मंडळी तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे,YouTube journey,Yt payment?चॅनलडिलीट झाले होते😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • मंडळी तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे,RUclips journey,Yt payment?चॅनलडिलीट झाले होते😱
    • Snacks Recipe
    Brekfast recipe
    • Brekfast recipe/न्याहर...
    Maharashtriyan recipe
    • Maharashtriana Recipes
    #aartisrecipemarathi#food#foodie#cooking
    Thankyou for watching 🙏

Комментарии • 554

  • @kalpanakshatriya8404
    @kalpanakshatriya8404 6 месяцев назад +21

    तुझा youtube चा प्रवास तसाही इतरांना प्रेरणा देणारा आहे. Kepp it up....

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 6 месяцев назад +28

    वा आरती बाळा मुख्य म्हणजे तू एक फौजीची बायको आहे याचा मला खुप अभिमान आहे व तू खुप सुंदर छान बोलकी मेहनती हुशार उच्च शिक्षित आणि गोड हसरी मुलगी आहे तुझ्या रेसिपी सुध्दा एक नंबर आहेत आणि तुझा मुलगा विहान सुध्दा खुप गोड आहे अशीच मेहनत करत रहा तुला तुझ्या कामात भरपूर यश मिळू दे भरपूर प्रगती होऊ दे हीच देवाकडे प्रार्थना तुझ्या आईवडिलांनी तुला खुप कष्टात वाढवले तुझ्या आईवडिलांना व तुझ्या मिस्टरांना माझा कोटी कोटी प्रणाम। देव बरे करो❤❤❤

    • @vijayas4945
      @vijayas4945 6 месяцев назад +1

      खरच, आरती अवांतर बोलतच नाही ✅मस्त वाटतं❤🌹

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад +1

      🙏

    • @namrataghaisas4764
      @namrataghaisas4764 19 дней назад

      आरती मी तुझे विडीओ नेहमी पहाते मला खूप आवडतातही. तु फौजी पत्नी आहेस हे कळल्यावर अभिमान वाटला. धन्यवाद❤❤

  • @onkarshinde1240
    @onkarshinde1240 4 месяца назад +6

    मी पण फौजी पत्नी आहे २६ वर्ष फौजी लाइफ पाहिली खूप कठीण असतं ताई फौजी ची बायको संघर्ष करावाच लागतो आता रिटायर झालेत ताई तुम्ही खूप छान आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुमच्या रेसिपी खूप सुंदर असतात

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 6 месяцев назад +39

    ❤आरती तुझ्याकडे पाहिले की खूप नाजूक,सुंदर,आहेस तुझ्या बोलतही खूप शांत,अदबीने,नाजुकपणे आहे.पण तू स्वतः ला खंबीर,बनवले आहेस अशीच रहा तुला माझे खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद🙌❤😍😘

  • @meeraparanjape3520
    @meeraparanjape3520 5 месяцев назад +6

    ताई तू ग्रेट आहे
    लहान वयात चिकाटीनं यश मिळवलं
    खूप छान असतात तुझ्या रेसिपी
    तुझी अशीच प्रगती होवो
    स्वामी समर्थाची कृपा तुझ्यावर सदैव राहो 🙏🏻

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  5 месяцев назад +1

      Thankyou
      श्री स्वामी समर्थ

  • @foodlifeandhappiness0604
    @foodlifeandhappiness0604 6 месяцев назад +10

    खूप छान माहिती दिली. अशीच प्रगती करत रहा. पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ!

  • @shrimant_yogi278
    @shrimant_yogi278 Месяц назад +3

    नमस्कार ताई 🙏🏻😊 तुमचा युट्यूब प्रवास अगदी च प्रेरणादायी आहे. मी एक नवीन you tube creater आहे.मी सुद्धा तुमच्या प्रमाणे टि व्ही वर विष्णू जी च्या सर्व रेसिपी पाहिल्या आहेत. करून पाहिल्या आहेत तसेच लिहूनही ठेवलेल्या आहेत.महत्वाचे म्हणजे मला सुद्धा रेसिपीज बनवण्याची प्रचंड आवड आहे.परिश्रम करण्याची पण तयारी आहे.
    मला तुमच्याकडून ... चॅनल योग्य रीतीने सुरू ठेवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी म्हणजे रेसिपी शुट करण्यापासून ते vdo up load करण्यापर्यंत काय काय करणे आवश्यक असते .याबाबत माहिती सांगताना एखादा व्हिडिओ बनवावा. अशी अपेक्षा आहे.
    धन्यवाद.🙏🏻 😊

  • @anuradhashinde2662
    @anuradhashinde2662 4 месяца назад +1

    आपले
    सर्व पदार्थ पद्धतीने करून बघितले खूप सुंदर होतात, मला तुमच्या पद्धती आवडल्या. मी ठाण्यात कळवा येथे राहाते.

  • @pradnyarane8335
    @pradnyarane8335 Месяц назад +1

    मीही खान्देश ची आहे पण मीं लग्नाआधी ही इथेच शहापूर ला होती आत्ता लग्नानंतर मीं मुंबईत आहे मीं आता 59यार ची आहे पण मला तू खूप आवडते खूप छान GO ahead 👌👌खुप छान i like it tuzya receipe आवडतात मस्त

  • @sujatajadhav4643
    @sujatajadhav4643 Месяц назад +1

    आरती तुमचे रेसिपी मी नेहमी पाहते. तुम्ही रेसिपी दाखवताना कोणता पदार्थ करता ते सांगा.तुम्ही फार गोड आहात बोलण फार सुंदर आहे तुम्हा तिघांना उदंड आयुष्य मिळो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना.

  • @pramilabrahme1467
    @pramilabrahme1467 4 месяца назад +1

    आरती खरच तुझ्या चेहरा आणि तुझ्या बोलन्यावरून तुझा शांन्त स्वभावाचा अंदाज येतो त्यामुळे तुला तुझे पुढचे मार्ग मोकळे होतात मी एक महिन्या पासून तुझ्या व्हिडिओ पाहते आहे खुप छान आणि सोप्या पद्धतीने करतेस मी त्या रेसीपी माझ्या मुलीला सेअर करते मी काही रेसीपी बनवल्या खुप छान झाल्या एवढ्या कठीण प्रवासातून तु प्रयत्न केला तुला पुढच्या प्रयत्नाना खुप खुप शुभेच्छा

    • @jaywantwavekar6279
      @jaywantwavekar6279 Месяц назад

      तुमच्या रेसिपी खूप छान असतात.टिप्स छान असतात.

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 4 месяца назад +2

    खूप छान. अशीच तुझी प्रगती होऊ दे.इतक्या लहान वयात तू प्रयोग करून भरपूर रेसिपी दाखवतेस.खूप खूप आशीर्वाद😊

  • @poonamshinde2495
    @poonamshinde2495 6 месяцев назад +7

    हॅलो,
    खूपच प्रेरणात्मक प्रवास आहे तुमचा.
    काही क्षणांसाठी मला असे वाटले की, मी तुम्हाला जोश टॉक्स मध्येच पाहत आहे. तुमचे पती फौजी आहेत हे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच तुम्ही आयुष्याचा जोडीदार म्हणून एका फौजीची निवड केली हे अतिशय मोलाचे आणि कौतुकास्पद आहे.👍
    शेवटी इतकंच बोलावसं वाटत आहे की,
    आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
    विचार बदला आयुष्य बदलेल.
    हे तुमच्या बाबतीत बऱ्यापैकी लागू पडते.
    🙏

  • @shamalavekar1839
    @shamalavekar1839 6 месяцев назад +4

    खूप छान mahiti dili. Life मध्ये struggle pratekalach karav lagat. Tyatun aapan barach काही shikto. तुला pudhi vatchalisathi खूप खूप शुभेच्छा अणि आशीर्वाद.

  • @neetasonawane5267
    @neetasonawane5267 Месяц назад +2

    Khup chhan vatale tuza pravas aikun Swami tula prachand bal detil ani tu ajun pudhe janat. Tuza face varun tu atishay sussbhavi disate

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 24 дня назад

    Arati तू खूप down to earth आणि नैसर्गिक रीत्या सुंदर आहेस बाळा. माझी मुलगी तुझ्या व्हायचीच आहे. ती परदेशात आहे..

  • @sunandaborse8294
    @sunandaborse8294 4 месяца назад +2

    वा छान तु ग्रेट आहेस सुंदर सुशील आहेस ❤
    तुझा चैनल मी नेहमी पहात असते .तुझ्या सगळ्याच गोष्टी खुप सुंदर आहेस गुणांची खान आहेस

  • @alkadahale5964
    @alkadahale5964 Месяц назад

    कौतुकास्पद आहे.तुझ्या कष्टाचे
    सार्थक होईल.आमच्या शुभेच्छा
    तुझ्या पाठीशी आहे.श्री स्वामी समर्थ.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад

    आरती तुझा प्रवास इतर बायकांना प्रेरणादायी आहे तुझे रेसिपीस खूपच छान असतात त्यापेक्षा तुझे बोलणे खूपच नम्र आणी शांत आहे तुला यापुढेही यश मिळो.हा माझा आशीर्वाद आहे

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 Месяц назад

    खूप छान आरती.मी ६६ वर्षांची आहे.सून नौकरी करते.नातवंडं कालेज शाळेत जातात.तुझे यूट्यूब पाहून मी करत आहे.कारण आमचं जुणी पदार्थ जमतात पण नवीन काहीतरी केलं तर मुलांना खूप आवडते.म म्हणून नवीन रेसीपी पाहून करते.नातवंड खूष आपल्या ना समाधान वाटतं.तुला शुभेच्छा आशीर्वाद.

  • @ashwinijadhav1735
    @ashwinijadhav1735 5 месяцев назад +1

    खूप छान ताई... स्वामी तुझ्या प्रयत्नांना अजून यश देवोत.... तुझा चॅनल अजून खूप मोठा होऊदेत....🙏🏻🌹!! श्री स्वामी समर्थ!!🌹🙏🏻

  • @sadhanawaghmare9709
    @sadhanawaghmare9709 Месяц назад +1

    तु माझ्या मुलीप्रमाणे आहेस तुझा व्हिडिओ पाहिला तु जसे नवर्या सोबत आहेस तसंच माझी पण त्यांच्या सोबत होती ती फार शिकलेली नव्हती पण पण आर्मी वाल्यांच्या बायकांना माझा सलाम माझी आई तिथे स्वेटर विणायला नुसतीच शिकली नाही तर आम्हाला सर्वांना घालायला सर्व प्रकारचें स्वेटर विणून घातले तिकडे वेळ जात नाही म्हणून तुम्ही टाइमपास करत नाही याचं कौतुक आहे आणि तुला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे त्यामुळे तुझं खुप कौतुक वाटले तुझं खुप नाव होऊदे तुला खूप प्रसिद्धी मिळो हाशुभ आशिर्वाद या शुभ दिनी ♥️♥️ तुला कुणाची नजर नको लागायला आधी मिठ मोहरीने नजर काढून टाक तु जास्त भाव मारत नाहीस तुझा साधेपणा मला खूप आवडला तु बोलत होतिस आणि माझ्या डोळ्यातुन अश्रु येत होते मी खुप हळवी आहे मला दोन मुलंच आहेत मुलगी नाही मुलांची लग्न झालेत त्याना मुलं आहेत ♥️♥️ तुझा व्हिडिओ मला खूप आनंद देऊन जातो तुला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या सोबत असू द्या

    • @anuradhanagraj3683
      @anuradhanagraj3683 Месяц назад

      खूप खूप छान मी पण रिटायर फौजीची पत्नी आहे तुझ्या रेसिपी खूप छान असतात मी नेहमी बघत असते

  • @diptimarathe3968
    @diptimarathe3968 6 месяцев назад +4

    मी तुमच्या रेसिपी नेहमी बघते, खूप छान आणि पटकन होणाऱ्या असतात. मी त्या लगेच करून पण बघते. आजचा व्हिडिओ आवडला. All the best. अशीच प्रगती होत राहूदे 👍💐

  • @sangitamukwane4778
    @sangitamukwane4778 Месяц назад +1

    Sadhyachi paristhiti baghta Mistrana pratyksh dakhu naye please faugi aahet mhnun ❤

  • @anjalitayade2760
    @anjalitayade2760 5 месяцев назад +2

    खुप कमी मुलींना स्वयंपाक करणे आवडते.... अभ्यास नसेल हिला किंवा शिकली नसेल जास्त... असे म्हणतात...कमी पणाचे समजतात..
    खूप छान वाटलं... तुझा अनुभव ऐकून..

  • @deepikalokhande8507
    @deepikalokhande8507 6 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ तुझा प्रत्येक व्हिडिओ मी पाहते खूप छान खूप छान पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा

  • @bharatisarode1642
    @bharatisarode1642 4 месяца назад +5

    खूपच छान...! शब्द अपुरे पडतात तुझे कौतुक करताना...! उदंड यश मिळो यासाठी आभाळभर शुभेच्छा...!❤🎉

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 6 месяцев назад +2

    खूप छान आहे करायला अगदी सोप्या पद्धतीने आहे त्यामुळे नक्की करुन बघेन धन्यवाद ताई

  • @winterlily100
    @winterlily100 6 месяцев назад +3

    Faujichi bayako mhanaje khup khup brave aahes ga tu! Mi pan khandeshchi aahe pan sadhya US madhe asate ani tuze videos baghate 😊. Keep it up and many best wishes for your future.

  • @manishasaraf7675
    @manishasaraf7675 Месяц назад +1

    ताई मी तुमचे video नेहमी बघते. मी पण खानदेशी आहे. परंतु आता मुंबई ला राहते. मी सुद्धा नवीन चार महिने झाले. रेसिपी chanel चालू केले आहे.
    Manisha'srecipe & maza
    muliche Shewta' Kitchen मी तुमच्या रेसिपी छान असतात.
    chanelआहे.

  • @suchitrapawar2239
    @suchitrapawar2239 6 месяцев назад +1

    फेसबुकवर तुमची स्टोरी अनुभव नक्की लिहीत जा आणि प्रत्येक रेसिपीची लिंक देत रहा, मुलगी असावी तर तुमच्यासारखी,आईवडिलांच्या कष्टाची जाण राखणारी,कर्तृत्व वाण,खम्बीर आणि सोशिक सुद्धा!पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा🎉💐छोट्या विहानला❤ आणि फौजिना सलाम👍

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 29 дней назад

    हा प्रश्नोत्तराचा व्हिडिओ खूप छान वाटला. मी व्हिडिओ बघत असते पण आज तुझी सगळी माहिती ऐकून, तूझे खूप कौतुक वाटले. कधीच हिंमत न हारता वाटचाल चालू ठेव. शुभेच्छा.

  • @CookingChirpsMore
    @CookingChirpsMore 6 месяцев назад +2

    खुप छान या व्हिडिओ मुळे आमच्या सारख्या नवीन लोकांना खुप फायदा होईल आणि पुढच्या वाटचालीस खुपसऱ्या शुभेच्छा🎉💐💐

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर आणि संघर्षपूर्ण प्रवास आहे. अशीच प्रगती करत रहा.

  • @bhartimahajan5188
    @bhartimahajan5188 3 месяца назад +1

    Arti. Tuzya recipe khup chan astat pan.tu pachora gavakadchi ahe mahnun mala tuza.khup abhiman vatla karan mi pan tikadchi ahe

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 6 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आरती.अशीच मेहनत घेत जा.फळतर मिळणारच तुला.श्री स्वामी समर्थ ❤

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад

      Thankyou
      श्री स्वामी समर्थ

  • @manishaadake2647
    @manishaadake2647 Месяц назад +1

    Arti tu khu p chaan boltes ani recii
    Pi ppatkan samajtat kiti god aahes
    Shri swami samarth🙏🙏

  • @ramlalpatil517
    @ramlalpatil517 Месяц назад

    मी पण एक फौजी ची बायको होती माझ्या वर पण अशीच गोष्ट झाली आहे आता तुझे काका कोरोना मध्ये गेलेत माझे मुल पण सर्व पुणे आहेत तुझे मी व्हिडिओ बघते मी पण पाचोरा ची आहे म्हणजे गाव नांद्रा आहे मला खूप आवड आहे यु ट्युब बघते

  • @Chetna2606
    @Chetna2606 5 месяцев назад

    मी तुमच्या रेसिपीज् पाहते. तुमचं सादरीकरण खूप उत्तम असतं. तुम्ही तुमचा पडद्यामागचा प्रवास सांगितला. ऐकताना एका क्षणी तर डोळे भरुन आले. आपल्या लाईफ पार्टनरला साथ देणाऱ्या एका खंबीर स्त्रीचा सुंदर आदर्श तुम्ही समाजासमोर ठेवला आहे. त्याचबरोबर स्वामींचा अनुभव सांगून पुन्हा एकदा स्वामी भक्तांना खूप सकारात्मक विचार दिला आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni484 Месяц назад

    आरती तू मिस्टर व मुलगा छान आहात .अशीच तुझी प्रगती होवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आशीरवाद.

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 28 дней назад

    आरती तू सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुझा सर्व प्रवास उलगडून सांगितलंस खरचं तू मेहनती सहनशील व नक्कीच great आहेस तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @MrandMrsRaval_Vlogs
    @MrandMrsRaval_Vlogs 6 месяцев назад +5

    मी आजच हा व्हिडिओ बघितला स्वामींचा अनुभव आणि जर्नी पाहून अक्षरशः अंगावर शहारे आले. खूप छान वाटले👌👍

  • @vaishalimane9546
    @vaishalimane9546 4 месяца назад

    खुप छान वाटले तुझे बोलणे ऐकून. अशीच प्रगती करत रहा. नक्कीच खुप यशस्वी होशील. देवांचा आशिर्वाद आहे तुला. ❤

  • @SandhyaSKulkarni-if8xs
    @SandhyaSKulkarni-if8xs Месяц назад

    खूपच छान आरती...
    नावाप्रमाणे तुझी आरती करावी अशीच तू आहेस.. लहान वयातच तू एवढी समजदार आहेस कि इतरांनी तुझा आदर्श घ्यावा...तुझे निर्णय तू तुझ्या पतीच्या सल्ल्याने घेतेस हे ऐकून खूप छान वाटले... शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हेच खरे... *जय जय स्वामी समर्थ*
    तुझ्या रेसिपीज मी पण ट्राय करते.. मला खूप आवडतात.. तुझ्या सारख्याच त्याही खूप गोड आहेत... अशीच कायम हसतमुख रहा...😂😂

  • @bitag.ramteke2008
    @bitag.ramteke2008 5 месяцев назад

    शब्दच अपूरे पडतात कौतुक करण्यासाठी. तुझ्या या ऊपक्रमास खूप खूप आशीर्वाद णी शुभेच्छा.

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 5 месяцев назад

    आरती मीतुझे व्हिडिओ आताच पहायला सुरवात केली, व लगेचच तुझी यु ट्युब चॅनेलवर तुझी जर्नी ऐकली, व मला खूप आश्चर्य वाटले, शिवाय माझ्या मनातले सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. तु दाखवलेले पदार्थ मी करून पाहते.तु सुगरण आहेस यात शंकाच नाही. मी देखील आत्याकडून पोळ्या करायला शिकली, बघूनच मी सुद्धा पदार्थ करू शकते. मी बिर्याणी करून पाहीली, नाश्त्याची रेसिपी बघून बाईला करायलासुद्धा. एकदा वांग्याचे भरीत व पिकलेल्या टोमॅटोची भाजी दाखव . खूप खूप धन्यवाद व शुभाशीर्वाद.

  • @ashwinisolase1171
    @ashwinisolase1171 6 месяцев назад +43

    माझे पण मिस्टर एक फौजी आहेत ते बाहेर आहेत आत्ता माझी मुलं स्कूल मध्ये गेले की मलाही खूप एकटं वाटतं म्हणून मी पण यूट्यूब चैनल सुरू केलेला आहे आत्ताच 😊

  • @ganeshsirsat4277
    @ganeshsirsat4277 4 месяца назад

    मी पण एक फौजी पत्नी आहे आणि तुमच्या सारखेच मला पण माझ्या मिस्टराचा ८ दिवसांनंतर २ मिनिटे फोन यायचा आता आम्ही दोघेही नागपूर ला आहोत

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 4 месяца назад

    खूप छान रेसिपी असतात आरती तुझ्या,मला पण रेसिपी करायला आवडते,सुरुवात कशी करायची मला नक्की सांग.

  • @DipaliDalvi-fm3hg
    @DipaliDalvi-fm3hg 6 месяцев назад +1

    Aarti tu khup Chan v easy पटकन होणाऱ्या रेसिपीज दाखवता , खूप बरं वाटतं तुमचे व्हिडिओ पाहायला , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @user-qb7sk3zs9l
    @user-qb7sk3zs9l 2 месяца назад

    आरती तुझ्या रेसिपीज खूप छान असतात मी नेहमी पाहते आणि बनवते सुध्दा पण तु जी एवढी जास्त कॉन्टटी बनवते ती कोण खाते म्हणजे तसे घरात दोघेच असता न खाणारे म्हणून सहज विचारते😂❤

  • @purnimatamhane8798
    @purnimatamhane8798 6 месяцев назад +8

    खूप छान अंकिता, मी तुझे व्हिडिओ अलीकडे च पाहायला लागले, खूप छान असतात,नीट समजावून सांगतेस, मी करुनही बघते
    मी तुझ्या आईपेक्षा ही मोठी असेन.
    पण कोणी चांगले ज्ञान देत असेल तर त्याला गुरु करावे,मग तो कितीही लहान असला तरी,
    तुझे सर्व अनुभव ऐकून खूप चांगले वाटले,अशीच आनंदी आणि उत्साही रहा.तुला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤😊

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @vivekhaladi
      @vivekhaladi 5 месяцев назад +1

      Feeling proud of you.All the best..🎉

    • @madhurirevankar6140
      @madhurirevankar6140 5 месяцев назад

      Feeling proud of you...All the best Tai

  • @abhabhave6021
    @abhabhave6021 4 месяца назад

    तुझ्या सर्व रेसिपी खूप छान असतात. खर म्हणजे आता बरेचदा मला स्वैपाकाचा कंटाळा येतो पण तुझा विडिओ पाहिल्यावर हुरूप येतो. 😀

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Месяц назад

    वा खुप ग्रेट आहे खुप प्रयत्न केले स्वामी तुमच्या पाठीशी आहेत खुप छान👌👍

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Месяц назад

    आरती खूपच सुंदर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम मी पण 75 वर्षाची आजी आहे मी पण तुझ्या रेसिपी रोज पाहते पण लिहायला मला जमत नाही एवढं मला तू पण आवडतेस तुझ्या रेसिपी पण आवडतात

  • @pramodinijuikar1334
    @pramodinijuikar1334 6 месяцев назад +2

    आरती, तुझ्या सर्व रेसिपी छान असतात, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sharadasondkar7283
    @sharadasondkar7283 Месяц назад

    आरती मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो!तू तर छान आहेसच!तशीच तू हुशार आणि खूप धीराची आहेस!बाळा अशीच खूप मोठी हो नवऱ्याच्या पाठिशी रहा!तुझ्या बाळास चांगल तयार कर!तुम्हा सर्वाना खूप आयुष्य लाभो!

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 6 месяцев назад +1

    ❤🎉👌👌👌खुपच छान...तुला खुप खुप शुभेच्छा.मनापासून अभिनंदन... श्री स्वामी समर्थ...❤🎉

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 6 месяцев назад +1

    Khup chan aarti,tuzi RUclips journey yekun dolyay pani aal ,kharch khup stong aahes, Salute aahe tumha saglya fuji पत्नींना,aamhi corona mdhe sampurn family sobt gharat hoto,aani tumhi desha sathi ldgat hote😢

  • @manishapatil5799
    @manishapatil5799 6 месяцев назад +1

    मी पण तुमचे शॉर्ट व्हिडिओ पाहते ताई तुम्ही खानदेशी सांगितल्यावर मला खूप आनंद वाटला आणि तुमचं गाव पाचोरा जवळ आहे असं सांगितले आम्ही पण पाचोरा जवळ राहतो तुमचे प्रॉपर गाव कोणते ते कळवाल का ताई आम्हाला अजून जवळीक वाटेल तुम्ही फौजी पत्नी आहात आम्हाला पण खूप अभिमान वाटतो तुमचं स्ट्रगल पाहून आम्हाला पण उत्साह येतो

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई
      गोंदेगाव

    • @leenajohare3831
      @leenajohare3831 5 месяцев назад

      Mi pn ek police patni aahe ..Majh sasr Shendurni chi aahe .. aani majhe mummy papapn nashik la rahtat

  • @deepanaik8112
    @deepanaik8112 Месяц назад

    Tumcha atta paryant cha pravas khupach prernadai ahe, tumcya pudhchya vatchalisathi khup khup shubhechya👍

  • @Neha-q4m
    @Neha-q4m 5 месяцев назад +1

    Mi Neha Thai tumche Anubhav aikun khup Chan vatye kiti mehnat gheta aasacha tumala Yash Milo 👍

  • @kalpanaphalke256
    @kalpanaphalke256 10 дней назад

    तुम्ही खुप छान बोलता . ऐकत राहव वाटतय

  • @saritamane476
    @saritamane476 Месяц назад

    तुम्ही खूप मेहनत घेतली आहे
    श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 4 месяца назад

    आरती तुझा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे तुला पुढे खूप तुला खूप खूप यश मिळो तुझा स्वभाव खूप नम्र आणि बोलका आहे याचा तुला भविष्यात फैयदाच होईल. तू विस्मरणात गेलेल्ल्या receip दाखव तुला त्याचा खूप फैयदा होईल जुने ते सोने असतेच. सध्या सोप्या सटसुटीत कृतीच बऱ्या वाटतात. तुला खूप खूप आशीर्वाद

  • @anushridalvi1833
    @anushridalvi1833 2 месяца назад

    Mast ahe tuzhi You tube journey 👌🏼🙂👍🏼 we proud of you.... & all the best

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 5 месяцев назад

    खुप छान आरती धैर्याने परिस्तीतीला तोंड दिलैस व तुझा या ट्यूब चालु केलास तझै खुप अभिऩदन स्वामी समर्थांचा तुझ्यावर कृपा असावी ही प्रार्थना

  • @user-qb7sk3zs9l
    @user-qb7sk3zs9l 2 месяца назад

    माझ्याकडून तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा🎉

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 5 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ📿 ताई तुझ्या आहे रेसिपी अफलातून व भन्नाट आहे त परवानगी करायला मज्जा व सुंदर होतात thanku so much love you❤ me gushi khup mohit fan ahe

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  5 месяцев назад

      Thankyou so much
      श्री स्वामी समर्थ

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 6 месяцев назад +4

    खूप छान पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @Savitasrecipe-1212
    @Savitasrecipe-1212 6 месяцев назад

    तुझा you tube प्रवास मला प्रेरणादायक ठरेल आणि इतरांना ही Thank you didi

  • @SmitaShinde07
    @SmitaShinde07 6 месяцев назад +1

    आरती तुझ्या recipes छान असतात. तूझे खूप कौतुक वाटत आहे की तू एकटी घराच्यांपासून दूर राहत असूनही मोठ्या हिम्मतीने लहान मुलाला सांभाळत तूझे स्वतः चे youtube channel यशस्वीपणे चालवत आहेस. खरचं तूझे खूप कौतुक आणि अभिमान वाटतोय. तूझ्याकडून अनेकांना प्रेरणा मिळेल अशीच तू आहेस. तूझ्या प्रत्तेक प्रयत्नांना भरभरून प्रेम प्रतिसाद आणि यश मिळावे अशी प्रार्थना स्वामींना करते. तू एका फौजीची बायको आहेस, इथेच तू आधी स्वतःला मग इतरांना जिंकले आहेस. म्हणून कधी ही खचू नकोस, बघ किती अनोळखी व्यक्ती तुझ्या व्हिडिओज झ ला प्रेम देत आहेत❤❤❤

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 2 месяца назад

    Tumche vichar khupach chan aahet .kharach Annapurna devicha aashirwad aahe.tumche short video khupach bhari aahet.

  • @snehalagokhale5481
    @snehalagokhale5481 6 месяцев назад +1

    आताच तुझा व्हिडिओ पहिला.किती छान बोलतेस गं. मी याआधी पण कॉमेंट केली आहे पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप आशिर्वाद,,😊

  • @chitrajoshi8044
    @chitrajoshi8044 Месяц назад

    आरती तुला खूप खूप आशिर्वाद, तुझ्या recepies खूपच छान असतात व सोप्या असतात,keep it up

  • @harshaslife19
    @harshaslife19 5 месяцев назад

    छान वाटलं तुमचा अनुभव ऐकून . माझ सुद्धा युट्युब चॅनेल आहे तर आपला युट्युब अनुभव शेअर करत जा 😊

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane1753 6 месяцев назад +1

    आरती तू पाचोरा तालुक्यातील नेमकी कोणत्या गावची aahe तू त्या गावच नांव सांग

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 4 месяца назад

    प्रेरणादायी आहे तुझा हा व्हिडिओ. ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Месяц назад

    आरती खूप छान व्हिडिओ झालाय तू एक फौजी पत्नी आहेस आणि नुसते घरी बसून न राहता तुझे पाककला कौशल्य छान आहे तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे खूप खूप कौतुक ❤

  • @nehatawde6984
    @nehatawde6984 6 месяцев назад +1

    आरती तू फौजी पत्नी तर आहे स सर्च तू खूप बोलकी खूप सुंदर आणि तुझ्याबद्दल आता खूप आत्मीयता वाटू लागली अशीच कायम राहा सॉंग

  • @deeparajwadkar6259
    @deeparajwadkar6259 5 месяцев назад

    Khup chan Aarti mast mahiti dilis aajkal chya mulina tya mulini tuzya kadhun prerna ghetali pahije all the best tula pudhachya vatchali karta

  • @user-pq2qj5yw3f
    @user-pq2qj5yw3f Месяц назад

    आरती प्रयत्न करीत रहा, देव तुझ्या पाठीशी आहे, नेहमी तुला यश मिळणार आहे

  • @user-ss8tj7ex9u
    @user-ss8tj7ex9u 6 месяцев назад

    आरती स्वामी कधीही आपल्या पाठीशी असतात उभे जो मेहनत करतो त्याला साथ देतात तुझी कहाणी माझ्या डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ 👌👌🙏 हिम्मत कधीच हरवू नकोस असे स्वतःला कामांमध्ये गुंतवून ठेव मला खूप खूप आवडतात तुझ्या रेसिपी

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ

  • @suchitrapawar2239
    @suchitrapawar2239 6 месяцев назад +1

    मधुरा रेसिपी पेक्षाही तुमच्या रेसिपी साध्या सोप्या व रुचकर आहेत

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад

      🙏

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 4 месяца назад

      अशा कमेंट करू नयेत. कुणाशी तुलना करू नये.

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 6 месяцев назад +1

    पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आरती
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @HealthyCooking96
    @HealthyCooking96 6 месяцев назад +1

    Nice information dear आरती👍Sucess for your hard work एन consistency👏👏👍👍

  • @SwadGharchaPallaviChavan
    @SwadGharchaPallaviChavan 3 месяца назад

    अगदी बरोबर म्हटलं आरती तू एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते खूप वेळ द्यावा लागतो माझे पण यूट्यूब चैनल आहे झटपट स्वाद घरचा पल्लवी किचन या नावाने. आपल्या ऑडियन्स ने व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केले यातून आपल्याला एक नवीन उत्साह येतो नवनवीन रेसिपी बनवायला.

  • @kalpanakankariya6576
    @kalpanakankariya6576 6 месяцев назад

    आरती मी देखील तुझ्या रेसिपी मी रोज बघते.आज तू तुझ्या बद्दल सांगितलेली माहिती फार प्रेरणादायी आहे.मी तुझ्या पध्दतीने दम बिर्याणी केली होती.फार छान झाली होती.पण थोडी तिखट झाली होती.पण आता मसाला कमी टाकायची आठवण ठेवल.

  • @vrundadeshmukh1216
    @vrundadeshmukh1216 6 месяцев назад +1

    आरती खूप छान...माझे पती सुद्धा एक फौजी आहेत... मी सुद्धा या सर्व फेज मधुन गेले आहे. तू situation ला खूप छान फेस केलेस. Really proud of you❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 месяца назад

    आरती,तू खूप गोड मुलगी आहेस.❤
    तुझी हिम्मतच तुला पुढे घेऊन जात आहे.
    तुझ्या सर्वच रेसिपी छान असतात.मी नेहमीच
    तुझ्या सर्व रेसिपी बघते.काही करूनही बघते.
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹 तुझी भरभराट होत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️❤

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 2 месяца назад

    Tuzya recipe khup chhan sutsutit astat.tuze kout aahe.mulala samhaltes .tuze koutuk aahe
    .akun tu great aahed
    Tuze purna nav kay

  • @sunandasandhan8173
    @sunandasandhan8173 5 месяцев назад

    आरती, तुझे सगळे video खूप छान असतात, तुला खूप यश मिळो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐

  • @oldsongshindi5501
    @oldsongshindi5501 2 месяца назад

    मला तू खूपच आवडतेस.माझ्याकडून तुला खूप खूप शुभाशीर्वाद

  • @user-ni9yq8ez4r
    @user-ni9yq8ez4r 2 месяца назад

    Hlo aarti me tumchchya recipes khup chan aastat me tumche video navinch pahayala suruwat keli aahe aashad che talan khup aavdle tyamadhe jawriche peeth aaste hey Mala mahit navte aai karat hoti pn me itke laksh dile navte ata mala sanwanpak karayla khup aavdte tumhi khup sunder dista, bolta, recipes pn chan samjavta khup shubhechchha 👍👍 shri swami samarth 💐💐

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 Месяц назад

    Great. I love फौजी Indian army. Keep it up. All the best for your future journey. From satara

  • @smitagunjavate
    @smitagunjavate Месяц назад

    Hii. Tumchya recipe khup chan astat. Khup chan mahiti dili .khup chan bolta. Mastch.

  • @SheetalChavan-eo2uk
    @SheetalChavan-eo2uk 6 месяцев назад +1

    अरे व्वा नाशिकचि आहेस तु मीपण नाशिक मालेगाव खान्देंशी मि आजच बघीतला तुझा व्हिडिओ खुपच छाण बोलते सांगतेस पुढील वाटचालीस खुपखुप शुभेच्छा आरती

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद ताई

    • @damini.C11
      @damini.C11 6 месяцев назад

      माझं पण माहेर नाशिक, आणि सासर मालेगाव आहे.😊

  • @shobhakanawade9177
    @shobhakanawade9177 Месяц назад

    ❤❤HII AARTI TUZA AATA VIDIO PAHILA M HALICH TUZYA RESIPY BAGHYLA LAGLIY AKDAK SOPYA BHASHET V SUSUTIT TUZYA RESIPY ASTHATH V TUZA SWAMINVARCHA VISHWAS FAR MAHTWACHA AAHE ASACH RAHU DE KHUP MOTHI HO

  • @UlkaChaubal
    @UlkaChaubal 11 дней назад

    वाह फौजी पत्नी वाह तुझ खूप खूप कौतुक. ❤

  • @rutujawaigankar9671
    @rutujawaigankar9671 5 месяцев назад

    खुप छान माहिती.. मी सुद्धा घरी एकटीच असल्यामुळे माझं सुद्धा food चॅनल चालु केले आहे.. ❤