उन्हाळ्यातील आंबा बाग व्यवस्थापन कमी पाण्यात शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण - काष्ट आच्छादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • गांडुळाची ओळख करून घ्या
    गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही. कारण त्याला डोळे नसतात. त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते. जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते. ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते. परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते. निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे. या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते. त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते. अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते. तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते. ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना हवा भरपूर मिळते. पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.हे सारे करत असताना जमिनीतली माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळते . विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो. गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते. त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो. मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात. गांडुळांची जन्म-मरणाची साखळी सुरू असते. शेकडो पिलांना जन्म देऊन एखादे गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकर्‍यांच्या उपयोगी पडते. गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो. त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के इतके प्रोटिन्स किंवा प्रथिने असतात. त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो. सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते. गांडुळाचा खत म्हणजे प्रामुख्यानेगांडुळाची विष्ठा.
    *या विष्ठेचे विश्‍लेषण केले असता त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फूरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच*. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत. जमिनीमध्ये सर्वसाधारणत: जेवढे जीवाणू असतात त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात. तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस् असतात. हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात. त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात आणि पिकांवर पडणार्‍या रोगांवर इलाज करतात. गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे. त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात. गांडुळाचे हे सारे गुणधर्म पाहिले म्हणजे गांडुळ हा शेतकर्‍यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल आणि गांडुळाची मदत घेऊन शेती करणे कसे बिनखर्ची शेती करण्यास उपयोगाचे आहे हेही ध्यानात येईल. गांडुळाचे आणखी काही महत्वाचे उपयोग आहेत. ते पाहिले म्हणजे गांडुळाला वगळून शेती करणे हा किती मोठा अपराध आहे आणि हा अपराध करून आपण आपल्याच पायावर कसा दगड मारून घेत असतो हे लक्षात येईल.
    आपल्या शेतात आपण पिकांना रासायनिक खते देतो. अशी तयार खते बाजारात मिळतात आणि ती पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे पिकांना ती दिली की, पाण्यात विरघळून तयार झालेले खतयुक्त पाणी झाडांची किंवा पिकांची मुळे शोषून घेतात. ही सारी प्रक्रिया एक-दोन दिवसात घडते. त्यामुळे रासायनिक खते पिकांना ताबडतोब लागू होतात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते. शेणखत किंवा गावखत यांची अवस्था अशी नसते. ती पटकन शोषून घेता येत नाहीत. शेतात पडलेले शेणखत, काडी-कचरा हे खत म्हणून पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नाहीत. मात्र ही खते किंवा शेतातले कोणतेही सेंद्रीय पदार्थ आधी गांडूळ खातो. त्याच्या पोटात निसर्गाने ठेवलेल्या भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते. ी खतयुक्त विष्ठा मात्र पाण्यात पटकन विरघळते आणि ते विष्ठायुक्त खत मात्र पिकांच्या मुळांना शोषून घेता येते. म्हणजे ही सारी प्रक्रिया घडायला काही वेळ लागतो. म्हणूनच आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रीय खते पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नसतात. परंतु ती पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम गांडूळ करत असतो. म्हणजे गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे. हा भटारखाना म्हणजे खताचा कारखाना सुद्धा आहे.
    गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते भस्त करत असते. म्हणजे आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोेग दवाखाना म्हणून होत असतो. अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात. कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते. कीडींमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधे मारावी लागतात. त्या औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो. अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते. *पहिला खर्च रासायनिक खताचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि

Комментарии • 36

  • @OmSairam-e1p
    @OmSairam-e1p 5 месяцев назад +1

    सर माझ्या शेजारीच बांदांवर केशर ची 50 झाड आहेत मग मला माती परीक्षण ची गरज आहे का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 месяцев назад

      झाडे येतील छान पण माती परीक्षण केल्यास खत व्यवस्थापन कऱणे सोप्प जाइल व खतावर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येइल .

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 5 месяцев назад +1

    Good information thanks sir

  • @VikasPatel-ur4yd
    @VikasPatel-ur4yd 5 месяцев назад +1

    Is prakar ki mulching humne Apne aam ke pedon mein ki thi per andar se chuhon ne bill bna liye aur kuch roots damage kr diye the

  • @arjungarad208
    @arjungarad208 5 месяцев назад +1

    नर्सरी कोणती चांगली आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 месяцев назад

      माझ्याकडे मिळतील सर्व जातीची आंबे रोपे .
      फोन करा वाजवी दरात देतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 месяцев назад

      माझा whatsapp no. 8888782253 / 8855900300

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 6 месяцев назад +2

    तुमच्या विविध व्हिडिओतून आपण 3 एकर क्षेत्रावर मिश्र फळबाग लागवड केली आहे... म्हणून आपण यावे ही अपेक्षा

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 6 месяцев назад +1

    राहुल सर रीजेन्ट अल्ट्रा जमिनीत झाडाच्या बुंध्यावर सोडले तर चालेल का आणि त्याचं पाणी प्रमाण किती मिली घ्यायचे तेवढं सांगा प्लीज

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад

      झडाचे वय ५ वर्षे वयापर्यंत असेल तर ७० ग्रॅम + २ लिटर पाणी एकत्र करुन खोडाच्या बाजूने गोलाकार ओतावे .

  • @MyBhau
    @MyBhau 5 месяцев назад +1

    अतिशय उत्तम माहिती
    मी आपले व्हिडीओ बघून माझी आंबा बाग तयार केली आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 месяцев назад +1

      धन्यवाद दादा ..
      काहीही अडचण आली तर नक्की फोन करा .

  • @rohidaspatil1163
    @rohidaspatil1163 6 месяцев назад +1

    सर तुमचे ये सर्व मार्गदर्शन विडीओ हे आमच्यासाठी बहुमूल्याचे ठरत आहे धन्यवाद सर

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 6 месяцев назад +1

    राहुलदादा, छान माहिती सांगितली.आपण आमच्या बागेस भेट देण्यासाठी याल का?आपली फी जी असेल ती देईन.

  • @kadamkrishna5102
    @kadamkrishna5102 6 месяцев назад +1

    किती वर्षाचे बाग आहे सर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад

      आता बागेचे वय अडीच वर्षे आहे .

  • @sushilakale9707
    @sushilakale9707 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद

  • @ashachavan960
    @ashachavan960 6 месяцев назад +1

    👌

  • @pradeepravnang1544
    @pradeepravnang1544 6 месяцев назад +1

    झाडाला आधार दिलेल्या काठीला वाळवी लागली तर काय करावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад

      आधाराची काठी फक्त पहील्या वर्षी वापरावी . पहील्या वर्षी दोन छाटण्या घेतल्यास खोड भऱणी उत्तम होते . लागवडीच्या दुसऱ्या वर्षी आधाराची काठी काढून टाका . वाळवी लागलीच तर खोडाला जशी बोर्डोपेस्ट किंवा काव पेस्ट लावतो तशी काठीला पण लावा .
      जमीनीत वाळवी हुमणी लागू नये म्हणून रिजेंट अल्ट्रा चा वापर करा

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 6 месяцев назад +1

    1.5-2 वर्षाचा रोपाची भाव काय आहे...

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад +1

      केशर
      दीड वर्षे - १४० रु
      दोन वर्षे - २०० रु .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад +1

      माझा संपर्क क्रमांक - 88 55 900 300 / 8888782253(whatsapp)

  • @sopan880
    @sopan880 6 месяцев назад +1

    जय शिवराय, अनमोल माहिती

  • @vikasjadhav8758
    @vikasjadhav8758 6 месяцев назад +1

    Thibak sincha cha kiti kharch aala aahe ya bagela.

  • @GulabGiri-h3l
    @GulabGiri-h3l 6 месяцев назад +1

    छान माहिती दादा 🙏