भारतातील प्रमुख नवदुर्गा ! | नवरात्रि स्पेशल | द ग्रेट स्टोरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आराधना होते, ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे "नव दुर्गा " म्हणून संबोधतात.
    दुर्गेची नऊ शक्तिरूपे आहेत, ती अशी :-
    शैलपुत्री - हिमालयपुत्री हिचे लग्न शंकराशी झाले. नवरात्राच्या पहिल्या दिवशी हिचे पूजन करतात.
    ब्रम्हचारिणी - म्हणजे तपचारिणी. उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू असे तेजोमय स्वरूप. पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात असा समज आहे. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी हिचे पूजन करतात.
    चंद्रघंटा - कल्याण करणारे व शांतिदायक दशभुजा स्वरूप. शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे.सर्व हातात अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टांतून मुक्ती मिळते असा समज आहे. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी हिचे पूजन करतात.
    कुष्मांडा - अष्टभुजा प्रकारचे स्वरूप. पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. हिला कोहळ्याचा नैवेद्य लागतो. वाहन सिंह आहे. नवरात्राच्या चवथ्या दिवशी हिचे पूजन करतात.
    स्कंदमाता - स्कंदाची माता म्हणून असलेले चार भुजांचे स्वरूप. देवी कमळासनावर विराजमान आहे. देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्राच्या पाचव्या दिवशी हिचे पूजन करतात.
    कात्यायनी - 'कत' नावाच्या ऋषीच्या कुलात, 'कात्यक' गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी. नवरात्राच्या सहाव्या दिवशी हिचे पूजन करतात.
    कालरात्री - काळे शरीर व तीन डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, वाहन गर्दभ. खड्ग धारण केलेली, भयानक असे स्वरूप. नवरात्राच्या सातव्या दिवशी हिचे पूजन करतात.
    महागौरी - गोरा वर्ण, आभूषणे व वस्त्र पांढऱ्या रंगाचे. चार हात असलेली व वृषभ हे वाहन असलेली. नवरात्राच्या आठव्या दिवशी हिचे पूजन करतात.
    सिद्धिदात्री - सर्व सिद्धी देणारी. हिच्या उपासनेने आठ सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात. नवरात्राच्या नवव्या दिवशी हिचे पूजन करतात.
    .
    .
    द ग्रेट स्टोरी चॅनल ला subscribe करा !

Комментарии • 3