rain in maharashtra : तुफान पाऊस! नदी नाले तुडुंब भरले बंधारे फुल्ल kolhapur rain | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #rain #heavyrain #पाऊस #मुसळधार #मान्सून #मराठी #marathinews
    rain in maharashtra : तुफान पाऊस! नदी नाले तुडुंब भरले बंधारे फुल्ल kolhapur rain | Hello Baliraja
    एकीकडं राज्यातील अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळं शेतकरी हवालीदिल झालेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं सावट आहे. तर दुसरीकडं मात्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरूये. मुसळधार पावसामुळं नदी, नाले, ओढे, तलाव जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भरले आहेत.
    कोल्हापूर जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या दमदार पावसामुळं वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आलं आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यानं वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली, बस्तवडे व चिखली बंधारे पाण्याखाली गेलेत. मुरगूडसह शिंदेवाडी व यमगे गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सरपिराजीराव तलावाच्या पाण्याची पातळी १७.१० फुटावर गेलीये.
    भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मौनी सागर जलाशय भरला आहे. येथील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वेदगंगा नदी पात्रात होऊ लागला आहे. याचबरोबर सतत सुरू असणाऱ्या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना पहायला मिळत आहे. असाच जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासात वेदगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
    -----------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 1