कुणकेरी हुडा उत्सव 2023,Kunkeri huda,दैवी अवसर १०० फुट उंच हुड्यावर होतात स्वार।रोंबाट ।वाघाची शिकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कुणकेरी हुडा उत्सव २०२3,Kunkeri huda,दैवी अवसर १०० फुट उंच हुड्यावर होतात स्वार।रोंबाट ।वाघाची शिकार
    कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव
    कोकणातील प्रत्येक गावागावात होळी शिमगोत्सवाची एक वेगवेगळी खासियत असते.काही गावात 5 दिवस,7 दिवस,9 दिवस असा जोरदार उत्साहात साजरा होणारा सण आहे.असाच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावातील हुडोत्सव प्रसिद्ध आहे.या सणाची एक वेगळीच खासियत आहे. यंदा 12 मार्च 2023 रोजी हुडोत्सव आहे
    कुणकेरीचे दैवत भावी आई देवस्थानच्या प्रांगणात हा हुडोत्सव रंगतो. हुडा म्हणजे एक 100 फुट उंच असा एक लाकडी खांब असतो तो सागवानी लाकडापासून बनवलेल्या असून संपूर्ण आंब्याच्या टाळानी (पानांनी) आच्छादलेला असतो.यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते.त्या गावातील व पंचक्रोशीतील लेकी,सुना, चाकरमानी फार भाविकतेने या हुडोत्सवात सहभागी होतात.होळीच्या 7 व्या दिवशी हा हुडोत्सव असतो यंदा तो 12 मार्च 2023 रोजी साजरा होणार आहे
    प्रत्येक मंदिराजवळ वेगवेगळी होळी
    कुणकेरीच्या हुड्याच्या शेजारी भेडला माडाची (गावी लग्नमंडप सजावटीसाठी यांची पाने वापरतात तर खोडाचे पन्हळ व वासे) होळी घालतात तर लिंगदेव मंदिराकडे आंब्याची होळी घातली जाते.शिमगोत्सवात डफ व घुमट या पारंपारिक वाद्यांचा वापर करून विविध खेळ खेळले जातात. या प्रसंगी खेळगडी जी पारंपारिक गाणी म्हणतात त्यांना जती असे म्हणतात
    वेगवेगळे खेळले जाणारे खेळ
    घोडेमोडणी-- खेळण्यातला घोडा बनवून त्यात खेळगडी स्वतः उभा राहतो व नाचतो.लांबून पाहणाऱ्याला घोडाच नाचतो आहे असा भास होतो.
    लुटुपुटुची वाघाची शिकार-- हा खेळ रोंबाट घालणारे खेळगडी फार अप्रतिमरित्या सादर करतात.बघायला खूप गर्दी होते.
    पेटत्या शेणी मारणे-- होळीच्या 6 व्या दिवशी हा खेळ असतो.तयार केलेल्या हुड्याला पेटत्या जळत्या शेणी भारतात.
    फातर उचलणे-- परंपरागत तिला धनगरणीची फातर असेच म्हणतात.जरा तरूण आणि ताकदवान लोकांचा हा खेळ आहे.
    अवसरांवर दगड मारणे-- होळीच्या 7 व्या दिवशी श्री भावईदेवीचे तिन्ही अवसार प्रसाद उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी 100 फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढून जातात. देवीचे वारे अंगात आलेले अवसर या 100 फुटी उंच (साधारण 9 माळ्याची इमारत इतकी उंची) अशा सजवलेल्या हुड्यावर सफाईदारपणे वर चढल्यावर त्यावेळी जमलेले भाविक त्यांच्यावर दगड मारतात.पण सहजासहजी तो त्यांना लागत नाही पण ज्यांचा दगड त्या अवसाराला लागतो त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 5 वेळाच दगड मारण्याची प्रथा आहे
    कुणकेरीच्या भावई देवीचे धार्मिक कार्यक्रम
    होळीच्या 7 व्या दिवशी कुणकेरीची भावई देवी मातेचा जेष्ठ बंधू आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल आणि कनिष्ठ बंधू कोलगावचा श्री देव कलेश्वर आपल्या बहिणीच्या म्हणजेच हुडोत्सवात तरंग काठी सह अवसर व मानकऱ्यांसह सहभागी होतात
    कुणकेरी परबवाडी येथे श्री भावई देवीच्या घरी तिची उत्सव मूर्ती आहे. हुडोत्सवाच्या दिवशी भावई देवी मातेच्या मंदिरात ओटी भरणे,नवस करणे,नवस फेडणे असे विविध प्रकारचे कार्यक्रम असतात.लेकी सुना,पै पाहुण्यांनी कुणकेरीचा सारा परिसर गजबजून गेलेला असतो.यंदा 2023 मध्ये 12 मार्च रोजी हुडोत्सव आहे.
    संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर,गोवा, बेळगाव वगैरे परिसरातून मोठ्या संख्येने भाविक या हुडोत्सवात सहभागी होतात.हुडोत्सव ही आगळीवेगळी परंपरा जपणारा हा कुणकेरीचा हुडोत्सव जरूर आयुष्यात एकदातरी आपण पहावा असाच आहे.
    कुणकेरीच्या हुडोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
    किशोर देसाई
    Dear viewers kindly support us. / सुवर्णकोकण -:
    Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant, Kudal
    Mr. Ashish Natalkar, Devgad
    Music:
    Editing -: Mr. Ashish Natalkar
    Location -:Kunkeri
    Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
    Follow us on Instagram : / suvarnkonkan
    #konkan
    #shimga
    #holi
    #kunkeri
    #hudabeauty
    #kokan
    #traditional #suvarnkokan

Комментарии • 17

  • @Bhatkanti1993
    @Bhatkanti1993 5 месяцев назад

    खूप सुंदर दादा

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад +1

    खूप सुंदर आहे 👌👌👌

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +3

    खुप खुप 👍👍

  • @दिनकरपाडावे

    खुप खुप छान सुंदर😍💓 आणि मालवणी बोली. 👍👍

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 6 месяцев назад

    एक दिवस कधी ना कधीतरी कोकण चा शिमगा बघायला येणारच

  • @santoshmalvade651
    @santoshmalvade651 Год назад +1

    Mast

  • @radaking897
    @radaking897 Год назад +2

    आमची कुणकेरी ❤😁या कधी गवाक

  • @ViGaMi
    @ViGaMi Год назад +3

    उत्सव आणि परंपरा ❤👍 यांचा अनोखा संगम

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar Год назад +3

    खूप छान...कोकणातील परंपरागत होळी उत्सव आमच्यापर्यंत पोचला...धन्यवाद

  • @ashukumbhar
    @ashukumbhar Год назад +2

    bhari🤩♥️

  • @padmaphadke2762
    @padmaphadke2762 Год назад +1

    Sundarch vedio sundarch mahiti dilit Ghar baslya devdarshan ghadvlat dadannu🙂🙏🙏

  • @gamingop8994
    @gamingop8994 7 месяцев назад +1

    30march 2024 या वर्षी

  • @royal4116
    @royal4116 Год назад +1

    Aakeri nahi ... Aambegon , kunkeri aani kolgon

  • @yojanaratwal6898
    @yojanaratwal6898 Год назад

    Lora gavi kas jaych