उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
HTML-код
- Опубликовано: 17 янв 2025
- उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा #narmadaparikrama #prikrama
त्वदिय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
नर्मदा परिक्रमा ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे. या परिक्रमेच्या मार्गात एक हजाराहून अधिक तीर्थस्थाने आहेत.
संपूर्ण भारत परिक्रमा सोडल्यास नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी आणि अवघड परिक्रमा आहे.
संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी तीन वर्षे, तीन महिने, तेरा दिवस आहे. पूर्वी ही परिक्रमा पायीच पूर्ण केली जात असे. आता सायकल, मोटार, बस या वाहनांचा उपयोग करून ही परिक्रमा कमीत कमी दिवसांत पूर्ण केली जाऊ शकते. अशी परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरुवात करून तिथेच समाप्त केली जाते. हे सारे अंतर सुमारे ३८०० किलोमीटर आहे.
प्राचीन काळी मार्कण्डेय ऋषींनी, तर आधुनिक काळात प. पु. वासुदेवानंद सरस्वती यांनी संपूर्ण नर्मदा परिक्रमा केली होती.
संपूर्ण नर्मदा परिक्रमेइतकीच पुण्यदायी
गरूडेश्र्वरजवळ गुजरात राज्यात बडोदाजवळील तिलकवाडा ते रामपुरा अशी नर्मदा नदी उत्तर वाहिनी अर्थात उत्तर दिशेने वाहते. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते. नर्मदापुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये चैत्र महिन्यामध्ये जर “उत्तर वाहिनी” नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, अशी साक्षात नर्मदामैय्याने खात्री दिली आहे.
तीन वर्ष तीन महिन्यांमध्ये किंवा सहा महिन्यामध्ये संपूर्ण पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे प्रत्येकाला उत्तरवाहिनी असते. त्यामुळे तिलकवाडा- रामपुरा- तिकलवाडा अशी उत्तरवाहिनी नर्मदा नदीच्या प्रदक्षिणा घालण्याला ‘उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा’ असे म्हणतात.रामपुरा-तिलकवाडा-रामपुरा किंवा तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा अशी ही परिक्रमा पूर्ण करता येते.अशी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यात केल्यास अधिक पुण्य मिळते अशी दृढ श्रद्धा आहे. संपूर्ण नर्मदा परिक्रमेची पहिली पायरी म्हणूनही या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेकडे पाहिले जाते.एकवीस किलोमीटरचा पायी प्रवास या सहलीत करायचा असतो.या वर्षी गुडी पाडवा दि.9 एप्रिल रोजी आहे. अर्थात 9 एप्रिल रोजी चैत्र महिना सुरु होत आहे.म्हणून 9 एप्रिल पासून 1महिन्यात हि परिक्रमा करावी. अनेक ट्रॅव्हल्स वाले या 3 दिवस परिक्रमे चे आयोजन करतात. त्यांचा सर्व साधारण कार्यक्रम हा असा असतो. गरुडेश्वर येथेनर्मदा स्नान,टेंबे स्वामी समाधी दर्शन तसेच गरुडेश्वर महादेवा चे दर्शन करून दुपारी तसेच संध्याकाळी महाप्रसाद केला जातो. रात्री 8 वाजता घाटावर नर्मदा आरती करावी दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजल्या पासून संकल्प सोडून परिक्रमेला सुरुवात करतात.
music credit: Avinash Satoskar
Pramod Salkar
Sanjay Salkar
#gurumauli #tilakwada #chaitraparikrama
#marathivlogs #narmada #uttarvahininarmadaparikrama #narmadehar #amarkantak
#parikramavideo #garudeshwar#tembeswami #gurudevdatt
#marathi#marathisongs#dattachiarati#ramanandsagar#dattaguru
नर्मदे हर
हर हर नर्मदे हर हर नर्मदे 🙏🙏🙏
नर्मदे हर
मातृ श्री नर्मदे हर
भगवंत
जय जय श्री राम
महादेव
हर
नर्मदे हर 🙏
🙏नर्मदे हर 🌹🙏😊
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏
वाहानाने कशी करायची
🙏
नर्मदे हर
नर्मदे हर