बाणाईची मेथीची भाजी बनवायची पद्धत निराळीच हाय, भाजी लय चविष्ट बनवली | dal methi bhaji recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @vaishalipandit8867
    @vaishalipandit8867 Год назад +404

    बाणाईला माझं कौतुक सांगा हो दादा ! उघड्यावर असा नीटनेटकेपणे स्वयंपाक करणे किती कठीण आसते, पण बाणाई आगदी सहजपणे वावरतात.बोलतात.छान रेसिपी दाखवतात.तुम्हा लोकांच्या कष्टातून ही आनंद तुम्ही फुलवता.खरंच कमाल आहे.

  • @ishaakulwar1031
    @ishaakulwar1031 10 месяцев назад +47

    असं बाहेर उघड्यावर स्वयंपाक करताना आणि प्रेमाने घरच्या लोकांना वाढणे यातच खुप आनंद आहे हेच खरं जिवन🙏🌹 🙏

  • @smitapatil-khairnar8962
    @smitapatil-khairnar8962 Год назад +124

    सौंदर्य अस उघड्यावर पाहिल की वेदना होतात मनाला पाहिले धनगरांचे जीवन जवळून पण खूप खुश राहतात नवऱ्यासोबत प्रामाणिक राहतात सतत फिरस्ती असूनही छान संसार करतात

  • @saraswatijawale456
    @saraswatijawale456 10 месяцев назад +7

    बाणाई चे खूप खूप मनापासून अभिनंदन असं उघडया वर सुंदर स्वंयपाक करणे प्रेमाने खाऊ घालणे किती सुंदर स्वर्गही यापुढे फिके पडे मला ही बाणाई ची भाकरी भाजी खायची इच्छा झाली मनापासून.।👌👌👌💐💐💐

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 Год назад +108

    बाणाईबाईन चुलीवरची मस्त 👌👌भाजीबनवली. निसर्गाच्या सानिध्यात आंनदी जीवन जगता देव तुम्हाला शक्ती देवो. 🙏🙏💞😄

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni5114 11 месяцев назад +138

    कोणत्याही सुविधा नसताना इतक्या नीटनेटकेपणा ने स्वयंपाक करणे सोपे नाही.
    बाणाई ताईंचे खरंच कौतुक आहे.

  • @sunitapanhalkar9304
    @sunitapanhalkar9304 Год назад +47

    डोक्यावरील पदर पडू नाही दिला हिच आपली संस्कृती . खुप खुप छान

  • @ishaakulwar1031
    @ishaakulwar1031 10 месяцев назад +16

    खुप छान.सर्वात महत्त्वाचं स्वयंपाक करताना खूप शेतात करत असतांनाच सुध्दा साफ सुतरेपणाने करणं आणि करण्याची पद्धत.. खुप छान..🙏ताई

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 10 месяцев назад +20

    खूप सुंदर जीवन शैली.. निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच माणूस सुखी, निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकतो.

  • @anuradharenavikar4636
    @anuradharenavikar4636 10 месяцев назад +6

    बाणाई भाजी एकदम मस्तच. मलापण अगदी जेवायलाच बसावे असेच वाटले.खूपच सुंदर व्हिडिओ झाला आहे.

  • @rajeshmankar8682
    @rajeshmankar8682 11 месяцев назад +41

    हा जगण्याचा साधेपणा, ही शुद्ध संस्कृती टिकून राहावी ही परमेश्वरा चरणी प्रार्थना 🌹

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 Год назад +11

    सुगरण कुठेही असो संसार आणि स्वयंपाक उत्तमच करते छान बानाई वहिनी आणि दादा छान video 👌🙏💐😊👏

  • @namratakhot7380
    @namratakhot7380 Год назад +26

    एक गोष्ट छान आहे कि तुम्ही सगळे छान धुवून घेता बनवताना 😊😊👌🏻👌🏻खूप chan

  • @arunkhadse6641
    @arunkhadse6641 10 месяцев назад +9

    मस्त,मेथीची भाजी व बाजरी ची भाकरी छान जंगलातील जेवणाचा आनंद घ्या 👌

  • @pandurangchoudhari4267
    @pandurangchoudhari4267 10 месяцев назад +8

    आक्का, तुझं जेवण सर्व चुलीवर केलंय. दिसतय ते किती चवदार झालं असणार, भाजी भाकरी,हरबऱ्याची आमटी आणि बाजरीची भाकरी. रानमेवा. 👌👌👌

  • @smitabarve9379
    @smitabarve9379 Год назад +89

    खरच तुमचं जगणं किती कठीण परिस्थितीत असत हो दादा आणि वहिनी..तुम्ही खरंच ग्रेट आहात..आयुष्य प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने कसं जगायचं हे तुमच्याकडून शिकावं खरंच🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @suvarnakadekar9904
    @suvarnakadekar9904 Год назад +280

    जीवन आनंदात जगायला किती कमी सामान लागते..पण माणूस किती हव्यास करतो..

  • @rnk374
    @rnk374 10 месяцев назад +25

    तुमच्या संसाराला लक्ष्मी आई चा आशीर्वाद मिळो दादा 🙏

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Год назад +19

    गावरान जेवण कधीही चांगलं, मेंढपाळ जीवन निसर्गाच्या सानिध्यात स्वयंपाक बनवुन खाणे आरोग्याला उत्तम खूप छान

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Год назад +41

    बाणाई, एकदम झक्कास मेथीची रेसिपी दाखवली, वाटलं तव्यावरची गरम बाजरीची भाकरी घ्यावी आणि तुमच्या सोबतच जेवायला बसावं !

  • @PurabiyaSanjal
    @PurabiyaSanjal 10 месяцев назад +25

    सुंदर 👌 खाना तो परिवार के साथ ही सुख देता है।
    गृहिणी का स्नेह मिला है। पूरा परिवार एक साथ और नन्हा बालक भी साथ। 👌👌👌👌👌

  • @manisharasal5701
    @manisharasal5701 Год назад +17

    दादा तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ रेसिपी पण खूप छान टाकली 🙏🙏👌👌👌 चुलीवरची भाजी भाकरी बघून खुप छान वाटल 👍👍👍

  • @suchemahajan9830
    @suchemahajan9830 11 месяцев назад +11

    खूप कौतुक आहे बाणाईचं.इतक्यात भाजी बनवून खाण्याची मजा भारीच असणार

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 Год назад +7

    निसर्गाच्या सान्निध्यात बाणाईताईनी खुपच सोपी व अप्रतीमच मेथीची भाजी बनविली...ईश्वर तुम्हा सर्वांनाच सुखी ठेवो हीच प्रार्थना..ॐॐॐ

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Год назад +34

    खूप छान भाजी बनवली बाणाई ने 👌👌 बाणाई अगदी सुगरण आहे हो भाऊ ❤️❤️असेच मस्त व्हिडिओ बनवत रहा...तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏

  • @bharad1234
    @bharad1234 10 месяцев назад +34

    बानाई खूप मेहनती आई आहे. त्यांचे बाळासोबतचे कौतुक खूपच छान वाटले. बाणाई च्या निरागस संसाराला आमचा सलाम. बानाई व त्यांच्या कुटुंबास ईश्वर सदैव खुश ठेवो! त्यांच्या रेसिपीज खूप छान व घरच्या वाटतात. 🙏👍

  • @nandinipandharkar9646
    @nandinipandharkar9646 10 месяцев назад +16

    लय भारी गावची आठवण आली आम्ही लहान होतो तेव्हा वावरात सपार बांधून आजोबा रहायचे तेव्हा चुलीवर अशीच भाजी भाकरी खायचो😊

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 Год назад +17

    सुखी जीवन कसं जगावं हे तुमच्याकडून शिकण्या सारखें आहे माऊली छान आहे त्यात समाधान हे तर सुखी जीवन ,🙏🙏👌👌

  • @gourikamble4769
    @gourikamble4769 Год назад +21

    खूप सुंदर दादा, डाळ घालून केलेली मेथीची भाजी, मी पण अशीा भाजी करून बघेल, तुमचं साधं-सरळ संसार बघून खूप आनंद झालं, सागर चं मुक्तपणे खेळणं बागळणं मन मोहून गेलं असेच मस्त म स्वस्थ व आनंदी रहा, सागरला खूप खूप आशीर्वाद.

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 11 месяцев назад +14

    👌👌👌भावा तुमचे जीवनही आवडले आणि जेवण पाहून आवडले. तुमच्या बरोबर जेवायला खूप आवडेल. खूप खूप छान भावा. 👌👌👌

  • @ganpatgaikwad5342
    @ganpatgaikwad5342 Год назад +5

    बानाई कडे एक कौशल्य आहे खुप छान सवपाक बनवते आहे त्या परिस्थिती मस्तच धन्य ती अन्न पुर्णा

  • @rajashripatil7642
    @rajashripatil7642 11 месяцев назад +5

    उघड्यावर केलेल्या स्वयंपाकात खरा पौष्टिक आहार असतो

  • @vedantighumare4197
    @vedantighumare4197 Год назад +24

    हरभरा डाळीची भाजी आमटी एकदा नक्की दाखवा बानाई ताई तुम्ही छान करता स्वयंपाक👌👌

  • @nehaambadkar7071
    @nehaambadkar7071 4 месяца назад +1

    खुप छान मेथी भाजी खरपूस भाकरी त्याचा स्वाद अप्रतिमच आहे. निरागस आई बाळाचे कौतुक खेळ प्रेमळ संवाद .❤
    धनगर जिवन शैली तरी सुखी संसार हे पाहुन दृश पाहुन मन भरुन आले.
    🙏🙌🏻🙌🏻

  • @tejakulkarni543
    @tejakulkarni543 11 месяцев назад +7

    भाजी करताना पाहूनच खावीशी वाटतेय..मस्त.

  • @sainathgaikwad8784
    @sainathgaikwad8784 11 месяцев назад +6

    बानाई आईचं खूप कौतुक.रानात छान भाजी बनवली.

  • @sangitakadam1131
    @sangitakadam1131 Год назад +5

    बाणाई खूप छान झाली भाजी आणि वाटण छान वाटले . अगदी लहान असताना शेतात पाहिलेल्या स्वयपांकीची आठवण झाली.

  • @pravinvitthalu9573
    @pravinvitthalu9573 10 месяцев назад +4

    छान भाजी केली खरंच हे दिवस गेले आता

  • @irreplaceable-nandeeni3112
    @irreplaceable-nandeeni3112 10 месяцев назад +5

    खूपच छान, बानायी ताईंच्या रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटते ❤️ दादा सागर ला शाळेत घाला..त्याला चांगले शिकवा .

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 Год назад +20

    बाणाईला सांगा दादा मेथीची भाजी खूपच छान बनविली 😊👌

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Год назад +7

    खूपच छान पद्धत व आरोग्यासाठी चांगली आहे👌👍👍

  • @smitachaudhari8782
    @smitachaudhari8782 22 дня назад +1

    मस्त ! छान निसर्गात् स्वयंपाक करणे ही पण कलाच आहे . बानाइ तुझासाठी ❤

  • @MalatiYenpure
    @MalatiYenpure 11 месяцев назад +10

    खुप छान बानाई मेथी आणि भाकरी

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 10 месяцев назад +1

    भाजी खूप छान झाली असणार. ताई इतक्या कमी साहित्यात छान जेवण. सुखी रहा. मी अशीच भाजी करून पाहिन.

  • @chhayasonawane9956
    @chhayasonawane9956 Год назад +5

    ताई तुम्ही खूप छान भाजी ची रेसिपी सांगितले आहे खूप छान

  • @shubhangibrahme204
    @shubhangibrahme204 2 месяца назад

    किती छान. मोकळ्या वातावरणात फक्कड जेवणाचा बेत. Simple &:sober

  • @pratimadixit2558
    @pratimadixit2558 Год назад +4

    खूपच सुंदर / चुलीवर स्वयंपाक बनविणे ही 1 कलाच आहे / बाणाईचे खरच खूप कौतुक 👌👌👍

  • @Neenzz1
    @Neenzz1 11 месяцев назад

    खूप सुंदर जीवन जगत आहात उघड्यावरती संसार असूनही तुम्ही एवढे आनंदात आणि समाधानाने जीवन जगत आहात. बाणाई खरंच स्वच्छ आणि सुंदर स्वयंपाक करते तिचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे ती सहजतेने करते उघड्यावर आणि कमी सामानात सुद्धा

  • @raniparasnis8832
    @raniparasnis8832 Год назад +4

    वा मेंढर घेऊन हिंडणार्‍या आणि उघड्यावर राहणार्‍या धनगराने छानच विडिओ केला आहे. बाणाई जवळ असलेल्या साधनांचा वापर करून पटापट किती चविष्ट स्वयपाक करतायत. मेथीच्या भाजीची हि पद्धत करून बघितली पाहिजे. पण भाकरी मात्र बाणाई सारखी जमणार नाही. तुम्हा दोघांचे कौतूक वाटते.

  • @malini7639
    @malini7639 11 месяцев назад +1

    बाणाई मिरची लसूण वाटल्या वर हात खुप आग मारतात आम्ही पण पुर्वी पाट्यावर मसाला वाटायचो व चुलीवर स्वयंपाक पण तुमचे कठीण काम छोटा पाटावरवंटा ,तिन दगडाची चुल . बाणाई अन्नपूर्णा आहे . सागर आई आई करतो छान वाटते .आईच्या पाया पडतो आहे लयी छान वाटले .

  • @sunitasalunkhe5164
    @sunitasalunkhe5164 Год назад +60

    Great people simple living with high satisfaction, happiness.. Less needs more happy... Hats off ❤❤

  • @shobhashinde5998
    @shobhashinde5998 Год назад +2

    गावाकडे कोणीही काही पण देतात सगळ्यांना आता बघा मिरच्या घेऊन जा म्हणाली ताई
    आणि त्या वातावरणात काय भारी लागते भाजी. ती पण patyavar वाटलेली.waw amezing. आता कोणी इतकी मेहनत नाही करीत वाटायची. देवा banala सुखी ठेव.
    ताई खुप छान रेसिपी.👌👌👌👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +25

    दादा video ची वाट पाहीली Video ची खूप सवय झाली आहे. तुमचे Video खूप आवडतात 👌😊👍

  • @shrigurudevdatt9043
    @shrigurudevdatt9043 Год назад +1

    राधे राधे हरे कृष्णा श्री गुरुदेव दत्त प्रणाम सुंदर जीवन आहे ताई

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +4

    व्हिडिओ खूपच मस्तपैकी हाय मेथी ची भाजी लय भारी सागर लयच गोड आहे❤❤

  • @suwarnaritapure2645
    @suwarnaritapure2645 11 месяцев назад +1

    बाणा ई तुमची स्वच्छ्ता, नीटनेटकेपणा, सरळ साधसोप बोलण खूप आवडत, जे आहे त्यातून च चांगल कस बनवायचं तुमच्या कडून शिकावं, आम्ही कितीही मसाले आणून घातले तरी तुझ्या हातची सर येणार नाही, तुझा स्वयंपाक बघितला की तोंडाला पाणी सुटते, तुम्हाला पाहिले की बहिणाबाई आठवते, सुख म्हणजे नक्की काय असते... तुमच्याकडे पाहून कळते..

  • @sabihasayed8389
    @sabihasayed8389 10 месяцев назад +7

    साधी कष्टाडू मानसे, सादा जेवन पण ह्याचातच जीवनातला असली मज्जा आहे

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 10 месяцев назад

    कुठलीही आधुनिक साधनसामुग्री। नसतानाही किती स्वच्छ, नीटनेटकी या सुंदर भाजी केली आहे!फारच कौतुकास्पद!आजूबाजूचा निसर्गही छान! आवडलं!

  • @shrawanishinde2421
    @shrawanishinde2421 Год назад +18

    Simply Outstanding Bhaji, Great Life Dining in Surrounding of Nature, Roti is so yummy

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 10 месяцев назад

    मेथीची भाजी खूपच छान झालीय.दादा म्हणतायत तसं बाजरीची भाकरी आणि ठेचा या भाजीबरोबर मस्तच लागेल.

  • @patrickdsouza1183
    @patrickdsouza1183 10 месяцев назад +10

    I lov the way she cooked it. Thanks a lot. Looking forward for more videos.

  • @asmitainamdar3766
    @asmitainamdar3766 9 месяцев назад

    विळी ऐवजी कोयत्याचा वापर किती छान. भाजी तर चविष्टच असणार. लगेच जेवायला यावं असं वाटतंय बाणाई.

  • @sayyed9161
    @sayyed9161 Год назад +3

    खूप छान. शेतात..भज्जी खूपच छान पाठीतीची होती🙏❤️

  • @Creator-Sangitabachkar
    @Creator-Sangitabachkar 10 месяцев назад

    वा माऊली खूप छान भाजी बनवलीत अगदी प्रतिकूल परिस्थितीत खूपच छान....... 🙏

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Год назад +7

    छोटं बाळ फार गोड आहे. मला माझ्या नातवाची आठवण झाली. 🥰

  • @hemarasal3272
    @hemarasal3272 2 месяца назад

    घरोघरी अशीच समाधानी अन्नपूर्णा नांदो, मला फार आवडली भाऊ तुमची बाणाई व तिचा नेटका सुगरणपणा 👍

  • @vidhyachavan8950
    @vidhyachavan8950 Год назад +3

    खूप छान मेथीची भाजी अन बाजरीच्या भाकरी एक न.बेत मला खूप च आवडते

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 11 месяцев назад

    खरच खुप कौतुक आहे बाणाईचे .रानातही सर्व स्वच्छता पुर्वक धुवून वगैरे भाज्या घेऊन स्वयंपाक करणे.भाषा पण छान सफाई दार बोलणे.व्हिडीओ होतो आहे तरी न डगमगता सर्व छान जेवण वाढण्या पर्यंत केले.भाकरीपण सुंदर थापल्या.बाणाई तु खरी अन्नपूर्णा आहेस.

  • @SanataniHindu-f7f
    @SanataniHindu-f7f Год назад +16

    सुख म्हणजे नक्की काय असतं❤

  • @medhasupanekar9185
    @medhasupanekar9185 4 месяца назад

    साक्षात अन्नपूर्णा. शुद्ध सात्विक अन्न. कमालीची स्वच्छता.

  • @radhikapawar4249
    @radhikapawar4249 Год назад +5

    खूपच छान करतात बानाईताई ,असेच रेसिपी दाखवत रहा !

  • @artclassesvyawahare8700
    @artclassesvyawahare8700 11 месяцев назад

    मी पण ह्या पध्दतीने करुन बघेल भाजी
    माझी कुक नेहमी म्हणते की मेथीची भाजी असे करतात पण मी तीला करु नाही दिली पण आता नक्कीच करेल मला पण आवडेल . भारी डायनिगं टेबल वरील जेवन पेक्षा तुमचे जेवन भारी वाटले .असेच नवीन रेसिपी दाखवत जा

  • @Arundhati-r8b
    @Arundhati-r8b 11 месяцев назад +4

    खुप कठीण असत असं जीवन पण तुम्ही ते सहज सुंदर जीवन बनवता ह्यालाच सुखी सं संसार म्हणतात 👍

  • @sarikapatil3600
    @sarikapatil3600 10 месяцев назад

    खरंच तोंडाला पाणी सुटलं असा स्वयंपाक पाहून.खरं तर रानमळा मध्ये जेवायला जायचं आम्ही कधीतरी मज्जा म्हणून जातो पण तुम्ही तर हे जीवन रोज जगत आहात आणि त्याचबरोबर आम्हाला नवीन रेसिपी सुद्धा सांगत आहात धन्यवाद सलाम आहे तुम्हा सगळ्यांना👍

  • @neelawadke7020
    @neelawadke7020 Год назад +4

    ताई तुमचे कश्टाळुहात त्यात सुरेख बांगड्या चेहर्यावरील तेज तुम्ही अतीशय सुंदर आहात. ❤

  • @sheelaNabria-yj4ec
    @sheelaNabria-yj4ec 11 месяцев назад

    Khup cchan video blog dhanyawad methi chi bhaji banavinyachi paddhat. Best khup cchan aani shetat le jevan nachi goshtach nirali aste dhanyawad video Sathi Namaskar Om Sai Ram

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 Год назад +49

    Wonderful ! Awesome ! Amazing ! These people, their cuisine and their innocent simple, down to earth 🌎 and close to nature lifestyle !☺️💜❤️💛💜🧡💚💕💕💕🙏🙏🙏🙏🙏

  • @yahshua9816
    @yahshua9816 Год назад +2

    आजच्या मिक्सर ला काय विचारता अशी अगदी छोट्याशा दगडाला पाट्यासारखा उपयोग करुन छान मिरची लसुण वाटून ,मस्त भाजी बनवली.

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 Год назад +5

    Biradavar asun dekhil kami bhandyat kami savsarat.. Soyi nastana. Dekhil.. Mast swayampak karte mazi banai... Ak ak bharich idea astat tichyakade. Hushar aahe.. Kautuk aahe ticha khooo🥰☺

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 10 месяцев назад

    खूप छान जीवन जगत आहेत तुम्ही लोक ,पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात राहून जगण्याचा आनंद घेत आहात सिधू .खऱ्या अर्थाने संसार करीत आहात असेच दोघे एकत्र राहा आयुष्यभर.👍👌

  • @mangalapatra6066
    @mangalapatra6066 Год назад +67

    Very nice Real life love of mother 👌💖 Natural atmosphere love it Jai Hind Jai Bharat 🙏🙏❤️

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Год назад

    अरे वा मेथी ची भाजी खुपच छान लागते सुंदर ‌बाण ईतर। सुगरण आहे 👌

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Год назад +36

    मावशी खूप छान झालीय ग् भाजी ♥️👌😋😋
    My Favourite Methi Bhajiii
    अगदी#माझ्या #आईच्या हाताच्या चवीची आठवण झाली ♥️, पण आज ती या जगात नाहि 🙏
    किती Carrying Family आहे खरचं ♥️😍

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 Год назад +2

    मस्तच. लय भारी,चुलीवरची भाकरी आणि मेथी एकदम मस्त.👌👌👌👌👍

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 Год назад +3

    Khupach chhan bhaji ani parisar!...tumache sade saral bolane ...vagane Apratim!!

  • @KathaPravah-eu9ht
    @KathaPravah-eu9ht 3 месяца назад +1

    खूप chhan Baanai ani Sidudada❤❤Lai bhari. Love from Manjuu Food Creations, you tube channel ❤

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 Год назад +6

    स्वच्छता आणि टापटीप पाने, कमी साधन सामुग्री मध्ये साधी आणि चविष्ट रेसिपी

  • @umaparab6290
    @umaparab6290 8 месяцев назад

    Tai n Dada dhanyavad. Tumchya padhhatine bhaji keli , khupach chan zali n chavishta lagli.

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 Год назад +7

    खूप छान अगदी सफाईने भाजीची रेसिपी दाखवली 👌👌👍

  • @vandanasangle8352
    @vandanasangle8352 10 месяцев назад

    सुंदर शालीन सुसंस्कृत सोज्वळ Superb sweet Sakhi चा सात्विक शुद्ध सु मधुर s ❤स्वयंपाक 👌👌👌👍👍👍

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Год назад +3

    खूप छान, ताई अभिमान वाटतो तुमचा .. 👍👌🙏❤️

  • @vaishali1529
    @vaishali1529 Год назад +1

    Chuli Varcha jevanachi lajjat khupch vegali ahe.. Mala chulivarch jevan khup awdta.. Gavi gelo ki ami sarve jan chulivarch jevan banvto.. Ashich methi bhaji banvto khup chavisht hote bhaji ani tya sobat bajrichi bhakri.. Mala khup awdte.. Dada khup chan video dakhvla mastch❤❤❤.. Tumla khup dhanyavaad..

  • @maheshdhale1072
    @maheshdhale1072 Год назад +5

    वाव मस्तच , चव नक्की च चांगली असणार .

  • @vandanauttarwar7373
    @vandanauttarwar7373 11 месяцев назад

    बनाई ची मेथीची भाजी आणी भाकर खूप छान दाखवली आमच्या कडे सगळ्यांना आवडते दादांनी खूप छान वीडीओ बनवीला मस्तच

  • @अशोकजवखेडे
    @अशोकजवखेडे Год назад +3

    जय मल्हार 🙏🙏 माऊली

  • @poojamayande5957
    @poojamayande5957 11 месяцев назад +1

    फारच छान ❤
    असे वाटत होते आम्ही हे सगळ तिथे जवळून बघतोय

  • @पुजा-ढ7श
    @पुजा-ढ7श Год назад +86

    दादा तुम्हाला आणि मेंडरांना बघीतलना मला संत बाळुमामा आठवतात🙏🙏🙏

  • @Akshataa_1111
    @Akshataa_1111 10 месяцев назад +2

    तुमच्याकडे साधेपणाची केवढी श्रीमंती आहे..🙂सागर पण खूप गोड आहे त्याला भरपूर शिकवून मोठा करा..आणि बाणाई ताई तुम्ही भाजी खूपंच छान केली..👌👌

  • @URKk1271
    @URKk1271 11 месяцев назад +4

    टोपली मस्त आहे भाकरी ठेवायची❤

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 Год назад +2

    Lal kathachi nili Sadi, hiravyagar bangadya bharalele sundar hat....kiti sundar aahe sagala....!!!