अंध महिलेच्या मदतीला धावला देवदूत मयुर शेळके, जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावरून चिमुकल्याला वाचवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 апр 2021
  • मध्य रेल्वेवर असलेल्या वांगणी स्टेशनवर आपल्या जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या रेल्वे पॉईंटमन मयुर शेळकेचा सर्वत्र कौतुक केलं जातंय. रेल्वे मंत्री पियुष गोयल सोबतच सेंट्रल रेल्वे डीआरएम अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा मयुरच्या या धाडसाचं कौतुक केलं. शनिवारी वांगणी स्टेशन प्लॅटफॉर्मवर चालत जाणाऱ्या एका अंध महिलेच्या सोबत असलेले लहान मुलं चालत असताना अचानक प्लॅटफॉर्महून खाली पडले. त्याचवेळी त्या ट्रॅकवर येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेकडे पाहून प्रसंगावधान दाखवून अवघ्या 7 सेकंदात त्या मुलाचा जीव मयुर शेळकेने वाचवला. हा अंगावर शहारे आणणाऱ्या कौतुकास्पद प्रसंगबाबत मयुर शेळके यांनी एबीपी माझाही बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Комментарии • 2,8 тыс.

  • @marathi_corner
    @marathi_corner 3 года назад +409

    *भाऊ Salute तुला यार जीव वाचवलास... तुझा पण आणि त्या मुलाचा🙏🙏👍👍 तुला एक पुरस्कार प्रदान करावा सरकार ने*

  • @mkallnews
    @mkallnews 3 года назад +1002

    भावा सैलुट तुझ्या कामाला एकच नंबर

  • @mr.govindwaghmode5989
    @mr.govindwaghmode5989 3 года назад +114

    सध्या महाराष्ट्रात चर्चा कोरोनाची नव्हे मयूर भाऊ शेळके यांचीच आहे💟🙏
    "तुम्ही दाखवलेल्या साहसामुळे अख्खा महाराष्ट्र आपला आभारी आहे"🙏

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад +2

      किति भाग्यवान असेल ती आई जिने मयुर दादा सारख्या मुलाला जन्म दिला

  • @uttamchougule7540
    @uttamchougule7540 3 года назад +80

    मराठी माणूस काही पण करू शकतो, हे आज सिद्ध केलं भावा तू, खराच आज तुझ्या रुपात मी आज आपल्या राजांचा मावळा पहिला, जय शिवराय,

  • @kgkraps
    @kgkraps 3 года назад +178

    एका आई ला मुलगा परत मिळवून दिला ज्या आई ला माहीत ही नसेल काय झालं असत त्या आई चा आशीर्वाद तुला आणि आई गावदेवी तुझा पाठीशी आहे भावा खूप खूप अभिनंदन

    • @ravimore332
      @ravimore332 3 года назад +1

      भावाला मनापासून कडक सॅल्युट

  • @mallinathnaykode4401
    @mallinathnaykode4401 3 года назад +245

    मृत्यू च्या संकटातून बाहेर काढणारा वाघ म्हणजे मयूर शेळके धन्यवाद जीव वाचवलं तुम्ही लहान मुलाचं सलाम........

  • @rrpawar1568
    @rrpawar1568 3 года назад +61

    भाऊ तुझ्या कार्याला तमाम महाराष्ट्राचा मानाचा मुजरा🚩🚩

  • @prashantmahajan3534
    @prashantmahajan3534 3 года назад +35

    त्याने एक नाही 2 जीव वाचवले त्या लहान मुलाचा आणि त्या अंध आईचा पन जी एकदम रेल्वे रुला जवळ आपल्या मुलाला शोधन्याचा प्रयत्न करत होती, भावा salute तुला

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад

      हो अगदी बरोबर

  • @user-ho8gu1fz9h
    @user-ho8gu1fz9h 3 года назад +117

    रिअल हिरो आहे मयुर देशाचा प्रत्येक नागरीक तुझ्यासारखा हिरा जन्माला यावा सल्युट भावा🙏

  • @vlogbeast007
    @vlogbeast007 3 года назад +290

    सत्कार झालाच पाहिजे तसेच promotion झाले पाहिजे

  • @surajsir2884
    @surajsir2884 3 года назад +14

    श्री मयुर शेळके यांनी देशाच्या सीमेवर लढणार्या सैनिकासारखे महान कार्य केले आहे. त्यांच्या बहादुरीला सलाम..

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад

      हो बरोबर

  • @lakhanshripati1878
    @lakhanshripati1878 3 года назад +24

    शिवबांचे. मावळे 60 भारी है वाक्य तुला. लागु होते भाऊ,🙏 जय जिजाऊ 🙏जय शिवराय🙏

  • @prashantgurjar6205
    @prashantgurjar6205 3 года назад +412

    अभिनंदन करतो शेळके साहेब तुम्हाला ईश्र्वर उदंड आयुष्य देवो

    • @anilpawar8998
      @anilpawar8998 3 года назад +5

      अभिनंदन भाऊ

    • @NITV9
      @NITV9 3 года назад +1

      Fund devo

    • @rakeshpatel4061
      @rakeshpatel4061 3 года назад +3

      Great sarji

    • @manojghulaxe3527
      @manojghulaxe3527 3 года назад +4

      Ho

    • @latamude9939
      @latamude9939 3 года назад +1

      Thank you Seklake Tumche Kautuk Karane Devasarkhe Tumhi Balala Vachavle Far Ear Danyawad.

  • @hackersden6817
    @hackersden6817 3 года назад +295

    बघा हा पण शुर मराठीच शेवटी आम्ही शिवबाचे मावळे❤️

  • @kk7134
    @kk7134 3 года назад +16

    जबरदस्त्ं कामगीरी मित्रा...रेल्वे ट्रॅकमधल्या स्लीपर्स आणि खडीवरून इतक्या वेगात धावणं खरं तर कठीण आहे पण जीवतोडून धावलास आणि त्या बाळाचे प्राण वाचवलेस...सलाम तुझ्या धाडसाला

  • @kalpanaawate5016
    @kalpanaawate5016 3 года назад +3

    भावा तु खरच शिवाजी महाराजांचा धाडसी मावळा .तुला मानाचा त्रिवार मुजरा.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 3 года назад +85

    खूप दिवसातून महाराष्ट्रात एक चांगली गोष्ट घडली.... कोरोना मुळे माणुसकी मेली होती आज पुन्हा जिवन्त झाली असं वाटलंय. महाराष्ट्रला तुझा अभिमान आहे भावा... देव तुला मोठं आयुष्य देवो !!!

    • @commonman6382
      @commonman6382 3 года назад +1

      Ho Corona Vaze doka kharab zhale hey baghun bagun, ata khup bara vatata ashi batmi bagun.

  • @tusharkadam9844
    @tusharkadam9844 3 года назад +285

    एखाद्या व्यक्तीची सर्वात सुंदर संपत्ती ज्ञानाने भरलेली नसते, परंतु प्रेमाने भरलेले हृदय, ऐकण्यासाठी तयार कान आणि इतरांना मदत करण्यास तयार असलेला हात असतो.... सलाम तुमच्या कर्तुत्वाला...👌👌👍👍

    • @rajunathale1375
      @rajunathale1375 3 года назад +2

      भावा तुझे मनापासून धन्यवाद तुला 1000 तोफांची सलामी

    • @sunandawadibhasme4933
      @sunandawadibhasme4933 3 года назад +2

      खरा योद्धा Salut............

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад +2

      बरोबर आहे

    • @mohanjeetbansal3503
      @mohanjeetbansal3503 3 года назад +2

      @@SisterWood jai sadguru🙏🙏🙏🙏🙏

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад +2

      @@mohanjeetbansal3503 jay sadguru Mohanjeet

  • @shivdastambe2398
    @shivdastambe2398 3 года назад +6

    मयूर आपण एक नाही तर दोन जणांचे प्राण वाचवले. प्रत्यक्ष मुलाचे आणि प्रत्येक आईसाठी प्राणाहून प्रिय असणार्‍या तिच्या अपत्याचे.You are really Great Mayur.

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 года назад +5

    अशी देवदूत सारखी माणसे आहेत.. म्हणून जग चाललय.. उदंड आशिर्वाद भाऊ तुला 👍👍👍🙏

  • @prakashnikam2116
    @prakashnikam2116 3 года назад +127

    साक्षात देवदूत पाहिला, साक्षात मृत्यू समोर असताना एका लहान मुलाला वाचवलं हे सोपं काम नाही, परमेश्वर मयूर शेळके यांना उदंड आयुष्य देवो.

  • @chetanrao1849
    @chetanrao1849 3 года назад +78

    धन्य ती माता जिने तुझा सारख्या वीरास जन्म दिला........

  • @yatinn834
    @yatinn834 3 года назад +11

    आम्हाला मयूर भाऊसारख्या रिअल लाईफ हिरोचा अभिमान आहे. आपल्या सारखे लोक महाराष्ट्राचे नाव गोरांवित करतात. आपण आणि कुटुंब नेहमीच निरोगी रहा, ही आमची प्रार्थना आहे.
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад +1

      हो बरोबर

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 3 года назад +3

    खरोखरचा देवदूत... माणुसकीचा जिवंत झरा... किती नम्र पणे सर्वांचे कौतुक स्वीकारले .. देवाचा दूत आहेस..

  • @dnyaneshwarmuthal6195
    @dnyaneshwarmuthal6195 3 года назад +96

    शंबर तोफांची सलामी भाऊ👍

  • @alwaysthank7843
    @alwaysthank7843 3 года назад +36

    माणसाची किंमत असणारा माणूस🙏 सलाम तुमच्या कार्याला❤️

  • @hhdghgfffgg
    @hhdghgfffgg 3 года назад +28

    देव तारी त्याला कोण मारी
    साक्षात देव मानवी रुपात आले धावून🙏🙏🙏🙏
    खूप खूप धन्यवाद मयूर भाऊ

  • @chayakshtriya4216
    @chayakshtriya4216 3 года назад +1

    मयुर तु खुप मोठ धाडस केलस तुझ कौतुक करायला शब्द अपुरे पडतील एका आईचे तुला लाख लाख आशिर्वाद

  • @swapnilingale3180
    @swapnilingale3180 3 года назад +64

    मयूर शेळके सर याच्या सारख्या शूर माणसांची सरकारी खात्यात् खुप गरज आहे,
    सलाम सर तुमच्या कार्याला 🙏🙏👍👍

  • @user-hn4co1tc5w
    @user-hn4co1tc5w 3 года назад +111

    😥💪✊ भावा तु मन जिंकलास महाराष्ट्राचा ..असेच काम प्रत्येक राजकारणी,,डाॅक्टर केले आसते तर कित्येक जिवे वाचले आसते,,,😥 Salute Bro

  • @appasahebhinge6728
    @appasahebhinge6728 3 года назад +5

    त्या सात सेकंदांमध्ये त्यांच्या मनात एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या मुलाला वाचवायचे👌👌

  • @rajusasane5233
    @rajusasane5233 3 года назад +3

    खरच मयूर तुम्ही स्वतःआ जीवा ची परवाह न करता एका बाळा ला वचवल आणि या जगाला मनुसकी जीवंत आहे है दाखवून दिल 💐🙏

  • @sudhakarahire3290
    @sudhakarahire3290 3 года назад +39

    स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकच बालकाचा जीव वाचवणाऱ्या रेल्वेमन शेळके यांना खरोखरच मनापासून सलाम👏🌷🌷💐💐💐💐

  • @manoharpatil3772
    @manoharpatil3772 3 года назад +76

    भावा तु देवदूत बनुनच आला... सैल्युट तुझा कार्याला... 🙏🙏🙏🙏

  • @akashtathe510
    @akashtathe510 3 года назад +3

    खरच भावा जेवढ कौतुक करावे तेवढं कमीच आहे ...... दादा तुमच्यासारखे स्वतःचा जीव धोक्यात घालवून इतरांच्या मदतीला धावणारे लोक खूप कमी आहेत ..... तुम्हाला बघून खूप गर्व होत आहे ...... यासमोरही अशीच सेवा देत राहाल हीच अपेक्षा करतो 🙏😊

  • @s.r.pproduction8076
    @s.r.pproduction8076 3 года назад +1

    रियल हिरो , हाच खरा हिरो आहे जीवनाचा👌👌👌💖💗

  • @atishvirle219
    @atishvirle219 3 года назад +109

    माझ्या गावचे श्री मयूर सखाराम शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता. त्या लहान मुलाचे जीव वाचवले it's real hero from my village Karjat (Talwade) . Great job mayur .. GBU ❤️👍🙏

    • @pankajpawar6604
      @pankajpawar6604 3 года назад +3

      आगरी 👑 किंग 🙏❤️🙏

    • @mazagaonmazakokan3991
      @mazagaonmazakokan3991 3 года назад +6

      दादा आमच्याकडुन मयुर दादांना आभिनंदन सांगा. मी प्रमोद बालगुडे ठाणे. कर्जतला येण्याचा योग आला मयुर दादांना भेटायला आवडेल. नक्कीच येईन.

    • @atishvirle219
      @atishvirle219 3 года назад +1

      @@mazagaonmazakokan3991 नक्कीच 👍🙏

    • @atulmore7888
      @atulmore7888 3 года назад +1

      Mayur la abhinandan sanga.......tynchykadhe bgun ajun he samajdar manuski shillak ahe asa janvle

    • @atishvirle219
      @atishvirle219 3 года назад

      @@atulmore7888 नक्कीच ❤️👍🙏

  • @tanvib.2462
    @tanvib.2462 3 года назад +144

    वास्तविक नायक चित्रपटात नसतात परंतु ते आपल्या आसपास असतात. तुमच्याबद्दल अभिमान आहे मयूर, इतरांबद्दल फार कमी लोक विचार करतात आणि त्यांचे जीवन वाचवतात. तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. कृपया त्यांना शौर्य पदक द्या, उत्कृष्ट कार्य करत रहा.🙏👌

  • @javednaikwadi8169
    @javednaikwadi8169 3 года назад +4

    मयूर तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व्यक्तींची देशाला गरज आहे. तुम्ही केलेल्या धाडसी कामाची शासनाने दाद घ्यावी.धन्यवाद

  • @vitthalinglepatil9168
    @vitthalinglepatil9168 3 года назад +6

    मनुष्य जातीतला वाघाचं काळीज असलेला असा माणूस आज प्रत्यक्षात पाहिला यालाच म्हणतात वाघाचं काळीज एकदम क डक सॅल्यूट तुमच्या या हिम्मत बाज कामाला 👑मयूर भाऊ शेळके👑💪💪💪💪🙏🙏👍👍

  • @sddheshraut2080
    @sddheshraut2080 3 года назад +89

    आज मी बोलू शकतो की मी देव पहिला ❤️

  • @anjalishelar2338
    @anjalishelar2338 3 года назад +48

    मयुर तुमच्या धाडसाला तोड नाही. समाजात तुमच्यासारखे खरे हिरो आहेत ,जे आपलं कर्तृत्व सिद्ध करतात. तुमच्या कार्याला सलाम ,

  • @rajagaikar
    @rajagaikar 3 года назад +5

    भावा ग्रेट जॉब...महाराष्ट्रातील प्रत्येकाला आज तुझे कौतुक आहे...पण विडियोला डिसलाईक करणारे 275 डाणचोर कोण...?

  • @krushnanavhate4157
    @krushnanavhate4157 3 года назад

    मयुरेश कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे अशा कर्मचाऱ्याची प्रशासनाने दखल घेऊन फक्त गौरवच नाहीतर बढती देऊन असे काम करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.सलाम मयुरेश.

  • @sushanthatte1138
    @sushanthatte1138 3 года назад +24

    खूप खूप धन्यवाद मयूर शेळके.....ह्यांना शौर्य पुरस्कार दिलाच पाहजे असे कोणा कोणाला वाटते आहे.

  • @mangeshkshirsager2732
    @mangeshkshirsager2732 3 года назад +96

    मयुर दादांना खूप खुप सलाम व दादा तुम्ही देवासारखे धावून आले

  • @uttamdaruwale8359
    @uttamdaruwale8359 3 года назад +4

    अगदी मनपूर्वक आभार. तूझ्या ह्या धैर्या ला great salute 🙏. Be blessed.👍

  • @rahulingle8597
    @rahulingle8597 3 года назад +1

    खरोखरच या देवरूपी माणसाने आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाऊन त्या मुलाचा जीव वाचवला खूप खूप अभिनंदन या देवमानसाचे

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 года назад +36

    तुझे करू तेवढे कौतुक कमीच आहेत भावा तुनी नवीन पिढीला नवा आदर्श घालुन दिलास मनापासुन अभिनंदन 💐💐💐💐👍👌

    • @gkgeneral6187
      @gkgeneral6187 3 года назад

      Good job bro

    • @jagadishpatil7203
      @jagadishpatil7203 3 года назад

      All Indians have proud of you bro, You are really brave.God bless you

  • @amitsagare4003
    @amitsagare4003 3 года назад +33

    शेळके यांना शासनाकडून पुरस्कार मिळायला हवा तसेच रेल्वे कडून प्रमोशन मिळायला हवे .... शेळके सलाम तुम्हाला

  • @sunandawadibhasme4933
    @sunandawadibhasme4933 3 года назад

    अभिनंदन, आभार मानले तेवढे कमीच आहे अतुलनीय कामगिरी ,खरा समाजसेवक.

  • @rajuchavan5534
    @rajuchavan5534 3 года назад +7

    तुमच्या शौर्याला कोणत्या शब्दात व्यक्त करावे कळत नाही साहेब. देव सदैव तुमच्या पाठीशी राहो..... हीच प्रभू चरणी प्रार्थना..

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад

      हो अगदी बरोबर

  • @sachingandhi1215
    @sachingandhi1215 3 года назад +67

    देव कोणालाही संधी देत नसतो ,ज्यात देवपन असते ,त्यालाच ही पुण्य संधी मिळते ,भईया आपणास आमचा प्रणाम।

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 3 года назад

      You are right sir

    • @tatanvastadvastad8146
      @tatanvastadvastad8146 3 года назад

      खरय दादा तुमचं

    • @pravin-m
      @pravin-m 3 года назад

      लाईन मॅन स्वतः
      देवा ला धन्यवाद देत आहेत.
      दोघाचे जीव वाचवणार तोच एक परमेश्वर
      जो आत्मा परत घेतो व आत्मा देतो
      धन्य त्याचे नाव या जगता वरी....

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 3 года назад +42

    Praud of you.आई बाबांना शतशः प्रणाम अश्या मुलाला जन्म दिला मयुरजी नशीबवान आहात

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 года назад +1

    मयुर शेळके really आपण great आहात.God bless u.आपण खरे देवाच्या रुपाने येऊन त्या लहान मुलाचे प्राण वाचविले.अक्षरशः आपण जिवाजी बाजी लावुन तुमच्या धाडसाला यश आले.मी म्हणतो,आपला राष्ट्रपतीनी शौर्य पदक देऊन सत्कार केला पाहिजे .Hats off

  • @shivajijadhav9937
    @shivajijadhav9937 3 года назад

    मयुरं जी तुमच खुप खुप कोतुक तुचयासारखयाची खर्चरच गरज आहे धन्यवाद भावा

  • @magandasgilbile6621
    @magandasgilbile6621 3 года назад +57

    भारत माझा देश आहे सर्व माझे बान्धव आहेत.हि प्रतिग्जा तू पूर्ण कलीस.तूझ्या सारख्या धाडसी व्यक्तीच देशाची शान आहे.salute to you my brother.

  • @amjadpathan1958
    @amjadpathan1958 3 года назад +36

    खूपच भारीना भावा सैल्यूट तुला,,जय महाराष्ट्र ,गर्व होत आहे भावा तूझ्या वर💐💐

  • @hrishikeshpund2004
    @hrishikeshpund2004 3 года назад

    माऊली तुमच्या कार्याला आमचा सलाम

  • @aryakesarkar6036
    @aryakesarkar6036 3 года назад

    पूर्ण व्हिडिओ पहिला ज्या पद्धतीने स्वताच्या जीवाची पर्वा न करता एक लहान मुलाचं जीव वाचवला मयूर शेळके हा खरा हिरो आहे.....आपणास मनापासून प्रणाम🙏🙏

  • @Artofoptionlearning12
    @Artofoptionlearning12 3 года назад +45

    गर्व आहे भावा तुझा आम्हाला👍👍

  • @vivekgurunathraoinamdar518
    @vivekgurunathraoinamdar518 3 года назад +45

    मयूर हजार तोफांची सलामी तुझ्या शूर कर्तृत्वाला कोटी कोटी सलाम

  • @mayurpatole3251
    @mayurpatole3251 3 года назад +1

    मयूर तू जे काय लहान मुलाचे जीव वाचवण्यासाठी मदत केलीस त्या साठी तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहे. तुझ्या कार्याला सलाम 🙏

  • @jadhavaditya6710
    @jadhavaditya6710 3 года назад +1

    Salute तुझ्या कार्याला

  • @shankarmote492
    @shankarmote492 3 года назад +72

    सलाम सर तुमच्या धाडसाला.....

  • @pankajgandhare7219
    @pankajgandhare7219 3 года назад +85

    स्व:त हा चा जिव धोक्यात घालून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन भावा जय हिंद जय महाराष्ट्र

    • @mgadhave1
      @mgadhave1 3 года назад +1

      Proud off you, Mayur, God bless you, you are hero

  • @paragdeore5146
    @paragdeore5146 3 года назад +6

    भावा तुला दिल से salute🙏👍

  • @sambhajidakare1542
    @sambhajidakare1542 3 года назад +1

    चांगल्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे,बडे जिगरवाला ,salute

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 3 года назад +68

    भावा
    सेलुट तुझा धाडसाला👏👏🙏🙏

  • @rameshraghatwan1492
    @rameshraghatwan1492 3 года назад +25

    आईला मुलगा किती मोलाचा आसतो हे आईच जानते दादा तु तर ऐका खरी गरज आसलेल्या मातेला देवासारखी मदत केली ‌ त्या माऊलीने खुप आशिर्वाद दिले आहेत हेकाम सारा देश लक्षात ठेवील ‌की आजही मानुसकी जिवंत आहे हेच तु जगाला काही क्षनात दाखवल खुप खुप कौतूक ्आपला आदर्श जीवनमूल्यांची ठेव राहील सलाम भाऊ

  • @jaydeepbhorje9832
    @jaydeepbhorje9832 3 года назад

    थँक्स भावा. डोळ्यात पाणी आल प्रसंग पाहून.

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 года назад

    🙏 खरचं धन्यवाद मयुर दादा.... जिव धोक्यात टाकून चिमुकल्या चा जिव वाचवणारे ... खरे भारतीय नागरिक... सॅल्युट दादा. 🙏 खुप अभिमान वाटतो तुमच्या बद्दल.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 3 года назад +25

    अंध आई व मुलाला पाहून आनं दा श्रु आले , मयुर तूला उदंड आयुष्य लाभो, महान कार्य , सलाम करतो तुला मित्रा,,🙏🙏🙏🙏🙏gbu

  • @6373abhi
    @6373abhi 3 года назад +91

    वाघाच काळीज लागत अशी हिम्मत असायला. आता फकत त्याला प्रमोशन दया प्लीज...🙏

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 3 года назад +2

      Barobar juste tarif karun chalnar nahi tuna paritoshik dya,l promotion dya.

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад

      हो बरोबर आहे

  • @ranjanashelake
    @ranjanashelake 3 года назад

    खूप कौतुकास्पद कामगिरी!👌👌👍👍✌✌

  • @shaikhayub5749
    @shaikhayub5749 3 года назад

    मयूर सर,
    तुमच्या सारख्या माणसाची आज भारताला खूप गरज आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही एका अंध आईच्या मुलाला वाचवले आहेत..त्या आईचा आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर लागेल. यात तिळमात्र शंका नाही.. तुम्ही केलेल्या धडसापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आज तुमच्या या seen मुळे अनेकांच्या मानावर असे धाडस करण्या साठी एक प्रेरणाच आहे.. शेवटी एवढंच मयूर भाऊ तुमच्या धडसाला, कर्तुत्वाला, कर्तव्याला ,पुरुर्षार्थाला सलाम तुमच्या सारख्या माणसाची आज देशाला खूप गरज आहे. देश तुमची नक्कीच दखल घेईल.. पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..असेच तुमच्या हातून सत्कर्म घडो ..💐💐💐💐
    (पुस्तकाच्या स्वरूपात काहीतरी लिहील भविष्यात मी या 7 सेकंदावर ... आणि त्याचा title असेल...
    # 7 सेकंद )

  • @prakashshelke4455
    @prakashshelke4455 3 года назад +28

    दादा तुझे त्या मुलाला वाचवण्यासाठी धाडस बघून, तुझ्या याकार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @agromarket2188
    @agromarket2188 3 года назад +70

    Praud of you तुमचा अभिमान आहे

  • @dipak4545
    @dipak4545 3 года назад

    ग्रेट आहेस भावा तू तुझ्या या धाडसी कार्याबद्दल तुझे खुप खुप आभार ..

  • @reshmaoman9544
    @reshmaoman9544 3 года назад +1

    छान काम केले मयुरदादा 💐💐👏🏻👏🏻👏🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

  • @amolraj730
    @amolraj730 3 года назад +21

    सलाम आहे भावा तुला.….....व्हिडिओ पाहून अंगावर काटे आले आणि डोळ्यात आनंदअश्रू सुद्धा आले...खरच भावा तुला पुनश्च माझा सलाम.

  • @deepakwani9073
    @deepakwani9073 3 года назад +48

    मयुर शेळके यांच्या शौर्याला सलाम 🙏🙏🙏 आणि ए बी पी माझा यांनी या प्रसंगाची दखल घेत ती बातमी प्रसारित केली तरी आमच्यासारख्या सामान्य जनतेला एक प्रेरणा देणारी आहे
    खरचं तुमचं स्लोगन खूप काही शिकवत
    उघडा डोळे बघा नीट...
    तरी त्यांचे व ए बी पी माझा परिवाराचे आभार...
    धन्यवाद
    दिपक वाणी
    जळगांव ( MH )

  • @pundlikdhule7811
    @pundlikdhule7811 3 года назад +2

    भावा अभिनंदन...जीव धोक्यात घालून तू एक जीव वाचवला...देव मानले तुला भावा..❤️❤️

  • @rahul4561
    @rahul4561 3 года назад

    भाऊ सलाम आहे तुला खूपच अप्रतिम अशी ही कामगिरी केली आहेस देवदूत च आहेस त्या मुला साठी त्या मुलाचे प्राण खेचून आणलेस.
    भाऊ ग्रेट आहेस.

  • @bhupendragharat2886
    @bhupendragharat2886 3 года назад +60

    तुम्ही जे काम केले कुणीही करुशकनार नाही तुम्हाला मानाचा मुजरा 🙏

  • @kumarsutar407
    @kumarsutar407 3 года назад +33

    अभिनंदन साहेब तुम्हाला मुलाचा जिव वाचवलं

  • @ganeshshirkar9494
    @ganeshshirkar9494 2 года назад

    अतिशय खुप छान खरंच मयुर त्या आईचे डोळे वाचवले खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन नाही तर त्या आईला आधार काय होता खरंच अभिनंदन मयुर

  • @dhananjaykalal6101
    @dhananjaykalal6101 3 года назад

    श्री. मयूर भाऊ, अभिनंदन. एका अंध आईच्या मुलाचे प्राण वाचवून तुम्ही जे शौर्य दाखविले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. स्वतः चा जिव धोक्यात घालून तुम्ही एका अंध आईच्या मुलाला वाचवून तुम्ही स्वतःचेच नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाव ही सुवर्णाक्षरांनी लिहिले ही आम्हा मराठी माणसांसाठी गौरवास्पद आहे. शासनाने याची दखल घेऊन आपणास लवकरात लवकर पदोन्नती द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पुनश्च अभिनंदन.

  • @RajeshNarsale645
    @RajeshNarsale645 3 года назад +12

    कोटी कोटी आभार तुझे मयुर शेळके....देव माणसात असतो याचे तु जिवंत उदाहरण आहेस मित्रा..... महाराष्ट्र सरकारने या माणसाच्या शोर्याचा सम्मान करुन त्याला पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे

  • @swadishtamasala678
    @swadishtamasala678 3 года назад +27

    आज पर्यंत फक्त movies मध्ये बघितले होते पण तुम्हीच आहेत खरे Hero... Salute Mayur Sir

  • @gaikwad770
    @gaikwad770 3 года назад +2

    Hatss up to u Mayur💐💐. समाजात आजही माणुसकी शिल्लक आहे हे तू दाखवून दिलंस 🙏..

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 3 года назад +2

    मयूर तुझ्या कामाचा नक्कीच गौरव होतोय सगळीकडे .स्वतःच्या जीवाचा धोका पत्करुन तू हे जे काम केलंस त्याचं चित्रण बघताना डोळ्यात पाणी तरळलं ,धन्य आहेस तू

  • @pandurangdhole3906
    @pandurangdhole3906 3 года назад +22

    आमच्या साठी आज पासून मयूर शेळके च रिअल सूपर हिरो🙏🙏🙏🙏🙏🙏🙌

  • @AkasH-ly9bu
    @AkasH-ly9bu 3 года назад +22

    मित्रा मन जिंकलस शब्द अपुरे आहेत. तुझ्या कार्या साठी ,, तुला उदंड आयुष्य लाभो 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @anilsawant5516
      @anilsawant5516 3 года назад

      या भावाला शौर्य पदक देऊन गौरविण्यात यावे

  • @sagarsawant2276
    @sagarsawant2276 3 года назад +2

    अभिनंदन शेळके साहेब तुम्हाला निरोगी व उदंड आयुष्य लाभो.......

  • @vijaypatankar734
    @vijaypatankar734 3 года назад

    मयुर शेळके यांचे मना पासुन धन्यवाद.....
    त्यांना त्यांच्या सेवेत बडती मिळाली पाहीजे

  • @vijaykarad4660
    @vijaykarad4660 3 года назад +17

    शब्द नाहीत तुझ्या कौतुकाला मित्रा, दिल जीत लिया तुमने!!💐💐💐👍👍👍👍

  • @kaminisonawane6540
    @kaminisonawane6540 3 года назад +30

    मयुर आभीनंदन डोळ्यात पाणी आले
    तुझ्या सारख्या मानसाची देशाला गरज आहे

  • @ramkalamagar9600
    @ramkalamagar9600 3 года назад

    खूप छान भाऊ अस धाडस ज्याच्या मनात करुणा असते असा माणूस च करु शकतो

  • @sachinsagolale1331
    @sachinsagolale1331 3 года назад +1

    महाराष्ट्राचा मावळl गर्व आहे मराठी माणसाचा जो स्वतःच स्वार्थ न बघता दुसऱ्याच विचार करतो