ओवाळू आरती मदन गोपाळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • ओवाळू आरती मदन गोपाळा ।
    श्यामसुंदर गळा वैजयंती माळा || धृ ||
    चरणकमल ज्याचें अति सुकुमार ।
    ध्वजवज्रांकुश ब्रीदाते तोडर । १.
    नाभिकमलीं ज्याचें ब्रम्हयाचे स्थान ।
    हृदयी पदक शोभें श्रीवत्सलांछन । २.
    मुखकमल पाहतां सूर्याच्या कोटीं ।
    मोहिले मानस कोंदियली दृष्टीं । ३.
    जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान |
    तेणें तेंजे कोंदले अवघे त्रिभुवन । ४.
    एका जनार्दनीं देखियेलें रूप ।
    रूप पाहों जातां झालें तद्रूप । ५.

Комментарии • 5