एकटेच राहतात सह्याद्रीच्या घनदाट जंगलातील घरात | कुसूर पठार | Lives Alone Into Dense Forest | Kusur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुण्याच्या मावळातील विस्तीर्ण पसरलेल्या कुसूर पठारावर कोंडीबा आखाडे हे माळकरी आजोबा एकटेच राहतात...शेती करतात, गुरे राखतात...ट्रेकर्स मंडळींना दूध, दही, ताक देतात. मुले कामानिमित्त पायथ्याच्या कुसूर गावात असतात. शनिवार रविवारी मुले त्यांना भेटायला तसेच काही हवं नको ते बघायला डोंगरावरील घरी जातात.
    • एकटेच राहतात सह्याद्री...
    India has a mountain range extending from north (Gujarat - Maharashtra border) to south (till Kerala) called Sahyadri Mountain Range / Western Ghats.
    This mountain range is home of many types of wildlife as well as sanctuaries, forts, ancient sites.
    80 years oldman, Mr. Kondiba Akhade lives alone at top of mountain called Kusur Plateau located in Pune dist.
    I have interviewed him in Marathi to know how he lives, take care of cattle.
    Vdieo Recording : Ganesh Vispute
    Video Editing : Subodh Hattarki
    Editing App : Video Guru

Комментарии • 355

  • @subodhhattarki
    @subodhhattarki  Год назад +12

    मित्रांनो, आजच नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे....नक्की बघा.
    ruclips.net/video/g9f5NBZOqfE/видео.html

  • @rajendrabhosale3863
    @rajendrabhosale3863 Год назад +106

    ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड आहे त्यांना ही व्हिडीओ चांगलीच आवडणारच

  • @suhaskalekar
    @suhaskalekar Год назад +23

    "माचीवरला बुधा" ह्या पुस्तकातील व्यक्तीचित्र, खऱ्या जीवनात आपल्यामुळे अनुभवता आले.

  • @hrushikeshyarnalkar1059
    @hrushikeshyarnalkar1059 Год назад +11

    अशी प्रेमळ माणसं शहरात सापडणं कठीण देव ह्यांना उदंड आयुष्य देवो 🙏

  • @udaypatekar
    @udaypatekar Год назад +34

    किती सुंदर घर आहे आणि किती प्रेमळ माणसे आहेत. 👌👌👌👌👌👌👌👌

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Год назад +17

    जुन्या लोकातील धनगर समाज हा एक असा प्राणी आहे की ज्याला मरणाची भीती वाटत नाही त्यामुळे तो कुटल्याही जंगलात राहू शकतो

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 Год назад +14

    डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात राहून बाबांचे मन अगदी दहा वर्षांच्या मुलाएवढे निरागस,निर्मळ दिसले.हिरवाईत राहणारा माणूस सदासतेजच राहणार याच हे उदाहरण.

  • @ameyrane59
    @ameyrane59 Год назад +27

    वय वर्षे ८०+ , बाबांना पाहून आनंद झाला.🥰 सुंदर माहिती सुबोध 👏👏

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 Год назад +17

    स्वर्गीय आनंद मिळाला... दादा
    पुन्हा जुन्या काळात जावं असं वाटतं...तेच दिवस किती छान होते.अल्प गरजा. भरपूर माणूसकी.प्रेम. जिव्हाळा.... किती वर्णन करावं तरी कमीच ❤️🙏🚩

  • @narendrabhosale3843
    @narendrabhosale3843 Год назад +7

    जुन्या पिढीतल्या माणसांसोबतच्या संवादातून माहिती ही छान कळाली व निखळ निसर्गाच्या कुशीतलं त्यांचं जगणं,,,, हेवा वाटावा असंच आहे,,,,,,,

    • @rameshpawar7683
      @rameshpawar7683 Год назад +1

      संत तुकाराम महाराज हे सांगून गेले. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर वनात रहाणे. वनभोजन करणे. हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. छान माहिती दिली आपण धन्यवाद. जय महाराष्ट्र🚩🚩

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 Год назад +9

    बाबा खूपच काटक आहेत.. मस्त निसर्ग 👌

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 Год назад +13

    दर्या खोऱ्यात राहणारे भोळा भाबडा रांगडे धनगर समाज..छत्रपती शिवाजी महाराज च्या काळात सर्वात जास्त धनगर मावळे होते

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  Год назад

      👌🤝

    • @Berar24365
      @Berar24365 Год назад

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात जास्त धनगर मावळे होते
      हा निष्कर्ष कोणत्या पुराव्यांवरून काढला ?

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 Год назад +1

      @@Berar24365 जसा पुरावा तुम्ही म्हणता की मराठा ही जात आहे छत्रपती शिवाजी महाराजच्या आधीपासून...मराठा ही जात आहे ह्याला पुरावे नाही पण त्याहून जास्त पुरावे छत्रपती शिवरायांच्या काळात धनगर मावळे होते,ह्याचे पुरावे जास्त आहेत...कारण तेव्हाचे युद्ध किल्ले अर्थात डोंगर मुळे होयचे.. ज्यांच्याकडे जास्त किल्ले/डोंगर असायचे तो श्रेष्ठ राजा म्हटला जायचा...आणि डोंगरावर तेव्हा धनगर लोक राहायचे कारण तो पशुपालक समाज आहे ...मावळे मधी बघा तुम्ही सगळे मावळे हे घोंगडी,डोक्यावर धनगरी फेटा, कपाळी भंडारा ह्या वेशात दिसतात कारण धनगर लोक जास्त असल्यामुळं त्याचं वेशभूषा चा प्रभाव मावळ्यांमधी दिसून येतो..जस एकेकाळी आर्मी मध्ये पंजाबी लोकांच संख्या जास्त होता त्यामुळं सर्व आर्मी वाले मग तो कुठल्या पण राज्यातला असू दे त्याला पंजाबी यायचंच...

  • @adityaparanjape5703
    @adityaparanjape5703 Год назад +3

    शुद्ध मराठी इंग्रजी हिंदीविना खूप काळाने ऐकायला मिळाली.2003 आसपास इथं ताक प्यायचा योग्य आला होता. निश्चितच कोंडीबा दादा होते🙏
    सुबोध गणेश आपले खास अभिनंदन .साधेपणात सार्थ जीवनाचे सुंदर चित्रण. कुसुर पठार खूप विस्तिर्ण आणि निर्मनुष्य अशी एक समजूत आहे. पण कोंडीबाच्या तेथील प्रेमळ वास्तव्याने ते भरून गेले आहे . आपल्या इथे मात्र शहरात अनेक लोक आजूबाजूला असून एकटे अपूर्ण वाटते.

  • @avinashshirgire3717
    @avinashshirgire3717 Год назад +3

    Dhangar Vada Ani tya aajich adnav Jankar hi Dhangar samajachi majbut vicharachi an swatachya jeevan nisrgat jivan ghalvleli manas ,asa majha Dhangar Samaj dongra dongrat rahnar bindast, dhadsi,👏

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 Год назад +5

    आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत।
    गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो।
    माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला।
    आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे।
    देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका
    मोबाईल 9869266211
    धन्यवाद।....

  • @thelifeoftraveling57
    @thelifeoftraveling57 Год назад +8

    बाबांनी खुप चांगली माहिती दिली सर्व घडलेल्या गोष्टी शेअर केल्या व्हिडिओ पाहिल्यामुळे त्यावेळचा इतिहास कसा असेल लोकं जीवन कसे होते हा विचार मनात आला धन्यवाद सर हा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहचवला 🙏🙏

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Год назад +7

    फार सुंदर आजोबांना नमस्कार एक माईक‌ बाबां ना दिलास तर फार सुंदर झाले असते

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  Год назад

      नक्कीच...खरं तर व्हिडिओ बनवण्याच्या हेतूने गेलो नव्हतो म्हणून माईक नव्हता नेला. पुढल्या वेळी माईक सोबत ठेवेन.

  • @pramodzate9254
    @pramodzate9254 Год назад +2

    आजोबांचा निरागसपणा आणि साधेपणा पाहून डोळे भरून आले ।।। अनुभव पण तितकाच मोठा आहे आजोबांचा खूप प्रेमळ आजोबा ।। ज्या माणसाच्या मनात कपट खोटेपणा नसतो असे खूप कमी माणसे पाहिली त्यातलेच एक व्यक्तिमत्व म्हणजे हे आजोबा।। माझ्या आजोबांची आठवण आली।।

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Год назад +18

    भावा हे असेच जंगलाचे विडिओ, जिथे कोणी जात नाही असे ठिकाणचे विडिओ बनव.. जाम मजा आली हा विडिओ पाहायला... सह्याद्री ची जंगले एक no... अशी अनुभवी जुन्या गोष्टी माहीत असणारी माणसे भेटली की खूप मजा येते.. आजोबा 👌

  • @rohanthorat871
    @rohanthorat871 Год назад +21

    Hats of Ajoba 👏👏👌

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Год назад +6

    एवढ्या घनदाट जंगलात दोन वयस्कर माणसे राहतात किती हिंमत आहे.

    • @subodhhattarki
      @subodhhattarki  Год назад +2

      👍👌बाबा एकटेच राहतात....त्यांचे नातेवाईक येऊन जाऊन असतात...

  • @ganeshrakshe6161
    @ganeshrakshe6161 Год назад +12

    भाऊ आपली व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं कसूर पठार ची आम्ही देखील ह्याच्या कसूर पठाराच्या रांगेच्या। सुरुवातीला। वाउंड गावात राहतो ❤️❤️🙏

  • @santoshagre
    @santoshagre 8 месяцев назад +1

    फारच छान ...सुबोध....किती सुख-समाधानाचं आयुष्य जगतात हे बाबा...ना कसला मोह ना कसली अपेक्षा...

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 7 месяцев назад +1

    खूपच छान व सुंदर बाबाचा आयुष्य जगण्याची मजा ❤

  • @thanekarsanjay
    @thanekarsanjay Год назад +3

    ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
    त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
    मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
    तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।

  • @yogeshkharat729
    @yogeshkharat729 Год назад +4

    खूप छान माहिती दिली आहे....हे आजोबा आमचे नातेवाईक आहेत♥️🚩

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 Год назад +4

    बाबा माळकरी आहे राम कृष्ण हरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे

  • @ddchavan9
    @ddchavan9 2 месяца назад +1

    छान ट्रेक आहे आम्ही राजमाची ते भीमाशंकर हा ट्रेक करताना या पठरातून गेलो होतो

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Год назад +7

    खुप छान व्हिडिओ 👌👌👌
    आजोबांची ह्या वयातील स्पूर्ती पाहून खुप सुंदर वाटल 🙏🙏🙏🙏

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 8 месяцев назад +2

    आजोबा ना सलाम या वयातही एवढे चड चडतात

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 Год назад +9

    जुने ते सोने. पन्नास वर्षां पुर्व चे निसर्ग पहायला मिळाला..धन्यवाद

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 Год назад +1

    हा व्हिडिओ बघून मी खरच खूप भारावून गेलो..पण आज वाईट या गोष्टीचं वाटत की दादा आपली आजची तरुणाई पूर्ण विसरली ....!
    अस म्हणजे आज आपण काहीतरी खूप अनमोल संस्कृती गमावतोय याच खूप खूप वाईट वाटत . 🥴😔🥺

  • @anuradhakarkase824
    @anuradhakarkase824 3 месяца назад +1

    बाबा खूप सुंदर बोलले

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Год назад +5

    मी आताच तुमचा पहिला vlogs पाहिला खरे तर हे बाबा च खरे जीवन जगतात,, आपण तर शहरात प्रदूषण च्या नरकात राहतो,, 🙏🏻😊या बाबा ना पाहून माझ्या आजोबा ची आठवण आली 🥺🙏🏻

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 Год назад +2

    खूप सुंदर धन्यवाद तुला आजोबाना सलाम 🙏👌👌👌😍

  • @ashoksalvi1018
    @ashoksalvi1018 Год назад +2

    असे नैसर्गिक जीवन जगायला नशीब लागते ., जुनं ते सोनं, धन्यवाद बाबा ,छान व्हिडीओ

  • @kamleshh9907
    @kamleshh9907 3 месяца назад +1

    Khup chan video banvala ahe bro .kharcha maje baba pan asech hote ya baba n sarkhe .baba ni khup chan mahiti dili khup premal pane sangat ahet .khup chan .bro.very nice

  • @subodhhattarki
    @subodhhattarki  Год назад +8

    तुम्ही सर्वांनी मनापासून प्रतिक्रिया दिल्या याबद्दल खूप खूप आभारी आहे. खरं तर या बाबांना मी गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. आधीपासूनच मनात होतं, यांचा डॉक्युमेंट्री सारखा व्हिडिओ बनवायचा पण योग काही जुळत नव्हता. गेल्या शनिवारी मी आणि गणेश आम्ही अचानक बाबांना भेटायला निघालो...तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा हेतू नव्हता म्हणून माईक आणि व्हिडिओ साठी लागणारे इतर साहित्य सोबत नेले नव्हते. तिथे गेल्यावर आखाडे बाबांसोबत नवीन ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनला आणि अचानक व्हिडिओचा योग जुळून आला.
    मला अशीच अजून बरीच ठिकाणे माहीत आहेत, तेथील सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा सुद्धा अशीच साथ द्या.
    धन्यवाद
    श्री. सुबोध दिपक हत्तरकी (जोगेश्वरी पूर्व, मुंबई)

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 Год назад +1

    सुबोधजी असे जंगलातील व्हिडीओ दाखलता धन्यवाद मी सुभाष बलकवडे नांगरगाव लोणावळा माझ्या मित्रांसोबत भिमाशंकर ट्रेकला जाताना ह्याच आजोबांनी आम्हांला ताक प्यायला दिले होते फार प्रेमळ आहेत आठवणी ताज्या झाल्या परत जंगलात भटकायला जावं अस वाटतं

  • @nimeshpatil38
    @nimeshpatil38 Год назад +6

    सिंधुदुर्ग जिल्हा वैभववाडी तालुक्या मध्ये देखील कुसुर नावच गाव आहे व त्या गावाच्या पुढे वर गेल्या वर असच धनगर वाडा आहे. काय योगा योग आहे.

  • @mohanakhade4785
    @mohanakhade4785 Год назад +3

    ❤️🙏सुबोध दादा मस्त व्हिडिओ आहे. तुम्ही बाबांना भेटल्यामुळे बाबा पण खुश झाले आहे . आपल्या कार्यास शुभेच्छा.👍

  • @rahul234011
    @rahul234011 Год назад +1

    आजोबांच्या चेहऱ्यावर किती छान प्रसन्नता आहे

  • @46ajinkyadeshmukh83
    @46ajinkyadeshmukh83 Год назад +2

    खुप सुंदर
    खुप वर्षांनी तुमच्या माध्यमातुन
    आमचा भाग पाहावण्यास मिळाला

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 2 месяца назад +1

    Nisargacha abhyas kelya nantar jivanacha arth kalato bhau kharokhar Tumi nisarg premi ahat chan mahiti dilya baddal khup dhanyevad

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 Год назад +1

    खुप छान.श्री.बाबा तुमचे अभिनंदन.माझे कडुन तुंम्हाला लाख लाख शुभेच्छा 🌹

  • @gskharat7796
    @gskharat7796 Год назад +1

    खूपच छान लहान पनी आम्ही सुट्ट्यान मध्ये याच पठारावर बगडायचो...

  • @DinkrPashte
    @DinkrPashte 21 день назад +1

    Iam so glad and proud of kokan

  • @theswarbarsaatevent
    @theswarbarsaatevent Год назад +5

    ह्या आजोबांसोबत त्यांच्या घरात रानात एक दिवस राहायला नक्की आवडेल.

  • @vaibhavlokhande1002
    @vaibhavlokhande1002 Год назад +5

    ग्रेट भेट.. ग्रेट परसनालिटी.. खूपच छान झालाय व्हिडिओ 👍👍

  • @seemabedke748
    @seemabedke748 Год назад +20

    बाबांना बघून माझ्या वडिलांची आठवण झाली. त्यांचही शेती आणि गुरांवर खूप प्रेम होतं. ते आता हयात नाहीत.🥺

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 Год назад +1

    हा खरा वानप्रस्थाश्रम।शतशः नमस्कार या कामांना।

  • @prasadbahule8063
    @prasadbahule8063 Год назад +2

    अप्रतिम आणि दिलासादायक video 👌👌👌

  • @rahubhau9376
    @rahubhau9376 Год назад +3

    Great dhangar

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Год назад +5

    Hyana pahun ase vatate jeevan kiti sadhe panane pan jagta yete, hech khare aayushya🙏🙏🙏🙏🙏❤

  • @user-cb8xg1wz3e
    @user-cb8xg1wz3e 8 месяцев назад +1

    Kup chan🎉🎉🎉

  • @nileshdeshmukh1353
    @nileshdeshmukh1353 Год назад +2

    ह्या बाबांन कडे आम्ही भीमाशंकर ट्रेक करताना ताक पिल होत खूप छान फेमेली आहे

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Год назад +1

    बाई आजोबाची कमाल आहे. एव्हडे वयस्कर असून जगंलात आले. तुम्ही एव्हडं जगलं दाखवलंत. छान वाटले.

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 Год назад +4

    शहरापासुन लांब असनार्या लोकांच जीवन खुप सुंदर असते.

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 Год назад +1

    असे च मावळे असतील शिवबांचे या बाबांच्या सारखे सरळ,साधे,प्रामाणिक, धाडसी

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Год назад +2

    या गवळी धनगर समाजातीलच होती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणी
    गडावर दुध विकून उदरनिर्वाह करत असे.

  • @deed2820
    @deed2820 Год назад +1

    Sabse pehale mai baba jee ko pranam karta hu🙏 bilkul bilkul asan nahi hai akele jungle me rahana pura jeevan babaji ne kudarat k sath jiya hai kudarat bhi babaji ko har pal sath de rahi hai...
    Subodh jee aapn bahoot hi soft politely bolte hai kahi bhi aawaz upar nahi kiya na dikhava kiya bahoot hi simple baat chit ki aapne bada anand mila aapki baate our babaji k baate sunkar ....thanks for too good vdo❤️

  • @SDW-qw2qq
    @SDW-qw2qq Год назад +7

    Keep going ❤️ असच मेहनत कर नक्की यश मिळेल
    मस्त आहे Video

  • @deepaklokhande9966
    @deepaklokhande9966 Год назад +1

    वा हेच खरे जीवन आहे माणूस म्हणून जगण्याचं

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 6 месяцев назад +1

    Fantastic ❤

  • @shrikantkhivansara685
    @shrikantkhivansara685 Год назад +3

    मन प्रसन्न झाले❤️

  • @medhaavadhani5881
    @medhaavadhani5881 Год назад +1

    Koop sundar.ashya gharat rahanare dhannya ahe.🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilpawar7210
    @swapnilpawar7210 Год назад +1

    Khup chan, Amhala hi Aavdate rahayla

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 Год назад +1

    Khupach chaan

  • @sanjeev7821
    @sanjeev7821 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली या व्हिडियो मधून.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Год назад +2

    कुसुर घाट निसर्ग फारच सुंदर आहे एक वेळ पाहिलेच पाहिजे.

  • @JDmarathivlog
    @JDmarathivlog Год назад +2

    भावा बहनी चे प्रेम....

  • @manikdahiphale652
    @manikdahiphale652 Год назад +1

    शहरातील लोकांना जंगल फार फरके वाटते कधी तेथून निघून घरी जाऊ पंख्याखाली बसू पण या व्हिडिओ मधले आजोबा तेजंगलातिल घरसोडूनखालीगावातआमुलाकडेजायलात्याचे मनतयार नाही कारण ते इतकेएकरूप झाले पण खरी शांती जंगलातच असतेजंगलहच त्यांचा श्वासआहेज्याजंगलातीलहवा;पाणीपिऊनआई- वडीलाचा सानिधातराहूलहान चे मोठे झाले मुलानाजंगलाच्यासहवासनको पण शहरातील लप्रदुषणखाऊनपीऊनस्वनिर्मित ताण तणाव सहनकरूनजेव्हापंचतत्त्वातविलीनझाल्यावर अंतीम सहवास मातीच्या सान्निध्यातच आहे व तेथेच खरी शांती आहे

  • @drabhijeetacharya5649
    @drabhijeetacharya5649 Год назад +1

    Hats off to Ajoba
    Ajobanna BP Diabetes Cholesterol Arthritis Asa konta hi ajar nasnar yevdhach kai vayanusar sadha moti bindu man nasel
    Nisarga pasun apan lamb gelo ani roganni aplya la gherlay

  • @akashchavan1706
    @akashchavan1706 Год назад +1

    व्हिडिओ पाहून मन हळव झालं ❤️

  • @lahushedage5501
    @lahushedage5501 Год назад +1

    खूप जबरदस्त ब्लॉक

  • @firojinamdar5446
    @firojinamdar5446 7 месяцев назад +1

    Sundar

  • @sanjaysamel65
    @sanjaysamel65 Год назад +1

    Mast videoआहे छान माहिती दिली, असेच सुंदर video बनवत जा.

  • @amolsurve9675
    @amolsurve9675 Год назад +2

    Jabardast video jhalay...babana tar salamach

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Год назад +2

    मस्त भाऊ. असेच व्हिडिओ पाहायला आवडतील

  • @bunty2591
    @bunty2591 Год назад +1

    Baba agdi devasarkhe ahet ..khupch chan ♥️

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 Год назад +1

    माझ्या गावच्या सड्याची आठवण झाली. अशा जागी, मातीचे छोटेसे घर बांधून राहावे. खूप सारी झाडे लावावीत असं वाटतं. 😍

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Год назад +1

    Amazing. What a life.

  • @prabhakarmhatre2133
    @prabhakarmhatre2133 Год назад +1

    Aajoba khup chhan boltat .....🙏😊

  • @santoshnimse149
    @santoshnimse149 Год назад +1

    छान विडिओ बनवलाय सर 👍

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Год назад +2

    खुप छान 👌
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या भाऊ हा विडियो पाहुन

  • @devidasadivarekar7480
    @devidasadivarekar7480 Год назад +1

    Khup garv ahe hya vayat sudha apla nisarg purvipramane japnari manse hya pruthvivar ahet 😊

  • @machindramengal6992
    @machindramengal6992 Год назад +1

    खुप छान सात अनुभव दिलास

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 Год назад +1

    खूप छान!

  • @mukeshkamble3983
    @mukeshkamble3983 Год назад +1

    छान मस्त मित्रा...

  • @pratikgurav6068
    @pratikgurav6068 Год назад +1

    खरी माणसे... ❤❤❤❤❤🤗

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 Год назад +1

    Khup avadla vedeo. Aseych vedeo banva

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 Год назад +2

    बाबांच्या सारखी जुनी मायाळू माणसं खूपच कमी राहिली आहेत....त्यामुळे जुन्या माणसांच्या सहवासात राहत जा

  • @pavanramane
    @pavanramane Год назад +2

    Wooooooooow 😍❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥👌🤝👍

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Год назад +1

    असेच रम्य video टाकत जावे ही विनंती 🙏

  • @balajidhotre7858
    @balajidhotre7858 Год назад +1

    खूप छान👌

  • @udayexplorervlogs
    @udayexplorervlogs Год назад +1

    खुप छान माहिती दिली 👌👍

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 Год назад +2

    मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @Gameingtestg
    @Gameingtestg Год назад +1

    निसर्ग हाच आपला देव. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आहे. आमच्या येथील तिलारी जंगल पण खूप छान आहे. नक्की भेट द्या 🙏🙏🙏

  • @panchkailashideepakpai799
    @panchkailashideepakpai799 12 дней назад

    🙏 JAI BHOLE KI 🙏

  • @swarangisourav
    @swarangisourav Год назад +2

    जबरदस्त 🔥🙏