सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही भूपाळी घरा घरात आणि तुम्हा सर्वांच्या मनात पोहोचली हा सुद्धा स्वामींचा आशिर्वाद 🙏🏻 या जनमोत्सवाच्या निमित्ताने स्वामींच्या अभंगांचा संपूर्ण कार्यक्रम प्रसारित करणार आहोत व स्वामींची वर प्रार्थना सुद्धा माझ्या याच चॅनेल वरती रिलीज करणार आहे. त्यालाही तुमचा आशिर्वाद तुमचं प्रेम मिळेल अशी आशा… 🙏🏻🌸
मी आधी पासूनच दररोज सकाळी उठी उठी गोपाळा , घन:शाम सुंदरा ऐकत असतो. आठदहा दिवसांपुर्वी माझे युट्यूब वर हि भुपाळी शेअर झाली. तेंव्हा पासून दररोज हि भुपाळी मी ऐकत आहे. श्रीराम आठवले यांची हृदयस्पर्शी रचना व शमिका भिडे यांचे सुरेल, लयबद्ध, कर्ण मधूर, गायन. तनमन पुलकित होऊन भारावून गेले. हि भुपाळी म्हणजे भक्तीचा ठेवा,आनंदाचा झरा, प्रसन्नतेची झुळूक आणि मन:शांतीचे स्वर्गीय सुख. कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏🙏
ऐकता स्वर भूपाळी भावपूर्ण आवाजात मन क्षणात गेले पावस येथील गाभाऱ्यात पुन्हा आठवण झाली मज आरतीची जी मी केली होती पावस क्षेत्री स्वरूपा नंद स्वामी समोर मज दिसले नेत्र आनंदने गहिवरले सौ. शमिका चितळे
।।श्रीराम।। ऐकताना डोळे मिटतात व साक्षात सरस्वतीचेच दर्शन होते. स्वर आणि शब्द! माधुर्याची मधुरता! सात्विवतेची सुंदरता! वर्णनाला शब्द पुरत नाहीत. त्यात हे माझ्या शाळेतील शिक्षकांची शब्दरचना! 🙏 कितीतरी वर्षांनी या भूपाळीतून गदिमांच्या तोडीची शब्द-योजना ऐकायला मिळाली. या माझ्या लौकिक गुरुंना अत्यंत विनम्र वंदन!🙏🙏🙏🌸
।।ॐ॥ परमहंस स्वामी स्वरुपानंदाविषयीची प्रासादिक भूपाळी व शमिकाताईंचा भावमधुर सुरेल स्वर असा सुरेख संगम असल्याने ही भूपाळी मनाच्या गाभार्यात घुमत राहते..भूपाळी रचनाकार, शमिकाताई व संगीत नियोजकांना साधुवाद!😊
शमिका, सुप्रभात...तू गायलेली भूपाळी ही कानात सतत घुमत रहाते...अत्यंत भावपूर्ण, भक्तीने ओतप्रोत व सर्वात महत्वाचे म्हणजे तुझा अत्यंत मधुर आवाज... कानांची तृप्ती न झाली तरच नवल .. अशीच छान गीते गत रहा...
मला ही भुपाळी खुप खुप आवडते मी हातात मोबाईल घेतला चला हेच गाणं मला लावायचा होत आणखी मोबाईल चालु केला तेच चालु झाले मनातलं खर्च मोबाईल समजते हे मात्र खरे आहे ज्याचा मोबाईल आहे ती वेक्ती काय पाहाते आएकते तैच नोटिफेकशन ये सत्य आहे जैसे कर्म तैसे फळ ❤❤😊😊
शमिका भिडे - सारेगमप मध्ये ही बालगायिका भेटली होती. स्वच्छ, भावस्पर्शी स्वराची धनी अशी गुणी गायिका. स्वामी स्वरुपानंदांची ही भूपाळी किती गोड गायिली आहे हिने. भूपाळीचे शब्द आणि चाल दोन्ही अतिशय सात्विक, स्वामींचे स्वरूप उलगडून दाखविणाऱ्या आहेत! अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती देणाऱ्या या गीतासाठी गीतकार, संगीतकार आणि गायिका यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!
खूपच सुंदर भूपाळी.मी मित्र मैत्रिणीन बरोबर शेअर केली. सर्वांना खूप आवडली. सुंदर गायन शमिका.सर्व म्हणले सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. खूप खूप सुंदर गायलीस.
खूप च भावपूर्ण, खरंच भक्त तर काय स्वामी सुध्दा आतुर असतील अशी भूपाळी ऐकलयला आणि रोज शमिका तुझ्या भूपाळी ची वाट पाहत असतील,अगदी स्वर्गीक सुखा ची प्राप्ती होते ऐकताना,खूप खूप मन पासून धन्यवाद आणि आशीर्वाद, स्वामी कृपा सदैव अशीच असू दे।❤
सर्व प्रथम स्वामीजींच्या ह्या रचनेला हृदपूर्वक नमन,शमीकजींच्या गोड गळ्यातून ह्या रचनेला साजेसे स्वर,एकंदरीत सकाळी ही रचना ऐकल्यावर स्वर्ग सुख काय असते याची अनुभूती,शमीकाजींच्या पुढील भक्ती गीतांसाठी खूप खूप शुभेच्छा,अशीच सुमधुर भक्ती रसाने भरलेली गाणी गाऊन आमच्या पर्यंत पोचवावे
खुपच सुंदर भूपाळी ऐकून खूपच आनंदी मन झाले श्री स्वामींच्या मंदिरा बसल्याचे समाधान वाटले खुप खुप शुभेच्छा गात रहा अशी श्री वेतोबा माऊली चरणी प्रार्थना.जय सदगुरू.
Shamika,तुझी भूपाळी ऐकून मन तृप्त झाले, नकळत डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे कधी संपूच नये असे वाटत होते. कमाल तुझ्या गाण्याची आहे की ते एव्हढे भक्तिरसात ओथंबलेले होते की नुसते गाणे वाटलं नाही त्यात आर्जव होते.तुला तुझ्या पुढच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा
खूपच गोड आवाजात भूपाळी गायली आहे.अशीच स्वामी कृपा अखंड तुझ्या वर राहो व तुला चांगली प्रसिद्धी मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना.तुझ्या गोड आवाजाने ऐकतच राहावेसे वाटते.मन मुग्ध होते.
खूप छान ह्या आधी पण ऐकली पण हेडफोन लावून ऐकल्यावर काही वेगळीच अनुभूती येते. एक एक शब्द इतका स्पश्ट आणि अर्थपूर्ण. आवाज ही फार गोड वाटतो जणू कोणी हळुवार फुंकर मारत आपल्याला मार्गस्थ करीत आहे असे वाटते. खूप छान शमिका तुझे खूप खूप अभिनंदन 🙏😊 अशीच स्वामींची तुझ्यावर कृपा दृष्टी राहो हीच सदिच्छा.
खूप खूप माधुर्याने भरलेल्या, स्पष्ट आणि सुस्पष्ट अश्या आवाजात म्हटली आहे ही भूपाळी शामली भिडे ह्यांनी. कौतुक आणि गुणगान करावे तेवढे कमी असे वाटते ऐकून. भूपाळीच्या रचनेबद्दल म्हणायचे तर मानस गाभारी घुमणारे आणि स्थिरावणारे असेच शब्द योग्य ठिकाणी वापरून रचनेला अर्थपूर्ण केले आहे रचनाकाराने.
शमिका ताई, तुमची सर्व भजन व गाणी आम्ही नेहमीच ऐकतो, अलौकिक भाव व अप्रतिम आवाज, गुरूंची तुमच्यावर अशीच कृपा राहून आम्हा सर्वांना असाच अद्भुत आनंद प्रसाद मिळत राहो..🙏🙏🙏
🙏जय श्री कृष्णा खूप प्रसन्न अस वातावरण भूपाळी ऐकताना मन अगदी त्या प्रभू चरणी लीन होत सद्गुरूचे ते रुप सहज पणे डोळ्यासमोर येऊन अगदी त्या परम आनंदाची ओढ लागते .खरच गायन करणाऱ्या ताईंना , काव्य रचना ,तसेच लेखकाला धन्यवाद अन् सदगुरु चरणी प्रणाम ..🙏
अत्यंत सुरेल सुमधुर सुश्राव्य , भावपूर्ण सुस्पष्ट आणि भक्तिपूर्ण गायन ज्यानं अंतः करणाचा ठाव निश्र्चितच घेतला. खूपच छान ! माझ्या सारख्या अनेकांना मी हे पाठवलं आहे ज्यांना खात्रीनं आवडेल...
श्री श्रीराम बाळकृष्ण आठवले या गुरुवर्यांनी या रचनेत अति सोप्या शब्दात उपनिषदांतील सार सांगितले आहे. त्यातच शमिकाचा सुरेल आवाज आणि भूप रागाचे पाच स्वर सोबत संगीत संयोजन आणि साथ -- इतकी अप्रतिम रचना प्रसिध्द न झाली असती तरच नवल होतं. कृपा प्रसाद आहेच !
सुरेल, सुस्वर, शांत, संयत, शब्दप्रधान व गायकीला संपूर्ण कह्यात ठेवून गायलेली भूपाळी. श्रीसद्गुरूंना सुद्धा या भूपाळीच्या स्वरांनी पहाटेच्या प्रभाकिरणांचे स्वागत करायला आवडत असणार 🙏
बऱ्याच वर्षांपूर्वी मी पावसला गेलो होतो, आज पुन्हा स्वामींचे दर्शन घडले. रसाळ शब्द रचना, शुद्ध, स्पष्ट आणि सुरेल स्वर, भक्ती रस सगळे काही मंत्रमुग्ध करणारे होते. भर दुपारी ऊन्हातून चालत असतांना अचानक मार्गात एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेत आपण जी शितलता अनुभवतो तसेच काहीसे अनुभवायला मिळाले. खूप धन्यवाद. 🙏🙏
शमिका ! संगीतामधील सर्व प्रकारांमधे आजवर ऐकलेल्या लाखो गाण्यात तुमची ' सोहम् घोष ' ही भूपाळी माझ्या साठी कायम अव्वल स्थानावर राहील ! लागोपाठ अनेक वेळा ऐकूनही कंटाळा येत नाही ; समाधान होत नाही ! स्वामींचा आणि सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहेच ; तो तसाच सदैव राहो ।।
खूप सुंदर ,जीवाला भिडणारी रचना आहे।एकदा ऐकली की ऐकतच रहावी वाटते.मनाचा ताण, थकवा नष्ट करणारी.आ.श्रीरामजीनी अप्रतिम रचना केली आहे.आणि शमीकाच्या स्वरांनी तिला अलंकारित केले आहे.शमिका,आम्ही तुला सा रे ग म प पासून पाहतोय.तुझं गायन अप्रतिम आहे.अशीच गात रहा.☺️☺️☺️🙏🙏🙏
शमिका, अतिशय गोड आवाज आहे तुझा! खरोखरच गुरूकृपाच आहे ही,तसेच रचना पण खुपच अर्थपूर्ण आहे.गोड आवाज असा की कानात घुमतच रहातो.गुरूतत्वाला साष्टांग प्रणिपात! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍
।।ॐ॥ स्वामी स्वरुपानंदांची भूपाळी रचली आहे सुंदर शब्दांत आणि शमिकाताईॅंचे गायनी कळेने अतिशय सुश्राव्य झाली आहे.रोज ऐकावी अशी ही भूपाळी.शमिकाताई अभिनंदन व साधुवाददेखिल!
आमच्या रोजची पहाट ह्या सुंदर भूपाळीने, कृपावंत भला…., उदारा जगदाधारा… अशी सुंदर होते… आनंदाची अनुभूती स्वामी तुमच्या सुमधुर आवाजाने देतात…. सर्वांचीच पहाट अशीच वर्षानुवर्षे होत राहो🙏🌹🙏
My Aai played this early morning while i was still asleep and this sweet voice, made me open mu eyes and it felt surreal, the best moments of my life, the lyrics are heart touching and pure, namaskar to you and the composer! 🕉️
सद्गुरू स्वामी स्वरूपानंद माऊलींची ही प्रासादिक भूपाळी ज्यांनी रचली त्या गुरुकृपांकित लेखणी चे धनी आठवले जीना आदरपूर्वक नमस्कार, शामिकाताई च्या ओजस्वी स्वरांनी ही भाव पूजा अधिकच श्रवणीय झाली आहे, संगीत अप्रतिम
आठ दिवसापूर्वी आपल्या सुमधुर आवाजात ही सुंदर शब्द रचना ऐकण्याचा योग आला. आता रोज सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींची ही प्रार्थना ऐकतो आणि प्रसन्न दिवस सुरू होतो. खूप खूप धन्यवाद शमिकाजी.
फारच छान, फार दिवसांनी असे सुंदर स्वर कानी पडले.शमिका ही भुपाळी अतिशय सुंदर म्हटली आहे.आता ग दि मां चा जोगवा राग सुद्धा असाच होऊ दे.(कोन्यात उभी सतार सरला रंग).
सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही भूपाळी घरा घरात आणि तुम्हा सर्वांच्या मनात पोहोचली हा सुद्धा स्वामींचा आशिर्वाद 🙏🏻 या जनमोत्सवाच्या निमित्ताने स्वामींच्या अभंगांचा संपूर्ण कार्यक्रम प्रसारित करणार आहोत व स्वामींची वर प्रार्थना सुद्धा माझ्या याच चॅनेल वरती रिलीज करणार आहे. त्यालाही तुमचा आशिर्वाद तुमचं प्रेम मिळेल अशी आशा… 🙏🏻🌸
श्री राम जय राम जय जय राम apratim sushmita bihade aashirwad maharaj kalan Karo bay 88 j n
, ,
उत्कृष्ट.
ओम राम कृष्ण हरी🙏...thank you so much for presenting this भूपाळी 👍... waiting for more such videos
Kay sangu ..kiti kaurtuk karu , shabda nahit stutisathi sapdat itake sushravya, sumadhur avarnaniya git aikayla milale he aamche ahobagya .khup dhanyawad Shamika tai
प्रभात झाली स्वरूपनाथा या हो मम अंतरी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥
माझे माझे लोप पावु दे, तुझे तुझे उगवु दे ॥
कोण असे मी, तो मी, तो मी, सहजपणे कळु दे ॥
प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥
दृष्टी निवळु दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा ॥
अभ्यासाचा, या वचनाचा, छंद जडु दे जिवा ॥
सुमने सुमने अर्पण व्हावी, कृपा करा सत्वरी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥
रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव ॥
करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव ।
हरिमय होउन आम्हा जाणवो हरिमय नरनारी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥
उद्दात उन्नत, पावन मंगल, जीवन हे व्हावे ॥
सोऽहम् सोऽहम् म्हणता म्हणता, ममत्व संपावे ॥
सोऽहम् फुंकर, भरा बनु द्या, या देहा बासरी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥
जवळ घेऊनि शिकवा गीता, ओढ अशी लागली ॥
घास सानुले करुनि भरवा, आम्हा गुरु माऊली ।
राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जपो सदा वैखरी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु. ॥
द्वंद्व न उरले, दु:ख संपले, अनुभव हा यावा ॥
तिमिर मावळे, गगन उजळले, जाणवु दे गारवा ॥
चित्ति वचनी कृतित यावी, सहज सुधा माधुरी ॥
सोऽहम् घोषची घुमत रहावा मानस गाभारी ॥ ध्रु.॥
स्वागत करितो सद्गुरुराया, उमलो दे मनि उषा ॥
कृपाप्रसादे स्वामी आपुल्या शमुदे सगळी तृषा ॥
भक्तवृंद हा प्रसन्न वदने विनम्र वंदन करी,
स्वामी विनम्र वंदन करी ॥
रहावा मानस गाभारी,
रहावा मानस गाभारी,
रहावा मानस गाभारी॥
अभ्यासाचा या वचनाचा
ऐवजी
अभ्यासाचा या भजनाचा
उमलो दे मनी उषा
ऐवजी
उमलो जीवनी उषा
असे शब्द पाहिजे.
2:25
🙏🙏
रचनाकार नाव समजू शकेल का?
काही संगीतांचं कौतुक " वाजवलेल्या टाळ्यांनी " नव्हे तर , " भरलेल्या डोळ्यांनी " होतं , त्यातलंच हे एकमेकाद्वितीय...!!!!👌❤👍
व्वा, अवघे ' स्वामीमय ' झालो आम्ही...!!! ❤❤❤
खूप खूप धन्यवाद🙏🏻😇
मी आधी पासूनच दररोज सकाळी उठी उठी गोपाळा , घन:शाम सुंदरा ऐकत असतो. आठदहा दिवसांपुर्वी माझे युट्यूब वर हि भुपाळी शेअर झाली. तेंव्हा पासून दररोज हि भुपाळी मी ऐकत आहे. श्रीराम आठवले यांची हृदयस्पर्शी रचना व शमिका भिडे यांचे सुरेल, लयबद्ध, कर्ण मधूर, गायन. तनमन पुलकित होऊन भारावून गेले. हि भुपाळी म्हणजे भक्तीचा ठेवा,आनंदाचा झरा, प्रसन्नतेची झुळूक आणि मन:शांतीचे स्वर्गीय सुख. कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏🙏
अतिशय सुंदर भूपाळी आवाज पण खूप छान आहे 👌👍🙏
Titkach chhan कौतुक देखील
Mi roj sakali uthlyaver aikte,prasanna watate khupach chhan
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शमिका,अशीच छान गात रहा
ऐकता स्वर भूपाळी भावपूर्ण आवाजात
मन क्षणात गेले पावस येथील गाभाऱ्यात
पुन्हा आठवण झाली मज आरतीची
जी मी केली होती पावस क्षेत्री
स्वरूपा नंद स्वामी समोर मज दिसले
नेत्र आनंदने गहिवरले
सौ. शमिका चितळे
ruclips.net/video/_rJdHmr0Dcs/видео.html&si=EnSIkaIECMiOmarE
Pawas
अगदी खरंय तुमचं 👍
अनेक वेळा ऐकले तरी मन भरत नाही असे वाटते की आपण खरंच समोर बसून ऐकत आहोत.मन प्रसन्न होते
तुम्ही पावस च्या आहात का?माझी आई पावसची आहे.
हे भजन फारच गोड गायलय खुप भाव आहे माझे आजी आजोबांचे हे गुरू त्यांनीच त्यांना गुरूमःत्र दिला खुप भाग्यवान हरि ॐ तत्सत
हे भजन नसून ही भूपाळी आहे पहाटे देवाला प्रार्थना करतात त्याला भूपाळी असे म्हणतात
।।श्रीराम।। ऐकताना डोळे मिटतात व साक्षात सरस्वतीचेच दर्शन होते. स्वर आणि शब्द! माधुर्याची मधुरता! सात्विवतेची सुंदरता! वर्णनाला शब्द पुरत नाहीत. त्यात हे माझ्या शाळेतील शिक्षकांची शब्दरचना! 🙏 कितीतरी वर्षांनी या भूपाळीतून गदिमांच्या तोडीची शब्द-योजना ऐकायला मिळाली. या माझ्या लौकिक गुरुंना अत्यंत विनम्र वंदन!🙏🙏🙏🌸
आणि दासगणू महाराज (ह भ प)
Who is listning this for 100 th time?
Daily ❤
रोज
रोजच
रोजच
I am listening almost daily
।।ॐ॥ परमहंस स्वामी स्वरुपानंदाविषयीची प्रासादिक भूपाळी व शमिकाताईंचा भावमधुर सुरेल स्वर असा सुरेख संगम असल्याने ही भूपाळी मनाच्या गाभार्यात घुमत राहते..भूपाळी रचनाकार, शमिकाताई व संगीत नियोजकांना साधुवाद!😊
शमिका, सुप्रभात...तू गायलेली भूपाळी ही कानात सतत घुमत रहाते...अत्यंत भावपूर्ण, भक्तीने ओतप्रोत व सर्वात महत्वाचे म्हणजे तुझा अत्यंत मधुर आवाज...
कानांची तृप्ती न झाली तरच नवल ..
अशीच छान गीते गत रहा...
मला ही भुपाळी खुप खुप आवडते मी हातात मोबाईल घेतला चला हेच गाणं मला लावायचा होत आणखी मोबाईल चालु केला तेच चालु झाले मनातलं खर्च मोबाईल समजते हे मात्र खरे आहे ज्याचा मोबाईल आहे ती वेक्ती काय पाहाते आएकते तैच नोटिफेकशन ये सत्य आहे जैसे कर्म तैसे फळ ❤❤😊😊
शमिकाच्या गोड आवाजात ही भूपाली आणखीन गोड वाटली. स्वामींची ही वचने जगता यावी एवढीच प्रार्थना 🙏
Uttam. Abhang
हे गाणे मी कितीही वेळा ऐकू शकतो. फार सुंदर गायन. या गाण्यावर मेडिटेशन पण करता येईल एवढे सुंदर.
🙏🏻🙏🏻😇😇
शब्दातीत अनुभूती.
ह्याच साठी केला होता अट्टहास.
अशीच दैवी रचना, अशाच दैवी स्वरात ऐकता ऐकता मोक्ष प्राप्ती होवो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर
दिवसाची सुर वात अशा सुमधुर आवाजात अर्थपूर्ण भूपाळी ने होणे हेच फार मोठे आहे दिवस अत्यंत सुखमय आनंदी वातावरनात जातो.
खूप सुंदर, भावपुर्ण स्वरांनी श्री स्वामींना अभिषेक केलास बाळा....तुझ्या गळ्यातून अशीच निरंतर स्वरसेवा घडो आणि सद्गुरुंचे आशीर्वाद सदैव मिळोत.
शमिका भिडे - सारेगमप मध्ये ही बालगायिका भेटली होती. स्वच्छ, भावस्पर्शी स्वराची धनी अशी गुणी गायिका.
स्वामी स्वरुपानंदांची ही भूपाळी किती गोड गायिली आहे हिने.
भूपाळीचे शब्द आणि चाल दोन्ही अतिशय सात्विक, स्वामींचे स्वरूप उलगडून दाखविणाऱ्या आहेत!
अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती देणाऱ्या या गीतासाठी गीतकार, संगीतकार आणि गायिका यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!
खूप धन्यवाद ! तुमचे आशिर्वाद असेच माझ्या पाठीशी राहोत 🙏🏻😊
अप्रतिम, खुप सुंदर , फारच छान आणि शांत वाटते ऐकून
खरच खूप सुंदर गायली आहे भूपाळी. अगदी दिवाळीला अभ्यंग स्नान झाले आहे आणि तुझी भूपाळी ऐकतोय अगदी असेच प्रसन्न वाटते. खूपच गोड आणि शांत आवाज.
खूपच सुंदर आवाज आहे, खप तन्मयतेने म्हणत आहेस,अशीच सद्गुरुची क्रुपा तुझ्या वर राहावी
शमिकाजी तुमच्या मुखातून निघालेले भूपळीचे मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात व गोड स्वरांनी भूपाळीला अधिकच गोडी येथे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर भूपाळी.मी मित्र मैत्रिणीन बरोबर शेअर केली.
सर्वांना खूप आवडली.
सुंदर गायन शमिका.सर्व म्हणले सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.
खूप खूप सुंदर गायलीस.
Thank you so much 🙏🏻🙏🏻😇😇
स्वामी स्वरूपानंद आशीर्वाद आठवले सरांचे शब्द व शामिकाताई चा मधुर वाणी ह्या सर्व मुळे भूपाळी फारच मधुर झाली आहे
अतिशय भावपूर्ण आणि मधुर स्वरात गायलेली ही स्वामींची भूपाळी ऐकून माझ्या मनाचा गाभारा नीरव शांततेने भरून गेला आणि नेत्र आनंदाश्रूंनी गहिवरले. धन्यवाद.
Khup khup Dhanyawad 😊🙏🏻
अतिशय भावपुर्ण.स्वामींच्या पवित्र शब्दांना लाभलेले सुरेल कोंदण
Khup Sundar sarva guni smpsnna
खूप च भावपूर्ण, खरंच भक्त तर काय स्वामी सुध्दा आतुर असतील अशी भूपाळी ऐकलयला आणि रोज शमिका तुझ्या भूपाळी ची वाट पाहत असतील,अगदी स्वर्गीक सुखा ची प्राप्ती होते ऐकताना,खूप खूप मन पासून धन्यवाद आणि आशीर्वाद, स्वामी कृपा सदैव अशीच असू दे।❤
सर्व प्रथम स्वामीजींच्या ह्या रचनेला हृदपूर्वक नमन,शमीकजींच्या गोड गळ्यातून ह्या रचनेला साजेसे स्वर,एकंदरीत सकाळी ही रचना ऐकल्यावर स्वर्ग सुख काय असते याची अनुभूती,शमीकाजींच्या पुढील भक्ती गीतांसाठी खूप खूप शुभेच्छा,अशीच सुमधुर भक्ती रसाने भरलेली गाणी गाऊन आमच्या पर्यंत पोचवावे
Khupach sundar....jitkyanda aaika mann prasann ani shant hun jato. Sundar🙏😁
😇🙏🏻
शमिका आपणांस संतांचा आशीर्वाद आहे
भाग्यवान आहात तुम्ही !
खुपच सुंदर भूपाळी ऐकून खूपच आनंदी मन झाले श्री स्वामींच्या मंदिरा बसल्याचे समाधान वाटले खुप खुप शुभेच्छा गात रहा अशी श्री वेतोबा माऊली चरणी प्रार्थना.जय सदगुरू.
Shamika,तुझी भूपाळी ऐकून मन तृप्त झाले, नकळत डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे कधी संपूच नये असे वाटत होते. कमाल तुझ्या गाण्याची आहे की ते एव्हढे भक्तिरसात ओथंबलेले होते की नुसते गाणे वाटलं नाही त्यात आर्जव होते.तुला तुझ्या पुढच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा
आम्ही यां प्रार्थने ने क्लास ची सुरुवात करतो....
ऐकतच रहावे,अशी श्रवणीय व अर्थपुर्ण भूपाळी!शमिका, खूप प्रसन्नतेचा अनुभव आहे.👌💐👌
ruclips.net/video/_rJdHmr0Dcs/видео.html&si=EnSIkaIECMiOmarE
Pawas
आहाहा, किती आतंर ह्दयानी गायलेत,
Enlighted voice.. enlighted lirics..
Daily... Lesaning this lovely voice and bhopali bhajan...
शमिका तुझ्या गोड आवाजात भूपाळी ऐकताना पहाट झाल्याची प्रसन्नता जाणवते.
खूपच गोड आवाजात भूपाळी गायली आहे.अशीच स्वामी कृपा अखंड तुझ्या वर राहो व तुला चांगली प्रसिद्धी मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना.तुझ्या गोड आवाजाने ऐकतच राहावेसे वाटते.मन मुग्ध होते.
सकाळी अशा गोड आवाजात सुदगुरू भुपाळी ऐकून मन प्रसन्न होते. मनाला शांत, आनंद मिळतो. श्री गुरुदेव दत्त महाराज प्रसन्न 🙏
खूप छान ह्या आधी पण ऐकली पण हेडफोन लावून ऐकल्यावर काही वेगळीच अनुभूती येते. एक एक शब्द इतका स्पश्ट आणि अर्थपूर्ण. आवाज ही फार गोड वाटतो जणू कोणी हळुवार फुंकर मारत आपल्याला मार्गस्थ करीत आहे असे वाटते.
खूप छान शमिका तुझे खूप खूप अभिनंदन 🙏😊 अशीच स्वामींची तुझ्यावर कृपा दृष्टी राहो हीच सदिच्छा.
असल्या रचाना गायला सुद्धा कृपा प्रसाद असावा लागतो नाही तर अनेक गायक झिंगात किंवा कोंबडी पळाली सारखी धुडगूस घालत असतात ..
खूप भावपूर्ण रसाळ रचना !शमिका अगदी तन्मयतेने गायली !!ऐकून शांत वाटतं जीवाला !!!चित्तवृत्ती प्रसन्न होतात!!💖⚘🎶🙏
शमिकाचा कर्णमधुर आवाज,स्पष्ट शब्दोच्चारण, यामुळे भूपाळीचे भाव ह्रदयापर्यंत पोचतात.सुंदर👌👌👌
Very nice
Khup sudar and god aavaj 💯👌💐🌹🙏👌
बेटी, खूप छान रचना व गीत गायन सुद्धा 🌹🌹
गुरूंची सदैव कृपा आपणावर राहो ही सदिच्छा🌹🌹
हे अजर अमर तु गावे you will become very famous
आपल्या आवाजात अभंग ऐकताना आपल्या कंठी साक्षात श्री सरस्वती माता वास करते याची जाणीव होते. खूप छान गाता आपण. सद्गुरुंची कृपा आहे 🙏
केवळ स्वामीकृपेने अशी भावस्पर्शी रचना व मधुर गायन शक्य आहे. पुन्हा पुन्हा ऐकावीशी दिव्य भूपाळी! सोहं सोहं!👍💐
खूप छान गायन शब्द व गायन अतिशय मधुर सारखे ऐकावे वाटते मन तृप्त होतच नाही इतके सुमधुर
माझी सकाळ या भूपाळी ऐकण्याने करायला मला आवडते. दिवसाची सुरुवात छान होते. 🙏 स्वामींचा वरदहस्त तुझ्या मागे सदैव असणाच.
शब्द, स्वर, चाल सर्वच अप्रतिम !
शब्दातीत !!
धन्यवाद !!!
खूप सुंदर! ऐकता ऐकता मन गुरुचरणी कधी लीन होतं हे कळतच नाही.💐💐👌👌👍
वा!... अप्रतिम...भक्तिरचना आणि गायन...स्वामींची कृपा....🙏🙏
खूप खूप माधुर्याने भरलेल्या, स्पष्ट आणि सुस्पष्ट अश्या आवाजात म्हटली आहे ही भूपाळी शामली भिडे ह्यांनी. कौतुक आणि गुणगान करावे तेवढे कमी असे वाटते ऐकून. भूपाळीच्या रचनेबद्दल म्हणायचे तर मानस गाभारी घुमणारे आणि स्थिरावणारे असेच शब्द योग्य ठिकाणी वापरून रचनेला अर्थपूर्ण केले आहे रचनाकाराने.
आवाजाची गुणवत्ता अप्रतिम आहे ! स्वच्छ , स्पष्ट , शुद्ध शब्दोच्चार ! भूपाळी रचना सुरेख आहे , वातावरण प्रसन्न करणारे आहे !
आवाजाची गुणवत्ता व कर्णमधुर आवाज अप्रतिम
शमिका ताई, तुमची सर्व भजन व गाणी आम्ही नेहमीच ऐकतो, अलौकिक भाव व अप्रतिम आवाज, गुरूंची तुमच्यावर अशीच कृपा राहून आम्हा सर्वांना असाच अद्भुत आनंद प्रसाद मिळत राहो..🙏🙏🙏
😊🌹🙏 आपल्या वाणी मधून साक्षात सरस्वती मातेचा ओघवतां प्रवाह वाहत आहे....... अभिनंदन श्री चरणी शुभेच्छा 🙏🌺😊
खूप खूप सुंदर.ॐ राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतीम. स्वामींच्या गोड शब्दांना शमिकाचा गोड आवाज मिळाला. मंगलमय अनुभूती. 💐👌
Thank you 🙂🙏🏻
शमिका ताई तुझ्या आवाजाची ही भूपाळी ऐकल्याशिवाय माझे मनच भरत नाही 😊❤
अतिशय सुंदर! रोज़ आमची सुप्रभात हे सुमधुर गाणे ऐकूनच होते… सद्गुरूंची कृपा आहेच.. अशीच बरसत रहो! कल्याणमस्तु!
🙏🏻🙏🏻😇
Kan. Trupti. Jhale
🙏जय श्री कृष्णा
खूप प्रसन्न अस वातावरण भूपाळी ऐकताना मन अगदी त्या प्रभू चरणी लीन होत सद्गुरूचे ते रुप सहज पणे डोळ्यासमोर येऊन अगदी त्या परम आनंदाची ओढ लागते .खरच गायन करणाऱ्या ताईंना , काव्य रचना ,तसेच लेखकाला धन्यवाद अन् सदगुरु चरणी प्रणाम ..🙏
अत्यंत सुरेल सुमधुर सुश्राव्य , भावपूर्ण सुस्पष्ट आणि भक्तिपूर्ण गायन ज्यानं अंतः करणाचा ठाव निश्र्चितच घेतला. खूपच छान ! माझ्या सारख्या अनेकांना मी हे पाठवलं आहे ज्यांना खात्रीनं आवडेल...
Khup khup Dhanyawad 😊🙏🏻
श्री श्रीराम बाळकृष्ण आठवले या गुरुवर्यांनी या रचनेत अति सोप्या शब्दात उपनिषदांतील सार सांगितले आहे. त्यातच शमिकाचा सुरेल आवाज आणि भूप रागाचे पाच स्वर सोबत संगीत संयोजन आणि साथ -- इतकी अप्रतिम रचना प्रसिध्द न झाली असती तरच नवल होतं. कृपा प्रसाद आहेच !
इतक्या गोड आवाजातील हौ भूपाळी संपूच नये व तू अशीच गात रहावी असे वाटते.
महाराजांची तुझ्यावर सदैव कृपा आहेच.
🙏🏻😇
सुरेल, सुस्वर, शांत, संयत, शब्दप्रधान व गायकीला संपूर्ण कह्यात ठेवून गायलेली भूपाळी. श्रीसद्गुरूंना सुद्धा या भूपाळीच्या स्वरांनी पहाटेच्या प्रभाकिरणांचे स्वागत करायला आवडत असणार 🙏
मी सकाळी वाॕकला जाताना ही भूपाळी आणि शमिकाने गायिलेले स्वामींचे अभंग रोज न चुकता ऐकतो
तुझ्या मधुर आवाजात ही भूपाळी डोळे मिटून ऐकावी असे वाटते ! तुझ्यावर स्वामींची आणि माता सरस्वतीची सदैव कृपादृष्टी राहो!
बऱ्याच वर्षांपूर्वी मी पावसला गेलो होतो, आज पुन्हा स्वामींचे दर्शन घडले.
रसाळ शब्द रचना, शुद्ध, स्पष्ट आणि सुरेल स्वर, भक्ती रस सगळे काही मंत्रमुग्ध करणारे होते.
भर दुपारी ऊन्हातून चालत असतांना अचानक मार्गात एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेत आपण जी शितलता अनुभवतो तसेच काहीसे अनुभवायला मिळाले.
खूप धन्यवाद. 🙏🙏
हीभुपाळी ऐकताना कुठे ही असलो तर स्वामी चे दर्शन होते
शमिका ! संगीतामधील सर्व प्रकारांमधे आजवर ऐकलेल्या लाखो गाण्यात तुमची ' सोहम् घोष ' ही भूपाळी माझ्या साठी कायम अव्वल स्थानावर राहील !
लागोपाठ अनेक वेळा ऐकूनही कंटाळा येत नाही ; समाधान होत नाही !
स्वामींचा आणि सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहेच ; तो तसाच सदैव राहो ।।
@@dilippendharkar1738 मनःपूर्वक धन्यवाद
खूप दिवसांनी सुरेल भूपाळी ऐकायला मिळाली, सुंदर.
जितकी स्वामी मंदिरातील शांतता, त्या सम शांत, सुरेल आवाज
ओढ 11 September स्वामींची पुण्यतिथी
वाह क्या बात है, अतिशय सुंदर.
शामिकाजी तुमचे मधूर स्वर आत्म्याला स्पर्श करतात. very nice 👍👍👍🙏🙏🎉🎉🎉🎉
खूप सुंदर ,जीवाला भिडणारी रचना आहे।एकदा ऐकली की ऐकतच रहावी वाटते.मनाचा ताण, थकवा नष्ट करणारी.आ.श्रीरामजीनी अप्रतिम रचना केली आहे.आणि शमीकाच्या स्वरांनी तिला अलंकारित केले आहे.शमिका,आम्ही तुला सा रे ग म प पासून पाहतोय.तुझं गायन अप्रतिम आहे.अशीच गात रहा.☺️☺️☺️🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻😇😇
Shamikachi hee madhur aavajatil Soham -Bhupali mana prasanna karte. Shamikaa daivee swarsaundaryachi apoorva denagi labhleli aahe. Abhinandan Shamika!
जय श्री राम जय श्री कृष्ण रामकृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏😊🌹सुंदर प्रसन्न सुमधुर शांत सुमंगल चैतन्य स्वरूप भूपाळी 🌺😊🙏
अर्थपूर्ण भुपाळी खूप सुंदर आवाजात गायलीस शमिका.कुठे तो वाद्यांचा कल्लोळ आणि कुठे तुझे शांत सूर सकाळ तर प्रसन्न होतेच पण मी केव्हाही ऐकते.मन शांत होते.
ही भूपाळी रोज सकाळी ऐकतो व माझ्या गुरूंच स्मरण करतो.
Jai गुरूदेव हिराजी बाबाजी ❤
शमिका, अतिशय गोड आवाज आहे तुझा! खरोखरच गुरूकृपाच आहे ही,तसेच रचना पण खुपच अर्थपूर्ण आहे.गोड आवाज असा की कानात घुमतच रहातो.गुरूतत्वाला साष्टांग प्रणिपात!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍
अतिशय प्रासादिक ,भक्तिरसमय,मन प्रसन्न झाले
🙏🙏🙏
।।ॐ॥ स्वामी स्वरुपानंदांची भूपाळी रचली आहे सुंदर शब्दांत आणि शमिकाताईॅंचे गायनी कळेने अतिशय सुश्राव्य झाली आहे.रोज ऐकावी अशी ही भूपाळी.शमिकाताई अभिनंदन व साधुवाददेखिल!
अप्रतिम गायन आहे हैं।किती सुंदर पवित्र शब्द, भाव,
Khup Sundar . Man agdi shant Ani premal hote . Kharach positive ahw
अतिशय अर्थपूर्ण रचना व सुमधूर व भावपूर्ण आवाजात सादर केलेली भूपाळी.
डोळे मिटून भक्तीमय अंत:करणाने ऐकून मन भरून गेले. धन्यवाद.
Thank you 🙏🏻
शब्दांच्या पलीकडचा अनुभव देणारी रचना आणि आत्मानंद देणारा मधुर आवाज🙏
कालच्या 23/04/022 ला पावस ला स्वामींचे दर्शन घेतले आणि पहाटे काकड आरती चा लाभ घेतला त्याची आठवण झाली ,अतिशय अप्रतिम आवाज 🙏
आमच्या रोजची पहाट ह्या सुंदर भूपाळीने, कृपावंत भला…., उदारा जगदाधारा… अशी सुंदर होते… आनंदाची अनुभूती स्वामी तुमच्या सुमधुर आवाजाने देतात…. सर्वांचीच पहाट अशीच वर्षानुवर्षे होत राहो🙏🌹🙏
जय श्रीराम!अतिशय सुंदर,अर्थपुर्ण व श्रवणीय!खूप छान!👌💐👌
My Aai played this early morning while i was still asleep and this sweet voice, made me open mu eyes and it felt surreal, the best moments of my life, the lyrics are heart touching and pure, namaskar to you and the composer! 🕉️
One of the best bhoopali and sadguru stavan🙏🙏🙏
सद्गुरू स्वामी स्वरूपानंद माऊलींची ही प्रासादिक भूपाळी ज्यांनी रचली त्या गुरुकृपांकित लेखणी चे धनी आठवले जीना आदरपूर्वक नमस्कार,
शामिकाताई च्या ओजस्वी स्वरांनी
ही भाव पूजा अधिकच श्रवणीय झाली आहे, संगीत अप्रतिम
आठ दिवसापूर्वी आपल्या सुमधुर आवाजात ही सुंदर शब्द रचना
ऐकण्याचा योग आला. आता रोज सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींची ही प्रार्थना ऐकतो आणि प्रसन्न दिवस सुरू होतो. खूप खूप धन्यवाद शमिकाजी.
Thank you so much! Means a lot 🙏🏻🙂
@@ShamikaBhideofficial खुपचं सुंदर नमस्कार
दैवी शब्द रचना, दैवी गायन 🙏
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
Atishay bhavpurn manala bhvnari v gurucharni man tallin karnari gayliy bhupali shabbs shamika
अतिशय , सात्विक ,सुमधुर आणि भक्तिभावाने भारलेली अशी भूपाळी ऐकून मनाला खूप शांत आणि प्रसन्न वाटले.👌👌👍
खूप खूप धन्यवाद! 🙏🏻😊
फारच छान, फार दिवसांनी असे सुंदर स्वर कानी पडले.शमिका ही भुपाळी अतिशय सुंदर म्हटली आहे.आता ग दि मां चा जोगवा राग सुद्धा असाच होऊ दे.(कोन्यात उभी सतार सरला रंग).
खुप छान गायले आहे अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते.
चिंगुले, एवढ्या लहान वयात !!!blessings, 🎉 ही उच्च पातळी वरच्या अध्यात्माची भावना आहे.
Khupch Sweet voice..... sarkhe eykave asa Sweet voice.....Sadguru krupa Ashirwad
Shamima Khulna bhavpurna gaileli ani Prasanna techs sada shimpanari…bhupali…khap chan.. ami Roja eekato🙌🙏
खूपच सुंदर स्वामींची रचना व शमिका चा गोड आवाज मन खूपच प्रसन्न झाले,👌👍
भिडे शिमिका ताई नमस्कार, सुंदर अतिशय मधुर आवाज, अतिशय बोधप्रद भूपाळी ,धन्यवाद