महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजगिरा लाडू उद्योग | Kalansh Rajgira Ladu Udyog | Chikki Business

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे रेणुका रोहित काले यांनी गुळापासून राजगिरा लाडू तयार करण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात राजगिरा लाडू निर्मितीची सर्वात मोठी कंपनी म्हणून कालांश राजगिरा लाडू उद्योगाकडे पाहिले जाते. रेणुका रोहित काले यांनी अतिशय मेहनतीने कालांश राजगिरा लाडू उद्योगाची धुरा सांभाळत कोपरगावसह धारणगाव व परिसरातील शंभरपेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कालांश राजगिरा लाडू उद्योगाचा गुळापासून बनवलेला लाडू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या कंपनीत गुळापासून बनवलेली शेंगदाणा चिक्की तसेच गुळापासून बनलेला मुरमुऱ्याचा लाडूही चवदार आणि आरोग्यदायी आहे.
    महाराष्ट्रसह देशभरात कालांश राजगिरा लाडू उद्योगाच्या मार्फत गुळाचे राजगिरा लाडू पुरविले जातात. रेणुका काले यांना त्यांचे पती रोहित काले तसेच कुटुंबीय आणि कंपनीतील अधिकारी, कामगार महिला कर्मचाऱ्यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्याचमुळे या कंपनीच्या राजगिरा लाडूला खूप मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे कालांश राजगिरा लाडू उद्योगामार्फत महाराष्ट्रातही होतकरू तरुण, महिला घरबसल्या व्यवसाय करून पैसा कमावत आहेत.
    #rajgiraladuudyog
    #chikkibusiness
    #murmura laduudyog
    #राजगिरालाडूउद्योग

Комментарии • 20