Ardhanari nateshwar mandir velapur | velapur mahadev mandir | वेळापूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2022
  • Ardhanari nateshwar mandir velapur | velapur mahadev mandir | वेळापूर
    देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले. खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले. यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नांव एकचक्रनगर असे होते. महाभारताचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी दक्षिणेकडचा भाग हा दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. यावरूनच वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषी-मुनींनी तपश्‍चर्या केली आहे. म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी, पावनभूमी अशी आहे. शांडिल्य ऋषीसह अनेकांनी येथे तपश्‍चर्या केली आहे असे परंपरा मानते. महाभारत ते यादवकाल या कालावधीमध्ये वेळापूरबाबतचे पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र यादवकालापासून इ.स.१३०० पासूनचे पुरावे येथे आढळतात. देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर. वेळ म्हणजे सीमा. पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गांव. यावरून वेळापूर हे नांव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे असे वाटते. माणदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाईदेवराणा हे पहात होते. एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अनन्य साधारण महत्त्व होते. त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरभराटीस आलेले होते. त्याकाळात पर्यटनस्थळ म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा, येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. या जीर्णोद्धाराचा संकल्पक बाईदेवराणा होते. स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते. पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा, गाभार्‍यात पिंड व आतील नंदी, तो ही उघड्यावर एवढेच असावे. नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी. कारण इतरत्र कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी नाहीत
    #travelvlogs #amolsawantvlogs #maharashtratourism

Комментарии • 29