भेट वस्तू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • 39 - भेट वस्तू - ३०-१०-२०२२
    विजयचा बाप घंटागाडीतील कचऱ्यामधील एक सुई टोचल्याचे निमित्त होऊन घंटागाडीत कचऱ्यावर पडून तडफडून मेला . द्विपदवीधर असलेल्या विजयला नगरपालिकेने दिलेली बापाच्या पदावर रुजू होण्याची संधी नाईलाजाने स्वीकारावी लागली . गादी चालवण्याची परंपरा येथे देखील पार पाडण्यात आली .
    रात्री घंटागाडीवर काम करून सकाळी विजयाचा बाप नव-निर्माण संकुलात सफाईकामगार म्हणून काम करत असे . संकुलाच्या पदाधिकाऱ्यानी विजयाला बापाचे काम देऊन उपकृत केल्याचे पुण्य पदरी पाडून घेतले .
    रो-इनटरन्याशनल क्लबचे बरेचसे सभासद नव-निर्माण संकुलात राहत होते . या वर्षीच्या अध्यक्षांना सोशलवर्कचा एक प्रोजेक्ट करायचा होता . सदोदित टापटिप राहणाऱ्या विजयकडे बघून त्यांना एक नामी कल्पना सुचली . सफाई कामगारांबद्दल त्यांच्या मनात विशेष कणव निर्माण झाले . त्यांच्या विभागातील सर्व सफाई कामगारांना चांगल्या कापडाचा ड्रेस , हात मोजे , गमबूट , मास्क असे साहित्य द्यायचे त्यांनी ठरवले . बजेटमध्ये बसवता बसवता चांगल्या कापडाच्या ड्रेसला वगळावे लागले . त्या ऐवजी दिवाळी फराळाचा एक डबा त्यांच्या बजेटमध्ये कसाबसा बसला .
    संकुलाच्याच आवारात समारंभ पार पडला . सफाई कामगारांना भेट वस्तूंचा खोका देण्यात आला . सफाई कामगारांना काय हवे? हा विचार कोणाच्याच मनात आला नाही . फोटो निघाले . सर्व मंडळी परतल्यानंतर क्लब सभासदांचा ‘आनंदी तासा’ बरोबर शाहीखाना झाला . एक प्रोजेक्ट पार पडला .
    विजय त्याला मिळालेल्या भेट वस्तूंचा पुडा घेऊन घरी आला . या उपकारांनी आपल्याला काय मिळाले हा त्याला प्रश्र्न पडला . मूळ प्रश्र्न काय आहे ? या कडे कोणाचेच लक्ष नव्हते . संकुलातील लोकांनी कमीतकमी त्यांचा कचरा देतांना स्वच्छ करून द्यावा, याचे सभासदांना खरतर परीक्षण द्यायला हवे . या गरजेवर वेळ आणि पैसे खर्च करायला हवेत . पण , जी गोष्ट टाकून साध्या होते त्यावर कशाला एवढा विचार करायचा अशीच सर्वांची वृत्ती होती . कांही वर्षांनी आपला मुलगा या कामावर रुजू होईल या कल्पनेने विजय शहराला .
    प्रश्र्नाचे खरे स्वरूप आणि गांभीर्य संकुलातील सभासदांना जाणवून देण्यासाठी कांहीतरी करायला हवे या कल्पनेने तो अस्वस्थ झाला . त्याला एक कल्पना सुचली .
    बाजारात जावून त्याने बरेच रिकामे भेटखोके आणले . प्रत्येक खोक्यात त्याने समान भरायला सुरुवात केली . काय होते ते समान ?
    ते समान होते.
    वापरलेला स्यानेटरी न्यापकीन / शी सकट पेपरमध्ये गुंडाळलेला डायपर / प्लास्टिकच्या पिशवीत भरलेलेली आमटी आणि भाजी / अर्धवट फोडलेले चकण्याचे पुडे / टराटर फाडलेले गिफ्ट ऱ्यापर्स / दोरे ,कलाबतू आणि प्लास्टिकने भारेलेले निर्माल्य /
    विजयने वरील एक एक वस्तू एक एक खोक्यात गिफ्ट प्याक केल्या आणि दुसरे दिवशी सकाळी प्रथम त्याने संकुलाच्या अध्यक्षांना पहिली भेट वस्तू दिली . देतांना तो म्हणाला “ साहेब तुम्ही देऊ शकत होता त्या वस्तू तुम्ही आम्हाला दिल्यात आता आम्ही आमच्या नशिबी जे आहे ते तुम्हाला देत आहोत . कृपया ही भेट स्वीकारावी.”
    संकुलातील सर्व विचारवंत आणि रो- इनटरन्याशनल क्लबच्या सर्व सभासदांना सकाळी सकाळी ही अमुल्य विचार करायला लावणारी भेट वस्तू मिळाली .
    सभासदांनी लगेच सभा घेतली .
    विजयाला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला .
    ************************************************
    कौस्तुभ ताम्हनकर-९८१९७४५३९३
    kdtamhankar@gmail.com
    ****************************
    गर्दी नसलेले एकमेव
    ठिकाण
    " माहेर "
    सासवणे - अलिबाग
    गावाकडंच घर
    भेटा
    www.mahertrip.in
    ************************************************सुंदर होण्यासाठी आचरणा
    www.zerogarbage.co.in
    ****************************

Комментарии •