संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • संजयच्या लग्नात आमची झाली चुकामुक 😍 | Konkani Marathi Wedding - जावळे Mandangad (Konkan) माझ्या मावस भावाच्या संजयच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. मंडणगड तालुक्यातील जावळे गावात माझ्या मावशीचे गाव आहे. जावळे गावाजवळच माझे आंबवली हे गाव आहे. माझी मोठी बहीण हिला सुद्धा जावळे गावातच दिले आहे. मी खास करून संजयच्या लग्नाला कोकणातील माझ्या गावी गेलो होतो. माझी बायको वर्षा आणि मी लग्नासाठी गेलो परंतु एक अडचण अशी होती की, आमच्या नात्यामध्ये दोन लग्ने होती. एक लग्न माझ्या सासरोडी साखरी गावात तर दुसरे लग्न जावळे गावात होते. नवरी मुलगी मंडणगड तालुक्यातील गुडेघर गावची आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने घराच्या समोरील मांडवात लग्न लागतात. गावच्या लग्नामध्ये एक वेगळीच मजा असते. हळदीचा कार्यक्रम, लग्न, वरात, लग्नानंतरही आणि अगोदर बरेच कार्यक्रम हे घरी होत असतात. खास करून सगळे नातेवाईक या निमित्ताने एकत्र जमतात. माझे सगळे मामा, काका, मावश्या आजोळची माणसे एकत्र आले होते. थंडीच्या दिवसात लग्न लागतात त्यांची मजा वेगळीच असते. गावी कोकणात लग्नात जी मजा येते ती कुठेच नाही. घरी लग्न असेल तर त्यासाठी वर्षभर जमवाजमव चालू असते. लग्नाच्या वेळेस घरात आठवडाभर एक उत्साहाचं वातावरण असतं. गावी कोकणात मांडवात होणारी लग्ने ही सर्व ग्रामस्थ, वरिष्ठ मंडळी आणि नातेवाईक यांच्या साक्षीने होतात. #KonkaniMarathiWedding #MarathiWedding #JavaleMandangad #sforsatish
    संजयच्या लग्नात आमची नवरा बायकोची चुकामुक झाली कारण आम्ही लग्नात एकत्र नव्हतोच. दोघांना वेगवेगळ्या लग्नाला जावे लागले. साखरी आणि जावळे गुडेघर गावातील लग्नाला आम्ही दोघांनी उपस्थिती दिली. जावळे गावाला मी खास हळदीला अगोदरच गेलो होतो. हळदीला रात्री खूप धमाल होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गुडेघर गावाला आम्ही सगळेजण लग्नाला गेलो. गाडीतून जावळे ते गुडेघर गावापर्यंत प्रवास केला. लग्नातले जेवण म्हणजे एक वेगळीच चव असते. हळदीला सागोती होती. लग्नातल्या जेवणाच्या भाज्या यांची चव निराळीच असते. आम्ही लग्न लावून पुन्हा जवलर गावी आलो तेव्हा प्रदनु आणि बायको वर्षा वरात बघायला आले होते. आमची भेट झाली. प्रदनुला हा सगळा अनुभव नवीन होता. प्रांजूला आम्ही मिस केले. प्रदनु जाम मस्तीखोर झाला आहे. त्यासोबत दिवस कसा जातो कळतच नाही. एकदंर लग्नाचे दोन दिवस मजा आली. सगळ्या नातेवाईकांना भेटता आलं. लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. आम्ही चंदर मामाकडे राहिलो होतो तिने खूप चांगली आमची सोया केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या आंबवली गावी निघालो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गावाला कोकणी पद्धतीने लग्न कसे लागते हे दाखवले आहे. लग्नाचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 367

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 3 года назад +30

    छान.. लग्न म्हटले की उत्साहाला उधाण येते हे खरे.. बँड बाजा वराती..मस्त👍👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +4

      होय, गावी कोकणातील लग्न म्हटले की धमाल मस्ती आणि एक वेगळंच वातावरण ❤️😍😊

    • @vaishalijagdale4916
      @vaishalijagdale4916 3 года назад +1

      @@SFORSATISH qqqq wy cy

  • @Checkmate12184
    @Checkmate12184 3 года назад +2

    कोकणातील लग्न बघून मजा आली. यानिमित्ताने कोकणी संस्कृतीचा एक पैलू अनुभवता आला...धन्यवाद

  • @subhashnathbhajan3327
    @subhashnathbhajan3327 3 года назад +1

    सतिश हा व्हिडिओ पाहतांना खरोखर लग्नाचा आनंद घेतला
    खुप छान व्हिडिओ बनवला अगदी बारीक सारीक माहिती दिली.आणि तो मामांनी दिलेला ड्रेस खूप छान वाटत होता.

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 3 года назад +3

    लग्नाचं आमंत्रण येऊन सुद्धा काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकलो नाही तरी दादूस तुझा सुंदर video पाहूनच खुप छान गावी असल्या सारखे वाटत होते.धन्यवाद

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ❤️ hoy yenar hotat na

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 3 года назад +4

    भारीच असते कोकणातील लग्न एकदम पारंपरिक पद्धतीने छान video

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 3 года назад +2

    नेहमी प्रमाणे जबरदस्त चित्रीकरण 👍👍👍👍

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 3 года назад +7

    जबरदस्त ‌विडीओ खुप छान विडिओ लग्न झालेल्या संजय व नव वधू यांचे अभिनंदन

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 3 года назад +2

    खुप छान हळदीचा कार्यक्रम. .

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 года назад +2

    खूप मस्त वाटत होते लग्न बघायला खूप मज्जा आली मस्त व्हिडिओ.

  • @bedundhvishal
    @bedundhvishal 2 года назад +1

    सावन महिना मा गाणं love kokan

  • @rohitghade922
    @rohitghade922 3 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ मी लग्नला नाही येऊ शाखलो पण व्हिडिओ पाहून खूप आनंद झाले
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navanathbhojane7456
    @navanathbhojane7456 3 года назад +2

    छान आहे कोकणातील लग्न

  • @naavyachinchgharkar318
    @naavyachinchgharkar318 3 года назад +2

    ती हळद लावतेय ना ती स्वाती आहे मी ओळखते तिला माझ्या वर्गात शिकायला होती दादा खूप छान

  • @meghalaware5724
    @meghalaware5724 3 года назад +2

    Mi khuup enjoy kela video... 🤗 Dada khup ch chaan lagn sohla zala...

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +5

    खरी मजा हळदीलाच असते 👌👌शुभ लग्न सावधान 🙌🙌

  • @prajaktaraheja5006
    @prajaktaraheja5006 3 года назад +7

    खुपच छान आहे ही लग्नाची पध्दत 👌👌👍

  • @navnathpaygude3651
    @navnathpaygude3651 3 года назад +8

    सतीश दादा तुझे व्हिडियो कितीही मोठे असुदे मी संपूर्णपणे तुझे व्हिडियो बघतो 👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +1

      असेच प्रेम असुद्या

  • @sandeepchavan93
    @sandeepchavan93 3 года назад +1

    खूप माझ्या आली लग्न

  • @mitsuauto557
    @mitsuauto557 3 года назад +1

    छान.. लग्न म्हटले की उत्साहाला उधाण येते हे खरे.. बँड बाजा वराती..मस्त

  • @prashantadagale2454
    @prashantadagale2454 3 года назад +1

    अप्रतिम होता लग्नाचा व्हिडिओ आणि खास करून कोकणी पध्दत पारंपरिक विवाह दाखला
    व्हिडिओ आवडला

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +2

    परफेक्ट लग्नाचे शूटिंग केले आहेस. एवढा मोठा व्हिडीओ असून सुद्धा बघायला मजा आली. तुझा बालगोपाल फार स्वीट आणि क्यूट आहे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ❤️❤️😊😊🙏

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    खुप मस्त व्हिडीओ गांवाकडील लग्न सोहळा छान 👌👌👍👍

  • @pratikshakaravde4980
    @pratikshakaravde4980 3 года назад +1

    गावी लग्नाला खुप मज्जा नाचायला. येते खुप छान विडिओ 👌 दादा

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 года назад

    गांवच्या मातीशी प्रेम आणि आदर तुम्हा दोघामध्ये क्षणोक्षणी दिसून येतो

  • @sujatapoul1320
    @sujatapoul1320 3 года назад +2

    Kasa tak laun baghtoy pradnu pan shant vattoy kokanatle lagn 👌👌👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +1

    मस्तच अप्रतिम व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला कोकणी विवाह सोहळा 👌👍🙏

  • @sonalijadyal8229
    @sonalijadyal8229 3 года назад +6

    आमच्या कडे पण घाण्याचा हेच गाण बोलत , आणि नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ👌👌👌👌

  • @prajaktaraheja5006
    @prajaktaraheja5006 3 года назад +5

    हळदीची पध्दत खुपच छान आहे

  • @sheetalphoto8992
    @sheetalphoto8992 3 года назад

    खुप छान व्हिडीओ आहे आम्हि बडोदा गुजरात ला राहतो प्रत्येक व्हिडीओ पाहतो सुंदर

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 года назад

    Khup masst ....Lagnachi Kari maja gavalach asate..sagal parmparik ritiriwajapramane kary paar padat....ek vegalich maja asate......👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Hoy gavachi maja veglich

  • @prakashnikale3122
    @prakashnikale3122 3 года назад

    कोकणातील बैंजो पार्टी फार आवडली
    एकदम कडक होती आमच्या नाशिक कावडी प्रमाणे खूप छान दादा.

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 3 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ ❤️❤️ सगळे नातेवाईक भेटण्याचं एकमेव लग्न सोहळा नाइस व्हिडिओ 👍❤️❤️❤️❤️❤️

  • @komallambade2001
    @komallambade2001 3 года назад +1

    कोकणातील पारंपरिक लग्न रीती प्रमाणे होत ..मजा येते गावी लग्नात ..दादा कँमेरा वाला आंबवली मध्ये माझ्या दादाच लग्न होत तेव्हा तोच आला होता..

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 года назад

    खुप छान Video बनवलास भावा. मोठा होता Video पण मस्त. गावाकडील लग्नात मजाच काय और असते.

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 3 года назад

    सतीश दादा विडिओ मोठे बनवत जा , बघायला खूप मजा येते ☺️👌

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +2

    खूप छान झाले लग्न । तुमाला आमाला दोघी ना मझझा आली । जोडी मंस्त आहे । 👍👍❤️❤️ नवीन रीत बघायला भेटली । 👌👌👌🎉 खूप छान विडीयो ।

  • @baban152
    @baban152 3 года назад +2

    लग्न आणि खालू बाजा म्हणजे फुल धमाल 🥳🎊🎊🎉🎉

  • @dharashah361
    @dharashah361 3 года назад +2

    Nice traditional wedding rituals video

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 3 года назад +2

    Lay Bhari lagan, Navardev smile very Nice. Thanks for sharing such wonderful marriage video.

  • @laxmannaiknimbalkar5624
    @laxmannaiknimbalkar5624 3 года назад +2

    एकदम मस्त ...छान लग्न होत

  • @vijaylaxmirawat4454
    @vijaylaxmirawat4454 3 года назад +1

    बहुत सुंदर वीडियो गांव की शादी देख कर खूब अच्छा लगा।👍🏻😊

  • @vijaynaikwadi1820
    @vijaynaikwadi1820 3 года назад +1

    first time pahayla milale Kokani lagn... khup Chan

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +1

    खूपच छान शूट झाला लग्नाचा व्हिडिओ,प्रदनू एकदम क्युट दिसतो बरका,

  • @rohitghade922
    @rohitghade922 3 года назад +1

    माझ्या मेहुण्याच्या लग्नाला नाही मुले येयला पण ही तुमची व्हिडिओ पाहून खुप छान वाटले

  • @vilasvilas964
    @vilasvilas964 3 года назад +1

    एक नंबर सतिश हा लग्नाचा विडिओ बघून गावची खूप खूप आठवन आली खूप छान मस्त

  • @shwetak6194
    @shwetak6194 3 года назад +2

    Khupch sundar oouttm aahey Lagna 🙏🙏Jay sadguru 🙏🙏

  • @kk846
    @kk846 3 года назад +1

    गावी लग्नाची मज्जा वेगळीच असते. मी एकदा पाहून पून्हा एकदा व्हिडिओ पाहिला. खुप छान.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +1

    Khup chaan video sarvanni khup chaan majjja aali bhagayela lagna

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 3 года назад +2

    क्या बात है 👌
    ....सतिश शुभलग्न कार्याचा पुर्ण प्रवास (2 दिवसाचा) अवघ्या 47.07 मिनिटात समोर ठेवलास....छान....मंगेश कदम.दापोली

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      खूप आभार 🙏
      होय म्हणूनच मी छोटासा व्हिडीओ बोललो 😍😊 लग्न आधी आणि नंतर बरेच विधी असतात जे दाखवण्यासारखे आहेत ✍️❤️ माकू, हळद उतरणे

    • @mangeshkadam7518
      @mangeshkadam7518 3 года назад

      @@SFORSATISH खुप छान...Good Work...

  • @kedar394
    @kedar394 3 года назад +1

    Chaan video aahe dada

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +1

    लग्न सोहळा खुप छान व जबरदस्त पार पडतं आहे . तोही ऑर्केस्ट्रॉ सह . खुप धमाल केली मंडळींनी . धन्यवाद

  • @parirevaentertenment9608
    @parirevaentertenment9608 3 года назад

    छान आहे हळद सगळे किती मस्त enjoy करतात तुमचे व्हिडिओस खूप आवडतात मला

  • @sandeepchavan93
    @sandeepchavan93 3 года назад +1

    लय भारी वाटलं लग्न बघुन 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @deepakmayekar8523
    @deepakmayekar8523 3 года назад +1

    Lagnacha vidio khup chyan vatla lai bhari

  • @Sh_raddha11
    @Sh_raddha11 3 года назад +2

    खुप जबरदस्त जल्लोष वाटतो दादा गावाच्या लग्नाचा. ही मजा मुंबईत नाही.👍👍आणि बेंजो फुलं भारी 🙏🙏

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 3 года назад +2

    खुप छान

  • @prathameshshinghare3279
    @prathameshshinghare3279 3 года назад

    लय भारी दादा

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 года назад

    सतीश. भावा खुप. सुंदर. Nice. वीडियो 👍

  • @anitabelekar2184
    @anitabelekar2184 3 года назад +1

    एकदम मस्त.

  • @rajeshreesalunkhe5297
    @rajeshreesalunkhe5297 2 года назад

    Mast dada lay bhari

  • @chanchalakunder3282
    @chanchalakunder3282 Год назад

    Wonderful wedding vedeo.

  • @shivanipatekar4141
    @shivanipatekar4141 3 года назад +1

    लग्न घरबघून खुपच छान वाटले

  • @sachinkhedekar4311
    @sachinkhedekar4311 3 года назад +1

    दादा मला तुमचे विडीयो खूप आवडतात 👍👍👍👍

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 года назад

    मस्त जकास

  • @monikakastewad4979
    @monikakastewad4979 2 года назад +1

    Mast

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 года назад

    खूप छान लग्नं झालं आणि वरात ही खुप छान झाली .

  • @sahilGamingYTSj
    @sahilGamingYTSj 3 года назад +2

    Tumcha ha video amhaala khup avdla

  • @atulbarate3174
    @atulbarate3174 3 года назад +1

    Mastt zal lagn
    Amhi pahilyandach pahil kokanatle lagn

  • @manojauti8081
    @manojauti8081 3 года назад +1

    Ek number radha radha full jallosh

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад +1

    लग्नाचा व्हिडिओ खूप छान बनवला आहेस. तुमचे सर्वांचे व्हिडिओ मी भरपूर जणांना शेअर करते

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you, khup abhar ❤️

  • @maheshraje0133
    @maheshraje0133 3 года назад +1

    भाऊ कलवरी आवडली वाटत

  • @nishamasavkar2862
    @nishamasavkar2862 3 года назад +1

    Mumbai peksha gavi langnat khup chan vate

  • @ankitajadhav497
    @ankitajadhav497 3 года назад

    Khup chaan dada

  • @Yashrane07
    @Yashrane07 3 года назад +2

    खूप भारी।।।।

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 3 года назад +2

    लय भारी माझ्या आली . छान बनवली व्हिडिओ👌👌😍

  • @abhijeet4471
    @abhijeet4471 3 года назад

    one of the best video..about kokan culture and kokani people........superb satish..

  • @jotikamle6405
    @jotikamle6405 3 года назад +3

    Hello Satish khup enjoy dhamal keli lgnnat..pahun khup maja vatli..as vatle ki aapan swtah tith aahot...pahilyanda kokan til lgnn bgitl...khup chan lgnn zal.. Sanjay la aamche kdun Happy married life ..👌👌🌹 💐💐💐💐💐

  • @mihikachavan3624
    @mihikachavan3624 3 года назад

    Hi me तुमची new subscriber aahe...anI maze Maher मंडणगड तालुक्यातील विन्हे गाव..... मी staff nurse aahe ... me mazya pandamic posting nAnter positive aale teva 5 divas ताप आणि headache nanter तब्बल 5 divsani मी मोबाईल baghitala आणि तेव्हा तुमचे videos pahile ....khup chaan aahet तुमच्या padu la बघून माझ्या मुलाची च आठवण मला यायची तशी मी माझ्या बाजूच्याच रूम मध्ये होम qaurantine आहे ....पण तब्बल 20 divasanchya वर झाले मी माझ्या मुलाला n mullila जवळ घेतलेच नाही....पण तुमच्या videos na बघून मला खूप बरे vatatyche......मला ही रानात जायला खूप आवडते सो तुमचे video me khup enjoy kele ...tumchya छोट्या ची मस्ती बघून maza lek samor यायचा.... तुमच्या wife khup chan jeven बनवता त quarantine madhe तुमची dum biryani बघितली आता घरी गेल्यावर नक्की ट्राय करेन माझ्या मिस्टर ना खूप आवडते सो तुम्ही खूप छान काम करता आहात .....in such crusial days ur vedioes done great job for me seriously....tumhi mothe aaahet ghara madhye khup chan kalji घेता सगळ्यांची.....I hope mala hi asa chan motha bhau hava hota...god blessed you all🙏

  • @sanjivanisrecipes3648
    @sanjivanisrecipes3648 3 года назад +2

    Saglech khupch Chan Aahe Lagn pan khupch Chan Aani saglyat Chan tu Aahes Satish tuje Bolane Aani Tuja swabhav Bayko Aani mulanvarche Prem Baghun mi Tuje video Baghte aasech Prem kart ja prasun khupch cute Aahe 😘😘😘

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 года назад +2

    Mast ek number. Nice wedding. Really miss this type of wedding. U all look superb.

  • @sandeepnandgaonkar7854
    @sandeepnandgaonkar7854 3 года назад +1

    सुंदर,

  • @reshmalokhande760
    @reshmalokhande760 3 года назад +1

    खूप भारी वाटतं ना गावाकडचे लग्न म्हटलं की खूप मस्त मजा येते एन्जॉय दादा वहिनी ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️💐💐💐💐💐💐

  • @sandeshbhagane190
    @sandeshbhagane190 3 года назад +1

    Nice

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад +2

    Khup Chaan👌 Hardik Shubhecha 👍

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 3 года назад +1

    Lagn jam bhari zal aani lgna pn Chhan padhtine present kelas bhava 👌👌👍😊

  • @vinodkatkar2230
    @vinodkatkar2230 Месяц назад

    Very good👍🎉🎉 nice shadi

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 3 года назад

    छान

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 3 года назад +4

    आमच्या कडे हळदी सकाळची असते आणि म्हवा रात्रीचा असतो

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 3 года назад +1

    Atishay sundar vlog yaa nimitta ne kokanatil paramparik lagn pahayla milaale... Thanx satish dada

  • @ramdalvi7706
    @ramdalvi7706 3 года назад +2

    वा
    🙏

  • @atulmore7888
    @atulmore7888 3 года назад

    Kup bhari yaar mastch

  • @rampingalkar5357
    @rampingalkar5357 3 года назад +1

    सुंदर...

  • @krushnathvada5471
    @krushnathvada5471 3 года назад +1

    Mast dada mide uru yade

  • @mangeshshirke
    @mangeshshirke 3 года назад +1

    खूप छान ! कोंबड्याने पहिली लग्नाला परवानगी दिली केवढा योगायोग !! कारण तोच संपूर्ण श्रुष्टीला जाग आणत असतो !!
    --
    मंगेश शिर्के

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад +2

    Ekach number.... Dada 😍😍

  • @nilaybhatt1671
    @nilaybhatt1671 3 года назад +1

    Lai bhari satish dada..khup aavadla video

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +1

    लई भारी , संपूर्ण लग्न छान दाखवले |🙌🏼
    कोरी चहा पियाला येतो 😊

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 3 года назад +1

    खूप खूप छान झालाय लग्न

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад

    मस्त मज्जा आली व्हिडीओ बघून 👌👌👌

  • @siddhivajirkar5495
    @siddhivajirkar5495 3 года назад +1

    छान विडिओ दादा 👌👌👌
    पुढे असेच मस्त विडिओ बनवत रहा दादा 🙏🙏🙏