प्रतापगड प्रदक्षिणा । जावळी खोरे । भाग १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • जावळीचे खोरे । भाग १ । प्रतापगड प्रदक्षिणा । नकाशावाचन । प्रवासवर्णन
    जावळीचे खोरे: स्वराज्य स्थापनेच्या इतिहासात जावळी प्रकरणाला अनन्यसाधारण महत्व आहे, ज्याच्या हातात जावळी त्याचे कोकण आणि घाटमाथ्यावर वर्चस्व. कोकणात रायगड चंद्रगड मंगळगड शिवथर ते माथ्यावर महाबळेश्वर, जोर-जांभळी, मधू मकरंद, पर्वत-चकदेव आणि यांना जोडणारे पार, हातलोट, रडतुंडी, ढवळे, पसरणी सारखे प्रशस्त घाट आणि असंख्य दुर्गम वाटा असा हा विस्तृत जावळी चा प्रदेश. जावळीच्या रानात राज्य करायला वाघाचे काळीज हवे. जावळी प्रकरण पहिले -चंद्रराव मोरे आणि महाराज, जावळी प्रकरण दुसरे - अफझलवध आणि स्वराज्यविस्तार, या दोन्ही प्रकरणाच्या वेळी जावळीचे किती महत्व आहे, महाराज किंवा अफझलखान दोघेही जावळी साठी किती उत्सुक होते हे समजून येते
    पुढील काही भागात आपण या जावळी खोऱ्याबद्दल जाणून घेऊ
    भाग पहिला : प्रतापगड प्रदक्षिणा
    पहिल्या भागात आपण प्रतापगड प्रदक्षिणा, गड-दर्शन , क्षेत्र पार, कोयनेचे खोरे असा भॊगोलिक प्रदेश आपण पाहणार आहोत. पुढील काही भागात जावळी प्रकरण पहिले म्हणजे चंद्रराव मोरे आणि महाराज यामधील संघर्ष, निसणीची वाट - जिथून महाराज स्वतः जावळीत उतरले होते, रडतोंडी घाट - जिथून मोठी तुकडी पार मध्ये शिरली होती, दरे, जावळी, जोर-जांभळी, चतुर्बेट, हातलोट ही मोऱ्यांची महत्वाची ठाणी ते रायगड (रायरी) आणि कोकणात उतरणारा पार घाट पाहू. पुढे जावळी प्रकरण २ म्हणजे अफझलवध- वाई - पसरणी - महाबळेश्वर -प्रतापगड - रानकडेसार - पार आणि मधू-मकरंदगड आणि कोकणात उतरणारा हातलोट घाट असा मोठा भूभाग पाहू. क्षेत्र महाबळेश्वर, कोळेश्वर , रायरेश्वर हि तीन प्राचीन पाठारे आणि ढवळे घाट आणि पलीकडे कांदाट खोरे, पर्वत -चकदेव , महिमंडन असा खूप मोठा प्रदेश आपण पाहू.
    संपूर्ण विडिओ शेवट पर्यंत पहवा आणि ऐकावा, काही चुकल्यास निदर्शनास आणावे
    धन्यवाद !
    Thanks to
    Trek organizer : Shiledar Adventure, Sagar Nalavade
    #shivajimaharaj #शिवाजीमहाराज #shivaji #pratapgad #प्रतापगड #chhatrapatishivajimaharaj #छत्रपती_शिवाजी_महाराज #shivpratapdin #शिवप्रतापदीन #प्रतापगड #अफझलखानवध
    #pratap#itihas #history #historical #इतिहास #mahabaleshwar #javali #जावळी #maratha #maharashtra #महाराष्ट्र
    Drone shots : Prathmesh Prakash Awasare
    Nitin Patole

Комментарии • 57

  • @subodhkulkarni-5448
    @subodhkulkarni-5448 5 месяцев назад +1

    मी पण प्रतापगड ला गेलो होतो पण तुझ्या एवढा जवळून प्रतापगड नाही पाहिला. एखादा गड कसा पाहावा हे मी तुझ्याकडून शिकलो. तुझे इतिहासावरचे ज्ञान प्रचंड आहे. एवढ्या माहितीपूर्ण व्हीडीओ साठी धन्यवाद.

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 9 месяцев назад +1

    किरण, फारच सुंदर व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Khoop. Chhan

  • @27avinash
    @27avinash 2 года назад +5

    किरण, अप्रतिम झालाय व्हिडीओ.... आवाजाचा पोत पण योग्य राखला आहेस....खूप छान...😍😍 माहिती पण थोडक्यात पण योग्य अशीच आह

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 года назад

      धन्यवाद सर

  • @yarss4u
    @yarss4u 9 месяцев назад +1

    वाह किरण, अप्रतिम झालाय व्हिडिओ, आणि माहितीचे सादरीकरण सुध्दा छान केलेस.👍🏻 आता आस पुढील भागाची.....

    • @dongaryatra
      @dongaryatra  9 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @dipaliyadav2066
    @dipaliyadav2066 9 месяцев назад

    अप्रतिम व्हिडिओ किरण....waiting for 2nd and 3rd part.

    • @dongaryatra
      @dongaryatra  9 месяцев назад

      धन्यवाद , वेळ कुठे मिळतोय, सर्व जागा फिरून येऊन आज 2 वर्षे झाली काहीच करता येत नाही आपल्या ऑफिस मुले

  • @Nikhilmadhavi
    @Nikhilmadhavi Год назад +1

    Nice 👍

  • @santoshmore7442
    @santoshmore7442 Год назад

    Khup sunder mahiti.

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Год назад +2

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +2

    अतिशय सुंदर विडिओ झाला आहे. प्रतापगडाची परिपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @atulgawade2213
    @atulgawade2213 6 месяцев назад

    🚩👍

  • @spruhatransport40
    @spruhatransport40 2 года назад +1

    खूप छान माहिती .

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 2 года назад +1

    अप्रतिम व्हिडीओ केला.

  • @sanketskhandekar
    @sanketskhandekar 3 года назад +1

    Mast mahiti .Mast shoot

  • @prasadtapkir1988
    @prasadtapkir1988 3 года назад +2

    Jay shivray

  • @apoorvdamale3006
    @apoorvdamale3006 Год назад +1

    उशिरा येऊन पोचलो इथे. विस्तृत माहिती देणारा video आहे हा! सुंदर प्रयत्न दादा! पुढचा भाग दिसत नाही channel वर? कधी येणारे? खूप उत्सुक आहे बघायला. आवश्य कळवावे

    • @dongaryatra
      @dongaryatra  Год назад

      लवकरच

    • @apoorvdamale3006
      @apoorvdamale3006 Год назад

      @@dongaryatra लवकर तारीख सुद्धा कळवा...आतुरतेने वाट बघतोय 😁

  • @shraddhasatam4438
    @shraddhasatam4438 3 года назад +1

    Very informative and interesting👍

  • @TravelSandy
    @TravelSandy 3 года назад +1

    Excellent Kiran.....

  • @parthparab2986
    @parthparab2986 2 года назад +1

    जय भवानी
    खुप छान information मिळाली
    सर आपला voice over खुप छान वाटला
    keep it up
    bright future best luck

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 года назад +1

      धन्यवाद सर

  • @maulistudios9543
    @maulistudios9543 Год назад +1

    Ajun kiti vaat bhagaychi .. pratapgarh pradakshina chi.. lavarch 2, 3 & 4 bhag upload karavet... Pls
    Writer shree Manjrekar

    • @dongaryatra
      @dongaryatra  9 месяцев назад

      लवकरच करतो , एकटा सर्व बघतो त्यामुळे वेळ मिळत नाही
      भाग 2 : घाटवाटा, जावळी प्रकरण 1 आणि 2
      भाग 3 : सप्त शिवपुरी, जावळी मधली देवस्थाने आणि इतर किल्ले

  • @akshaymore3731
    @akshaymore3731 2 года назад +1

    Nice

  • @archanamore3801
    @archanamore3801 2 года назад +1

    👏👍

  • @_miracle_india09
    @_miracle_india09 2 года назад +1

    सर दुसरा पार्ट कधी टाकताय ...?

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 года назад

      गेल्या वर्षभरात, खूप मोहीम झाल्या पण विडिओ साठी वेळ मिळत नाही आहे, काही दिवसात पुढील मोहीम अपलोड होतील
      १. जावळी मोहीम 2 - राडतूनदी घाट / निसणी वाट / प्रतापगड / जावळी / पारघाट
      २. जावळी मोहीम 3 - महाबळेश्वर, जावळी, , प्रतापगड , पार कुडपण , महिपतगड
      ३. रांगणा किल्ला
      ४. गोव्यातील 11 किल्ले आणि 5 मंदिरे
      ५. पावनखिंड

  • @sujaymadane3256
    @sujaymadane3256 Год назад +1

    प्रतापगड प्रदक्षिणा करण्यासाठी किती वेळ लागला

    • @dongaryatra
      @dongaryatra  Год назад +1

      सकाळी 8 वाजता सुरू केली तर जवळपास 30 मिनिटात आपण पार सोंडेवर येतो तिथून 1 तास चिरेखिंड
      पुढे taar road वर कंटाळा येतो आणि वेळ जातो.
      मधला मोठा चढ थकवणार आणि 1.5 ते 2 तास जाणारच आणि एकदा प्रतापगड च्या पायऱ्यांन लागले की तिथून महादरवाजा पर्यंत पुन्हा 1 तास ( जुन्या वाटेने, गाडी मार्गाने नाही )
      दुपारी 3 पर्यंत ट्रेक संपते

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 3 года назад +2

    वसोटा किल्ला पण जावली मध्ये येतो ना?

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 года назад +1

      वासोटा बद्दल बोलायचे तर वेग वेगळी मते आहेत, चांद्ररावांच्या जावळी मध्ये हा भाग नसावा.. हा भाग खूप दक्षिणेकडे येतो

    • @RanjeetBhosale-od4pw
      @RanjeetBhosale-od4pw 3 года назад +1

      @@dongaryatra ok

    • @RanjeetBhosale-od4pw
      @RanjeetBhosale-od4pw 3 года назад +2

      @@dongaryatra mahimandan gad kadachit shevatcha killa asel

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 года назад +1

      @@RanjeetBhosale-od4pw होय बरोबर, शिंदी च्या खिंडी पासून ते निरपजी पर्यंत ची 23 गाव आणि तिथे बाजूला असलेला मोर्यांच्या वाड्याचा अवशेष म्हणजे कांदाट खोरे नक्कीच जवळीत होते पण इथून खाली नदी पलीकडचा प्रदेश कदाचित नसावा, म्हाळुंगे मधून नागेश्वर मार्गे वासोटाला जाता येते, पण हा भाग आणि बाजूचा रेडेघाट जवळीत असेल याबद्दल शशांक आहे ... एकाच ठिकाणी उल्लेख सापडला होता पण त्या source बद्दल शंका असल्यानं बोलू शकत नाही.. सर्व authenticate refference book पहिली तर नक्कीच हा भाग जवळीत मोडत नाही.

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 года назад +1

      साशंक ***

  • @rupasaj950
    @rupasaj950 2 года назад +1

    Dusara bhag mala pahaycha ahe kuthe milel

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 года назад

      लवकरच अपलोड करू,

    • @dongaryatra
      @dongaryatra  2 года назад

      गेल्या वर्षभरात, खूप मोहीम झाल्या पण विडिओ साठी वेळ मिळत नाही आहे, काही दिवसात पुढील मोहीम अपलोड होतील
      १. जावळी मोहीम 2 - राडतूनदी घाट / निसणी वाट / प्रतापगड / जावळी / पारघाट
      २. जावळी मोहीम 3 - महाबळेश्वर, जावळी, , प्रतापगड , पार कुडपण , महिपतगड
      ३. रांगणा किल्ला
      ४. गोव्यातील 11 किल्ले आणि 5 मंदिरे
      ५. पावनखिंड

  • @abhishekpawar1785
    @abhishekpawar1785 2 года назад +1

    Next part kdhi?

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 2 года назад +1

    भाग 2 केव्हा येणार आहे

  • @abhishekwarphalkar6550
    @abhishekwarphalkar6550 2 года назад

    Pidacha bhagachi link asel tr dya please

  • @Kalyanii
    @Kalyanii 3 года назад +1

    Pavasalyat safe ahe ka??

    • @dongaryatra
      @dongaryatra  3 года назад +1

      पावसात करू नये, आणि या भागात आता खूप दरडी कोसळल्या आहेत, route open झाला असेल तरच करावी...

    • @Kalyanii
      @Kalyanii 3 года назад

      @@dongaryatra thank you so much :)

  • @RanjeetBhosale-od4pw
    @RanjeetBhosale-od4pw 3 года назад

    सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका आणि आणि ह्या जावळीचा काही संबंध आहे का.