काय नोहे केले । एक चिंतिता विठ्ठले ॥ Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • काय नोहे केलें - संत तुकाराम अभंग - 411 संत तुकाराम महाराज
    काय नोहे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥
    सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥
    योगायाग तपें । केलीं तयानें अमुपें ॥२॥
    तुका म्हणे जपा । मंत्र त्री अक्षरी सोपा ॥३॥
    अर्थ
    प्रस्तुत निरुपण सेवेसाठी निवडलेल्या आजच्या अभंगातून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज "समचरण पांडुरंग परमात्म्याचे चिंतन केल्याने होत असलेल्या फायद्यांबाबतचे" विवेचन सर्व वैष्णव भक्तगणांस देतात.
    जगद़्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून कथन करतात की, श्रीहरि पांडुरंगाच्या चिंतनाने सर्व इप्सित प्राप्त होते, मनुष्याच्या सर्व इच्छा फलद्रुप होतात.
    श्रीहरि विठ्ठलाचे चिंतन हे सर्व साधनांचे सार असून ते मनुष्याला इहलोकीच्या या भवसागरातून तारुन नेते असं अभंगाच्या द्वितीय चरणातून तुकोबाराय विशद करतात.
    या भगवंताच्या नामाचे चिंतन केल्याने अपार योग-याग, तपे केल्याचे पुण्य प्राप्त होते असे महाराज पुढे जाऊन सांगतात.
    अभंगाच्या अंतिम चरणातून तुकोबाराय सकल सुखप्राप्तीचा संदेश देताना सांगतात की, मनुष्याने आपल्या या नश्वर देहाचे कल्याण साधावयाचे असेल तर "विठ्ठल" या त्रीअक्षरी मंत्राचा जप मनोभावे नित्यनेमाने करावा.
    प्रस्तुत निरुपण सेवा ही सणचरण पांडुरंगाच्या चरणी आणि विश्ववंदनीय विश्वगुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित
    एका विठ्ठलाचे नाम चिंतन केले असता काय एक होत नाही?सर्व काही चिंतनाने प्राप्त होते.विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे.ते भवसागरातून तरुण नेते.त्याने असंख्य तपे व व्रते केल्याचे आणि याग करण्याचे पुण्य मिळते. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून भक्तजन हो,विठ्ठल हा तीन अक्षरी नाम जप तुम्ही श्रद्धेने करा.

Комментарии • 5

  • @gurunathchikale9092
    @gurunathchikale9092 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩

  • @vikaskumbhar9346
    @vikaskumbhar9346 Год назад +1

    जय हरी

  • @haripandurang4523
    @haripandurang4523  Год назад

    जय हरि माउली

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 Год назад +1

    लाख लाख उपकार

  • @Uk_1927
    @Uk_1927 2 года назад +1

    अप्रतिम
    माऊली कृपया तुमचा मोबाईल नंबर पाठवा.