mungi udali aakashi abhang part ( 1)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • मुंगी उडाली आकाशी अभंग भाग १
    ----------------------------------
    amzn.to/2QpFJFm
    मुंगी उडाली आकाशी |
    तिने गिळिले सुर्यासी||१||
    थोर नवलाव झाला |
    वांझे पुत्र प्रसवला ||२||
    विंचु पाताळासी जाय |
    शेष माथा वंदी पाय ||३||
    माशी व्याली घार झाली |
    देखोनी मुक्ताई हासली ||४||
    संतश्रेष्ठ श्रीमुक्ताईंचा हा अभंग म्हणजे सर्व सांसारिकांना तसेच सर्वसामान्य भक्तांना समजण्यास क्लिष्ट वाटणारा चार चरणांचा समावेश असलेला अभंग. श्रीमुक्ताईचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत, काही कूट, गहन अभंगही लिहिले आहेत. ते गूढ, अद्भुतरम्य, चमत्कृतिपूर्ण असल्याचे सहजपणे लक्षात येते. त्यांच्या अभंगांत योगाच्या खुणा जाणवतात, अध्यात्माची खोली प्रत्ययास येते; तसेच काही आत्मसाक्षात्काराचे पडसादही उमटतात.
    .
    आपण याचा साधा वाच्यार्थ बघितला तर लक्षात येते की, मुंगी हा तसा एक इवलासा जीव. तिची शिस्त, तिची चिकाटी याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. पण तिने आकाशात उडण्याचा पराक्रम केला. इतकेच नव्हे तर चक्क सूर्याला गिळून टाकले. मुंगी हा एक सामान्य जीव, एक क्षुद्र कीटक. याउलट सूर्य हा एक दिव्य तेजोनिधी महागोल. या दोघांची कोणत्याच अर्थाने बरोबरी होऊ शकत नाही. पण मुक्ताईंच्या मुंगीचा विक्रम हा की तिने सूर्याला गिळंकृत केले.
    .
    विशेष म्हणजे, एकीकडे हे असे अकल्पित घडले, तर दुसरीकडे ‘थोर नवलाव जाहला’ आणि तो म्हणजे वांझ स्त्रीने मुलाला जन्म दिला. ‘वंध्यापुत्र’ ही कल्पनाही तशी अशक्य कोटीतीलच! तिसरी घटना विंचू आणि शेषनागाविषयी आहे. शेष या महासर्पाने महाकाय पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली असल्याची परंपरागत समजूत आहे. त्या बलदंड नागराजाच्या माथ्यावर लाथ मारण्यासाठी विंचू पाताळात गेला आणि त्याने ते महाकर्म लीलया पार पाडले. चौथे अघटित हे माशीबद्दल आहे. घडले काय तर, ती सानुली-लहानगी माशी व्याली म्हणजे बाळंत झाली आणि तिने घारीला जन्मास घातले. एका यक:श्‍चित माशीच्या पोटी गगनाचा वेध घेणार्‍या घारीने जन्माला यावे हा एक मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे. हे सारे ‘अघटित’ पाहून मुक्ताईला हसू आले. असा या कूट अभंगाचा वाच्यार्थ आहे. तो वाचकाला सहजपणे कळतो, पण त्यातून त्याचे काही समाधान होत नाही; उलट तो अधिकाधिक अचंबित, आश्‍चर्यचकित होतो.

Комментарии • 29