श्री मल्हारी मार्तंड भजन
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- श्री मल्हारी मार्तंड भजन
वाघ्या मुरळी भंडारा उधळी येऊ तुझ्या दरबारी
सोन्याची जेजुरी गडाला नवलाख पायरी ||धृ||
देव मल्हारी भक्तांचा कैवारी
बानू म्हाळसा राणी त्याची सुंदरी
स्वारी तयाची येती गडावर अबलक घोड्यावरी ||1||
सार्या भक्तांच्या तूच खंडेराया
गड जेजुरी आलो तुझी पहावया
आम्हा वर द्यावा खंडेराया सुख मिळो संसारी ||2||
येळकोट गर्जती देवाच्या नावाने
भक्त देवाचे डोलती आनंदानं
कृपा दृष्टी सदा रहावी बघा ना कोणीतरी ||3||
मुरळी नाचती नाचती तालावरी
वाघ्या गातोया दिमडीच्या ठेक्यावरी
एका झटक्यात लंगर तोडीतो देऊनी ललकारी ||4||
शब्दारचना आणि प्रस्तुती सुंदर 👍👌जय मल्हार 🙏
दमदार प्रस्तुती 👌
जय मल्हार 🙏
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻 सुंदर प्रस्तुती 👌
खूपच सुंदर,सुरेल प्रस्तुती.येळकोट येळकोट जय मल्हार.
वा वा रागिणी खूप छान . जोशपूर्ण गायन . तुझे व टिमचे अभिनंदन
सुरेखच आणि सुरेल ही
दमदार प्रस्तुती.....
जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार 👏👏
फारच सुरेख
छानच प्रस्तुती
ऐकतच राहावं असं वाटतंय.
!येळकोट येळकोट जय
मल्हार!
सदानंदाचा विजय असो.
🙏🙏🙏🙏👌👌
प्रस्तुती, भजनाचे सादरीकरण श्रवणीय.छानआहे
येळ येळकोट जय मल्हार 👌👍👏🙏🌹
खुपचं छान येळकोट येळकोट जय मल्हार
खूप छान सादरीकरण
अप्रतिम ❤
Khup chan prastuti
खूप छान ठेक्यात गायले आहे
खूप छान प्रस्तुती.
खूपच छान
अप्रतिम शब्द रचना, रेकॉर्डिंग,एडीटींग, आणि वेळेत
यु ट्युबवर दाखविल्या बद्दल धन्यवाद
प्रस्तुती फार छान
Sunder jay malhar
छान सादरीकरण...कलाकार जोशात ..गायन झोकात.
Farach chach👌🙏
👌🙏