Terekhol Killa Goa|| Tetekhol Fort Goa || Fort Of Terekhol

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • तेरेखोल किल्ला गोवा || Tetekhol Fort Goa |
    गोवा राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला. तो तेरेखोल नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून वेंगुर्ले, रेडी मार्गे येथे पोहोचता येते, तर गोव्यातून पणजी, अरंबोळ, केरी मार्गे तेरेखोलची खाडी बोटीतून ओलांडून यावे लागते. गोव्यातील पेडणे गावाच्या वायव्येला सु. २० किमी. अंतरावर हा किल्ला आहे, शिवाय सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथून गाडी रस्त्याने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते.
    तेरेखोल किल्ला, गोवा.
    तेरेखोल किल्ला संपूर्ण जांभा दगडात बांधलेला व सुस्थितीत असून किल्ल्याचे दोन भाग आहेत. समुद्र सपाटीपर्यंत उतरत जाणारा किल्ल्याचा परिसर आणि बालेकिल्ला. या किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप दिसून येते. किल्ल्याचे नव्याने बसवलेले लाकडी प्रवेशद्वार पूर्वेकडील तटबंदीमध्ये असून या प्रवेशद्वारासमोर गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक आहे. गडाचे दरवाजे जुनेच असून वैशिष्ट्यपूर्ण अशा दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर एक मोठा पेटारा, बाजूच्या भिंतीवर दोन भाले आणि किल्ल्याचा नकाशा लावलेले दिसतात. प्रवेशमार्ग नागमोडी वळणाचा असून उजवीकडे असणाऱ्या कमानयुक्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश होतो. समोर मोठे प्रांगण असून यात डावीकडे पोर्तुगीज धाटणीचे सेंट अँथोनी चर्च दिसते. जवळच एक मोठा क्रॉस (ख्रिस्ती धर्म प्रतीक) असून त्याच्या पायाशी संगमरवरी दगडावर कोरलेला शिलालेख आहे.goa vloggoa trip plangoa trip vloggoa trip budgetgoa tourist placesgoa trip places to visitgoa travel guidegoa travel vlogplaces to visit in goagoa tour plannorth goagoa tour guidethings to do in goagoa travel plansouth goagoa tour packagegoa trip 2023goa tourismthings to do in north goagoa tourist spot

Комментарии • 8