Science Day 2023-24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा, सोलापूर
    हीरक महोत्सवी वर्ष 2023-24
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ राष्ट्रीय विज्ञान दिन व कला कार्यानुभव साहित्य प्रदर्शन
    12/03/2024 मंगळवार
    🧬🧬🧬🔍🔍🌡️🌡️🦠🦠🩻🩻🧪🧪🧫🧫🔎
    श्री सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व कला कार्यानुभव साहित्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्र.पाहुणे म्हणून
    दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ पद्मश्री भोजे मॅडम व अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम. गीता चिकमनी मॅडम उपस्थित होत्या.
    या प्रसंगी मान्यवरांनी थोर भारतीय शास्त्रज्ञ पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण, सावित्रीबाई फुले व श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले.
    याप्रसंगी इ.पहिली ते सातवीच्या च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले. इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी पाण्याची घनता ,पाण्यात विरघळणारे पदार्थ ,ज्वालामुखी , ज्ञानेन्द्रिय चंद्राच्या कला, मानवी फुफुसाची रचना व कार्य, पाणी स्वच्छ करण्याचे यंत्र व प्रकाश संश्लेषण अशा विविध विषयांवरचे प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आर्किमिडीज स्क्रू, जेट टॉय, soil moisture sensor, चांद्रयान-3 चे working model, शेतीची कामे व शेतीचे जोड व्यवसाय , सांडपाणी स्वच्छ करण्याचे उपकरण, चोरी पासून सावध करणारे लावायचे अलार्म व सूर्यमाला अशा विविध प्रयोगांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले. तसेच कला व कार्यानुभव च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या साहित्यांचेही प्रदर्शन मांडण्यात आले. प्र.पाहुणे मा.सौ.पद्मश्री भोजे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाच्या सादरीकरणाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या कलेचा व कार्यानुभवच्या साहित्यांचेही भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच मोठे संशोधन करून देशाचे, शाळेचे, आई-वडिलांचे व शिक्षकांचे नाव उज्वल करावे असे मनोगत व्यक्त केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.गीता चिकमनी मॅडम यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना मरगूर मॅडम यांनी केला. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.भैरप्पा शिल्पा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
    🌵🎄🌲🌳🌴🌱🌿☘️🍀🎍🪴🎋🍃🍂🍁🍁
    घेतला वसा शिक्षणाचा ध्यास आम्हा गुणवत्ता वाढीचा
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Комментарии •