 месяца назад +7

    सौरभ ची आतापर्यंतची बेस्ट मुलाखत , थँक्यू लेले साहेब.

  • @flirtandfunTV
    @flirtandfunTV 3 месяца назад +9

    Saurabh Netravalkar: Down To earth Man

  • @ankushjedhe2744
    @ankushjedhe2744 3 месяца назад +10

    आजच्या तरुण पिढीने हे मार्गदर्शन घेतले पाहिजे

  • @prakashmungekar3119
    @prakashmungekar3119 3 месяца назад +3

    Netravalkar deserves appreciation. Well played Netravalkar . Thanks Lele sir for the heart felt conversation.

  • @shashikantjadhav2697
    @shashikantjadhav2697 3 месяца назад +3

    सरांनी, सौरभची घेतलेली मुलाखत विद्यार्थ्यांच्यासाठी स्फूर्तीदायक .

  • @dsdoundesachin5443
    @dsdoundesachin5443 3 месяца назад +1

    खुप छान मुलाखत😊

  • @shivam9009
    @shivam9009 3 месяца назад +6

    परदेशात राहूनही आपल्या देशातील माती,भाषा,संस्कृती वरील प्रेम व आलेल्या अनुभवातील जाणीव यामुळे त्याची नाळ देशाशी घट्ट जुळलेली आहे हे त्याच्या बोलण्यावरून दिसते आयुष्यात struggle, मेहनतीला पर्याय नाही हे त्याच्या शब्दावरून जाणवते, व सर्वात महत्वाची गोष्ट तो बोलत असलेले प्रत्येक शब्द, वाक्य,कुठल्याही क्षेत्रातील करीअर साठी, आपल्या सर्वांगीन आयुष्यासाठी, व्यक्तीमत्वासाठी महत्वाचे आहेत. लेले का तर जे बोलतात ते करून दाखवतात😅, यावरून लेले काका आपल्या subscriber प्रती त्यांच्या अपेक्षाप्रती किती सजग आहेत ते दिसुन येते.. खुप छान.😊

  • @Rutu1991
    @Rutu1991 3 месяца назад +7

    सर ही खास मुलाखत जुळवून आणल्याबद्दल तुमचे आणि सौरभचे किती धन्यवाद मानावेत तेवढे कमी आहेत. सौरभला खूप खूप शुभेच्छा. बहुतेक सर तुमची व सौरभची पुढची भेट पुढील वर्षीच्या आयपीएल मध्ये होऊ शकेल असे वाटतेय. विराट आणि रोहितला सलग दोन ओवर्स मध्ये आऊट करण्याची क्षमता असलेल्या बॉलरला कोण नाही घेणार संघात?

  • @Sanjeevkshirsagar-t2d
    @Sanjeevkshirsagar-t2d 3 месяца назад +4

    खरच मुलाखत खुपच छान आहे vido पाहुन लै भारी वाटल खुप कष्ट मेहनत घेतली आहे नेत्रावलकर ने . त्याच्या कष्टाला भरपुर चांगली फळ मिळूदे👍👌

  • @vijaynirgude3941
    @vijaynirgude3941 3 месяца назад +3

    आपल्या क्रिकेटपटूंनी शिकले पाहिजे सौरभ नेत्रावळकडून की माणूस म्हणून कसे असलं पाहिजे.खूप नम्र. जमिनीवर पाय असलेला माणूस.

  • @ankitainapure3739
    @ankitainapure3739 3 месяца назад +2

    खरं सांगु लेले सर तर सौरभ सारखं शुद्ध मराठी आपल्या देशातले मराठी खेळाडू विशेष करून मुंबईकर क्रिकेटपटूंना जमत नाही. ही एक दुर्दैवी बाब आहे. पुढच्या वाचालीसाठी शुभेच्छा , सौरभ. अप्रतिम भेट घेतली.

  • @bhaveshtamboli546
    @bhaveshtamboli546 3 месяца назад +12

    he literally tried not to speak english word inhis whole interview. manal re bhaval

  • @rajendrashinde616
    @rajendrashinde616 3 месяца назад +7

    1 नंबर काका❤ थँक्यू

  • @Jadhavhouse
    @Jadhavhouse 3 месяца назад +6

    आतापर्यंतचा बेस्ट vdo लेले 🎉

  • @ROFAN45
    @ROFAN45 3 месяца назад +1

    Just infinite respect and love for saurabh netravalkar ❤

  • @mayachibhatkanti
    @mayachibhatkanti 3 месяца назад +4

    लेले सर खूप खूप धन्यवाद, आज आपल्यामुळे काही चांगले पाहायला मिळाले, बघायला मिळाले आणि ऐकायला मिळाले. खूप कमी विडिओ असतात जे पाहताना आणि पाहून झाल्यानंतर एक वेगळे समाधान मिळते. ते आज आपल्या या मुलाखतीतुन मिळाले. खरंच खूप धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @OppoVivo-je6eo
    @OppoVivo-je6eo 3 месяца назад +1

    अभिमान वाटला सर दोघांचापण
    तुमच्यामध्ये असलेले उच्च गुण आम्हाला लेले सरांमुळे बघायला मिळाले ...
    साधी राहणी उच्च विचारसरणी ❤
    खुप खुप धन्यवाद सर👍 God Is Great 🙏
    Congratulations & best wishes for T20 WorldCup 2024💐🤝🙏

  • @mav32019
    @mav32019 3 месяца назад +5

    Much awaited interview is out! Thank you for doing this finally!😇🎊

  • @nitinpandharpatte
    @nitinpandharpatte 3 месяца назад +1

    Saurabh - True ambassador of Indian Culture and Inspiration to all. Wishing him good luck

  • @vijaygavkar31
    @vijaygavkar31 3 месяца назад +1

    Thanks Lele Sir
    Thanks Saurabh , love you असाच पुढे जात रहा. तुझ्या कडुन शिकण्यासारखे खुप आहे.

  • @dustin3046
    @dustin3046 3 месяца назад +9

    Aaj mala abhiman vatato Marathi mansacha n tumcha pan

  • @tusharkhanolkar5838
    @tusharkhanolkar5838 3 месяца назад +2

    Man from Goa Netarvalkar khup chan

  • @vivek.salunke
    @vivek.salunke 3 месяца назад +1

    धन्यवाद लेले साहेब. तुम्ही सौरभला बोलतं केलं. फास्ट बॉलर असून थोडासा लाजरा आहे. कॅमेरा कडे बघत नाही. सच्चा माणूस आहे. अभिनंदन. स्पोर्ट्स कोटा खाली ग्रीन कार्ड मिळेल त्याला. 😊😊

  • @manoharsawant263
    @manoharsawant263 3 месяца назад +1

    धन्यवाद लेले साहेब. खुप दिवसांची इच्छा पूर्ण केलीत.

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 3 месяца назад

    सौरभ 👁वळकरची मुलाखत आवडली बेस्ट झाली एकदम ... या मधून एक शिकायला मिळाले यश लवकर नाही मिळाले तरीही प्रयत्न करणे सोडू नका....त्याचा पॉझिटीव्ह नेस आवडला....अभ्यास करत रहा.

  • @navnathbhegade6207
    @navnathbhegade6207 3 месяца назад +4

    अभिनंदन सौरव

  • @sagaronline265
    @sagaronline265 3 месяца назад +1

    kudos to this guy.i am surprise that he achieved so much inspite of having speaking problem,no shame but definitely it wud be another achvment if gets over this problem.goodluck to him for his cricket career.
    kharach khup inspiring aahe hyaacha pravas aani daadas.
    sunandan lele gr8 that u gave him platform too express himself and interviewed him.

  • @babasahebjugale9087
    @babasahebjugale9087 3 месяца назад +1

    Lele saheb, thank you for such an excellent interview. Sourabh is a ideal example for many people who face dilema in decision making.

  • @nikhiljoshiPi
    @nikhiljoshiPi 3 месяца назад

    सौरभ, जय कीर्ती इमारतीतील तू माझ्या आई बाबांना आजही आठवतो आहेस. असेच यशाचे शिखर पादाक्रांत करत रहा!

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 3 месяца назад +2

    खतरनाक आहे हे पोर❤❤❤

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 3 месяца назад +1

    खुपच छान। खुप काही शिकन्यासारख आहे सौरभकडुन. धन्यवाद लेले सर.

  • @vidyakulkarni2646
    @vidyakulkarni2646 2 месяца назад

    I like Saurabh's simplicity

  • @aniruddhaghaisas4468
    @aniruddhaghaisas4468 3 месяца назад

    एव्हढी गुणसंपदा असूनही आणि कर्तृत्व दाखवूनही सौरभचे पाय जमिनीवर आहेत. देवावर श्रद्धा आहे. कौतुक वाटलं.
    खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🎉🎉🎉
    सौरभची मुलाखत घेतल्याबद्दल लेलेंचेही आभार 🙏

  • @bhausahebdeokar1712
    @bhausahebdeokar1712 3 месяца назад +2

    ❤❤मराठी प्रेम मातृभाषा वरील प्रेम❤❤❤

  • @Aditya-rs1gd
    @Aditya-rs1gd 3 месяца назад +1

    खूप छान आणि वेगळा मुलाखत आहे आणि खूप घेण्यासारखे आहे कारण बरेच लोक सर्व त्याग करून क्रिकेट खेळत राहतात पण त्यातून केव्हा बाहेर आले पाहिजे ते कळत नाही

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 3 месяца назад +2

    वाह!❤ किती सुंदररित्या मुलाखत पार पडली ही 💯. कधी संपली तेच कळलं नाही 🎉

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 3 месяца назад +4

    कृपया भारतीय वंशाच्या इतर सर्व अमेरिकन क्रिकेटपटूंची मुलाखत घ्या

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 3 месяца назад +1

    Khupch utkrustha mulkhaat..Lele Sir tumchi interview gheyachi padhat khupch humurous aahe..tya mule samorcha mulkhaat denaara pan khulun mulakhaat deto..best...👌👌👌👌

  • @veenayardi
    @veenayardi 3 месяца назад

    अतिशय सुंदर मुलाखत ...सौरभने अतिशय प्रामाणिकपणे व मनापासून उत्तरे दिली ...अतिशय स्फूर्तिदायक ...त्याचा साधेपणा खूपच भावला...सौरभ व लेले सरांचे अभिनंदन ...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...👏👌👍🌷

  • @appanare3601
    @appanare3601 3 месяца назад +1

    खूप मोठे यश मिळुनही पाय जमिनीवर आहेत,नम्रपणा अतिशय आवडला.

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 3 месяца назад +1

    वा काय छान विचार, अनुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी ( सुसंस्कृत पणा) आहे

  • @shreedharmokashi8088
    @shreedharmokashi8088 3 месяца назад

    Best ever unfiltered interview 💯❤️

  • @santoshghadge78
    @santoshghadge78 3 месяца назад +1

    सौरभ तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    धन्यवाद लेले काका

  • @IAmIND47
    @IAmIND47 3 месяца назад +1

    He is really down to earth

  • @ckudalkar
    @ckudalkar 3 месяца назад

    Mr. Lele is great interviewer. He never interrupted Sourabh... See how Sourabh was standing... He offered Full Respect to Mr. Lele

  • @arjung17
    @arjung17 3 месяца назад

    खूप छान सौरभ दादा... खूप यशस्वी व्हावंसं हीच ईश्वर चरणी प्रार्थना, पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा!😊

  • @artteaser6975
    @artteaser6975 3 месяца назад +2

    Excellent sir and saurabh 👍

  • @ganeshsalunke2368
    @ganeshsalunke2368 3 месяца назад

    सौरभ आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना तुझा अभिमान आहे.. तु नवीन पिढीला आदर्श आहेस ❤ यशस्वी भव 🎉

  • @Sangita-rg8wr
    @Sangita-rg8wr 3 месяца назад +3

    खुप छान

  • @dipeshh1
    @dipeshh1 3 месяца назад +1

    Great personality....SAURABH .Your focus,hardwork and Passion is worth appreciating....Sunandan sir,khupach chan mulakhat ghetli....♥

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 3 месяца назад +3

    ग्रेट सर 🙏

  • @mr.nikhiltirvadekar
    @mr.nikhiltirvadekar 3 месяца назад

    What a Humble Person and Awesome Cricketer, Really want to see you in IPL 2025 🙂

  • @snehagurav6901
    @snehagurav6901 3 месяца назад

    We r proud of you Saurabh...as Indian...as maharashtrian..... best of luck for journey... किती डीसेंट पर्सन आहे 🫡🫡🫡

  • @itsnits11
    @itsnits11 3 месяца назад +1

    Since the USAvsPak game, we have been discovering all the wonderful things about Saurabh... Cricket, Engineering, Patents, defeating Pak, taking Kohli and Rohit's wicket... The dude is practically flawless... and just to protect him from bad eyes (kunachi najar lagu naye), mhanun ek chhotasa problem... stammering! Of course, this has not stopped him from achieving big things, and I wish it never stops him from anything he wishes to do!! This reminded me of my father, who rose through the ranks in a nationalized bank, with only a single working ear, that needed a hearing aid! My father did not let his disability stop him, and he never asked for any charity from anyone. Saurabh is the same... he won't ask for any concession or charity... he will keep going! Keep it up mitra! All the best!!

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 3 месяца назад

    Hats Off To You Saurabh ..... 🫡

  • @bhimashankarjunglemedicine
    @bhimashankarjunglemedicine 3 месяца назад

    धन्यवाद लेले साहेब उत्तम शैली आहे तुमची बोलण्याची , मुलाखत घेण्याची शैली उत्तम आहे 👍🏻👍🏻👏👏

  • @ronny3866
    @ronny3866 3 месяца назад

    सौरभने वर्ड कप मध्ये खूप छान गोलंदाजी केली. सौरभला आयपीएल मध्ये बघायला आवडेल, ते पण मुंबई इंडियन्स मधून 🧡

  • @chinmaygharpure4004
    @chinmaygharpure4004 3 месяца назад

    1 नंबर Interview..Very inspiring. Thank you Lele Sir

  • @SACHINSURE-cx1yb
    @SACHINSURE-cx1yb 3 месяца назад +2

    Great sir ✌✌🙏🙏👌👌

  • @ravijoshi8327
    @ravijoshi8327 3 месяца назад +1

    सुनंदजी.. भारी! खूप छान घेतली मुलाखत.. तुम्ही बोलता त्या प्रमाणे करतातच, सांगितलं होतं की सौरभ नेत्रावलकर ची मुलाखत घेणार म्हणून. धन्यवाद!🙏🏻💐😊

  • @sandeepparab9203
    @sandeepparab9203 3 месяца назад

    सालस, सरळ, मेहनती आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व.... मराठी पाऊल पडते पुढे .... Good luck to him....

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 3 месяца назад

    किती नम्र आणि सालस.
    पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👍

  • @saurabhgawali8927
    @saurabhgawali8927 3 месяца назад

    वाटच बघत होतो ya interview chi. Thank you. Very humble person. ❤

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 3 месяца назад

    खूप छान, सौरभला पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @cadiwan
    @cadiwan 3 месяца назад

    Thank you Lele Sir 😊
    किती किती सुंदर मुलाखत घेतलीत, सर !

  • @YatinDeo
    @YatinDeo 3 месяца назад

    आदर्श वागणूक. सौरभला शुभेच्छा. सुंदर मुलाखत. धन्यवाद. 🙏

  • @AshokSawant-r9o
    @AshokSawant-r9o 3 месяца назад

    सौरभ, तु खूप प्रामाणिक मेहनत कर. तु नक्की यशस्वी होशील. आमच्या तुला खूप खूप शुभेच्छा. God bless you. ❤❤❤

  • @akshayratnaparkhe7952
    @akshayratnaparkhe7952 3 месяца назад

    वाह! खूप सुंदर मुलाखत लेले सर आणि सौरभ. फारच अप्रतिम. खूप शुभेच्छा 😊

  • @ajitkhot1116
    @ajitkhot1116 3 месяца назад

    खुप छान, सौरभ याचे अभिनंदन. हा खरोखरीच अष्टपैलू माणूस आहे

  • @Revati5070
    @Revati5070 3 месяца назад

    Great interview, so proud of Saurabh👍🙏, seems to be very straightforward and honest

  • @ChicoDeChicago
    @ChicoDeChicago 3 месяца назад

    Leleji and Saurabh, as a Chicagoan with Indian descent, I look up to both of you. Your nature, straightforwardness, grit, and more, makes you both my role models. Keep up! Sambhaji, Chicago

  • @vivektulja4516
    @vivektulja4516 3 месяца назад

    We Marathi people are always humble. Best wishes Saurabh, both to Team USA and to you personally.

  • @sagarlingayat8384
    @sagarlingayat8384 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद ,मी या मुलाखतिचीच खूप दिवस वाट बघत होतो आणी माला खात्री होती की तुम्ही ही मुलाखत घेणार आणी तीही मराठीतून..सौरभ हा तर खूपच उत्तम खेळाडू आहे आणी आता तो माझ्या सगळ्यात आवडत्या खेळाडूंच्या लिस्ट मध्ये सामील झाला आहे . त्याच्या कडून खूप खूप काही शिकण्या सारखं आहे .

  • @bhausahebdeokar1712
    @bhausahebdeokar1712 3 месяца назад +1

    सुनंदन सुंदर मुलाखत ..