सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणात पाऊस मुसळधार पडतोय. शेतीच्या कामांना आता जोर धरला आहे. सध्या गावी फोड सुरू आहे. फोड झाल्यावर शेतातले तण काढले जातात. आमच्या घरी आजी वस्तीला आली होती. माझ्या आईची मावशी म्हणजे आमची आजी, आम्हाला सख्ख्या अजीसारखीच आहे. माझ्या आईची आई होती तेव्हा सुद्धा ती यायची आणि खूप जुन्या गप्पा करायची. जुन्या दिवसांबद्दल बोलायची. आम्ही सकाळी नाश्त्याला साबुदाना खिचडी तयार केली. सकाळी नाश्ता करून शेतावर जायचं असतं. आई, आजी आणि प्रांजु शेतावर गेले. आवण नाही आले म्हणून आम्ही मागून पेरणी सुद्धा केली. दुपारी शेतावर जेवण केले. प्रांजु शेतावर खूप मजा करतेय. कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग पाहण्यारखा असतो. पावसातील कोकण म्हणजे जणू स्वर्ग असतो. दुपारी आजीला सोडायला जावळे गावी गेलो. आजी जावळे गावी गेली तेव्हा पाऊस खूप जोरात आला.संध्याकाळी पुन्हा शेतावर गेलो. या वेळेस आम्ही प्रदनुला शेतावर घेऊन गेलो होतो. शेतात चिखल खूप झाला होता. प्रांजु प्रदनु चिखलात लोळत होते. लहान असताना आम्ही असेच शेतात धमाल करत असू. शेतावर गेलो तेव्हा पाऊस जोरात आला. आम्ही सगळे मिळून शेतावर काम केले. संध्याकाळी घरी येऊन चहा झाला. गावचं कोकणातलं शेतकऱ्याचं जीवन असं आहे. शेतीची कामे सुरू झाली की दिवसभर लोकं शेतात असतात. पेरणी, फोड, बेर झाली की लावणी सुरू होते. आम्ही सध्या कोकणातील आमच्या गावच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहोत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा सकाळचा नाश्ता शाबुदाना खिचडी आणि शेतावर प्रदनु प्रांजूची मजा दाखवली आहे. प्रदनु शेतावर चिखलात कसा लोळत आहे हे दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #SabudanaKhichadi #SabudanyachiKhichadi #ShetvarGelaPradnu #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 650

  • @vishakha2828
    @vishakha2828 3 года назад +59

    प्रदनु ने चिखलात खूप मज्जा केली . जगातील सर्वात सुन्दर सुख तुमच्या घरात आहे सतीश भाऊ. गावचा पावसाळा ,शेतीची काम त्यात भर म्हणून छानछान रेसिपीही पहायला मिळतात . व्हिडीओ एकदम भारी

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 3 года назад +49

    प्रदनु ने खुप मजा केली...असेच मुलांना आपल्या गावाची ,शेताची ओळख करून दिली पाहिजे.

    • @surajnikam6489
      @surajnikam6489 3 года назад

      Right

    • @rohitkeny3894
      @rohitkeny3894 3 года назад +1

      मुलांना काटक बनवत आहात.....उगाच बाऊ नाही करत....खुप छान

  • @ysbalgude4u
    @ysbalgude4u 3 года назад +8

    भात शेतीचे व्हिडिओ एकदम भारी असतात. भात पिकविताणा फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तुमच्या शेतीच्या व्हिडिओ साठी खूप शुभेच्छा.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +1

    शेतीचे व्हिडिओ बघून खूप आनंद मिळतो. ते कष्ट ते कुटुंबासहित शेतावरचे जेवण आणि मुलांची हौस पूर्ण झाली 🙏🙏🙏🙏

  • @savitajadhav428
    @savitajadhav428 3 года назад +3

    सतिश भाऊ तुमची मुलं नशीबवान आहेत की तुमच्यासारखे बाबा त्यांना मिळाले,कारण जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण आपल्या कुटुंबाला देण्यासाठीची तुमची धडपड कौतुकास्पद आहे.

  • @deepalolayekar6735
    @deepalolayekar6735 3 года назад +1

    शहरातल्या जीवना पेक्षा हे जिवन स्वर्ग सुखाचा आनंद देणारा. बाबु ला चिखलात खेळताना पाहून खूप आनंद झाला. हे सुख शहरात नाही उपभोगता येत. निसर्ग आणि तुम्ही एकरूप झालात .हे खरी श्रीमंती
    असेच आनंदी रहा

  • @varshakadam1993
    @varshakadam1993 3 года назад +2

    प्रदणू ची चिखलातली धमाल बघुन मजा आली अक्षरशः तो चिखलात मस्त माखून जीवाची धमाल केलान ❤️

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад +2

    आजी बरोबर बोलली, पूर्वी लोकांना डॉक्टर माहित नव्हते कारण तेव्हा लोकं शुद्ध आणि पौष्टिक खाणं खात होते... मूलांच्या चेहऱ्यावरचा आनंद... 👌 छान व्हिडियो आहे...👍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад

    खरचं खुप भाग्यवान आहे शेतीच्या कामात मजा केली आहे 👌 खुप धमाल आली बघून 👌 तुमचं गावं पावसाळ्यात खुप सुंदर आहे 👌 अप्रतिम सौंदर्य कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @anilgholap5407
    @anilgholap5407 3 года назад +2

    प्रदनुची शेतातली पहिली धमाल जाम भारी,आम्हीपण गावी राहतो.नाशिक जिल्ह्यात,पण कोकणाइतका पाऊस नसतो.तुम्हा सर्वांना पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад +1

    प्रदून चिखलात मज्जा करत आहे. गावी आल्यावर नावासारखं राहतो.Down to earth.

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 года назад +6

    खूप छान विडीयो मुलांनी खूप धमाल केली वर्षा आई खूप मेहनत करतात निसर्ग खूप छान रेसिपी मस्त

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 3 года назад +3

    😂😂😂............
    छान ...........
    प्रांजू आणि प्रद्रुन खूपच छान शेतामध्ये लोळून लोळून धमाल केली मला वाटतंय वर्षाताई तो लवकरच झोपला असेल बरं असेना का लहान मुलं म्हणजे देवा घरची फुले असतात ........
    मस्तच व्हिडिओ आवडला .......
    👍👍👍🤣🤣🤣🤣

  • @arvindakelakallusingh608
    @arvindakelakallusingh608 3 года назад

    खूपच सुंदर आहेत भावा तुम्ही सगळे खूप चांगले आहात असेच रहा बाबुने खूप मजा केली

  • @radhikaagravat6426
    @radhikaagravat6426 3 года назад +7

    विडियो👍 👌👌मस्त 👌👌👌छान 👌👌प्रांजू , प्रदुम्न दोघांनी आज मजा मजा केली मावशी आजी
    पण छान👌🙏🙏🙏

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад

    पदुने खूप छान मजा केली लहानपणी अशी आवड निर्माण व्हावी यासाठी खूप तुमचे प्रयत्न सर्व नीआपली काळजी घ्यावी

  • @MazaKonkanSwarggaurirane
    @MazaKonkanSwarggaurirane 3 года назад

    कोकणातील शेतीच्या कामाची मजा काही वेगळीच असते. मुलांना तर त्याचा आनंद लुटायला खूपच आनंद येतो. साबुदाण्याची खिचडी खूपच छान झालेली दिसते आताच खावीशी वाटू लागली आहे.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад

    हाय ,सतीश मी सुद्धा गावी लांजा येथे गेले होते.माझा भाऊ ऑफ झाल्यामुळे सगळे कार्य वगेरे होई पर्यंत तेथेच होती.तुझा व्हिडिओ आज 18 तारखेला पाहतेय.छान आहे मस्त शेतीचा नजारा ,चीखलात पदडू मस्त खेळत होता.pranju पण खूप मजा करत होती.एकदम सगळे गावच्या जीवनात रंगून गेले छान बघून आनंद झाला.व्हिडिओ मस्त 👍

  • @rajendrabhogal5370
    @rajendrabhogal5370 3 года назад +4

    असे विडिओ फक्त एक शेतकरी च बनवू शकतो.ग्रेट.अति सुंदर 👌👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад

    काळजी मिटली नवा लहान शेतकरी तयार झाला. आज प्रदनू नी शेतात भरपूर मेहनत घेतली आहे. आजी खूष झाली असेल व्हिडीओ मस्त झाला आहे.

  • @shrikantpatil6732
    @shrikantpatil6732 3 года назад +5

    मी पण शेतकरी आहे शेतीच्या व्यथा मला चांगल्याच माहीत आहेत बाकी व्हिडीओ छान आहे 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 3 года назад

    तुंम्हाला शेतात किती कष्ट करावे लागतात आई खूप काम करत असते तू आईला खूप मदत करतो बायको चांगली व हुशार आहे मुले पण गोड आहे रोज तुझा व्हिडिओ पाहिल्या शीवाय चैन पडत नाही असेच आनंदात रहा तुंम्ही सगळे खुप आवडता

  • @asmitapadyal3842
    @asmitapadyal3842 3 года назад

    खूप मस्त मज्जा केली प्रदनु ने त्याला हे सगळ अनुभवायला मिळत आहे आणि छान वाटल त्याची शेतातली मस्ती बघून .तुमची फॅमिली खूप छान आहे.

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 года назад +2

    आजचा व्हिडिओ खूप खूप छान होता आणि त्या आजी जे काही बोलल्या ते अगदी बरोबर होत आणि प्रज्ञेश ची धमाल 1 नंबर सुपर व्हिडीओ होता खूप मजा आली❤️👍

  • @prajktabargode7276
    @prajktabargode7276 2 года назад

    प्रदनु ने खूप एंजॉय केला ही मजा आणि हे सुख फक्त गावीच मिळू शकत

  • @gyangaming8726
    @gyangaming8726 3 года назад +2

    प्रदनु ची smile खूप छान आहे मला तो खूप आवडतो

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 года назад

    शेतावरची धमाल खूप छान शरदने आणि पारानजूने खूप धमाल केली जुने दिवस आठवले

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +1

    आजी खूप छान व सुंदर आहे तिला आमचा नमस्कार व ताईंची साडी खूप सुंदर पा्ंजू व प्रदनू खलाशी खूप छान मजा केली व मुले टिचर बिझनेस मन झाला तरी चालेल पण तुमच्या सारखे खूप खूप छान माणूस व पे्मळ स्वभाव असणाऱ्या मुले माञनक्कीच होणार शेत ही आपली आईच असते त्यामुळे तुम्ही मुलांना आईच्या कुशीत मनसोक्त आनंद आनंद घेवू दिला खरच मुले खूप सुंदर व मेहनती कष्टाळू आहे आत्ता पा्ंजू व खलाशी तुमच्या सारखा सगळ्यांचे मन जिंकणारा व त्याला मज्जा करताना पाहून छान वाटले व आता परत सारखे नेवू नका लहान आहे अजून तसेच पा्ंजू ची आँनलाईन शाळा चालू झाली तरी तुम्ही फँमिलीला घेवून मुंबईत आला तरी चालेल पण परत गावी जावू नका व आईला अजिबात मुंबईत आणू नका त्या गावीच चांगल्या व मस्तच आहे आजचा व्हिडिओ लय म्हणजे लय भारी तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात तुमचे पूर्ण फँमिलीवर खूप पे्म आहे देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही व लवकरच तुमची युट्यूब चॅनेलची खूप मोठे नाव होणार हे माञ नक्कीच ✌👍👌🙏

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    Kiti cute Pradnyu😊.....dhamaal keli chikhlaat....khupach chhaan vdo 🙌👍👌🚩

  • @vervalkarsam3383
    @vervalkarsam3383 3 года назад +1

    Bhai prdnu tar 1 no aahe same tuza sarkha aahe disayla n tuze video khup aavdtat asech chan video banvat raha

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 года назад +1

    प्रदनु ने खुप मजा केली शेतांत . आजीं एकदम बरोबर बोलला.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 года назад +1

    खूप छान व्हिडीओ मावशी आजी बोलल्या ते खरोखर आहे पहिली माणसे मस्त होती

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 3 года назад

    सतिश असेच छान छान विडीयो करीत जा! खुप मजा आली! असे लाईफ जगायला मीळत नाही! तुम्ही भाग्यवान आहात, घरी शेती आहे व तुम्हाला ती करायची आवड आहे! मुलांनी खुप एंजॉय केले, छान वाटले!! धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद!

  • @dancingangel2067
    @dancingangel2067 3 года назад +2

    Satish tuzi saglich mansa khup chan aahet tula khup support kartat you are really lucky👍

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад

    फार सुंदर निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणात तुम्ही आहात खरंच.खूप मस्त अनुभव येत असेल,आजी एकदम मस्त छान बोलत होत्या आणि रानभाज्या ची माहिती.छान सांगितले आहे. रानात जाऊन मस्त छान जेवण. मस्त व मनसोक्त मातीत खेळायला प्रदनुला मज्जा आली.छान. निसर्गरम्य व शेत जमीन साठी लागणारी ताकद व्हिडिओ छान.लय भारी

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад

    शेती karta karta tumhi sarv family khup enjoy pn kel. प्रदनु tr khup ch cute dist hota👌👌

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 года назад

    विडियो फारच छान आहे प्रदनु प्रांजु यानी शेतात भरपुर मज्जा केली So Cute ☺️☺️

  • @SKjadhav344
    @SKjadhav344 3 года назад

    सर्वच व्हिडिओ पहात छान आहे गावाकडची मजा काही औरच असते
    छानच छान

  • @shwetatharkude9058
    @shwetatharkude9058 3 года назад

    Khup chhan video. Vahini bhari aahe कामाचा कंटाळा करत नाही.
    प्रदनू v प्रांजू ni शेतात खूप धमाल केली.

  • @asharawool4854
    @asharawool4854 3 года назад

    Ha shetavarcha video khup avadla.Pradnune khup maja keli kasla bhari aahe to .
    Aamchtasarkhya samany mansana he sarv junya aathvanina ujala denar aahe . Dhanyawad aapan he sarv punha samor aanun dilyabaddal

  • @asmitasood652
    @asmitasood652 3 года назад

    आंम्ही सुध्दा लहान असताना शेतात जायचो असेच चिखलात मजा करायला या निमित्ताने आठवण जागी झाली खुपच सुंदर

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 года назад +1

    Satish da tu khup mehenati aahes, khup chhan pradnu chi tar majjach aahe lucky aahe gavchi mati angala lagliy purn ,pradnu pan khup motha hoil karan kokanchya matit tyach balpan jatay

  • @blackff-po3ir
    @blackff-po3ir 3 года назад

    तुम्ही तुमच्या मुलांची मातीशी करून दिलेली ओळख आम्हाला आवडली

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 3 года назад +1

    Pradun ani paranju ne khup mazya keli, mulnachi mazaya cha aste shetat. Masat life enjoy you. I like that

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 3 года назад +1

    खुप सुंदर तुमची शेती घर खास वर्षाचे कौतुक.

  • @madhurinaik668
    @madhurinaik668 3 года назад

    फारच छान वहिनी फार छान आहेत काम करायला कंटाळत नाहीत सदा हसत राहतात फार आवडतात

  • @user-fo5uk4ch1v
    @user-fo5uk4ch1v 3 года назад

    काय भारी प्रदनु खेळत होता मझ्या आली त्याला बगुन छान अप्रतिम

  • @ashwineesalve7758
    @ashwineesalve7758 3 года назад

    Pranju pradnu kiti mast enjoy karat hote..me tr ajun parayant chikhalat paay pn nahi thevla...khup mast life ahe yr tyACnch

  • @rahulghevade4251
    @rahulghevade4251 3 года назад +37

    Dada tumi ekdivas khup mote youtuber honar नक्की ❤⚡

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 3 года назад +5

      मोठेच युट्यूबर झालेत...

    • @rahulghevade4251
      @rahulghevade4251 3 года назад +4

      @@babalyautekar6196 अरे भाई अजून पुढे काय सबस्क्रायबर होत नाहीत काय मोठे म्हणजे मी वन मिलियन म्हणत आहे

    • @ramsathe
      @ramsathe 3 года назад

      फार मोठे youtuber व्हाल

    • @supriyaparab8788
      @supriyaparab8788 3 года назад

      खुप छान 👌👍

    • @pragatinandan5816
      @pragatinandan5816 3 года назад

      @@babalyautekar6196 क

  • @asmitasood652
    @asmitasood652 3 года назад

    वा छान सुंदर प्रदनूची खूपच मजा झाली

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    खूप मजा आली आजचा व्हिडीओ बघून. शेती करणे म्हणजे खाऊ काम नसते. खूप कष्ट करावे लागतात. लाडूने आज खूप मजा केली व आम्हाला पण आनंद दिला. म्हातारबा मस्त तुरू तुरू चालत शेतावर गेले व चिखलात मस्त लोळले. एकदम गोड हसतो व बोलतो जाडू जाडू. लहानपणी अशी बाळसेदार मुले खूप गोड वाटतात. माझी मुलगी पण अशीच जाडू जाडू होती. मजा येते लहान मुल असले की.

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад

    आज प्रदनु ने खरचं जाम धमाल केली आणि सोबत प्राजु पण दोघांनाही मस्त मज्जा आली असणार
    आजी ची महत्त्वाचे दोन संदेश दिले ते म्हणजे जुनी खान पाणा विषय ई खरच आज पुर्वी सारखे पोषटिक खानेच नाही राहिली सतिश भाऊ तुम्ही आज चा विडिओ पण नेहमी प्रमाणे च एक आगळा वेगळा दाखवला असे वाटले आपण पण जावे तुमच्या मदतीला खरच शेतातील काम करण्याची मज्जाच काही ओर असते
    सतिश भाऊ तुम्ही प्रतेक वेळी विषय खुप छान असतात मला आयकायला व बघायला छान वाटतात असे च छान छान गावातील गोष्टी दाखवा आजच्या पिढीला गावाचे महत्त्व कळले

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Thank you ❤️❤️😊

  • @pravinwanivadekar7326
    @pravinwanivadekar7326 3 года назад

    प्रदनूची फुल धमाल मस्त दादा मी पण शेतकरी आहे शेतात काम करने म्हणजे एक वेगळीच मजा असते स्वर्ग सुख👌👌👌👌👌

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 года назад +15

    सतीश भाऊ नमस्कार...!! 🙏
    👍 यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर सुप्रसिद्ध चित्रफिती कार सतीश र टाटे. मेहनती व्यक्तिमत्व सतीश भाऊ तथापि मेहनतीचे, कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे दुसरे नाव सतीश भाऊ... 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @pratiksha6518
    @pratiksha6518 3 года назад +4

    Khup mast vidio 😍pradanu tar khup cute aahe ❤😍

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 3 года назад +3

    Pradu video clip part watching again and again and again, My kids also enjoyed they never had this great experience. Satish great video making with doing field work. Keep making simple life great video.

  • @SandeepATate
    @SandeepATate 3 года назад

    Adbhutt!! Mumbait basun gaavchya maaticha suvaas ghetla!! Laamb shwaas khechla ani mann prassann kele!! God bless you guys!!🕉🙏🏼👍👍🌹🌹🌹🌹 Faarach sundar Video.!!!!👍👍🌹🌹

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 3 года назад +1

    मी आपले व्हिडीओ पहातो. दक्षिण कोकणातील
    परिसर ,डोंगर ,समुद्र फार आवडतात .

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 3 года назад

    Babune aaj khoop enjoy kela farm madhe actually khupach maja yete shetat nachaila ani rainy season madhe maja yete khichadi chhan banavli aaji aai vahini chhote dost sarvana maza regards dya

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 2 года назад

    पदनू नी खूप खूप मज्जा केली व्हिडीओ एकदम मस्त

  • @kansar1723
    @kansar1723 3 года назад +1

    Dada tuza kutamba khup chan ahe & Vahini pn khup chan ahe .
    Pradnu & pranju ani tuzi aai pn khup chan ahe
    Kiti chan ayusya jagtay thumi heva vatato saglyacha
    Asech Anandi raha

  • @shraddhadeo08
    @shraddhadeo08 3 года назад +1

    दोन्ही मुलं खूपच गोड आहेत,प्रदू ला गोड गोड पापा तो पण cute आहे त्याला कॅमेरा छान समजतो लहान आहे तरी सुदधा,'पपा प्रमाणे त्यालाही कॅमेरा समोर बोलायचं असत हे समजत ,😆😆😆

  • @sushmabhosale6354
    @sushmabhosale6354 3 года назад +1

    Vahini sugran ahe ani Khup Hasat mukh ahe Tumchi Aaji Je bolya junya lokan badal te khar ahe Pahili lok Dr javal n jata strong hote

  • @pritikarande6976
    @pritikarande6976 3 года назад +1

    Khup mast vatat video pahun lahanpanchi athvan yate

  • @smitavaidya4250
    @smitavaidya4250 3 года назад +1

    Kharach asa chikhlat mulana khelun dyava majja asate hich lahan panachi athavan Khup chan video

  • @mugdhapatil4980
    @mugdhapatil4980 3 года назад

    मस्त प्रज्ञूने व प्रांजलने छान मजा केली शेतात

  • @ashwinizore8301
    @ashwinizore8301 3 года назад +9

    Very nice,nowadays parents don't allow children to play in mud. Very good development of your children. Good experience for them. 👍👌👌👌

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 3 года назад

    Khup mazya aali video baghatana, superb, gaon chi mazya vegale, lahan vavese watale ,ajun ,khup maza kara

  • @bhartijadhav541
    @bhartijadhav541 3 года назад

    pradnu ne khup enjoy kel... Kharch tumcha mulanaa bgun as vatt ki kharch balpan dega deva🥰🥰

  • @ashishsawant848
    @ashishsawant848 2 года назад

    Satish dada mala tumcha gav khup aavadla aani tumcha ghar pan Chan aahe tumchi mulgi aani bal khup sweet aahet vahini che recepi khup mast aste 👌👍

  • @yogeshvaishampayan3285
    @yogeshvaishampayan3285 6 месяцев назад

    छान व्हिडिओ मुलांनी मस्त मज्जा केली

  • @akashpatangrao479
    @akashpatangrao479 3 года назад

    Kharach khup sundar video hoti..pradnu chi full dhmal pahun maja Ali..amchya lahapniche divas athavle ❤️

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    सतीश खूपच मस्त व्हिडीओ, अप्रतिम प्रांजू गोलुची जाम धमाल, तुम्हा सर्वाना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद

  • @npvlog9691
    @npvlog9691 3 года назад +2

    प्रदनू ची शेतातील धमाल खूप छान

  • @pachloresurekha2659
    @pachloresurekha2659 3 года назад +1

    Khup chan vaty. Tumche vidvo bghitlyvr.. Gawakdchi Aathvan yete..

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 3 года назад +1

    प्रदनु ने खूप मज्जा केली
    लय भारी

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas3641 3 года назад

    खूप छान व्हिडियो आहे.. प्रदनु आणि प्रांजू ने खूप धमाल केली..

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 3 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे .प्राजू आणि पदुडी नी खूप मज्जा केली मस्त.

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 года назад

    Kup avadla chanach family. Mi lavnila tumcha kade yein kiti kashata kartat. Khaychi kame nahit. Aji mhanaychi tandul dutana tandul sandu nako ekek danyala kiti kast padata tyala.sasri gelis tar sasu tov maril. Tumi amala bhutkalat ghevon jatat. I love your family. Ai kiti kastkartat salut. Chota bhavo ka madat karat nahi? Vahini pan don mulana sabhalun gret.kalji ghya parmeshvar tumchya kashtana yash devo. Amchya cutuklya kay bolto te amala samajto love him soooooo much. Stay blessed

  • @user-xl1xm8yq4x
    @user-xl1xm8yq4x 3 года назад +1

    Barobar aajine sangital....gavathi bhaji khaun dakathar mahit navta ❤

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 года назад

    pradnu khup majja kartoy aani pranju aani sheyetat madhye mase pan bhetat na aani feel hota na man mast😅😄👌👍

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq 3 года назад +1

    P redun khup sweet shetat jewen Gheun aai sathi versha khup sweet so sweet family

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 3 года назад +2

    वर्षा ताई खुप काम करते आईंना व खुप काम आणि प्रदनु तर गोलू मोलू त्याला घ्यावस वाटतं

  • @beallrounder7525
    @beallrounder7525 3 года назад +1

    खूप छान वातावरण आहे 👌👌👌👌👌

  • @madhurishinde7874
    @madhurishinde7874 3 года назад +1

    Pardnu aani parnju ne khupach majja keli mast 🥰😘

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar9196 3 года назад +1

    Chan chan Aajcha video pradnu na shetat bagun khup chan vatla

  • @sakshisalunke9088
    @sakshisalunke9088 Год назад

    Tumchya gavacha najara khupach sunder pradnyu ne khup dhamal keli aai khup kasht ghetat tyancha chehara nehami hasara asto.mala tumche vlog khup aavdayala lagale ahet

  • @sagar8140
    @sagar8140 Год назад

    आजी खरोखर १ no बोलली आणि खरे ग्रेट आजि

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 года назад +2

    Pradnu aani Pranju enjoy kratat shetamadhe

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 3 года назад +1

    हो आजी बरोबर बोलतायं अनुभवांचे बोल आहे 👍👍

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 года назад

    छान ब्लॉग 👍 आजी बरोबर बोलते...आपण जे खातो ते सगळं unhygienic khato...पूर्वीची माणसं किती काटक n nirogi astat....aji kiti sunder ahe आणि तिची नथ मस्तच 👍वातावरण खूप सुंदर 👍pradnu खूप क्यूट आहे...प्रंजुंची इच्छा मस्त teacher होण्याची👍साबुदाणा kasava roots pasun banato

  • @snehalshahapurkar9154
    @snehalshahapurkar9154 3 года назад +2

    Family khup mast ahe tumchi...amhi tumche sagale videos bght asto

  • @nileshmalusare7043
    @nileshmalusare7043 3 года назад

    Satish mitra tuzya video pahaychya adhich apla like n comment.... Gav mhanje swarg ahe re. Sunder video astat tuzya

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад

    मला पण साबुदाणे ची खिचडी आणी वडे खूप आवडते । पद्नु ची धमाल । शैतकरी झालो ।❤️❤️ विडीयो 👌👌👍✌️ पावसात निसृग खूप छान हीरवागार ।

  • @jindgiekhunarpoornimachoug1837
    @jindgiekhunarpoornimachoug1837 3 года назад +1

    Super video pradnu pranju chikhlat khelale khup chan enjoying

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    मस्त वीडियो👏✊👍 लहानपण असे पाहिजे.. शेतीच्या काळ्या मातीमध्ये हुंदडणारे....

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 3 года назад

    खरंच प्रदनू ची मज्जा आहे.

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 года назад

    व्हिडीओ ऐक नंबर लय भारी 👍👌👌👌

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +1

    भारी विडयो टायकुळयाची भाजी दाखव प्रदनु ❤️🥰मावशी आजी 🙏🙏

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 2 года назад +1

    Pradnu Khup Gaabu distoy, Ekdum Mast Vlog🥰✨💜