रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणात पावसाळ्यात रानात अळंबी म्हणजेच mushroom शोधायला आम्ही जातो. कोकणातील सर्वात महागडी भाजी म्हणून ओळखली जाणारी अळंबी जिला अलबी, रोवणे असे सुद्धा बोलतात. आमच्या गावी अलबी बोलतात. आषाढी एकादशीच्या वेळेस, म्हातारा पाऊस पडतो अशी माणसे बोलतात तेव्हा रानाला अळंबी भरपूर येतात. आमच्या गावच्या माणसांना तर अलब्यांचा पाऊस खास असतो तेसुद्धा माहिती आहे. अलब्या पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रानात जाऊन अळंबी शोधली जाते. वर्षा आणि मी अळंबी शोधायला सकाळी आमच्या रानात गेलो. भरपूर रानत शोधल्यावर अळंबी आम्हाला भेटली. पाऊस येऊन जाऊन होता. आम्ही रानात जेवण नेले होते. रानात जेवायची मजा भारी असते. आम्ही दोन ते तीन तास रानात अळंबी शोधली. आम्हाला एका वेळेला पुरेल एवढी अळंबी आम्ही शोधली. अलबी म्हणजे रोवणे शोधायला बराच वेळ लागतो. अळंबी भेटली तर भरपूर नाहीतर खाली हाताने घरी यावं लागतं. आम्ही घरी आलो तेव्हा आई अळंबी बघुन खुश झाली. आईने खास तिच्या पद्धतीने अळंबी साफ केली. अळंबी साफ कशी करतात हे आईने दाखवले आहे. आईच्या हातच्या जेवणाला चव खूप छान आहे. आईने सर्व अलंब्या साफ करून घेतल्या. पाण्यात धुवून कुस्करून घेतल्या. चुलीवर कांदा, लसूण, मिरची, टोमॅटोची फोडणी देऊन मस्त अलंबीची भाजी तयार केली. अळंबी भाजून सुद्धा खाल्ली जाते. वर्षा मी आणि प्रांजुने मीठ लावून चुलीत भाजलेली अळंबी खाल्ली. दुपारच्या जेवणात आम्ही अलंबीच्या भाजीचा आस्वाद घेतला. अळंबी आईच्या हातची खूपच छान झाली होती. Mushroom अळंबी रानात कशी शोधतात आणि अलंबीची भाजी कशी बनवली जाते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RanatGeloAlambiShodhayla #MushroomRecipe #AlambichiBhaji #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 788

  • @gitaparab4116
    @gitaparab4116 3 года назад +21

    🙏वर्षा खुप हुशार आहे.विडिओ छान असतात. मी रोज बघते.आई पण खुप चांगल्या आहेत. सर्वाना जीव लावतात.

  • @malangkhan8881
    @malangkhan8881 2 года назад

    निसर्गरम्य वातावरण आहे रे तुझ्या इकडे भावा
    मला तुझं राहणीमान आवडले . साधं आणि सरळ
    तुझ्या साठी माझ्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालसाठी.
    असाच पुढे जात राह कायम 😊

  • @ruchitadesai6067
    @ruchitadesai6067 3 года назад +71

    तुम्ही दादा वहिनी किती छान आणि गोड आहात, मला तुम्ही दोघेही खूप आवडता.एक छान हसरं कुटूंब आहे तुमचं. आमची मायेची वहिनी तर वर्णन करायला शब्दच नाहीत.मी नेहमी पाहते हे विडीओ.प्रदनू तर किती गोड!दादा नमस्कार.

    • @balasahebsheteshete350
      @balasahebsheteshete350 3 года назад

      good

    • @meenavartak3041
      @meenavartak3041 3 года назад +1

      Varshachya hatala yash
      Aahe.Tila nehmi Shimple Kalve bharpur
      Miltat.Nisarga tar as
      Usual apratim.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      ❤️❤️🙏😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 3 года назад +1

      खूप सुखी कुटुंब👌
      #SamreshVlogs

    • @kapilpatil1131
      @kapilpatil1131 3 года назад

      @@balasahebsheteshete350 jj

  • @govindaunawane8812
    @govindaunawane8812 3 года назад +6

    हेवा वाटतो असा निसर्ग, इथली माणस एकदम ,त्यांचा साधेपणा वाह झक्कास,

  • @jayvardhinidagade3532
    @jayvardhinidagade3532 3 года назад +11

    वर्षा ताई खूप छान आहे ...लकी आहे...तुमच्यासाठी दादा.. असेच छान रहा..❣️ nice couple..❣️

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +9

    कितीतरी सुंदर डोंगर आहे खळखल वाहणारे खडकतले पाणी आणि भाजी तर एक नंबर 👌👌👌👌

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 года назад +5

    कोकणातला निसर्ग इतका सुंदर आहे हे आज पहायला मिळालं.अळंबी तर मस्तच.

  • @rameshkamble5936
    @rameshkamble5936 3 года назад +1

    Khup mast,

  • @panchiazim5125
    @panchiazim5125 3 года назад +1

    Ek number bhaoooo

  • @vaishallialhat4552
    @vaishallialhat4552 3 года назад +3

    व्हिडिओ खूपच सुंदर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही आम्हाला सुद्धा घेऊन गेला. कोकणातील हिरवा निसर्ग तर लाजवाब. आई ने एक नंबर भाजी बनवली.

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 2 года назад

    Mast,,,, alanbi bhaji khup divasani receipe pahili .Pan khup mast vatale gavala aalyasarakhe vatale. Mast khup chan chan receipe.

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад

    अप्रतिम सुंदर आळंबी ची रेसिपी दाखवल्याबद्दल

  • @mohanborsevlogs7753
    @mohanborsevlogs7753 3 года назад

    खुप भारी आहेत आळँबी...मी पण काल आणले होते.. 👌👌.. यात आजुन लहान असताय ती एका जवळ जवळ खुप असतात...

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад +4

    अप्रतिम व्हिडिओ निसर्ग सौंदर्य अनमोल ताई तुमच्या साठी लकीच आहे आई रेसिपी सुंदर मस्तच खलाशी टाटा छान करतो ♥

  • @sunandakale7546
    @sunandakale7546 3 года назад +3

    खुप छान झाली अळंबी भाजी बघुनच कळली.

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 3 года назад

    मस्तच मित्रा,

  • @Ashish_Shinde77
    @Ashish_Shinde77 3 года назад +1

    मी पहिल्यांदा बघीतले आळंबी.

  • @dr.monikapatil3167
    @dr.monikapatil3167 2 года назад

    नशिबवान आहात...निसर्गाच्या कुशीत जीवन जगत आहात.....आणि निसर्ग तुम्हाला आनंद देतोय...खूप छान

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 3 года назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ.
    किती सुंदर निसर्ग.

  • @vijayghorpade1084
    @vijayghorpade1084 3 года назад

    खूप छान डोंगर, आणि निसर्ग रम्य वातावरण आहे, thank you video मध्ये सर्व दाखवल्या बद्दल, अळंबी पण छान

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад

    अंळंबीची भाजी...👌👌👌
    अळंबी शोधणं सुद्धा एक मोठं टास्क आहे...👍👍👍
    ख़ुप सुंदर व्हिडियो आहे 👌👌👌

  • @krishnamore2000
    @krishnamore2000 3 года назад +1

    Khupch mast keli ho athavn Ali gavchi

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला

  • @shraddhameshram5640
    @shraddhameshram5640 3 года назад

    खरं सांगू,का दादा तुमच्या या नेहमीच्या रेसिपी मध्ये काही विशेष नसते पण तरी ही बघतांना मला ते पदार्थ खावस वाटतं, खूप स्वादिष्ट असणार प्रत्येक एक पदार्थ असं जाणवत का माहिती आहे का तुम्ही सगळे जी मेहनत आणि ज्या आनंदाने पदार्थ तयार करता ना त्या मुळे तुमच्या सर्व रेसिपी सुंदर आणि चवीने रूचकर असतात. तुम्हां दोघांचं प्रेम असच कायम राहव हीच बुद्ध चरणी प्रार्थना. पुढच्या वाटचालसाठी all the very best....🙏🙏🙏😌😌😌

  • @sandeshshigwan8446
    @sandeshshigwan8446 3 года назад

    मस्तच

  • @advkhale
    @advkhale 3 года назад +1

    सतीश खुप छान अळंबी मिळली आहे, मस्तच. मला तुमच्याशी personally बोलायला खुप आवडेल.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +44

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

  • @Prem-011
    @Prem-011 3 года назад

    Nice Kokan che vidieo chhan astat please apload more vidieo

  • @samhero4476
    @samhero4476 3 года назад

    Ek no. Satish dada khup mast video gavchi aathavan aali

  • @santoshkulaye8310
    @santoshkulaye8310 3 года назад +1

    Dada vahini khup laki haay tumche sarv video baghitle mi jithe jataa tithe tithun kahi tari gheun yete khup. Chaan

  • @nikamdhiraj
    @nikamdhiraj 3 года назад +1

    Tumcha Sadhepana khup bhavala..

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 3 года назад +3

    Varsha Vahini tar sugran aahe kadhi kantalat nahi nehami hasri aaste aani kharach vahini tuzyasathi lukki aahe aai n cha pan mulanvar kiti jiv aaje tumhi sarv khup khup khush raha konachi najar nko lago tumchya ya happy family la

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 3 года назад +3

    मला सगळ्यात आवडते वर्षा वहिनी,खूप सुंदर तिचे मंद स्मित आहे,आणि तिचे काम खूप सुंदर असते..हसमुख वहिनी आहे...तिला माझ्या कडून 10 लाईक♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @anikashinde8436
    @anikashinde8436 3 года назад +1

    Vahini bhari ha mast boltat

  • @kirtisawant1658
    @kirtisawant1658 3 года назад +7

    Dada ..varsha vahini.... tujyasathi....nehmich .... lucky ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️.... God bless you both...... 🌈🌈🌈🌈🌈

  • @sandipkulsange1928
    @sandipkulsange1928 3 года назад

    Khup sunder bhau

  • @vasantpawar1906
    @vasantpawar1906 3 года назад +1

    खुपचं छान गाव आहे तुमचं

  • @namyapandya.3a656
    @namyapandya.3a656 3 года назад +4

    Khush raho bhai shri swami samrth

  • @xdgamer7213
    @xdgamer7213 3 года назад +1

    Khoopch chaan. Aamhi pan konkani aahot

  • @deepakmahadik6738
    @deepakmahadik6738 3 года назад

    खरा जीवनात आनंद काय घ्यावे याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे कोकण. आणि आपले कुटुंब आपल्याला मनापासून शुभेच्छा.

  • @user-nh4fi5bo2f
    @user-nh4fi5bo2f 3 года назад +1

    जेवण बघुन तोंडाला पाणी सुटले दादा रानांत जेवण करायची मजाच वेगळी असते

  • @sharadpawar3140
    @sharadpawar3140 3 года назад +1

    आणी तुमचे कुटुब म्हणजे तुमची आई,तुमची मिसेस ,तुमची दोन्हि मुले आणी तुम्ही स्वतः सगळे खुप गोड लोक आहेत,हेवा वाटावा अस कुटुंब आहे.

  • @rajendrakate9773
    @rajendrakate9773 3 года назад +1

    Bhari

  • @anilsalunkhe3401
    @anilsalunkhe3401 3 года назад

    आपले व्हिडिओ फारच सुंदर

  • @k10edits24
    @k10edits24 3 года назад +13

    Vat बघतच होतो तेवढ्यात notification ali❤️🔥

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 года назад +1

    Satish da tu aani vahini doghehi khup chhan aahat mast video

  • @twinsmummyvlog2770
    @twinsmummyvlog2770 3 года назад +15

    मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडले दादा. वहिनी तर त्याहून जास्त ❤️❤️

  • @rekhatripathi2228
    @rekhatripathi2228 2 года назад

    Chan hota video amhala tumche Gao avdle tumcha chota Mast ahe pradnyu

  • @niceguy6927
    @niceguy6927 3 года назад

    Chaan simple video bhau khara gavpan pahun mann prasann zale

  • @reenaghag3631
    @reenaghag3631 3 года назад

    Bharpur bhetlya 👌👌👌

  • @ravindragharge455
    @ravindragharge455 2 года назад

    Gabardast

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 3 года назад +2

    Khup sundar mast👍👍👌👌🙏🙏🌹🌹

  • @gargikhaire3740
    @gargikhaire3740 3 года назад +3

    भारी.... एकदम मस्त...... जंगलातून चालत जावून, मस्त नाश्ता करून भाजी आणणे, कीती exciting aahe.

  • @siddhisgrammarhacks9899
    @siddhisgrammarhacks9899 3 года назад +3

    मस्तच मळगावची आठवण आली

  • @vaishaliangwalkar1494
    @vaishaliangwalkar1494 3 года назад

    Video mast ,Aaicha hatch alibechi bhagi mast👌👌👌👌

  • @seemadavari3047
    @seemadavari3047 2 года назад

    तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहूनच छान वाटते ❤️❤️❤️

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 года назад +1

    पहिल्यांदा पाहिली अळंबी ची भाजी.

  • @reshmajoshi219
    @reshmajoshi219 3 года назад +3

    मस्त आम्ही गेल्या वर्षी लाॅकडाऊन मध्ये गावी होतो तेव्हा खायला मिळाली थोडीशी खुप छान विडिओ आहे प्राजू प्रज्ञू मजेत ना

  • @manjushapendor6784
    @manjushapendor6784 2 года назад

    Khup Chan vate tumchya gavakadche video bagun koknatl vatavaran khup Chan aste

  • @mangeshpatil8566
    @mangeshpatil8566 3 года назад

    Chan

  • @devpriyavlog4476
    @devpriyavlog4476 3 года назад

    Very nice video

  • @satishgurav3716
    @satishgurav3716 3 года назад

    Mast video

  • @spnikam5307
    @spnikam5307 3 года назад +19

    Loving and caring, respecting each other couple. Long live

  • @kokani_mulgi25
    @kokani_mulgi25 3 года назад +1

    Mast👌🏼👌🏼

  • @raziyashaikh3174
    @raziyashaikh3174 3 года назад +16

    Dada Vahini Alabi Shodhnyacha Volg Mast Vahini Khup Hushar Ani Telented Ahe vahimule Gharala Gharpan Ahe Teak Care 🙏🙏👌👍

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 года назад +2

    Khup chan ....mast ...u both r made for each other ...both r hardworking....aai ..padudya..ani pranju la baghun chan watala....asech happy raha ....ektra .... god bless u all😊😊😊😊

  • @pradnyavelaskar984
    @pradnyavelaskar984 3 года назад +6

    Vahini khup active aahet 👌

  • @nileshnileshtumbde857
    @nileshnileshtumbde857 3 года назад

    मला तर खुप आवडते

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 3 года назад +1

    Khup Chan must aahe bhau

  • @nileshbhagat576
    @nileshbhagat576 3 года назад +3

    खूप छान आहेत सर्व विडिओ तुझ्या मजा येत बघायला👍😊अश्याच छान छान विडिओ बनवत जा👌💐💐best of luck 👍

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 года назад +2

    दादा बायको ची साथ असेल तर सगळं सोपं 👌😍🥰

  • @vijayshreeseth4127
    @vijayshreeseth4127 3 года назад +1

    कोकणातील सर कोणत्याच निसर्गाला येणार नाही

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 3 года назад

    मस्त सुंदर.. Chan

  • @vidhyarasoi4368
    @vidhyarasoi4368 3 года назад +1

    Mast 👍🎉

  • @sketchesbymuskaan
    @sketchesbymuskaan 3 года назад +1

    Wonderfull video 👍🏻👍🏻

  • @mandarsawant7309
    @mandarsawant7309 2 года назад

    Alambi shodhatana Ani jagalat jaatana kalaji gyay. Haatat kaathi ghetos te Bara aahe. Tune video mast .gavi yayala Jamat nasale Tari kokan tuzya vidiotun baghato. Mast.

  • @vijuchaudhari3525
    @vijuchaudhari3525 3 года назад

    जय सद्गुरु आई

  • @k10edits24
    @k10edits24 3 года назад +5

    Mi hi bhaji kalch खाल्ली mushroom अळंबी .maz gav chiplun , kolkewadi ya भाजीच्या जवळ साप असतात ना सगळ्यात महागडी भाजी असते ही❤️

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 3 года назад +1

      भाजीच्या जवळ साप? बाप रे मला तर ये बघूनच भीती वाटत आहे. किती जीवावर खेळून

    • @k10edits24
      @k10edits24 3 года назад +1

      @@pratibhapatil8488 सगळेच साप विषारी असतात असं नसत आणि चावला तरी गावात कोणाला तरी नैसर्गिक औषध माहीतच असते

  • @chaitanyavlogs9497
    @chaitanyavlogs9497 3 года назад

    Khup chaan dada vahini gelyavrshi aamhi lockdown madhe aamhi sudhaa Asch maja mrs nhi Albi kashi astat dakhvle albichi bhaji aani bhakri aamhi Chiplun asurde gaav 😘

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад

    Pratek veles navin ky tri bhaji pahila milte khup chan👌👌

  • @sujatasalgar5579
    @sujatasalgar5579 3 года назад

    Mla Pan khup aavdte yachi bhaji khaun ata 22 vrshe zale khali nahi ata khavishi vathte 😋😋😋😋😋

  • @riyashirpute6425
    @riyashirpute6425 3 года назад +1

    Chan 😋

  • @latabule6436
    @latabule6436 3 года назад

    मस्त मिळाली अळंबी,आणि आईने सोप्या पद्धतीने छान भाजी बनवली.छान व्हिडीओ सतीश.

  • @xdgamer7213
    @xdgamer7213 3 года назад

    Mala gaon khoop aawadte mahnun subscribe kele😊👍👍👍👍👍👍👍

  • @sachinbhekare762
    @sachinbhekare762 3 года назад +1

    दादा वहिनी ला पण भरवा ना एक घास .......खूप खूप असाच तुमचा संसार फुलत राहूदे....खूप खूप छान वाटत तुम्हाला पाहून.अगदी mojakya शब्दात सांगायच झालं तर तुम्ही दोघे खूप niragas आहात.

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 Год назад +1

    She is very genuine person. And so humble also. No drama no overacting.. just genuine

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 3 года назад +1

    Satish bhau video chhan aahe ani recipe pan mast mala khayla avadel

  • @sonalchavan9610
    @sonalchavan9610 3 года назад +17

    Varsha tai chi tabbet khup kharab zaleli diste dole pan utarlele watat
    Tumhi kalji ghya tyanchi damat astil tya kam karun
    Sarv khush raha happy raha
    Pranju didi ani pradnu khup cute ahet
    Tumche vlogs khup chan astat nehmi vlogs takaycha prayatna kara
    Amhi vaat baght asto tumchya vlogs chi

  • @yogirajbagul6020
    @yogirajbagul6020 3 года назад

    Tondala Pani sutal Rao, ekach no ,alambi betali tumhala ani recipe tar khup cha Chan banvali.nice video Dada .

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 2 года назад

    भाई तुमचे विडिओ बघून आम्हाला गावाकडचे दिवस आठवले खूप छान वाटल

  • @preetikaur2328
    @preetikaur2328 3 года назад +5

    alwayz the BEST VIDEO BHAU N FAMILY I alwayz wait for your video.. plz upload daily.... we enjoy soo much... nature, cooking, get together... wow amazing.. khoopach chan watte apli videos... tk care love to family pradnu pranju.. Varsha tai aai ani bhava.. dhanyawaad 🙏❤️

  • @sanjanauttekar8970
    @sanjanauttekar8970 2 года назад +1

    खूप छान निसर्ग खूप छान व्हिडिओ अशेच व्हिडियो टाकत रहा Nice family

  • @npvlog9691
    @npvlog9691 3 года назад

    निर्सगाच्या सानीध्यात अशी अंळबी शोध घेण्याचा आनंद हा वेगळाच अनुभव आहे
    खूप छान

  • @shamravbansode3808
    @shamravbansode3808 3 года назад +22

    S for Satish. IDEAL family. Simplicity I like most and Satish ,Avinash and other Konkani U tubers maintain Simplicity. It has become my habit now to see vlogs of all you konkani u tubers. I really didn't see news channels and serials on TV at all.What is real and truth in life ,I learnt it from you Konkani u tubers.You people show simple life .May be in my opinion you should come out of orthodox following. However ,you people's honesty in every day life I like it most .And I really get energy in life from it.But my humble request to all you Konkani u tubers is this that while showing reality of life you should also make the reality of life known to simple Konkani people.
    Develop love in all .Without love there is nothing in life and you Konkani people love society life .you will become master of not only Maharashtra but the entire world..

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      😊🙏❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      हे तुमचं प्रेम आहे 😊🙏❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs 3 года назад

      सतीश दादाचा साधे पणा मला खूप आवडतो👌
      #SamreshVlogs

  • @bhausahebmalkar5436
    @bhausahebmalkar5436 3 года назад +1

    Mast nice video ranbhaji special ok thanks

  • @whatsaapstatusvideo4175
    @whatsaapstatusvideo4175 2 года назад +1

    Mastch vatavaran ahe tikdch 😍🥰👌👌

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад +1

    Khup chan video 👌🏻👌🏻

  • @rahulmahanwar9347
    @rahulmahanwar9347 2 года назад

    Kharch kup Chan jodi ahe tumachi dhoghanchi jodi salamat raho

  • @pratikshakaravde4980
    @pratikshakaravde4980 2 года назад +1

    खुप छान दादा

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +6

    सतीश मस्तच मिळाले आलंबी. छान आणि हो. प्रदनी आणि pranju लां,♥️♥️