नांदेड: खत बियाणे विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची लूट,दुकानदारांकडूनच व्यापाऱ्यांच्या फसवणुकीच बिंग उघड.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • सध्या महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असुन शेतकरी राजा पेरणीची लगबग आणि खत- बी बियाणे, कीटक नाशके खरेदीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान मराठवाड्यात आधीच दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला असताना आता खत बियाणे, कीटक नाशक कंपन्या ह्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून चढ्या दरानेच नाही तर तब्बल तिप्पट दराने खत, बी बियाणे व कीटक नाशके विक्री करत असल्याचे बिंग खुद्द कृषी सेवा केंद्र असणाऱ्या एका व्यापाऱ्यांनी उघड केलंय. दरम्यान 150 ml कीटक नाशक 2700 एम आर पी अथवा दर असणारे, शेतकऱ्यांनी खरेदी करताना यात मोल भाव करून नियमानुसार 900 रुपयांना विक्री करता येते,तर एक लिटरचे सूक्ष्म अन्न द्रव्य 1800 रूपये एमारपी असनारे मोलभाव करून केवळ 650 रुपयांना विक्री व्हावे असा नियम आहे. पण नांदेड येथील व्यापारी 150 मिली चे कीटक नाशक शेतकऱ्यांना थेट 2500 ते सूक्ष्म अन्न द्रव्य थेट 1500 रुपयांना चढ्या दराने विक्री होत असल्याची आर्थिक लूट कृषि उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी सचिन कासलीवाल यांनी उघडकीस आणलीय.

Комментарии • 196

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 2 месяца назад +102

    कसलीवाल साहेब स्वतःचे कृषी केंद्र असून सुद्धा तुम्ही आवाज उठवला आहात, आज जो तो स्वतःच बघत आहे सलाम तुमच्या कार्याला .

  • @kamlakarkamthe2983
    @kamlakarkamthe2983 2 месяца назад +56

    हिच लुट मेडिकल मधे सुदधा आहे केसलेवार साहेब सारखे दूकानदार आपण सुरवात केली तुमच अभिनंदन

    • @manojanwane4022
      @manojanwane4022 2 месяца назад +2

      दाढी वाल्याचे अच्छे दिन आहे न.
      आता घ्या शेकुन.

  • @sanjayjadhav1551
    @sanjayjadhav1551 Месяц назад +9

    कासली वाला नी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बरोबर घेऊन आपण आपलं काम पाहू अडीअडचणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्यावे ही विनंती आशा व्यापाऱ्यांचा आम जनतेकडून खूप खूप धन्यवाद बाबा🎉

    • @mohanparade1265
      @mohanparade1265 Месяц назад

      या संघटना लगेच मॅनेज होतात

  • @jayeshpatil-ko9ss
    @jayeshpatil-ko9ss 2 месяца назад +15

    खूप धाडसी काम करत आहात साहेब...
    महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आपल्या सोबत आहे..

  • @ravindrakhairnar6875
    @ravindrakhairnar6875 2 месяца назад +17

    कासलीवाल साहेब सलाम तुमच्या कार्याला, परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो, हाच खरा "जाणता राजा"

  • @DilipTidake-ze7yo
    @DilipTidake-ze7yo 2 месяца назад +7

    सचिन भाऊ तुम्ही रासायनिक औषधांचा त्रिफळा उडवला तुमचे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार..डी.आर.तिडके

  • @umakantshete8225
    @umakantshete8225 2 месяца назад +24

    कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्याची होणारी लूट थांबवावी

    • @ganeshkale9414
      @ganeshkale9414 2 месяца назад +1

      सूट देणारे लूट कशी थांबवणार.

  • @daulatkarle7258
    @daulatkarle7258 2 месяца назад +34

    खूप खूप छान शेठ कुठं तरी ही सुरवात होणं गरजेचं होतं,एक नंबर शेठ

  • @Malhr
    @Malhr 2 месяца назад +11

    देशात सर्वात जास्त शेतकऱ्याला लुटले जात आहे .

  • @bhaskardhorde433
    @bhaskardhorde433 2 месяца назад +21

    कोणी तरी बोलले पाहिजे, ही चागली सुरवात आहे

  • @umakantshete8225
    @umakantshete8225 2 месяца назад +13

    कांदा जास्त भावाने विकला तर परेशानी वाटते आता सरकारला कळत नाही का एवढ्या महाग आणि पेस्टिसाइड विकली जात आहे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 месяца назад +34

    याला जबाबदार लोकं राजकारणी लोक आहे शेतकरी मेला 😂😂😂

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 2 месяца назад +12

    कमी रेट मध्ये विकतात म्हणून बाकीच्या दुसऱ्या दुकान दाराने कंपनी कडे तक्रार केली असेल म्हणून कंपन्या प्रेशर देतात???

  • @rameshwarkalbande3056
    @rameshwarkalbande3056 Месяц назад +3

    शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवल्या बद्दल तुमच्या चॅनलचे व कासलीवाल साहेबांचे स्वागत .

  • @bhagwatpandule1128
    @bhagwatpandule1128 2 месяца назад +5

    भाऊ तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻

  • @manish9696
    @manish9696 2 месяца назад +5

    शेतकऱ्यांनी ब्रँड च्या मागे न लागता, चांगला रिजल्ट आणी कमी किंमत मध्ये जे मिळेल ते घेऊन उत्पादन खर्च कमी करावा

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 2 месяца назад +19

    सर्व कापणी वाल्यांचे पुढारी मंत्री आणी मोटे आधीकारी ना हापते आहेत त्या मुळे काहि बदल होत नसतो

  • @madhavkhadgave823
    @madhavkhadgave823 Месяц назад +1

    कासलीवाल साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन, हे अस बोलायला जिगर लागते, आपण ती हिम्मत दाखवलाय खूप खूप अभिनंदन, शेतकऱ्यांची खूप लूट होते मार्केट मधे, MRP वर खूप जास्त किंमत असते पण दुकानदार मनमानी भावाने सर्व प्रॉडक्ट विकतात.. न्यूज चॅनल चे पण आभार

  • @mohanparade1265
    @mohanparade1265 Месяц назад

    धन्यवाद कासलीवाल साहेब शेतकऱ्यांसाठी खुप मोलाचं काम करत आहात

  • @dnyanum4285
    @dnyanum4285 2 месяца назад +4

    खुपच छान माहिती दिली साहेब 🙏🙏

  • @gajananthakre5690
    @gajananthakre5690 2 месяца назад +4

    आपण सुरुवात केली खूप खूप धन्यवाद भाऊ शेतकऱ्याची खूप लूट चालू आहे

  • @sanjaykhairnar7033
    @sanjaykhairnar7033 Месяц назад +2

    I am proud of you sir.

  • @user-wy5df9cr6x
    @user-wy5df9cr6x 2 месяца назад +5

    साब हे तुमचे कार्यक्रम खूप चांगले राबवले आहे असेच कार्यक्रम राबवत चला शेतकऱ्यांची कल्याण

  • @subhashdihari6519
    @subhashdihari6519 12 дней назад

    कासलीवाल साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @sachinmatere8558
    @sachinmatere8558 Месяц назад +1

    सेल्यूट तुमच्या कार्याला 👍

  • @gajanandhumal6647
    @gajanandhumal6647 2 месяца назад +13

    सरकार रशिया च योद्ध रुकु शकतो मग हे का नाही

  • @balirampuyad1501
    @balirampuyad1501 2 месяца назад +9

    याला शासकीय सिस्टम जबाबदार आहे कित्येक वर्षांपासून बुकींग प्रमाणे बियाणे दुकानदारांना दिल जात नाही जाणीव पूर्वक तुटवडा निर्माण करुन भाव वाढवून जनतेची लुट करतात

  • @bhaskarhambarde2817
    @bhaskarhambarde2817 2 месяца назад +1

    कासलीवाल साहेबांचे आभार 🌹🌹
    .....

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 2 месяца назад +3

    Great कासलीवाल साहेब

  • @shyamraowayal6389
    @shyamraowayal6389 Месяц назад +2

    कृषी विभाग झोपला

  • @namdevfajge6749
    @namdevfajge6749 Месяц назад

    Dhanyawad kasliwal saheb

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 2 месяца назад +3

    ह्या दुकानदार ला सलाम, धन्यवाद शेठ

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 2 месяца назад +4

    राम राम भाऊ आपल्या कार्याला आम्ही पूर्ण सहकार्य क रनार

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 2 месяца назад +33

    यांच्या दुकान चा पत्ता द्या आम्ही त्यांच्याकडून खरेदी करू

    • @shivagraphics7056
      @shivagraphics7056 2 месяца назад +2

      Nanded la ahe ya

    • @pandurangveer2134
      @pandurangveer2134 2 месяца назад

      @@shivagraphics7056 पूर्ण पत्ता द्या

    • @MHSMARTFARMING
      @MHSMARTFARMING 2 месяца назад

      नांदेड मध्ये कुठे आहे दुकान पूर्ण ऍड्रेस मिळेल का ​@@shivagraphics7056

    • @madhavkathewade7813
      @madhavkathewade7813 2 месяца назад

      नाव सांगा दुकान चे

  • @jalshingshinde6661
    @jalshingshinde6661 Месяц назад

    कासलीवाल सावकार तुमच्या पाठीशी सर्व शेतकरी खंबीरपणे उभे राहतील जय जवान जय किसान

  • @h.bstatusstatus6985
    @h.bstatusstatus6985 Месяц назад

    भाऊसाहेब खुप खुप अभिनंदन

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 2 месяца назад +1

    धन्यवाद साहेब शेतकरी खरी माहिती दिल्याबदल

  • @balupatil5995
    @balupatil5995 2 месяца назад +2

    कासलीवाल साहेब अशिच जनजागृती चालू ठेवा शेतकरी शेतकरी तुमच्या पाठीमागे उभे राहतील धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र

  • @ssarkate539
    @ssarkate539 2 месяца назад +2

    तुमच्या धाडसाला सलाम❤❤

  • @santoshrahane3028
    @santoshrahane3028 Месяц назад +1

    शेतकऱ्यांनो.. वेळ आली आहे सर्व राजकारणी लोकांना घरी बसवायची आहे..किती दिवस साहेब साहेब करत फिरणार.. साहेबांचा मुलगा दादा..साहेबांची मुलगी ताईसाहेब..
    हे बंद करा..
    शेतकरी व्हा..
    एकजुट व्हा..
    संघर्ष करा..

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Месяц назад

    खूप धन्यवाद कासलीवाल जी.आपण खरोखरच शेतकरी हिताचे काम करीत आहात.यापूढे आपणाकडून विश्वासाचे कृषी साहित्य खरेदी केल्या जाईल.

  • @NarayanThombre-mz7yv
    @NarayanThombre-mz7yv Месяц назад +1

    👌👍Gaert kam hay kasliawal setji ❤Thinks

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 2 месяца назад +1

    Good thought🙏🙏🙏🚩🚩

  • @atkalrajendra
    @atkalrajendra 2 месяца назад +4

    आपले हारामखोर आमदार,खासदार,कृषी विभाग याला सर्वस्वी जबाबदार आहे

  • @kalpanapatil9861
    @kalpanapatil9861 2 месяца назад +2

    गोलमाल है सब गोलमाल है

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Месяц назад +1

    बालचद कनहीराम काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर मी शेतकरी आहेत तर बियाणे आणि खते व कीडनाशके यांच्या दुकानदार दुप्पट भाव ने विकतात आणि हे सरकार शेतकरी कडे लक्ष देत नाही धन्यवाद जी

  • @laxmandeore273
    @laxmandeore273 Месяц назад

    आदामा, एफ. यम.सी, बी एस यफ,
    ह्या कंपनी वर बहिष्कार टाका जास्त दराने शेतकऱ्याला कीटक नाशके, व तणनाशक विकतात हयांचा भांडा फोड कसलीवाल ह्या विक्रेत्याने केला शेकऱ्याची लूट थांबवली त्यांचं मनापासून अभिनंदन 🌹🌹🙏🙏🙏

  • @AnilKalane-lu6vn
    @AnilKalane-lu6vn 2 месяца назад

    धन्यवाद सर असंच मार्गदर्शन करत राहा शेतकऱ्यांना

  • @pravinkhupse7682
    @pravinkhupse7682 2 месяца назад

    धन्यवाद कासलीवाल साहेब,

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 2 месяца назад +2

    हाज मुद्दा खरा आहे 100%

  • @chetankoli4735
    @chetankoli4735 2 месяца назад +1

    सेंद्रिय खत , औषध, जिवानु विकना रे कंपनी ची‌ पन चौकशी केली पाहिजे ते पन असेच लुटत आहेत..

  • @vilaschilpipre1005
    @vilaschilpipre1005 2 месяца назад +11

    सर रासी 779च्या कपाशी बॅग 1300 रु विकली
    पावती दिली 864रु ची. ही लूट नाही का

    • @rohitpawar578
      @rohitpawar578 2 месяца назад

      864 च बियाणे 1300 रु ला घेणं ही आपली चूक आहे,,बिल 864 च दिल तर मग 1300 रुपये देताना विडिओ काढून तक्रार करायला हवी होती

    • @ravikirankadam3306
      @ravikirankadam3306 2 месяца назад +2

      राशी चे बी मागणी न करता इतर कंपनी चे घ्या ना राशी चा हट्ट हास का

  • @chetankotwal1177
    @chetankotwal1177 2 месяца назад +1

    शेतकऱ्यांनी औषधाचा घटक बघून आणि आपल्याला परवडेल त्याचा परिणाम पिकावर बघून खरेदी करावी एकच घटक असलेले खूप प्रॉडक्ट आहे मार्केट मध्ये शेतकऱ्याने पण एकाच प्रॉडक्ट मागे न लागता पर्याय पण वापरून अनुभव घ्यावा

  • @resetagri
    @resetagri 2 месяца назад +2

    अनेक कंपन्या पाण्यात फूड कलर मिसळून नुसतेच पाणी, खत म्हणून किंवा निम तेल म्हणून विकतात.

  • @samirsayyad1416
    @samirsayyad1416 Месяц назад

    Super sir.

  • @user-kc2qg4yv8p
    @user-kc2qg4yv8p 2 месяца назад +1

    धन्यवाद कासलीवाल साहेब यामागे ईलेक्टाल बॉडचे गतीत आहे खालुन वर पर्यंत शेतकऱ्यांची लुट करतात

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Месяц назад

    सचिन कासलीवाल यांनी दुकान दार शेतकरी ला दुप्पट विकत आहेत हे सरकार ला दाखवून दिले बदल कासलीवाल यांना धन्यवाद जी

  • @SahadevKolhe-pg8nx
    @SahadevKolhe-pg8nx Месяц назад

    कासलीवार साहेब तूमी जे धाडस केल या धाडसी हिमतीला माझा जयभीम दादा 20:40

  • @Allrounderramesh99
    @Allrounderramesh99 Месяц назад

    thanks you are right

  • @babanborude7377
    @babanborude7377 2 месяца назад

    Dhanyavaad saaheb

  • @grasseyesgaming783
    @grasseyesgaming783 Месяц назад

    साहेब सलाम तुम्हाला

  • @vijaychoudhari7410
    @vijaychoudhari7410 Месяц назад

    धन्यवाद 🙏🙏

  • @sandipwaghwagh628
    @sandipwaghwagh628 2 месяца назад

    शतावर मुजरा साहेब आपल्या कार्याला

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 2 месяца назад

    धन्यवाद

  • @SanjaySagane-ke7lf
    @SanjaySagane-ke7lf 2 месяца назад +1

    या सर्व बाबीला कृषी विभाग जबाबदार आहे

  • @praladmunde457
    @praladmunde457 2 месяца назад

    Ek number Saheb

  • @jokking2247
    @jokking2247 2 месяца назад +1

    कृषी मंत्री व कृषी मंत्रालय झोपून रहा साहेब

  • @ravindragole9088
    @ravindragole9088 2 месяца назад

    शेतकऱ्यांचे मरण हेच सर्वांचे धोरण..

  • @sagardangar4013
    @sagardangar4013 2 месяца назад

    Khup chaan saheb💐💐💐

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 2 месяца назад +1

    Good guidance thanks dhanyad

  • @nandkumarjivane3289
    @nandkumarjivane3289 2 месяца назад

    खरंच ही काळाची गरज आहे

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 2 месяца назад +1

    कासलिवाल साहेब आम्ही आपल्या सोबत.

  • @SharadKaurati-zz9mn
    @SharadKaurati-zz9mn 2 месяца назад +1

    शेतकरी पिकवतात पण विकता येत नाही दुसर्याचे शिका व एक जुट व्हा

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 2 месяца назад +1

    बेस्ट भाऊ

  • @rajabhaudeshmukh5809
    @rajabhaudeshmukh5809 2 месяца назад

    अभिनंदन कासलिवार साहेब आम्हि तुम च्या सोबत आहो!

  • @santoshrahane3028
    @santoshrahane3028 Месяц назад

    नामांकित किंपनीचे औषध..तशाच पॅकिंग मधे विकले जातात..आणी रिझल्ट भेटत नाही

  • @walmikwankhade7421
    @walmikwankhade7421 2 месяца назад

    Great jwab

  • @ShindePatil-kz3ct
    @ShindePatil-kz3ct 2 месяца назад

    आपला आडरेसश टाका मि आपले मनापासून आभार आहे विलास शिंदे धानोरा रूई ता हादगा जि नांदेड

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 Месяц назад

    कृषी सेवा kendravale luto राहिले

  • @abhijitmudhol2566
    @abhijitmudhol2566 2 месяца назад

    Khup chan mahitivdili🙏🏻

  • @girishzambare5753
    @girishzambare5753 2 месяца назад

    Great salute to you sir 🎉🎉

  • @MasumShaikh-hn9ey
    @MasumShaikh-hn9ey Месяц назад

    Sir dhaniwad

  • @Ajinkyasir333
    @Ajinkyasir333 2 месяца назад +1

    Jabardast

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 2 месяца назад

    Salut to sachiji kasliwal

  • @vaibhavtathode1199
    @vaibhavtathode1199 2 месяца назад

    भाऊच बरोबर आहे.. या वर कारवाई hola पाहिजे

  • @wasudeodhe4711
    @wasudeodhe4711 2 месяца назад +1

    साहेब citigen pn आमच्याकडे 1700 rs च्या जवळपास विकासात आम्ही नांदेड la alo tr हे aushadh मिळेल kay

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 2 месяца назад +2

    शेतकरी हिताचा व्हिडिओ

  • @VivekBorde-il9rr
    @VivekBorde-il9rr 2 месяца назад

    🙏 thank

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 2 месяца назад

    कासलीवाल साहेब तुम्ही प्रत्येक प्रत्येक तालुक्यात औषध विक्रीचे दुकान चालू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कमी पैशात औषध उपलब्ध होते सरकारने कासलीवाल साहेबांना संरक्षण द्यावे

  • @sanjayjasud
    @sanjayjasud 2 месяца назад

    Really good information sir

  • @ashokthakare3488
    @ashokthakare3488 2 месяца назад

    चंदा दो और धंदा लो अस जर चालू आहे तेथे कार्यवाहीची कुणाकडून अपेक्षा ठेवायची हे तर काहीच नाही तुम्ही बारीक नजर टाकली तर पावलो,पावली आणी प्रत्येक क्षेत्रात असे महाभाग सापडतील हे सर्व नेतेमंडळी व अधिकारी यांच्या च आशीर्वादाने सुरू आहे... उलट अशा घटनेत वाढ होतांना दिसते.

  • @hemantgawai9379
    @hemantgawai9379 2 месяца назад

    असेच काम करा शेतकरीवर्गात जागरूकता येईलच आणी आपल्या सोबत येतील

  • @tejaspatil8902
    @tejaspatil8902 2 месяца назад

    Dhanyawad Dada mahiti badal

  • @SambhajiKadam-pp4rz
    @SambhajiKadam-pp4rz 2 месяца назад

    योग्य काम

  • @gajupatil644
    @gajupatil644 2 месяца назад

    Great salute kasliwar sir

  • @rameshkadampatil7278
    @rameshkadampatil7278 2 месяца назад

    Hi ahe khari patrakarita, we are salute to you sir ❤

  • @nandkishorjakkalwad5958
    @nandkishorjakkalwad5958 2 месяца назад +1

    मरपी मुळे ग्राहक ची व्यापारी आणि कंपनी ही लुट थांबयचे कडक कायदे करावे

  • @poojakharbalkar1044
    @poojakharbalkar1044 Месяц назад +1

    Karvai karavi. Setkari Virodhi Sarkar Aahe. BJP

  • @yashodhanautade4158
    @yashodhanautade4158 2 месяца назад +1

    साहेब नवीन किरीट सोमाया दिसतात

  • @mangeshholkar627
    @mangeshholkar627 2 месяца назад

    केंद्र सरकार, राज्य सरकार ने कंपन्यावर कडक कारवाई करून खते, बियाणे, औषध किंमतीवर नियंत्रण आणावे व शेतकऱ्यांची लूट थांबवावी.