तव तेजाच्या दिव्य रश्मीने | Tav tejachya divya
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- तव तेजाच्या दिव्य रश्मीने, भवितव्याची क्षितिजे उजळिन
तुझ्या मागुनी ध्येयपथावर युगे युगे मी चालत राहीन ॥धृ.॥
सुमन समुच्चय तुला अर्पिता, मला दिले तू उदात्त दर्शन
ध्वजापुढे मी शब्द दिला तुज, परमेशाला साक्षी ठेवून ॥१॥
विरले संभ्रम स्थिरावले मन, तुझे दिव्य नेतृत्व पत्करून
किती चालणे प्रश्न न करिता, तुज हाती हे दिधले जीवन ॥२॥
शिरावरी प्रारंभापासून, संघर्षांचे हे कातळ घन
अजुनी ना वनवास संपला
नित्य आपदा देत निमंत्रण ॥३॥
आज केशवा समर्पणाचा, प्राणदीप मी तुजला लावीन
ध्येयभास्करा मीही तुझ्यातील अंश तुझ्यातच मिसळून जाईन ॥४॥
Khup chan abhinandan
अत्यंत हृद्य
👌
खूप च सुंदर प्रसन्न जी❤
👌👌👌🙏🙏🙏
प्रसन्ना शिक्षक,
खूप खूप सुंदर गायल्यामुळे तुमचे सगळ्या मागण्या पूर्ण होऊदेत. 🥳🎈🎉🎊🎂🛍🎁💐
प्रसन्न खूप छान गायले आहे❤
@@pramodpetkar धन्यवाद प्रमोद 🙏🏻😊