BhaDiPa Diaries - Gabhara |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • २४/०२/२०२४
    भाडिपा Diaries, पान दुसरं, गाभारा
    The benches of Marathi schools are emptying day by day, and this temple of knowledge is gradually closing its doors. Do people believe that the goddess Saraswati can only be found in English medium schools? On the occasion of Marathi Bhasha Din, we present to you a short story that shows the current situation of our Marathi schools. For more such videos subscribe to BhaDiPa.
    Join this channel to get access to perks:
    / @bhadipa
    Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
    NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchg...
    All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipa
    / bhadipa
    / bhadipa
    Poem: Kusumagraj (Vi. Va. Shirwadkar)
    Cast:
    Arnav Bhagwat
    Parth Lad
    Voice Over:
    Varun Narvekar
    Schools:
    Parag Vidyalaya
    Shivaji Talao, Bhandup (West)
    सदर video ह्यांच्याशिवाय शक्य नसता झाला.
    काही मोजक्या मराठी शाळांप्रमाणे ह्या देखील मराठी बाणा राखण्याचा प्रयत्न करीत आहेत.
    Pragati Vidyamandir
    Nardas Nagar, Shivdarshan Path
    Bhandup (West)
    Special Thanks:
    Parag Bane
    Kamlakar Sir
    Nilesh Gundale
    Prathamesh Salvi
    Credit list:
    Concept & Direction - Akash Sudhir Shirke
    Associate Director - Akshay Nar
    Director Of Photography - Aditya Divekar
    Assistant DOP - Ninad Sawant
    Editor - Karishma Dalvi
    Creative Producer - Sarang Sathaye, Paula McGlynn, Anusha Nandakumar
    Executive Producer - Ashwini Phatak
    Production Head & Sound - Kedar Naidu
    Production Manager - Mangesh Jadhav
    Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Abhi Thorat
    Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav
    Subtitles - Shail Deshpande

Комментарии • 423

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  6 месяцев назад +62

    तुमची शाळेबद्दलची एखादी आठवण सांगा…

    • @Saee14
      @Saee14 6 месяцев назад +9

      खरंच मराठी शाळा आवश्यक आहेत. आपण सर्वांनी च आपल्या महाराष्ट्र त तरी मराठी शाळेनच महत्व वाढण्यासाठी प्रयत्न कराव मला मनापासून वाटते. पण सर्वांनी मनावर घेतलं तर हे नक्कीच होईल.

    • @Siddhu.0.369
      @Siddhu.0.369 6 месяцев назад +4

      Pachvit Astana madhyal suttit maitrini jaychya dabba khayla eka jvl rahnyarya maitrinichya ghari mi pn ek divas gele tyanchya magun mg kay shiksha zali na sglyana mala tr jast zali Karan tya maitrini maz naav sangitl ki amhi hila n bolvta hi aali aamchya magun ani dahavit Astana madhlya sutti nantr palun gelo shaletun mi ani ek maitrin aamchi daptar mg dusrya maitrinini shalechya compound vrun baher fekun Dil aamhala punha shalet jaavas vatat ahe ata mala 😭😭😭

    • @smitagunjal6995
      @smitagunjal6995 6 месяцев назад +6

      परिपाठ, फलकलेखन, समुहगीत, आणि बरंच काही❤ यातून समृद्ध होत गेलेलं आयुष्य❤ खूप काही दिलं माझ्या शाळेने मला 🙏 सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला मिळाले आणि भेटले यातील फरक व्यवस्थित बोलताना कळतो आणि वापरताही येतो. 🤗🤭🥰

    • @theaditi__
      @theaditi__ 6 месяцев назад

      surprizingly......aajch amchya school chya grp chya trip cha photo mazya ekafrnd ne grp wr pthvla...ani tyanntr javal javal 2 varshanni ami 4 jani ektra bollo kho kho haslo ani asankhya athvani athvlya!

    • @sandeepparab7063
      @sandeepparab7063 6 месяцев назад +1

      विद्यार्थ्यांवर मेहनत घेणरे शिक्षक. , पाठ, कविता, वाचन गाणी आणि शारदादेवीची अनुभुती आजही आठवणीत आहे

  • @swapnilpawar6887
    @swapnilpawar6887 6 месяцев назад +77

    मी मराठी शाळेत शिकलोय , आज I.A.S ( भा.प्र.से) अधिकारी आहे . दुर्दैव हे आहे की लोक विचारात मराठी मध्ये शिकून IAS कसे झालात?. लोक भाषा आणि ज्ञान यात गफलत करतायेत . मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये आपण पारंगत असू शकतो हे लोकांना पटवून द्यायला हवं. शेवटी जेव्हा मराठी भाषा टिकेल तेव्हाच मराठी संस्कृती टिकू शकते.
    भाडीपा चे खूप अभिनंदन.
    @bhadipa

    • @manojkolhe7749
      @manojkolhe7749 5 месяцев назад

      Yes sir. Your journey is very inspiring.

  • @gourimane3508
    @gourimane3508 6 месяцев назад +91

    अभिमान आहे मराठी शाळेत शिकल्याचा आज त्या शाळेने दिलेल्या शिक्षणाच्या आणि संस्कारांच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो ❤❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +2

      ❤❤❤

    • @aniket4572
      @aniket4572 5 месяцев назад

      Nakalat shikashak samor ale ki vaklo jaato🥺❤

    • @shreyash_17_
      @shreyash_17_ 5 месяцев назад

      Did you send your children to a Marathi medium school?

  • @devendranikam7218
    @devendranikam7218 6 месяцев назад +41

    गर्व आहे मराठी शाळेत शिकल्याचा 🎒मुळात शालेय शिक्षण हे मातृभाषेतच होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये विविध कलागुणांचा विकासा करीता त्याची खूपच गरज आहे आज.

    • @shreyash_17_
      @shreyash_17_ 5 месяцев назад

      Did you send your children to a Marathi medium school?

  • @durgakale6786
    @durgakale6786 6 месяцев назад +65

    मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्याच राज्यात आमची भाषा शिकणारे आणि भाषेवर प्रेम करणारे मूठभरही लोक राहिले नाही हे दुर्दैव आहे. आमची मराठी भाषा कुठेही आणि कशातही कमी नाही.
    मराठी भाषा दिनाच्या इतक्या सुंदर आणि अशा प्रकारे शुभेच्या दिल्या बद्दल भडीपा चे खुप आभार ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +1

      धन्यवाद video आवडला असेल तर share करायला विसरू नका ❤

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 6 месяцев назад +44

    अप्रतिम! मराठी शाळा बंद झाल्या नाही पाहिजेत असे सर्व महाराष्ट्रीय लोकांना मनापासून वाटेल तो सुदिन! (लवकर उगवू दे!)

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +5

      सुरुवात आपल्या पासूनच करूया ❤

    • @ampawar66
      @ampawar66 6 месяцев назад

      I am 34, a parent of a 4yo!
      When I was thinking about school for my kid, I never had this constraint in my mind that it has to be English medium. But the options available nearby were two BMC schools and other private english schools. Of course we had to choose private english school because the company of students will be better there.
      Had it been a school like Shivaji Shala in Dadar nearby, we would have opted for that.
      So I feel, there are two ways-
      1. Increase the standard of BMC schools to the level of private maybe by charging private level fees for 25 % of classes or having separate premises for 'free' education and 'paid' education.
      2. Incentivise private schools to have Marathi medium as well!

    • @kiranjoshi4644
      @kiranjoshi4644 6 месяцев назад

      @@ampawar66 प्रयत्न सर्व पातळ्यांवर होणे गरजेचं आहे. पालक, अभ्यासक्रम बनवणारी यंत्रणा, विषय सोपा व रसपूर्ण करणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन, नियम बनवणारी यंत्रणा , अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी...अर्थात या सगळ्यात मराठीवरील प्रेम हा सामाईक धागा असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. थोडंसं लक्ष यापाठीमागील अर्थकारणाकडे ही पुरवणं गरजेचं आहे. मराठी प्रसारासाठी शासनाने अनुदान दिले पाहिजे व ते शाळांच्या सुविधा पुरविण्यासाठी वापरल्यास मराठी शाळेत जाणे हा आनंददायक अनुभव असू शकतो...

    • @ankitdhmane6343
      @ankitdhmane6343 6 месяцев назад +2

      मराठी शाळा बंद पडू नये असं फक्त वाटून काय होणार ? आजच्या घडीला, मराठी शाळेत शिकून जीवनात समृध्दी अनुभवलेल्या किती मराठी भाषिक आणि मराठी जनांच्या मनाची तयारी आहे की उद्याच्या पिढीला मराठी शाळेत शिकायला पाठवण्याची?

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 6 месяцев назад +48

    मी स्वतः आणि माझ्या सारखे अनेक विद्यार्गी मराठी माध्यमातून शिकून आम्ही घरी इंग्रजीमुळे अजिबात मागे पडलो नाही हे अभिमानाने सांगतो.
    तसेच मी स्वतः इंग्रजी भाषेत किमान पाचशे तास प्रशिक्षण दिले आहे.
    याला कारण माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय यातील सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी ,( शिक्षकेतर नव्हें )तसेच
    आम्हा सर्वांचे पीलक.

    • @sohamranadepersonal2733
      @sohamranadepersonal2733 6 месяцев назад +1

      माझी आई सुद्धा पार्ले टिळक चीचं आहे! '89 year.
      ती सुद्धा उत्तम इंग्रजीत संवाद साधू शकते. कोणत्याही अडचणी शिवाय.
      🙏

    • @akshaybutala4157
      @akshaybutala4157 6 месяцев назад

      Agdi barobar

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      ❤❤❤

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 6 месяцев назад +51

    मराठीची गळचेपी करणाऱ्या बातम्या पाहून काळीज रोज तीळ तीळ तुटत.
    मी दहावी पर्यंत मराठी माध्यमात शिकलो असंख्य आठवणी तर आहेत. नसानसात मराठी पण भिनल ते शाळेमुळेच; आज अभियंता म्हणून लाखो रुपये पगार मिळतो त्याचा पाया बे एके बे पासून घातला गेलाय.. अजूनही पाचा पाचा पंचवीस = ट्वेंटी फाईव असेच गणित असतात... इंग्रजी पोट भरते पण मराठी मन भरवते.. मराठी माणसं मराठी वर ठाम असतील तर लवकर माझ्या माऊलीची मराठी खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा होईल.

    • @Pradreamschasers
      @Pradreamschasers 5 месяцев назад

      स्वतःच्या मुलांना कोणत्या माध्यमातून शिकवता आपण .?इंग्रतीतूनच ना.!

  • @Chhand_makarand
    @Chhand_makarand 6 месяцев назад +29

    मराठी शाळेत शिकलो याच समाधान आहे पण आजची स्थिती पाहून माझ्या शाळेची डोळे पाणावतात❤ अन् तुम्ही आठवणींना उलगडा दिलात मराठी राजभाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा भाडिपा अन् सर्व मराठी शाळेच्या रसिकवर्गांना! बोलावी मराठी ऐकावी मराठी शिकावी मराठी 🧡

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      तुम्हला पण मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भाडिपा❤

  • @chitchat249
    @chitchat249 6 месяцев назад +132

    Higher education जर regional languages मधे करता येईल तर मराठी medium ही कुठे कमी पडणार नाही. मराठी, हिंदी news channel साथी ही english मधे interview घेतात.

    • @tanmaydesale
      @tanmaydesale 6 месяцев назад +20

      Same logic दक्षिण भाषेतील शाळांना लागू नाही का? त्या नाही बंद पडत. चूक मराठी माणसांचीच आहे. आपणच आपली भाषेची कदर नाही करत.

    • @aditimhadgut2710
      @aditimhadgut2710 6 месяцев назад +2

      Hallich eka mulakhatit aikalaa ki kahi uchha shikshan Marathitun suru honare! Engineering vaigre!!

    • @Shra.D
      @Shra.D 6 месяцев назад +2

      Marathi shalel shikun English bolata yet nahi he koni sangitla

    • @jafarbhandari7275
      @jafarbhandari7275 6 месяцев назад +4

      Semi English is the option
      संस्कृती पण आणि 10 वी नंतर सायन्स साठी उपयोगी

    • @sanjaysonwalkar9791
      @sanjaysonwalkar9791 6 месяцев назад +3

      आम्ही पण ZP शाळेचे विद्यार्थी आज interview English मध्ये झाला तरी कधी कमी नाही पडलो कधी अपात्र नाही ठरलो ❤️ प्रेम आहे मराठी वर....

  • @PratikBedarkar1988
    @PratikBedarkar1988 6 месяцев назад +24

    हृदयस्पर्शी वास्तव मांडल्याबद्दल भाडीपा टीमचे धन्यवाद।

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +2

      एवढं प्रेम दाखवल्या बद्दल तुमचे आभार ❤

  • @poonamdeepakshirke6843
    @poonamdeepakshirke6843 6 месяцев назад +7

    ही माझी शाळा आहे प्रगती विद्या मंदिर, नंतर पराग विद्यालय दाखविले आहे. Video बघून गहिवरून आले. Bhadipa चे आभार.

  • @sanikarewale2294
    @sanikarewale2294 6 месяцев назад +6

    इयत्ता पाचवी मध्ये लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... ही कविता होती... आपण किती महतभाग्याचे आहोत याची प्रखर जावीण सर्वाना व्हावी हीच इच्छा! ❤ शिक्षणाचा दर्जा वाढला तर मराठी शाळा जगातभारी होईल ❤

  • @sachinwaghmare849
    @sachinwaghmare849 6 месяцев назад +8

    पराग विद्यालय,
    ह्या शाळेत मी शिकलोय, ह्यातील व्हिडिओ मधील प्रत्येक क्षण मी अनुभवला आहे. असे वाटते की माझाच व्हिडिओ आहे . आता पर्यंत 10 ते 15 वेळा बघितला हा व्हिडिओ आणि प्रत्येक वेळा डोळ्यात पाणी आले.
    खरंच मी भाडीपा आणि त्यांच्या टीमचे चे मनापासून आभार मानतो.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @abhirajgalande
      @abhirajgalande 5 месяцев назад

      ओह …मला हा वीडियो पुणे विद्यार्थी गृह या शाळेतील वाटला.

    • @sachinwaghmare849
      @sachinwaghmare849 5 месяцев назад

      @@abhirajgalande
      दोन्ही शाळा भांडुप च्य्या आहेत.

  • @user-ek2iz7ik2b
    @user-ek2iz7ik2b 6 месяцев назад +3

    मराठी शाळांची झालेली दारुण अवस्था पाहून खरंच फार वाईट वाटले. मराठी शाळांमध्ये मिळालेले संस्कार हे कोणत्याही ईतर शाळांमध्ये नक्कीच मिळणार नाही. या शाळेमुळे आज आम्ही घडलोय किंवा उत्तमरीत्या घडलोय आणि भावी पिढीने देखील इंग्रजी माध्यमाचं खूळ डोक्यातून काढून मुलांना मराठी शाळेत घालणं फार गरजेचं आहे तरच हा वारसा पिढ्यानपिढ्या टिकू शकेन आणि मराठी भाषा देखील 😌 उत्तमरीत्या हा संदेश भाडिपाने सर्वांपर्यंत पोहोचवला आहे.

  • @snehal...7057
    @snehal...7057 6 месяцев назад +6

    अप्रतिम! शाळेची आठवण आली राव....आयुष्यातला सुवर्णकाळ होता तो...असंख्य आठवणी जाग्या झाल्या...सकाळी 10 ची शाळा...राष्ट्रगीत, प्रार्थना, खेळ....अगदी चित्रफिती प्रमाणे...❤loved it...💕

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 6 месяцев назад +4

    आम्हांला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा मराठी शाळेत शिकलो ह्याचा ! आपली भाषा आपण सर्वतोपरी जपली पाहिजे.. 🙏🙏

  • @user-bc7no3vl4f
    @user-bc7no3vl4f 6 месяцев назад +4

    मराठी शाळा, मराठी भाषा हे सुख आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राचं वैभव आहे. ती जपण्याचा, तिचा मान राखण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे.
    मुलीला मराठी शाळेतच घालायचं... हा त्याचसाठी अट्टाहास होता. आणि आज ती मराठी (माध्यम ) शाळेतून परिपूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे.. याचा अभिमान आहे. गाभाऱ्यातील सर्व सोनेरी आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. गाभाऱ्यात पुन्हा तसाच किलबिलाट व्हावा... हीच सदिच्छा 🤗

  • @chaitanyamirashi6785
    @chaitanyamirashi6785 6 месяцев назад +5

    भाडिपा कमाल आहात, या कवितेचा असा मेळ मराठी शाळांबाबत घालणं कमाल आहे.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      धन्यवाद video आवडला असेल तर नक्की share करा ❤

  • @madhu_baraskar3218
    @madhu_baraskar3218 6 месяцев назад +4

    जे आपल्या मातृभाषेत आपण शिकतो ते जास्त काळ लक्षात राहतं..

  • @swatisonawane3805
    @swatisonawane3805 6 месяцев назад +3

    मराठी शाळा जगायचं कसं ते शिकवते आणि घडवतेही....शाळा सोडून बरीच वर्ष झाली तरी आजही आपण शाळेतच आहोत......जुन्या आठवणीत....कारण जगण तर शाळेतच होत....आता तर फ़क्त पळण सुरू झाल आहे प्रत्येकाच....जिवंत राहण्यासाठी🎉

  • @Utrrgtvxserf
    @Utrrgtvxserf 6 месяцев назад +3

    काय राव... डोळे पाणावले माझे!❤
    तुमच्या याच गोष्टींसाठी तुम्ही मला नितांत आवडता भाडीपा मेंबर्स
    विषय महत्त्वाचा आहे.
    विषय आपल्या माय मराठीचा आहे.
    आशा आहे की, आपण सगळ्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवं

  • @ajaybakalkar
    @ajaybakalkar 6 месяцев назад +3

    खूप छान...मराठी राजकारण्यांच्या इंग्रजी शाळा आणि हेच राजकारणी मराठी टिकावी म्हणुन बोंबलत फिरतात....फक्त मुंबई नाही संपूर्ण महाराष्ट्राची हीच गत आहे !!

  • @sunilkhot01
    @sunilkhot01 6 месяцев назад +12

    मी मुद्दामहून माझ्या मुलांना मराठी मध्ये टाकलंय....छान समझून घेऊन शिकतात...इंग्लिश ची ही चांगली तयारी आहे...हल्ली १ पासून इंग्लिश आहे आणि मोबाईल आणि इतर गोष्टीमुळे तसे इंग्लिश आताच्या मुलांना चांगला जमतंय....आम्ही ग्रामीण भागातल्या मराठी शाळेत शिकून कुठे कमी नाही पडलो तर अताची मुले कशी कमी पडतील ??

    • @haku660
      @haku660 3 месяца назад

      उत्तम कंमेंट😮

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 6 месяцев назад +5

    पाल्यांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे.इग्रजी हा विषय फक्त शिकवला पाहिजे.मुलांचा विकास,आपले संस्कार, सगळं संपुष्टात येत आहे.इंग्रजाळलेल्या शाळेतून बालपण हरवत चाललं आहे.

  • @sushmapawar2147
    @sushmapawar2147 5 месяцев назад

    खूप अभिनंदन भाडिपा चे ह्या कवितेचाआणि वास्तवतेचाअसा मेळ. .. .. .खूप परिणामकारक आहे

  • @pallaviingle3859
    @pallaviingle3859 6 месяцев назад +2

    भाडीपा चे खूप कौतुक आणी आभार.इतका कळीचा मुद्दा मांडल्याबद्दल .तो ही इतक्या सुरेख रीतीने

  • @sunilambre2312
    @sunilambre2312 6 месяцев назад +3

    मराठी शाळा किंबहुना शिक्षण मातृभाषेतूनच असावा, असे अनेकांना वाटते. पण असे वाटणाऱ्यांपैकी .. स्पर्धेत टिकायचंय तर...हा एक विचार अनेकांच्या मनात येतो. उर्वरितांचे चालू सिस्टिमपुढे काही चालत नाही. एकंदरीतच गाभाऱ्याला कुणी गांभीर्याने घेईनासेच झाले आहे. मराठी देवळांच्या गाभाऱ्यात आता देव नाही..बाजार असतो.
    उत्तम कथा..

  • @namitarepe5450
    @namitarepe5450 5 месяцев назад +1

    This one is so soothing and heartwarming. I come from BMC Marathi medium school. And trust me, today I work at BCG and not even once I feel inferior to any of my teammates. Its all due to the confidence imbibed in me by my very humble BMC school - Sitaram Mill Compound School no. 1. ❤

  • @dhavalereshma5706
    @dhavalereshma5706 6 месяцев назад +2

    मराठी शाळेची सर ही आताच्या शाळांना कधीच येणार नाही, ते शिक्षण जेवढं आपुलकीने व्हायचं तेवढं आता होत नाही, त्यामुळे मराठी शाळेचा दर्जा उंच केला पाहिजे परत हीच काळाची गरज आहे,, विडिओ छान केला आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 👏🏻👏🏻

  • @virajvadhavkar6438
    @virajvadhavkar6438 6 месяцев назад +2

    जो पर्यंत पैशांचा बाझार सगळीकडे आहे तोपर्यंत असे अनेक प्रयत्न करून सुद्धा कोणत्याही क्षेत्रात काहीही फरक पडणार नाही.व्हिडिओ सुंदर बनवला आहे खूप छान

  • @kaustubhchamankar6844
    @kaustubhchamankar6844 6 месяцев назад +10

    माझी शाळा आहे ही पराग विद्यालय ♥️

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      खूप छान शाळा आहे तुमची ♥

  • @shraddhaadude1927
    @shraddhaadude1927 6 месяцев назад +23

    I am being doctor....every marathi student is facing understanding English only...few people watch English series specially for understanding, learning of english some of them students are getting used to it but cons are their uncultured thinking is becoming part of life 🥲 The thing is any one can do their best in any field of education, work in less time and more effectively in mother tongue .so i stand with Marathi being marathi , edjuction should be in मातृभाषा.❤🌼Bhadipa doing their best ...May become good platform for Great things💥🌼

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      तुमचा विचार मांडण्यासाठी धन्यवाद ❤

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 6 месяцев назад +5

    काळीज बाहेर आलं !!!! हरवलंय सगळं हे आता!!

  • @jyotiraorane8107
    @jyotiraorane8107 5 месяцев назад +1

    खूप आभार...आणि संमिश्र भावना...खूप काही आठवणी.😢..मनाचे श्लोकांचा पुस्तक........❤❤❤❤❤❤❤❤..

  • @adityamargal9871
    @adityamargal9871 6 месяцев назад +2

    मराठी शाळा,मराठी शिक्षण टिकाव ही तर सकल महाराष्ट्र जन्नांची इच्छा मनोकामना आहे परंतु कुठेतरी काम मिळवून देण्यात मराठी शिक्षण कमी पडते..हे ही लक्षात घ्यायला हवं हे एक कटु सत्य आहे..मराठी ज्ञानभाषा जरूर आहे परंतु ती जर काम भाषा ही बनू शकली तरच काहीतरी शक्य आहे...ज्या जगात इंचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जंग जंग पछाडवी लागते तिथे आपल्या ज्ञानभाषे चा टिकाव लागण कठीण आहे..

  • @manoj123456hi
    @manoj123456hi 6 месяцев назад +1

    Sunder message ❤❤❤
    Balpan jivant kele tumhi kahi kshanat.

  • @swap2734
    @swap2734 5 месяцев назад +1

    आमच्या कडे अजून ही गाभारा भक्तांनी भरून आहे आम्ही ही त्याच मंदिरात शिकलो आणी आता माझी मूल सुद्धा तिथेच आहे देव मात्र जरा त्याला दाखवलेल्या नवद्या इतकंच काम करतो हिच शोकांतिका आहे काही अजूनही देवा सारखे भक्ताच्या पाठीशी भक्कम उभे आहेत त्यांचे त्यांचा मुळे कदाचित देव्हारा टिकून आहे ❤

  • @madhavi1990
    @madhavi1990 6 месяцев назад +1

    हृदयाला स्पर्श करणारी..... thanks for making...😊

  • @Astromomer2008
    @Astromomer2008 6 месяцев назад +1

    भाडिपची मांडणी आणि कथा नेहमी उत्तम असते!! मराठी शाळेत शिकल्यामुळे मलापण खंत वाटते सद्य परिस्थिती बघून.
    कदाचित चांगल्या मराठी शाळा निघाल्यास परीस्थिती बदलू शकेल, कारण प्रत्येकालाच आपल्या मात्रूभाषे बद्दल आसकति असते..

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      ❤❤❤

  • @neetapatil4815
    @neetapatil4815 5 месяцев назад +1

    सर्वात अनमोल भा डी पा चित्रफित

  • @reshmag9368
    @reshmag9368 5 месяцев назад +1

    गोष्ट खूप उत्तमरित्या मांडली आहे....हा विडिओ बघून वाईट वाटले की मराठी शाळांचे विद्यार्थी कमी होत आहेत....मला अभिमान आहे मी मराठी माध्यमातून शिकले.मी परदेशी काम करते आणी इंग्रजी मधून ना शिकल्यामुळे माझ्या कामाचा दर्जा कमी झाला नाही. उलट मातृभाषा शिकल्यामुले विचार, आचार, आचरण समृद्ध झाले..मातृभाषेनी उत्तम समज दिली. शिकण्याची वृत्ती ठेवली तर तुम्ही इंग्रजीही शिकू शकता.तसेही आजकालच्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना ना इंग्लिश नीट येते ना मराठी...मराठीतील अवघड शब्दांचे अर्थही त्यांना कळत नाही...ही मुले मराठीतील थोरामोठ्यांचे काय आदर्श घेतील किंवा विचार वाचतील....
    चिनी,जपानी लोक त्यांच्या भाषेत शिक्षण घेतात...बऱ्याच लोकांना तर इंग्लिश येतही नाही..पण म्हणून ते लोक स्वतःला/कामाला तुच्छ लेखत नाहीत किंवा कशात मागे पडले नाहीत....

  • @shreyachinawalkar3850
    @shreyachinawalkar3850 6 месяцев назад +3

    सुंदर....... ह्रदयस्पर्शी.......पण निराशाजनक सत्य परिस्थिती 😢❤

  • @Sayali_C
    @Sayali_C 6 месяцев назад +16

    The fact is that we remember and understand concepts better when we learn in our native languages. In fact, schools must make it mandatory for kids to learn in their native language but it is difficult to implement this in a country like India.

    • @ampawar66
      @ampawar66 6 месяцев назад

      Understanding the concept is definitely better in native language but explaining the same to the world needs English now a days.. Just look at the language we used to comment here!

    • @Sayali_C
      @Sayali_C 6 месяцев назад

      @@ampawar66 Agree, I said the medium of education at least in the School can be in the native languages as the kids grasp the concepts better than a non native language. Higher education can be in English is what i was saying in my previous comment. Learning a new language is not really a difficult thing to do, one can learn a new language at any point of time in life.

    • @ampawar66
      @ampawar66 6 месяцев назад

      I agree with your opinion, but my response comes from a pov of a kid (like myself) who learns in Marathi medium till SSC from a state board in a tier 2/3 city. By the time I finished schooling with flying colors, the confidence level was 10! And then the struggle begins -
      1. 11th & 12th Science, I had to learn new terms, words as well while others are seamlessly focussing on content!
      2. I got admission to an Engineering course. By this time, I was at ease with education in english. But thinking in Marathi and translating in English before speaking in Viva or Interview was a real struggle!
      3. Then comes the biggest twist shifting to Mumbai for a job! This comes with a combination of cultural shock, lifestyle, and required 'fluency' in English in order to gel with colleagues, make new friends, understand which sitcom/web series they are discussing which you have never heard of, people talking about brands and you are thinking about how it's spelled and so much more!!
      Only a few, enjoy this struggle and change in life. Others feel low on self confidence and start wishing "I wish I could have done my schooling from an English medium in some tier 1 city like others did!"
      Sorry for blabbering my life story! But yes, feeling lighter by at least posting it here instead of just carrying inside me for so long! :-)

    • @Sayali_C
      @Sayali_C 6 месяцев назад

      ​@@ampawar66 I am glad you shared your story here and felt good, and kudos to your struggle dealing with all that you did but with all due respect to you, I have also seen a lot of people in my family having a stronger understanding of concepts, who did their primary education in Marathi. I completely understand the struggle is much more transitioning from one language to the other and can make or break someone's confidence but I really feel that language should not be a barrier to understanding very important concepts in STEM and a lot of times as a child I used to struggle too, to understand some concepts in English.
      All I can say is that everyone has their own struggles to learn and unlearn things.
      P.S Your written english is really good and I don't feel like you had your primary education in Marathi, it is that good. So, you have come a long way and kudos 😊

    • @ampawar66
      @ampawar66 6 месяцев назад

      @@Sayali_C :-)

  • @snehas230
    @snehas230 5 месяцев назад

    खूप खूप सुंदर विडिओ बनवला . कवितेची ओळ न ओळ , अक्षर न अक्षर उत्तम रित्या चित्रित करून आपल्या मराठी शाळेची अवस्था दाखवली ..जस कि हि कविता कुसुमाग्रजांनी ह्याच साठी लिहिली होती ... मन भरून आलं.. शाळेच्या आठवणी पटापट डोळ्यासमोरून गेल्या ... 😢

  • @learnforyourself8107
    @learnforyourself8107 5 месяцев назад

    प्रत्येक राज्यातील लोकांना आपापल्या भाषेचा अभिमान आहे जर आपल्याला हा अखंड भारत टिकवायचा असेल तर संपूर्ण देशाला एकच भाषा पाहिजे

  • @Siddhu.0.369
    @Siddhu.0.369 6 месяцев назад +4

    Shalechi aathvan krun dilit na rao ekdam Dole bharun aalena ata Mann ekch bolat ahe BALPAN DEGA DEVA❤❤❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +2

      Shaletlya mitrana ha video share kara❤

    • @Siddhu.0.369
      @Siddhu.0.369 6 месяцев назад

      @@BhaDiPa nakki nkki

  • @neelatare9755
    @neelatare9755 6 месяцев назад +1

    माझी शाळा मुंबईतील शिवाजी पार्क जवळची बालमोहन विद्यामंदिर. मला या शाळेत खूप चांगले शिक्षण मिळाले, कलागुणांचा विकास करणारी, चांगले संस्कार करणारी, जबाबदार नागरिक ज्या शाळेने निर्माण केले ती माझी शाळा. आम्ही मराठीत शिकूनहि आम्हांला आयुष्यात पुढे नोकरीत किंवा धंद्यामध्ये भाषेची अडचण आली नाही. शाळेचा खूप अभिमान आहे .

  • @maheshsathe9275
    @maheshsathe9275 5 месяцев назад

    Extent सारंग सर आणि टीम ..ह्या गोष्टीवर कोणीतरी बोलायला पाहिजे ...ते तुम्ही केलत...मनापासून धन्यवाद
    .great great great

  • @pruthvirajkale3201
    @pruthvirajkale3201 6 месяцев назад +1

    Thanks to bhadipa ..... thodkyt pan sunder prakare, bhashe cha mahatva ani kalachi garaj yanchi janiv karun dilya baddle...👏🏻

  • @rushikeshkondhare1664
    @rushikeshkondhare1664 6 месяцев назад +5

    खरं सांगायच झाल तर मराठीतून शिकलेल्या गोष्टींना कधीच रट्टा मारावा लागला नाही...
    त्या गोष्टी नसानसात आपोआप भिनतात !

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 6 месяцев назад +1

    मराठी भाषेची तळमळ सुंदर, समर्पक कलाकृतीतून मांडली . तुमच्या मांडणीला सलाम भाडीपा .👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
    महाराष्ट्रात मराठी भाषेची दुरावस्था झाली आहे . मराठीतून बोलणं कमीपणाचं वाटायला लागलंय . मराठीच्या अनेक बोली तर संपुष्टात आल्याच आहेत . किमान प्रमाण मराठी तरी टिकवायला हवी......

  • @abhisheksonawane7833
    @abhisheksonawane7833 6 месяцев назад +1

    नि:शब्द!!!
    इतका महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल भादीपाचे आभार!

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 6 месяцев назад +2

    ह्या विषयावर समाजात जागृकता निर्माण करायची सर्वात महत्तवाची गरज आहे, की मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण शिकणे-ह्याचा अर्थ कदापि होत नाही कि ती व्यक्ती मागासलेली/मागासलेल्या विचारांची आहे. एक वातावरण तय्यार करण्याची सर्वात जास्त गरज आहे-ज्यात मूल़-मुली आत्मविश्वासाने प्राथमिक शिक्षण त्यांचा-त्यांचा मातृभाषेतून शिकूशकतील.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      तुमचा मुद्दा आम्हाला पटला ❤

  • @siddhirajadhyaksha9743
    @siddhirajadhyaksha9743 6 месяцев назад +1

    कुसुमाग्रज सुखावले असतील हे बघून आज ! अप्रतिम !❤️

  • @shefalimundhe9525
    @shefalimundhe9525 6 месяцев назад +7

    ❤ वाह उत्तम कलाकृती

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      धन्यवाद ❤

  • @2musks
    @2musks 6 месяцев назад +1

    मी मराठी शाळेत शिकलो याचा मला अभिमान आहे. कदाचित समाजाप्रती असलेली आपुलकी ही माझ्या शाळेची मला देणं आहे. मी आज जे आहे ते माझ्या शाळेतील शिक्षणामुळे आणि संस्कारामुळे आहे. माहित नाही का पण आता लोकांनां मराठी शाळा नकोय..त्यांना बहुतेक असे वाटते की मुले कठेतरी मागे पडतील. पण सा नाहीये. मातृभाषेत घेतलेला अभ्यास कायम लक्षात राहतो आणि असा काही नाही की मराठी मध्ये शिकलेले सगळे बेरोजगार झालेत. आपण फक्त आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. हे पण खरा आहे की आपल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा तयार केल्या पाहिजेत आणि आपण स्वतःहून आपल्या मुलांना तिथे पाठवले पाहिजे.

  • @vaishnavishinde8653
    @vaishnavishinde8653 5 месяцев назад

    Shalechi athavan Ali 🥺🥺Aaj 9 years zale shalech tond nhi pahil...te days khup aathvtat....kash te days prt ale aste tr.....❤️❤️

  • @yugbhasme9924
    @yugbhasme9924 6 месяцев назад +4

    माझा वय १७ आहे .. शालेय शिक्षणाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आता १२वी ची परीक्षा देत अहो..
    फार वाईट वाटत आहे की मी फक्त इंग्रजी शाळेत शिकलो.
    एक अनुभव असा आहे की जेव्हा ८वी मध्ये मी CBSE वरून State Board वाल्या विद्यालयात प्रवेश केला तेव्हा मला मराठी या विषयात ८०/३७ गुण होते, खूप वाईट वाटत होतं आणि स्वतःची लाज देखील वाटायची मग lockdown लागलं आणि मग मी मराठीत पुस्तकं जसं पू. देशपांडे व शिवरायांचे चरित्र वाचले आणि मग इयत्ता १०वी मध्ये १००/९५ गुण मिळवून विदर्भात अव्वल आलो..
    मजोर्डे पणा नाही करत आहो 🙂 पण मला खूप बरं वाटलं होतं आणि आज सुद्धा मी तितक्याच आनंदानी मराठी भाषेला पुज्यातो🙏🏻
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻

    • @savitakhokle9694
      @savitakhokle9694 5 месяцев назад +1

      मराठी आपली मायबोली भाषा आज तिची काळजी वाटते बऱ्याच इंग्रजी शाळांमधून मराठी सातवी आठवी पर्यंत शिकवली जाते त्यानंतर मराठी विद्यार्थ्यांना नसते मराठी बालभारती पुस्तक लावल्या जात नाही तर साधं सोपं पुस्तक लावला जातो त्या पुस्तकातून काही शिकता येत नाही हे आपलं दुर्दैव म्हणावं इंग्रजी शाळांमधून 10 वी पर्यंत मराठी आवश्यक भाषा ठरवली गेली पाहिजे राज्य सरकारकडून

    • @yugbhasme9924
      @yugbhasme9924 5 месяцев назад

      @@savitakhokle9694 हो आता लवकर १२ पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करायलाच हवी आणि फक्त स्टेट बोर्ड नाही तर CBSE मध्ये सुद्धा🙏🏻
      नागपूरला एक विद्यालय आहे सेंटर पॉइंट नावाची CBSE शाळा आहे, तिथे वर्षभर मराठी नाही शिकवत व मराठीच्या पिरियड मध्ये इतर विषय शिकवतात आणि मग परीक्षेच्या वेळेस कामवाल्या बाईला बसवून उत्तर सांगायला म्हणतात .
      किती विटंबना होतंय मराठी भाषेची🙏🏻

  • @yogswaikul5190
    @yogswaikul5190 6 месяцев назад +1

    अप्रतिम .… कुसुमाग्रजांच्या कवितेचा संदर्भ देवून खुप गंभीर विषय सहजरित्या मांडला आहे

  • @sagarpaste4978
    @sagarpaste4978 6 месяцев назад +1

    रूपक.....एक साजरा अलंकार वापरलाय...वा...माणिक मोत्यांचे ढीग, गाभारा सलामत...., कमाल एडिटिंग मित्रानो

  • @ujwalapongde7028
    @ujwalapongde7028 5 месяцев назад +1

    अत्यंत सुंदर कल्पना आहे आणि वास्तवही!!! 💯✨

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 6 месяцев назад +1

    निःशब्द ,,,,,,,,,,,आणि तुम्हा सर्वांना असेच छान कंटेंट सुचूदेत या शुभेच्छा

  • @mukundbedre2441
    @mukundbedre2441 5 месяцев назад

    मी मराठी भाषेत शिकले CA झाले. कुठेच अशी खंत वाटली नाही की इंग्रजी शाळेत शिकले असते तर बरं झालं असतं. मराठी शाळेत असूनही इतरांपेक्षा छान इंग्रजी बोलू शकले. ही आमच्या शिक्षकांची कमाल.❤❤❤

  • @anaghathakur
    @anaghathakur 4 месяца назад

    माझं शिक्षण मराठी शाळेत झालं याबद्दल मला खूप अभिमान आहे . आज मी engineering करत आहे पण आजही मे माझ्या शाळेला खूप जास्त miss करते. माझे अनेक भावंड इंग्रजी माध्यमात शिकले पण मला जे माझ्याशाळेने दिले ते कोणाकडेच नाही. कुसुमाग्रज, पु. ल., विजय तेंडुलकर, सिंधूताई, असे अनेक लेखक . विचार, गंमत, ज्ञान, प्रकाश , दृष्टी आणि आदर मी हे कधीच विसरणार नाही.
    शाळेतील गोड आठवण म्हणजे , आमचे सर हे लेखक आहेत आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये माझ्याबद्दल लिहिले आहे. एक अनमोल हिरा म्हणून मला संबोधले आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप अनमोल आहे आणि ती मे आयुष्यभर जपून ठेवेल.

  • @nivasshinde1862
    @nivasshinde1862 5 месяцев назад

    गाभाऱ्याच् दर्शन अंतिम असते.गाभारा सलामत तो...

  • @sagarsangale1357
    @sagarsangale1357 5 месяцев назад

    एक अविस्मरणीय आठवण, कधीही न विसरता येणारी , पण आता त्या शाळे कदे पाहिले की मन उदास होते , आज ती शाळा बंद आहे .. माझी शाळा जनता शिक्षण संस्थेचे हायस्कूल , वरली, मुंबई

  • @jayshreeghatole
    @jayshreeghatole 6 месяцев назад

    अतिशय सुंदर.....

  • @nayanakamble4288
    @nayanakamble4288 6 месяцев назад +2

    Kiti Sundar....

  • @mohitbari143
    @mohitbari143 5 месяцев назад

    भावा शाळेतले दिवस आठवले रे, खूप सुंदर

  • @mitaleebandbe2982
    @mitaleebandbe2982 6 месяцев назад +2

    Shala aathvli
    Thank you

  • @rushikeshtaware6447
    @rushikeshtaware6447 6 месяцев назад +1

    मी स्वतः काही पूर्ण मराठीमध्ये नाही शिकलो..... म्हणजे सेमीचा विद्यार्थी आहे मी...पण खूप राग येतो ज्यावेळी मराठी लोकच मराठी भाषेतील शिक्षणाला तुच्छ लेखतात.....🥺 खूप छान..... सुंदर.... ह्रदयस्पर्शी होता अगदी हा व्हिडिओ....👌👌 आणि 'आई आणि अनीची' सिरीज आणा की राव...आणि मला पण त्यात रोल द्या (खाण्याचा नाही) मी पण कलाकार आहे...😁😁😁

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 6 месяцев назад

    खूपच हृदयस्पर्शी व्हिडिओ 👍मराठी शाळेतील आठवणी अलगद डोळ्यासमोरून तरळून गेल्या आणि वास्तवाचं भान येऊन डोळेही पाणावले, खरच सत्य परिस्थिती दाखवलीत तुम्ही 👍🙏

  • @navtushar
    @navtushar 5 месяцев назад

    भिठली हृदयाला......❤❤❤❤❤

  • @sushmapawar2147
    @sushmapawar2147 5 месяцев назад

    खूप अभिमान आहे आम्ही मराठी माध्यमात शिकलो याचाआणि माझी दोन्ही मुले दहावीपर्यंत मराठी माध्यमातूनच शिकली आहेत

  • @omgamer3510
    @omgamer3510 6 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद भाडीपा या छानशा लघु पाट साठी खुप छान झाला आहे .❤

  • @manasipadhye2798
    @manasipadhye2798 6 месяцев назад

    वास्तववादी विषय उत्तमरीत्या सादर केल्याबद्दल भाडीपा टीम चे आभार आणि अभिनंदन. उत्तम दिग्दर्शन, परफेक्ट voice over......❤

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 6 месяцев назад

    Shabd nahit, Team Bha.Di.Pa.!! Khoop koutuk ani khoop Prem!!

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 6 месяцев назад

    Kyaa baat... Kavitela vegla arth dilaat... Aathavni aani khant ekach veli anubhavli❤

  • @nileshchatur951
    @nileshchatur951 6 месяцев назад +1

    खरंच आता असच होत चालय माझ्या शाळेची पण हिच स्थिती आहे

  • @surajparab6096
    @surajparab6096 6 месяцев назад

    खूप भन्नाट कल्पना आहे. खरतर मराठी शाळा ना याची गरज आहे. आम्हालाही !

  • @manirsalvi8651
    @manirsalvi8651 5 месяцев назад

    Khup like Kara ashya videos na...viral hou dya.... social media mule..Ghar gharat ..pohachuya..apali shala..ani tich mahatv

  • @sharvanisalgaonkar0809
    @sharvanisalgaonkar0809 6 месяцев назад +10

    mi kadhich marathi shaale cha anubhav nahi ghetla... but this was so heart touching to watch! ❤ garva aahe mala mi marathi aslyacha 🧡

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +4

      तुमच्या मित्र मैत्रीणीन पर्यंत हा video पोचवा❤

    • @sbpcoe9011
      @sbpcoe9011 6 месяцев назад +2

      Kiti mast ❤❤

  • @saee_datar
    @saee_datar 6 месяцев назад

    खूप सुंदर @भाडिपा.... ❤
    कुसुमाग्रजांची कविता, या विषयाला चपखल दृश्यांमुळे अगदी छान relate झाली....
    आणि शेवट तर...🥹

  • @abhishekjadhav3429
    @abhishekjadhav3429 5 месяцев назад

    गर्व तर आहेच पण मज पण आहे की आम्ही मराठी शाळेत शिकून मोठे झालो आहे.. 🙏🏻💯

  • @GaneshGhag
    @GaneshGhag 5 месяцев назад

    जर महाराष्ट्रीय संस्कृतीचा विस्तार करायचा असेल, तर जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आणि जागतिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी तिला पूरक ठरू शकेल अशी चांगली ठोस भागीदार भाषा आवश्यक आहे. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनासाठी मराठी आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा लाभ घेण्यासाठी इंग्रजी. हिंदीसारखी दुसरी कोणतीही भारतीय भाषा करणार नाही, कारण तिच्याकडे वैज्ञानिक, तंत्रज्ञान, जागतिक पोहोच नाही.
    त्यामुळे मराठी अधिक इंग्रजी, हा महाराष्ट्रीयन संस्कृतीसाठी पुढे जाण्याचा मार्ग आहे

  • @hritikpawar163
    @hritikpawar163 6 месяцев назад +3

    Thank you bhadipa
    Kaahi 2-3 years pasun regional languages madhe content भरारी घेत आहेत.
    Ex. Focus Indian, Just Neel things, whyfal, etc. content creator Marathi la pudhe net aahet,
    As a citizen aapan, आपण मराठी भाषा कशा सर्व ठिकाणी वापरता येतील याचा विचार केला पाहिजे. उदा. China मध्ये coding हे सुद्धा mandarin (local Chinese language) मध्ये शिकवलं जाते

    • @rasikagt
      @rasikagt 6 месяцев назад

      Good❤

  • @poonamtapkire7084
    @poonamtapkire7084 6 месяцев назад +1

    Happy marathi language day
    आजची परिस्थिती अशीच झाली आहे 😢

  • @junkelite
    @junkelite 6 месяцев назад +6

    Loved it! Thank you.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад +1

      ❤❤❤

  • @madalasapadhye1744
    @madalasapadhye1744 6 месяцев назад +5

    अतिशय सुंदर!!!❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      धन्यवाद❤

  • @vihangkamble4291
    @vihangkamble4291 6 месяцев назад +1

    Nice concept very engaging

  • @dikshapokharkar91
    @dikshapokharkar91 6 месяцев назад +1

    Ek number ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      ❤❤❤

  • @sanketrajhans2831
    @sanketrajhans2831 6 месяцев назад

    मस्त बनवलाय लघुपट! यशस्वी मराठी लोकांनी मराठी ट्रेण्ड मध्ये आणली पाहिजे, इंग्रजी म्हणजे आधुनिक व प्रगतिशील हा भ्रम मनातून काढून टाकला पाहिजे आणि आधुनिक इंग्रजी शब्दांना/वाक्प्रचार/म्हणींना रोज वापरता येतील असे नवीन मराठी पर्यायी शब्द नियमितपणे निर्माण केले पाहिजेत.

  • @savitakulkarni689
    @savitakulkarni689 6 месяцев назад

    मराठी भाषेला शुभेच्छा🎉

  • @mathsgurunkglobalacademybh7288
    @mathsgurunkglobalacademybh7288 6 месяцев назад

    ही आमची शाळा 😊पराग विद्यालय😊भांडुप,मुंबई#धन्यवाद❤भाडिपा ❤

  • @Chaaaaaand
    @Chaaaaaand 6 месяцев назад

    गाभारा सलामत तो देव पचास ❤️🌻

  • @devenpawar1443
    @devenpawar1443 6 месяцев назад +2

    Nishabd kharach manala bhidla roj ratri walk la kusumagrajanchya Kavita aikna Ani tyanchi Ashi mandani Satya sthiti mandane hatssoff bhadipa stronger comeback ahe ha asach content rahila tr nakkich parat bhadipa che June divas parat yetil only reach.....❤❤❤❤❤ best keep it up guysss khup divsanantr khup jast bhari vatla just loved it....

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      धन्यवाद❤ असेच प्रेम दाखवत रहा.

    • @devenpawar1443
      @devenpawar1443 6 месяцев назад

      @@BhaDiPa always ♥️♥️

  • @shubhampokale2138
    @shubhampokale2138 5 месяцев назад

    बदल स्वतःपासून घडतो आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकूया..

  • @ameya_kuthe_kay_karto
    @ameya_kuthe_kay_karto 6 месяцев назад +7

    Beautiful ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      ❤❤❤

  • @swapnilbhilare8663
    @swapnilbhilare8663 6 месяцев назад +1

    Classic video❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  6 месяцев назад

      ❤❤❤