Special Report : ...म्हणून दारू न पिता मला टाईट झाल्याचा भास झाला | Antigua | Sunandan Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • वेस्ट इंडिज मधली सगळी बेटं सुंदर आहेत. प्रत्येक बेट म्हणजे वेगळा देश आहे. ह्यातील अँटिगा देश नितातं सुंदर आहे. इथे व्हिवियन रिचर्ड्स, अँडी रॉबर्ट्स, कर्टली अँब्रोस आणि रिची रिचर्डसन ह्यांना इंग्लंडच्या राणीने सर उपाधी देऊन गौरवले आहे. इथे भेटलेला टॅक्सी ड्राइवर सर व्हिव बरोबर शाळेमध्ये खेळाला होता. इतकेच नाही तर त्याने १९८३ साली लॉर्ड्स वर भारतीय संघाला विश्वचषक जिंकताना बघितले होते. तो काय म्हणला ऐका. बार्बाडोसहून अँटिगाला जायचा प्रवास किती मजेदार होता आणि आमचे इथले राहण्याचे रिसॉर्ट किती सुंदर आहे बघा फक्त. आणि झालेला सत्संग पण बघा ... होय सर व्हिव रिचर्ड्स मग सर कर्टली अँब्रोस ह्यांना भेटायला मिळाले आणि नंतर सर अँडी रॉबर्ट्स बरोबर डिनर करायला मिळाले. खूप गप्पा खूप किस्से कहाण्या. म्हणून दारू न पिता मला टाईट झाल्याचा भास झाला. होय मी तरंगत आहे अँटिगा मध्ये.
    🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket

Комментарии • 112

  • @nikhiltembulkar7234
    @nikhiltembulkar7234 3 месяца назад +44

    धन्यवाद लेले साहेब. तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या कॅरेबियन बेटे बघायला मिळतात. माल्कम मार्शल यांच्या समाधीचा व्हिडिओ आणि त्यावर आदरांजली म्हणून वाहिलेला बॉल बघून गहिवरून आले.

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 3 месяца назад +1

      हे ह्या व्हिडिओ मध्ये होते?? मला नाही पाहायला मिळाले

    • @nikhiltembulkar7234
      @nikhiltembulkar7234 3 месяца назад +1

      ​@@Ps..India2024आधीच्या व्हिडिओ मध्ये होते.

  • @dinzakas
    @dinzakas 3 месяца назад +10

    अरेवा, लेले सर, तुमच्या मुळे आम्हालाही west indies च्या सहलीला आलोय अस वाटतंय

  • @sudhanshb
    @sudhanshb 3 месяца назад +12

    काय समुद्र, काय होटील, काय विमान सगळे वोक्के आहे.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +10

    कष्ट आणि दैव यांचा संयोग आपल्या बाबतीत घडलाय आणि त्यामुळे जगातील उत्तमोत्तम प्रकृतीसौंदर्य आपणास अनुभवता येताहेत.आणि आपल्या व्हिडिओ द्वारा आम्हाला ही आपल्या भारत देशात बसूनअनुभव येतोय. यासाठी आपणास खास धन्यवाद लेले साहेब.

  • @Vk-or2iy
    @Vk-or2iy 3 месяца назад +11

    लेले साहेब वेळात वेळ काढून Gary सोबर्स भेटेल त्याला सर्व भारतीय क्रिकेट प्रेमीन तर्फे शुभेच्छा द्या. नक्की बरका!
    विवेक सहस्रबुद्धे पुणे

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  3 месяца назад +2

      he is not keeping well but still trying

    • @Vk-or2iy
      @Vk-or2iy 3 месяца назад

      @@LeleSunandan ऑल the Best

  • @Sachin-pp5hs
    @Sachin-pp5hs 3 месяца назад

    खुप छान लेले सर

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 3 месяца назад +4

    सुंदर सफर घडवून आणली आहे, वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या वैभवशाली इतिहास दर्शन केले आहे ! खूप धन्यवाद सर !!

  • @VK1008
    @VK1008 3 месяца назад +3

    🌊🏝🌊🏝🏊‍♂️🏝🏖🏕🌊🏘🏖🏝🏝
    लेले सर, हा Vlog पाहून आता मात्र खरच तुमचा खूप हेवा वाटायला लागलाय.....🙆‍♂️
    किती किती मनमुराद आनंद लुटताय या कॅरेबियन बेटांचा या 🏏20-20 World Cup🏏 च्या निमित्ताने.
    आम्ही देखील virtually हा आनंद लुटतोय.🕺
    Thank you for this MEMORABLE Vlog.
    💐💐🙏

  • @vinodkage123
    @vinodkage123 3 месяца назад +8

    Lele sir full enjoy kara tumi life 🍸 drinks kara ekate ekate lele sir khup bhari location ahet tumi khup punya kelet tyamule tumi maje karatay ami 😂😂😂😂😂😂😂😂papi ahot manun pune chya baher nahi gelo ❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @nitishgawande5816
    @nitishgawande5816 3 месяца назад +1

    अप्रतिम लेले काका. तेथील लोकांचे क्रिकेटप्रेम पाहून ज्याप्रमाणे सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपण म्हणतो, तसेच सारे वेस्ट इंडियन्स माझे क्रिकेटबंधु आहेत असे म्हणायला हरकत नाही. ❤

  • @ramchandrachaudhary883
    @ramchandrachaudhary883 3 месяца назад

    अप्रतिम लेले सर. 1:12

  • @BalasahebMadge
    @BalasahebMadge 3 месяца назад

    Very Good & Thanks❤❤❤

  • @jitendragharatcom
    @jitendragharatcom 3 месяца назад

    व्वा लेले साहेब अतिशय सुंदर अप्रतिम

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 3 месяца назад +1

    “ वो झुक नया आसमॅा भी , ( क्रिकेटका )
    इष्क मेरा रंग लाया !! होसियाऽऽऽर…
    मस्त मझा आली लेलेसाहेह keep it up !

  • @bhimsennagannavar7523
    @bhimsennagannavar7523 3 месяца назад

    Very nice video sir.

  • @vishwaskharde803
    @vishwaskharde803 3 месяца назад

    ग्रेट लेले सर तुम्ही तर एखाद्या तरुणाईला लाजवेल आसे काम करत आहात.सर्व क्रीकेट खेळाचे विडीयो बनवतात पण तुम्ही एकदम हटके.सबस्क्रायबर खूपच वाढणार आश्या विडीयोने.

  • @amitdhotre5921
    @amitdhotre5921 3 месяца назад

    खूप छान लेले साहेब.... हेवा वाटतो तुमचा

  • @rushikeshmali3082
    @rushikeshmali3082 3 месяца назад

    आभार मानावे तेवढे कमीच.... सूक्ष्म रूप धारण करता आल असत तर.... .. ...

  • @shrikantadivarekar3781
    @shrikantadivarekar3781 3 месяца назад

    तुमचे सर्व व्हिडिओ पहताना असे वाटते की तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा हा प्रवास करत आहोत.
    आणि तुमच्या शब्दात म्हण्याच झालं तर ही सर्व क्रिकेट देवाची कृपा खरचं खुप सुंदर
    अजून असे खुप व्हिडिओ पाहण्यासाठी मी खूप उस्तुक आहे..
    Thank you so much sir...😊

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 3 месяца назад

    खुप छान सर तुमच्या मुळं आम्हाला विंडीज explore करताना बघता आली.. विंडीज चे legends तर अप्रतिम 👍

  • @kashmira1999
    @kashmira1999 3 месяца назад +2

    खूप छान...भाग्यवंत आहात लेले साहेब...
    Enjoy❤

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 месяца назад

    लेले सर तुमच्या डोळ्यातून आम्ही सर्व वेस्ट इंडीज पाहत आहोत.

  • @PrashantSuryanshi
    @PrashantSuryanshi 3 месяца назад +1

    Very nice👍👍👍🎉🎉 sir

  • @raghuveervvaidya206
    @raghuveervvaidya206 3 месяца назад

    वा मस्तच लेले सर🙏🙏

  • @ckudalkar
    @ckudalkar 3 месяца назад

    Wah...Mustach...Thanks for Sharing Sunandan ji...

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 3 месяца назад

    छान. शूटिंग. छान. शब्दांकन......

  • @ujjwalmohole7687
    @ujjwalmohole7687 3 месяца назад

    लेलेजी,
    मस्त ॲंटिगा,बारबॅडोज फिरून डोळे निवले.WI ची ट्रिप मस्त! spot running सारखे spot siteseeing😊 आभार!!

  • @devendrapande6561
    @devendrapande6561 3 месяца назад +1

    Lele Sir, you are veryyyy lucky...to travel with Indian Team and and enjoying lot of places.

  • @nileshndb
    @nileshndb 3 месяца назад +1

    Thanks lele saheb...Tamara lidhe West Indies jova malyu...

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 месяца назад

    Best vlog...khub interesting..Keep it up

  • @tejasbagul8842
    @tejasbagul8842 3 месяца назад

    Scenary reminds me of the great childhood days when I used to draw a picture with beautiful blue waters ,white and gray beach sand , and sunset behind a small ship . Made me feel ecstatic ❤
    Thank you Lele sir 💯

  • @ramdasdanawale1893
    @ramdasdanawale1893 3 месяца назад

    वा.....,......लेले साहेब आम्हाला विमानातुन प्रवास करवला.😊

  • @dr.amitkumarhiremath1530
    @dr.amitkumarhiremath1530 3 месяца назад

    लेले........ मजे लेले......❤

  • @vikasjadhav6310
    @vikasjadhav6310 3 месяца назад +1

    Marshall sir .. we miss you

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад +1

    चिरतरुण लेले काका आज नाही तर नेहमीच आम्हाला पाहायला मिळतात, आणि तसेच नेहमी पहावेसे पण वाटतात🎉😂👌☺️🙏

  • @RamkisanSalunke
    @RamkisanSalunke 3 месяца назад

    Lele sir lay bhari

  • @sunnyk.4767
    @sunnyk.4767 3 месяца назад

    Bhari vatlaay ...khup mast anubhav dilat.

  • @PMantri6194
    @PMantri6194 3 месяца назад +1

    विमानाची गोष्ट बघून मला लहानपणी च्या चित्रपटगृहाची आठवण आली ❤

  • @advayrashmikulkarni9192
    @advayrashmikulkarni9192 3 месяца назад +1

    स्वप्नील आहे सगळंच..फार फार अप्रतिम

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 3 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद लेले सर.अप्रतिम व्हिडिओ.🙏🙏

  • @bharatoswalniceimage8526
    @bharatoswalniceimage8526 3 месяца назад

    Your lukey person enjoy your self

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 3 месяца назад

    Very lucky person Mr leleji 🎉❤

  • @mrinalmujumdar549
    @mrinalmujumdar549 3 месяца назад +1

    लेले काका आवाज खूपच बारीक येत आहे

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 месяца назад

    लेले सर अफगाणिस्तान जिंकले. तुम्ही हा अंदाज सांगितला होता. लवकर विडिओ येऊ द्या पोस्ट मॅच
    Super 8 मध्ये फेरफार होणार आता.❤

  • @shrikautade
    @shrikautade 3 месяца назад

    लेले काका व्हीडिओचे टायटल मस्त 😀😀

  • @rahulnarkar8139
    @rahulnarkar8139 3 месяца назад

    Bhari lele sir 🎉...

  • @pavanpatil2240
    @pavanpatil2240 3 месяца назад +1

    Sir chich hava aahe. 🎉😃

  • @akshaykhochare973
    @akshaykhochare973 3 месяца назад +1

    लेले सर, युरोप, अमेरिकेत सहसा Ceiling Fans बघायला मिळत नाहीत, इथे मात्र आहेत. कॅरेबियन बेटे तशी उष्णकटिबंधीय त्यामुळेच थंड हवेची साधने हवीतच.

  • @sureshadsule1618
    @sureshadsule1618 3 месяца назад

    Thank you Lele sir

  • @manojjane3122
    @manojjane3122 3 месяца назад

    फार फार छान वाटते आपण दाखविला व्हिडिओ बद्दल

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 3 месяца назад

    Mast ,zakkas😅

  • @madhukargaikwad9743
    @madhukargaikwad9743 3 месяца назад

    Excellent coverage you are great Sunandan

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 3 месяца назад

    Fantastic maan enjoy the time

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 3 месяца назад

    Nice video

  • @manishrane6499
    @manishrane6499 3 месяца назад

    Sir taxi guy was a awesome 👌

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 3 месяца назад

    एकदम मस्त... वाह वा.... 👍😁

  • @gurudevigalurgi8083
    @gurudevigalurgi8083 3 месяца назад

    Marvollous vlog

  • @anantdeshpande2293
    @anantdeshpande2293 3 месяца назад

    अप्रतिम विंडोज आणि कव्हरेज.
    पण पुणेरी प्रश्न?
    आपण बिचवर एकटेच आहत का?
    Crowd दिसत नाही 😊😊😊

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 3 месяца назад

    Waah 🎉

  • @VirajRao
    @VirajRao 3 месяца назад

    Excellent place to live retirement life. 😊

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 3 месяца назад

    अफलातून 🎉

  • @sanjeevbadwe6857
    @sanjeevbadwe6857 3 месяца назад

    Sunandan have a nice time

  • @kaustubharolkar5098
    @kaustubharolkar5098 3 месяца назад

    Mastach.. Tumche cricket video peksha paryatanache video masta astat.. Tunhi ek touring cha channel kadha seperate.

  • @HusainPatel-xw1us
    @HusainPatel-xw1us 3 месяца назад

    आपले खूप खूप धन्यवाद, तुम्ही सर्वांचा विचार करता. 🙏🏻💐

  • @praslele
    @praslele 3 месяца назад

    वाह वाह

  • @madhavbhave977
    @madhavbhave977 3 месяца назад

    लेले साहेब सुंदर सफर घडवून आणली, धन्यवाद इकडे कोणी कॅरेबियन क्रिकेटसमालोचक मैत्रिण नाही का?

  • @Ani.DR.07
    @Ani.DR.07 3 месяца назад

    Mast kaka

  • @datta6159
    @datta6159 3 месяца назад +4

    लेले सर आम्हाला विमानात बसले सारख वाटलं.

  • @akshaylangote3456
    @akshaylangote3456 3 месяца назад +1

    Sir as fill kokan madhe aahe ka...plz reply sir

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 3 месяца назад +1

    ओ लेले तो कोल्हापुरी पायतान कुनला दिलात ते सांगा

  • @ckudalkar
    @ckudalkar 3 месяца назад

    Sunandan Sir...West Indies che Tourism sopt pun dakhwa please....Musieums, Theaters, Theme Parks....and last but not the least....FOOOOODDDDD....he loka khatat ka Prawns, Khekde...etc....Are there Indian Restaurants Too ?

  • @vikram6428
    @vikram6428 3 месяца назад

    Mumbai Players na interview madhe marathi question vichara✅

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 3 месяца назад

    West Indies madhey kon kon te Island yetat.....sir
    Ex Anitigua, Barbados, St Lucia, port of Spain

  • @purushottamdeshpande9001
    @purushottamdeshpande9001 3 месяца назад

    सर सोबर्स सराना आमचा नमस्कार सांगा

  • @vikrantkhambekar9829
    @vikrantkhambekar9829 3 месяца назад

    सुंदर, आणी एक सुंदर माळ ओवली मैत्रीची (पोंडेचरी ). शेवटी फोटो दाखवले, आंब्रोस आणी जे कपल दाखवले ते कोण आहे?

  • @keshavpatankar4509
    @keshavpatankar4509 3 месяца назад +1

    13नंबर.चप्पल कोणाला दिली?

  • @mandarkajarekar8618
    @mandarkajarekar8618 3 месяца назад +1

    लेले काका, एकदा तिथलं लोकजीवन, पाणी प्यावं इतक्या सहज दारू पिणं.... यावर माहितीपर व्हिडिओ बनवावा ही विनंती

  • @arvindbawane1810
    @arvindbawane1810 3 месяца назад

    Lely sir sponsor कोण आहे

  • @javedthakur3852
    @javedthakur3852 3 месяца назад

    Ase watate WE madech hahot

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 3 месяца назад

    Many thanks for sharing your carrebian vidios. Sunandaji ase many more vidios are expected from you. 😅😅😅😅

  • @sameerdani5218
    @sameerdani5218 3 месяца назад

    Good video,Sir pls talk abt our top order batsmen,why they had to throw there wickets,we would have scored atleast 230-40 runs if they had batted with responsiblity,we have to play our next match with the toughest opponents ie Aussies,they r still unbeaten too. Make them understand,the attack would be tough compared to all the teams now

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 3 месяца назад

    कालच्या सामन्याचा व्हिडिओ

  • @rajeshthipse
    @rajeshthipse 3 месяца назад

    "घाट-घाट" का पानी पिने वाले बहुत होंगे...
    आज "समुद्र-समुद्र" का पानी पिने वालों को भी देख लिया! 😁

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 3 месяца назад +1

    काका, एकटे नका घेत जाऊ, पुण्याला आल्यावर सोबत बसू 😂😂

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 3 месяца назад +1

      सुदामे ला गाठला पाहिजे..

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 3 месяца назад

    Title bhari lavalay😂

  • @dealsme4370
    @dealsme4370 3 месяца назад

    शेवटी सरांना पोहतानाचा व्हिडिओ दाखवायची गरज नव्हती. बिकिनी घातलेली मादक ललना असती तर गोष्ट वेगळी होती😂😂😂

  • @sagarisame3378
    @sagarisame3378 3 месяца назад +1

    Lele sir 2024 t_20 world cup india c marnar

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 3 месяца назад +1

    लेले जीवाची चैन करून घेत आहात 😂

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 месяца назад

    लेले सर, याचा अर्थ काय होतो?---दारू न पिता म्हणजे🎉😂👍

  • @Travellifejourneys
    @Travellifejourneys 3 месяца назад

    T-shirt ek number Beach please ☺️😊

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 3 месяца назад

    Sir free seating mhanta mag lokk jasti jhale tar ubharun jatat kaay lokk?😂

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 3 месяца назад

    Kai bhaas ahe😂😂

  • @sudhanshb
    @sudhanshb 3 месяца назад

    बाप रे ही तर कॅरिबियन लाल परी ST टाईप विमान सेवा वाटते. चालतं या मिळेल तिथे बसून घ्या. विमानातून उतरले की आपले सामान आपण घेवून जा
    नीट चेक करा साहेब खुर्ची खाली ढेकूण आणि झुरळ नाही ना.मला विमान सेवेचे वर्णन ऐकून टाईट झाल्या सारखे वाटते.

  • @DP75889
    @DP75889 3 месяца назад

    विमान उडतात ना नीट😂

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 3 месяца назад +1

    विश्लेषण पद्धती काय बरोबर नाही....जरा improve Kara next time

  • @Maharaj449
    @Maharaj449 3 месяца назад

    अहो लेले कुठे आहात तुम्ही हा काय फालतूपणा करताय क्रिकेटकडे लक्ष द्या तिकडे ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान हरवली त्याच्यावर तुमचा व्हिडिओ दिसत नाही आहे

  • @premanandshinde7263
    @premanandshinde7263 3 месяца назад

    Bhij"lele

  • @ganeshjagtapshivcreation541
    @ganeshjagtapshivcreation541 3 месяца назад

    Bs kr lele ab ghar a ja

  • @commonerIndian
    @commonerIndian 3 месяца назад

    nice